Tuesday, May 18, 2021

प्रदूषण आणि भगीरथाचे सौरचक्र


महाराज, गंगेची पातळी दिवसे दिवस कमी होत चालली आहे. आता प्रजेला महिन्यातूनतून फक्त एक दिवस पाणी पुरवठा केल्या जाऊ शकतो. कृपया आपण याची अनुमती द्यावी. भारी मनाने महाराज भगीरथाने या आदेशावर हस्ताक्षर केले.

महाराज भगीरथ विचार करू लागले. असे किती दिवस चालणार. बिना उर्जेचे आज कुठलेच कार्य संभव नाही. उर्जेसाठी कोळसा जाळावा लागतो. विमान, वाहन इत्यादि  पाताळात साठलेल्या हलाहल विषापासून निर्मित पेट्रोलवर चालतात. मानवाला सुख आणि ऐश्वर्य प्रदान करणारे हे विष लाखों लोकांचे प्राणहि दरवषी घेते. वातावरणातील उष्मा वाढल्याने पृथ्वीवरचे ऋतू चक्र बिघडले आहे. पाऊसहि लहरी झाला आहे. कधी  पूर तर कधी दुष्काळ. असेच सुरु राहिले तर हिमालय पर्वतावर हिम राहणार नाही. गंगाहि अस्तित्वहीन होणार. अन्न आणि पाण्यासाठी लोक एका दुसर्याचे प्राण घेतील. कोट्यवधी प्रजाजन  उपाशी मरतील. 

भगीरथाने विचार केला सूर्यदेव जगाला उर्जा प्रदान करतात. ते पृथ्वीवर पसरलेल्या प्रदूषणाचे समाधान निश्चित करू शकतील. भगीरथाने सूर्यदेवाची आराधना सुरु केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सूर्यदेवाने भगीरथाला सौर चक्र प्रदान केले. 
 
भगीरथाने या सौर चक्राच्या मदतीने प्रदूषण रहित  ऊर्जा उत्पन्न केली. आता ऊर्जा निर्मितीसाठी  कोळसा किंवा हलाहल विषाची गरज संपली. पृथ्वीवरचे  प्रदूषण कमी झाले. रोगराई कमी झाली. पृथ्वीचे वातावरण पुन्हा पहिल्यासारखे झाले. पाऊस वेळेवर होऊ लागला. हिमालयावर पुन्हा हिमवृष्टी होऊ लागली. गंगेच्या पाण्याची पातळी वाढली.  प्रजाजन आनंदी झाले.   

No comments:

Post a Comment