Wednesday, December 25, 2013

हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे


मी रहात असेलेल्या उत्तम नगर भागात डिसेंबर महिना सुरु झाल्या बरोबर भाज्या स्वस्त होऊ लागतात. ४-५ किलोमीटर दूर एक मोठी सब्जीमंडी आहे व शिवाय दिल्लीचा ग्रामीण भाग ही जवळ आहे. शिवाय येथे दररोज जवळपास (किलोमीटर आतच कुठे न कुठे साप्ताहिक बाजार लागतोच). गेल्या सोमवारच्या बाजारात सर्वच भाज्या पालक, बाथू, सरसों, मुळा, गाजर इत्यादी १० किलो होत्या. फुलगोभी ही १० रुपये किलो आणि कोथिंबीर ५ रुपये पाव, त्यामुळे ३५ रुपये  किलो असलेले मटार घेणे परवडण्यासारखे. (मुंबई वाल्यांना जळण तर नाही होत आहे)  

दररोज संध्याकाळी घरी (७-७/३० मध्ये)पोहचल्या वर चहा बरोबर नाष्टा हा असतोच. उशीर झाला तर सरळ रात्रीचे जेवण (नऊच्या आत). आज २५ डिसेंबरची सुट्टी असली तरी कामानिमित्त कार्यालयात जावे लागले. संध्याकाळी ५ वाजता घरी पोहचलो. सौ. म्हणाली फुलगोभी घालून मटार पोहे चालतील का? हेच खाण्यासाठी हिवाळा केंव्हा सुरु होतो याची वाट बघत असतो.  (शिवाय बटाटे घालून कांदे पोहे खाण्यापेक्षा मटार पोहे केंव्हाही आवडणारच). मुलीचे लग्न झाल्या पासून घरात आम्हीतीन माणसेच. तसा मुलगाही भयंकर खादाडखाऊ आहे. तीन प्राण्यांसाठीच कृती देत आहे.

साहित्य: पोहे ४ वाटी, १ वाटी बारीक चिरलेली गोभी, ३/४ वाटी मटार, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची १.  शिवाय फोडणी साठी मोहरी व तेल. हळद (१/२ चमचे) तिखट/मीठ  (आवडीनुसार), चाट मसाला(एम डी एच) स्वाद वाढविण्यासाठी (१ चमचा), (साखर १ चमचा), लिंबू एक किंवा आमचूर पावडर (१ चमचा).

कृती: पोहे भिजवून घ्या (पोहे व्यवस्थित भिजलेले पाहिजे, पण जास्त पाणी ही नको व कमी ही नको पोहे भिजविणे पण एक कलाच आहे), कढई गॅसवर ठेवून तेल गरम झाल्यावर मोहरी फुटल्यावर हिरवी मिरची, मटार आणि फुलगोभी टाकून,  कढई वर झाकण ठेवून ३-४ मिनटे पर्यंत या  भाज्या शिजू ध्या.

२-३ मिनिटात पोहे पाणी पिऊन घेतात. हातानी पोहे पसरतात आहे, हे बघून हातानीच पोह्यात हातानेच तिखट, हळद, चाट मसाला, मीठ साखर सर्व बाजूनी टाकावी. चिरलेली कोथिंबीर ही अशीच टाकावी व नंतर लिंबू पिळावा. हलक्या हातानी पोह्यात वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिसळावे. गोळे न पडण्याची खबरदारी घेणे गरजेचे. ३-४ मिनिटात मटार गोभी शिजली वाटतच  पोहे कढईत टाकून परतावे  व झाकण ठेऊन १-२ मिनटे वाफ काढावी.  

वरून थोडी कोथिंबीर घालून गरमा-गरम पोहे,  लिंबाच्या लोणच्या बरोबर अप्रतिम लागतात. 

No comments:

Post a Comment