Tuesday, September 10, 2024

आर्थिक युद्ध: भारतीय मधाची बदनामी करण्याचे षडयंत्र

  


गेल्या 15 वर्षात भारतातील मधाचे उत्पादन 27000 MT वरून 1,33,200 MT (2022) पर्यंत वाढले आहे. 2030 पर्यंत ते दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. 
भारताने २०१३ मध्ये १९४ कोटी रुपयांचे मध निर्यात केले होते. २०२१-२२ मध्ये १२०० कोटी रुपयांचे मध निर्यात केले  

उत्पादित मधा पैकी निम्म्याहून अधिक मधाची निर्यात भारत करतो. या उद्योगात भारताच्या वाढती प्रगतीमुळे  परदेशी उत्पादकांचे नुकसान होणार हे उघड आहे. भारतीय मध उद्योगाला धक्का देण्यासाठी भारतातील बड्या कंपन्यांच्या  मधा बाबत भारतीय जनते मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम म्हणजे आर्थिक युद्ध.  यासाठी  एका कुप्रसिद्ध भारतीय  एनजीओच्या मदतीने भारतातील मध बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांची भारतातच बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या गेले. अधिकृत भारतीय प्रयोगशाळांकडून भारतीय कंपन्यांचा मध बनावट असल्याचे सिद्ध करणे शक्य नाही. पण आपल्या देशातील सुशिक्षित लोकही युरोप मधून कोणताही अहवाल आला की, कोणताही विचार न करता त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. याशिवाय या शिवाय आपले नौकरशाह असो, पत्रकार असो किंवा तथाकथित एनजीओ असो, पैशासाठी सहज विकले जातात. गेल्या वर्षी एका कुप्रसिद्ध भारतीय एनजीओच्या मदतीने आणि भारतीय मीडियाच्या मदतीने बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या गेले,

भारत हा उष्ण देश आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. येथील फुलांना सुगंध आणि गोडवा आहे. भारतीय मध औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे जगातील सर्वात जास्त मधाचे उत्पादन करणारा अमेरिका ही भारताकडून जास्तीत जास्त मध खरेदी करतो. आता युरोप बद्दल बोलायचे तर बहुतेक भाग थंड आहेत. तिथल्या फुलांना सुगंध आणि गोडवा नसतो. म्हणून, युरोपियन मधाचे शुद्धीचे मापदंड  वेगळे असल्याने या आधारावर भारतीय मधा बाबत संभ्रम निर्माण केला जाऊ शकतो. युरोपच्या एका देशातील एक लहान प्रयोगशाळा ज्यामध्ये 300 फुलांचे  मार्कर होते, त्यापैकी 85 टक्के युरोपियन फुले होती. भारतीय मधा बाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी या प्रयोगशाळेचा वापर करण्यात आला. भारतातील एनजीओच्या म्हणण्यानुसार, त्या प्रयोगशाळेत भारतातील सर्व प्रमुख ब्रँडच्या मधाची चाचणी घेण्यात आली आणि अहवालानुसार, युरोपियन मानकांनुसार, सर्वच मोठे भारतीय ब्रँडच्या खरे उतरले नाही. ते युरोपियन फुलांच्या मधाच्या मानकांनुसार नव्हते. भारतीय मधात भेसळ आहे, असा उल्लेख रिपोर्ट मध्ये नाही.  भारतीय एनजीओ ने ही तसे म्हंटले नाही. फक्त रिपोर्टचा दाखला देऊन संभ्रम निर्माण केला,

या अहवालाचा भारतीय मिळतात भरपूर प्रचार केला. मीडियानेही विचार न करता पंचायती चर्चा केली. भारतीय ब्रँडसची बदनामी केली. गंमत म्हणजे आपल्या ग्राहक मंत्रालयानेही तो अहवाल वेबसाईटवर टाकला. तिथे खरोखरच भारतीय मधाची  चाचणी झाली होती का?  असा प्रश्न कोणी विचारला नाही. मध उत्पादक कंपन्यांकडून संमती घेण्यात आली होती का? त्या प्रयोगशाळेला काही वैधानिक अधिकार होते का?  ज्या मध उत्पादकांची स्वतःची प्रयोगशाळा नाही, इतर प्रयोगशाळा ज्यांना भारत सरकारने यासाठी अधिकृत केले आहे, ते नियमितपणे त्यांच्या मधाची गुणवत्ता तपासून घेतात.  सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्या लॅबमध्ये भारतीय फ्लॉवर मार्कर होते का? चाचणी भारतीय नियमांनुसार झाली होती का? असे प्रश्न मीडियाने त्या एनजीओला विचारले नाही.

बाकीचे प्रश्न न मांडण्याचे कारण सांगायची गरज नाही. कारण सर्व समंजस लोकांना माहीत आहे. परिणामी, डाबर पासून ते पतंजली पर्यंतच्या सर्व भारतीय कंपन्यांना वर्तमानपत्र आणि टीव्हीवर मोठ्या जाहिरातींचे दाखले देऊन आपले शहर शुद्ध असल्याचे सांगावे लागले. यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. तरीही, बरेच लोक या अहवालावर विश्वास ठेवतील आणि कमी दर्जाचा विदेशी मध महागड्या किमतीत माल खरेदी करतील. 

खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल कसे तयार केले जातात याची सर्वांना कल्पना आली असेल. बाकी एवढे करून ही भारतीय मधाचा निर्यात वाढतच आहे. हे षडयंत्र पूर्णपणे फसले.  एनजीओ द्वारा भरपूर पैसा खर्च करून भारतीय  आणि अंतर्राष्ट्रीय ग्राहकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला तरीही  २३-२४ या वर्षात १४७०.८४ कोटी रुपयांचे 1,07,963.21 मेट्रिक टन मध निर्यात केले. 


Saturday, September 7, 2024

आर्य म्हणजे कोण : भारतीय ग्रंथांचा संदर्भ

आर्य नावाची जाती होती आणि ते  बाहेरून भारतात आले असे इतिहासकार बिना कोणत्याही आधारावर म्हणतात. भारतीय ग्रंथांच्या अनुसार आर्य  जातीवाचक किंवा समुदायवाचक शब्द नव्हे तर मानवीय गुणांच्या आधारावर आहे. आचार विचाराने श्रेष्ठ व्यक्तीला आर्य म्हंटले आहे. आपल्यातील समस्त दुर्गुणांचा नाश करून सद् मार्गावर चालणे म्हणजे आर्य होणे. 

इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुर॑: कृ॒ण्वन्तो॒ विश्व॒मार्य॑म् । अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥

इन्द्रं वर्धन्तो अप्तुर: कृण्वन्तो विश्वमार्यम् । अपघ्नन्तो अराव्णः ॥ (9/63/5)

या ऋचेचा सामान्य अर्थ इन्द्र अर्थात राजाने समाजात सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे  आणि दुर्गुणांचा प्रसार करणार्‍यांचा नाश करून आर्य धर्माचा प्रसार केला पाहिजे.  

महाभारतात  व्यासजी म्हणतात: 

न वैर मुद्दीपयति प्रशान्त,न दर्पयासे हति नास्तिमेति।
न दुगेतोपीति करोव्य कार्य,तमार्य शीलं परमाहुरार्या।।
(उद्योग पर्व)

जे विनयशील पुरुष विनाकारण कोणाचाही हेवा करत नाहीत आणि गरीब 
असतानाही दुष्कर्म करत नाहीत त्यांना 'आर्य' म्हणतात.
 
वशिष्ठ स्मृति म्हणते 

कर्तव्यमाचरन कार्य कर्तव्यमनाचरन 
तिष्ठति प्रकृताचारे स वा आर्य इति स्मृत. 

जो सत्कर्म करतो तो करणे योग्य आहे आणि वाईट कृत्ये करत नाही जी करणे योग्य नाही आणि जो चांगल्या आचरणात स्थिर राहतो तो आर्य होय.

श्रीमद् भगवत गीतेत  स्वयं भगवान कृष्ण म्हणतात: 
. 
अभ्यासाद धार्यते विद्या कुले शीलेन धार्यते ।
गुणेन जायते त्वार्य, कोपो नेत्रेण गम्यते ।।(अध्याय ५ श्लोक ८)

ज्ञान निरंतर अभ्यासाने प्राप्त होते, गुण, कृती, स्वभाव यांनी स्थिर होते, आर्य-श्रेष्ठ मानवी गुणांनी ओळखले जाते.


Thursday, September 5, 2024

लाकूड वापरा, झाडे जगवा.

मनुष्य स्वभावाने स्वार्थी असतो. वस्तू असो व प्राणी किंवा वनस्पती ज्यात माणसाच्या स्वार्थ दडला आहे त्यांना तो जपतो. आपल्या स्वार्थासाठी त्यांचे उत्पादन वाढवितो. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. 

तेव्हा नुकतीच सरकारी नोकरी लागली होती. सप्टेंबरचा महिना हा श्राद्धचा महिना असतो आणि याचवेळी सरकारी कार्यालयात हिंदी पखवाडा साजरा होतो. हिंदी पखवाड्यात अनेक कार्यक्रम होतात. निबंध प्रतियोगिता, अंताक्षरी प्रतियोगिता वादविवाद प्रतियोगिता, इत्यादी. या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते. त्या काळी कार्यालयांचा वेळ सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी सव्वा पाच हा होता. आमच्या  विभागात असे कार्यक्रम बहुदा संध्याकाळ ४ वाजता सुरु होत असे. त्यादिवशी वाद विवाद प्रतियोगिता होती. सकाळी हिंदी अनुभागाने वादविवाद प्रतियोगिता विषय सर्कुलर काढून सर्वांना कळविला. विषय आठवत नाही पण घरात लाकडाचा प्रयोग हा होता. नोकरीचे पहिलेच वर्ष होते म्हणून मी नाव दिले नाही. दुपारचे साडे तीन वाजले असतील हिंदी अधिकारी रूम मध्ये आले आणि म्हणाले पटाईतजी  तुम्ही पण भाग घ्या. मी उतरलो, माझे पहिलेच वर्ष आहे मला अनुभव नाही. अधिकारी, हसत म्हणाला, भाग घेतलेल्या शिवाय अनुभव मिळत नाही. मी तुमचे नाव सर्वात शेवटी टाकतो.दुसऱ्यांचे ऐकून तुम्ही तैयारी करू शकतात. आता माझा नाईलाज झाला,

माझ्या आधी १२ स्पर्धकांनी विचार मांडले. सर्वांनी घरात लाकडाचा उपयोग कसा कमी करावा जेणेकरून झाडांची कत्तल थांबेल. झाडे जगतील तर हिरवळ वाढेल पर्यावरणात सुधार होईल. त्यांची भाषणे ऐकता-ऐकता अचानक मनात विचार आला कृष्णा ने पूतनाचे दूध पिण्या ऐवजी रक्त प्राशन केले आणि तिचा मृत्यू झाला. पृथ्वीच्या वर जेवढे पदार्थ मिळतात त्यांचा आपण उपयोग केला तर पर्यावरणाला नुकसान होणार नाही आणि पृथ्वी ही नष्ट होणार नाही. 

भाषणाची सुरवात करत मी म्हणालो पूर्वी वसंत कुंज कुणी भागात अरावलीच्या टेकड्या होत्या. त्यावर जंगल होते. बिबट्या, कोल्हे, ससे इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य होते.  रोडी आणि स्टोन डस्ट साठी त्या सर्व टेकड्या माणसांनी खोदून टाकल्या. नंतर त्यात कचरा भरून  वसंत कुंज सारखी श्रीमंतांची कॉलोनी बनली. एकच हशा उमटला. घरांसाठी लोखंड अल्युमिनियम सिमेंट सर्वच आपण पृथ्वी खोदून बाहेर काढतो.  या सर्वांसाठी ऊर्जा लागते. त्यासाठी कोळसा खोदून काढावा लागतो आणि समुद्रातून हलाहल  विष अर्थात पेट्रोल ही काढावे लागते. तिथले जंगल नष्ट होतात. प्राणी पशू  पक्षी लुप्त होतात.  पन्नास ते शंभर वर्षांच्या आत ही घरे पडतात. त्यांच्या अधिकांश मलबा पुन्हा वापरता येत नाही.भूकंप आला तर लोकांना जिवंत काढणे ही कठीण असते.  मृत शरिरांना जमिनीत पुरले तर कब्रिस्तान भयंकर वेगाने जमीन गिळंकृत करतील. दिल्लीत हजारों एकड जमीन कब्रिस्तान ने गिळंकृत केली आहे. हीच स्थिती सर्वत्र आहे. 

आता लाकडांचा वापर केला तर काय होईल. गावांत आज ही जुन्या घरांचा भिंती बांधताना माती आणि बांबूचा वापर होतो. वरचा माला बांधायचा असेल तर लाकडांचा वापर होतो. छत खपरेल, नारळाची पाने इत्यादी पासून बनत असे. उन्हाळ्यात ही घरे थंड राहत असे. घरातील फर्निचर, दार, खिडक्या, पलंग  कपाट  लाकडांचेच बनविले पाहिजे. घर पडल्यावर माती पुन्हा वापरली जाऊ शकते. खराब लाकूड जाळण्याच्या कामी येते. स्मशानातील एका चितेवर वर्षात ६० ते ७० लोकांना मुक्ती मिळते.त्यासाठी दहा बारा झाडांचे लाकूड लागेल. वीस वर्षांत एक झाड कापण्या लायक होते. त्याकाळात त्याने भरपूर प्राणवायू दिली असते. चितेच्या  धुरापेक्षा शंभर पट तर निश्चित. पर्यावरण वाचवायचे असेल तर लाकूड बांबू इत्यादींचा जास्तीसजास्त वापर केला पाहिजे. ह्या सर्व वस्तू पृथ्वी वरच मिळतात. तिच्या शरीरावर घाव करायची गरज नाही.

प्रश्न फक्त झाडे लावण्याचा आहे. व्यवसायिक रीतीने झाडांच्या शेतीला प्रोत्साहन दिले तर झाडांची संख्या वाढेल. जंगल ही वाढेल. पशू पक्षी इत्यादींची संख्या वाढेल. वातावरणात प्राणवायू ही वाढेल.  पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम राहील. तीन मिनिटांचे भाषण पूर्ण झाले,सर्वांनी टाळ्या वाजविल्या.  मला ही पहिले बक्षीस मिळाले. 


 

Monday, September 2, 2024

जो दुसऱ्यांवरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला


जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)

[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].  

रोज सकाळी नळात पाणी येते. तरीही आपण भरून ठेवतो. टंकित पाणी साचवितो. कारण एखाद्या दिवशी नळात पाणी आले नाही तर चूळ भरायला ही पाणी मिळणार नाही याचा दिल्लीकरांना चांगलाच अनुभव आहे. आपली मुले शाळेत शिकतात. शाळा कितीही उत्तम असली तरी आपण महिन्यातून एखाद दिवस शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो आणि मुलाच्या अभ्यासाबाबत चर्चा करतो. कारण त्याची  अभ्यासात प्रगती झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते. 

पण आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. पण दुसऱ्यांवर  डोळे बंद करून ठेवण्याचा परिणाम काय होतो. उदा. दिल्लीत सोसायटीत राहणारे भाजीपाला सुद्धा मोबाईल वर मागवितात. याचा फायदा घेऊन दुकानदार बहुधा शिळी भाजीच घरपोच करतात. परिणाम लोक ताजी भाजी म्हणजे काय हे ही विसरून गेलेले आहेत. एकदा मी एका मित्राच्या घरी आलेली  शिळी भाजी परत केली आणि त्याला  घेऊन त्याच दुकानात  गेलो. तेंव्हा मित्राला कळले कित्येक वर्षांपासून त्याचा ओळखीचा दुकानदार त्याला शिळी  आणि खराब भाजी पुरवून ताज्या भाजीचे पैसे घेत होता. त्या दिवसापासून तो स्वत: बाजारात जाऊन भाजी आणू लागला.

छत्रपति शिवाजी महाराज खात्री केल्याशिवाय कुणावर ही विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी अफजल खान वर विश्वास ठेवला असता तर  स्वराज्य स्थापना झाली नसती.  दूसरी कडे पंत प्रधान नेहरुंनी हिंदी चीनी भाई भाई नाऱ्यावर विश्वास ठेवला. १९६२ युद्धात भारताचा दारुण पराभव झाला. 

आजच्या जगात दुसर्यावर विश्वास ठेवावेच लागतो. उदा: घर बांधायचे असेल तर ठेकेदारावर विश्वास ठेवावा लागतो.  पण घराचा नक्शा पास करून घेणे, बँक मार्फत लोनची व्यवस्था करणे, सरकारी अनुमती इत्यादी बाबी स्वत:च बघाव्या लागतात. विटा, सिमेंट, लोखंड कुठे चांगले आणि स्वस्त: मिळते हे ही पाहावे लागते. ठेकेदार किती ही विश्वासू असला तरी आपल्याला जातीने उभे राहून कामावर लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा कुठे घर मनाप्रमाणे आकार घेते. अन्यथा घराचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त. दुसर्यांवर अवलंबून राहायचे असले तरी  त्याच्या कामावर लक्ष हे ठेवावेच लागेल. त्या साठी थोडे कष्ट ही करावे लागतील.

ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात अन्यथा काय होते, या वरून एक जुनी कथा आठवली. 

पूर्वी  इक्ष्वाकु  वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.

आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही.  देवतांचा राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता विश्वामित्र सारख्या महान तपस्वी आणि इक्ष्वाकू वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला. रति  समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रानी मेनके सोबत संसार थाटला. राजा सत्यव्रताची गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. ते त्रिशंकू झाले. अधांतरी लटकले. त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली.  सत्यव्रताने तपस्या केली असती तर किमान मृत्यू  नंतर निश्चितच ते स्वर्गात गेले असते. 

सारांश एकच, प्रपंचातील कामे असो किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग, कार्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला स्वत:च कष्ट करावेच लागतात. तेंव्हाच कार्य तडीस जाते. समर्थांच्या शब्दातच,

व्याप आटोप करती
धके-चपटे सोसती
तेणे प्राणी सदेव होती
देखता देखता.
(दासबोध १५.३.७)

Saturday, August 31, 2024

इतिहासाची परिचय: शाळेतील ऐतिहासिक एन्काऊंटर

मी शाळेत होतो तेव्हा दिल्लीत अकरावी बोर्ड होता. आमची शेवटची बैच होती. शाळेचे नाव जरी नूतन मराठी असले तरी शाळेत शिकणारे ८० टक्के विद्यार्थी पाकिस्तानातून आलेले पंजाबी, मुलतानी आणि सिंधी शरणार्थी होते. पंधरा-वीस टक्के मराठी आणि दाक्षिणात्य विद्यार्थी होते. आज बहुतेक मराठी मुलांची संख्या दहा पेक्षा कमी असेल कारण करोल बाग  आणि जुन्या दिल्लीत मराठी लोकं बोटावर मोजणारे असतील. आठवीत मला संस्कृत मध्ये 90% मार्क्स मिळाले होते. मला लहानपणापासून वाचनाची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी जुन्या दिल्ली स्टेशन समोरच्या दिल्ली पब्लिक लाईब्रेरीचा सदस्य झालो होतो. हजारों हिंदी पुस्तके वाचली होती. नववीत हिंदी विषय घेण्याचा निश्चय केला. हिंदी शिकविणाऱ्या शिक्षक रमेशचंद्रांना एका मराठी विद्यार्थीने हिन्दी विषय घेतला याचा आनंद झाला. त्या काळात हिंदीत टॉपरला ही 75% मार्क मिळत नव्हते. नूतन मराठी शाळेची जयमंगला शास्त्री आर्ट्स मध्ये दिल्लीत प्रथम आली होती तिचे एकूण मार्क्स फक्त ७७ टक्के होते. संस्कृत मध्ये तिला ८० टक्यांच्या वर मार्क्स निश्चित मिळाले असतील. या शिवाय आर्ट्स विषय घेऊन आनंद कुलकर्णी (निवृत आयएएस) ही दिल्ली बोर्डात प्रथम आला होता. त्याकाळी टॉपर्सला कॉमर्स मध्ये ८०% पेक्षा कमी आणि सायन्स मध्ये ८५% पेक्षा  कमी राहत होते. 

आमच्या शाळेत बनारसचे शास्त्री सर संस्कृत शिकवायचे. हातात छडी घेऊन संस्कृत शिकवणारे बहुतेक ते एक मात्र शिक्षक असतील. संस्कृत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी वर ते मेहनत घेत असे, त्यामुळे संस्कृत शिकणाऱ्या दहा पैकी आठ विद्यार्थ्यांना 75 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळायचे (त्याकाळचे 75 टक्के म्हणजे आजचे 90 टक्के). बहुतेक सर्वच मराठी मुलांना 75 टक्के पेक्षा जास्त मार्क अकरावी बोर्डात मिळायचे. मी नववीत हिंदी विषय घेतला ही बातमी समजतात त्यांनी मला बोलावले. मला आठवते, हातात छडी घेऊन ते खुर्ची वर बसले होते. टेबल समोर मी उभा राहिलो. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी तोफ डागली. पटाईत, तुला पागल कुत्रा तर नाही चावला. मी नकारार्थक मान डोलवली.  मग हिंदी का घेतली? मी, "मला हिंदी आवडते". तुम्ही मराठी मुले हिंदी लिहिताना भयंकर चुका करतात. हिंदीतील सर्व मात्रा मराठी पेक्षा उलट्या आहेत. नापास होशील. मी, सर मला माहित आहे. मी चुका करणार नाही. ते प्रेमाने म्हणाले, बाळ तुझी हिंदी कितीही चांगली असेल तरीही 75 टक्के मार्क मिळणार नाही. संस्कृत घेशील तर तुला सहज ८० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि अकरावीत फर्स्ट डिव्हिजन ही येईल. हिंदी भाषा तर पंजाबी, मुलतानी शरणार्थी मुलांसाठी  आहे त्यांना जोडाक्षरांचे उच्चारण करता येत नाही  याशिवाय "ळ" शब्दही बोलता येत नाही. त्यांची मजबुरी आहे, तुझी नाही. आता मला राहावले नाही, आपले  इतिहासाच्या  पुस्तकात वाचलेले दिव्य ज्ञान त्यांच्यासमोर प्रगट केले. मी म्हणालो, सर, संस्कृत बोलणारे आर्य मध्य आशियातून येऊन सप्तसिंधू प्रदेशात निवास करू लागले होते. तुम्ही चूक.... शास्त्री सरांना उलटून बोलणारा विद्यार्थी मुळीच आवडत नव्हता. समोरच्या टेबलवर  छडी जोरात आपटत ते म्हणाले, मूर्ख आणि  गाढव आहेत ते. आर्य जर खरोखर असतील तर ते दक्षिण भारतीय असतील. बाकी तुला खड्ड्यात उडी मारायची असेल तर मार. हिन्दी घेतली तर तुझी फर्स्ट डिव्हिजन  येणार नाही, याची शंभर टक्के खात्री देतो. शास्त्री सरांची वाणी सत्य झाली.  भरपूर मेहनत घेऊनी हिंदीत मला फक्त ५४ टक्के मार्क मिळाले. सात मार्कांनी फर्स्ट डिव्हिजन हुकली. (संस्कृत घेतली असती तर 80 टक्के मार्क्स निश्चित मिळाले असते).  रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो होतो तेव्हा शास्त्री सरांची नजर चुकविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला सोडले नाही. भरपूर कान उपटले. पुढे अनेक वर्ष शास्त्री सर संस्कृत घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे उदाहरण देत होते. शास्त्री सरांचे न ऐकण्याचा परिणाम मला भोगाव लागला होता. बाकी माझ्या मोठ्या बहिणीने संस्कृत साहित्यात एम.ए. केले  आणि लहान भावाला ही बारावीत संस्कृत मध्ये 85 टक्के मार्क   मिळाले होते.

संस्कृत आणि विंध्यपार भाषांमध्ये सापडणारे अनेक शब्द पंजाब ते युरेशिया कोणत्याही भाषेत सापडणार नाही. त्यांना संस्कृत बोलणे अवघड जाते.  ऋग्वेदातील पहिला शब्दच "अग्निमिळे..." आहे.  साहजिकच आहे, आज ही जेंव्हा उत्तर भारतात चतुर्वेद पारायण यज्ञ होतात,  वेदज्ञाता ब्राह्मण दक्षिण भारतातून येतात. त्याचे कारण हेच. एवढेच काय हरिद्वार येथील एका अश्याच यज्ञात योगगुरू ने ही कबूल केले त्यांना गुरुकुलच्या  विद्यार्थ्यांना वेद पाठ असेल तरी  दाक्षिणात्य लोकांसारखे  उच्चारण जमणे शक्य नाही. 

आर्य नावाचा कबीला खरोखरच अस्तित्वात होता, तर तो दक्षिण भारतात कुठे तरी राहत असेल. युरेशियन असण्याचा प्रश्नच येत नाही. या शिवाय त्या भागात कुबड असलेल्या गायी ही नाहीत. जर आर्य मध्य आशियातून आले असते तर घोड्यांवर स्वार होऊन आले असते. ऋग्वेदातील इंद्र सेनेच्या सेनापती मुद्गलानीच्या रथाला बैल ऐवजी घोडे जुंपलेले असते. घोडे दुर्मिळ असल्यामुळेच घोड्यांच्या बदल्यात राजकुमारी माधवीच्या कथेचा जन्म झाला.

ब्रिटिशांना भारतीयांवर सदैव विदेशी राज्य करतात हे सिद्ध करायचे होते. आजच्या शासकांना हिंदू मत विभाजित करून थोक मतांच्या मदतीने निवडणूक जिंकायची असते. त्यांची लाचारी कळते. पण जेंव्हा शिक्षित लोक लेखन करताना ही स्वतचे डोके वापरत नाही तेंव्हा असे वाटते ते गुलामी मानसिकतेत जखडलेले आहे आणि स्व:विचार करण्याची क्षमता विसरून गेले आहे. या शिवाय देशात आजगायत  किमान दहा हजार जागी उत्खनन झाले आहे. सर्वच ठिकाणी हजारों वर्ष पूर्वीच्या मानवीय वसाहती मिळाल्या आहेत.  हे उत्खनन ASI आणि अनेक विश्वविद्यालयांनी केले आहे. पण   सर्व उत्खनांचे आकडे आणि निष्कर्ष एका ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयास एएसआय ने अजून ही केलेला नाही. आज देशातील एक विश्वविद्यालय हे आकडे एकत्र करत आहे. तरीही भारतातील प्राचीन वसाहतींची संख्या बघता, प्राचीन काळात भारतातून माइग्रेशन झाले असेल. आज ही मोठ्या प्रमाणात माइग्रेशन होत  आहे. 

बाकी आर्य हा स्वभावसूचक शब्द आहे.  कुळ आणि जातीशी काही एक संबंध नाही.



Thursday, August 29, 2024

समर्थ विचार: मुलाचे चालीनें चालावें

 समर्थ म्हणतात, 

मुलाचे चालीनें चालावें 
मुलाच्या मनोगते बोलावें.
तैसें जनासी सिकवावें.
हळु हळु.

समर्थ म्हणतात, ज्या प्रमाणे मुलांना त्यांच्या चाली प्रमाणे चालून त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजून शिकवावे लागते. तसेच लोकांनाही त्यांचें मन सांभाळून उत्तम आचार - विचार त्यांच्या मनात भरावे लागतात. यासाठी वेळ द्यावा लागतो. 

आपण कुणाला शिकवू शकतो हा सर्वात मोठा भ्रम आहे. आपण स्वतः ला कितीही मोठे विद्वान समजात असला तरी आपण दुसऱ्याला शिकवू शकत नाही.  प्रत्येक व्यक्ती हा स्वतः शिकतो. छोटा बाळ पहिले आईचा स्पर्श ओळखणे शिकतो. नंतर कानाने आवाज ओळखणे शिकतो.  डोळे स्थिर झाल्यावर चेहरा ओळखणे शिकतो.  एकदा की दुधात पॉवर विटा टाकून दिला. बाळाला त्याच्या स्वाद आवडला की साधे दूध त्याला चालणार नाही. जिभेला स्वाद आवडू लागतात.  घरात जर दुधी भोपळा, तोराई, कारले मुलांना जेवणात दिले नाही तर मोठे झाल्यावर ही त्या भाज्या त्यांना आवडणार नाही. तुम्ही दुसऱ्याशी खोटे बोलाल तर तुमचा मुलगा ही तुमच्याशी खोटे बोलणार. बाप जर  घरात  दारू पीत असेल  आणि त्याच्या  मुलाने दारू पियू  नये ही अपेक्षा बापाने ठेवणे व्यर्थ आहे. याच्या अर्थ प्रत्येक मुलगा त्याच्या ज्ञानेंद्रियांना जे काही कळते, समजते त्या आधारावर त्याच्या मनात असंख्य प्रश्न उठतात. त्या प्रश्नांचे उत्तर तो आई वडील आणि घरातील सदस्यांचे आचरण पाहून हळु हळु शोधतो. जन्माच्या पहिल्या श्वासा पासून ते अखेरच्या श्वासा पर्यन्त आपण शिकणारे लहान बाळच असतो. जे काही शिकतो त्यानुसार आपले व्यक्तित्व घडत राहते.

भौतिक शास्त्रज्ञ प्रोफेसर एच. सी, वर्मांच्या मते शाळेकरी मुलांच्या मनात सतत प्रश्न उठत राहतात.  त्यांना  स्वतः प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मदत करणे हेच शिक्षकांचे शैक्षणिक कार्य. जर मुलाला उत्तर सापडले नाही तर त्याला शिक्षणात रस राहणार  नाही. कदाचित तो उत्तम गुणांनी पास ही होईल. पण त्या विषयाचे व्यवहारिक ज्ञान तो आत्मसात करू शकणार नाही. नवीन आविष्कार  करू शकणार नाही. आचार्य विष्णु शर्माने पशु-पक्षी आणि जनावरांच्या गोष्टी सांगून राजकुमारांना राजनीती शिकवली.  उपनिषदांमध्ये प्रश्न विचारण्या वरच जास्त जोर दिला आहे. शिष्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे हेच गुरूचे काम.  म्हणूनच प्रोफेसर एच. सी. वर्माने भारतीय शिक्षा बोर्डच्या विज्ञानाचे पुस्तके  तैयाऱ करताना पंचतंत्र आणि उपनिषद दोन्ही विचारधारांचा समावेश केला आहे. विद्यार्थी प्रश्न विचारून त्यांच्या चालीने शिकतील. 

समर्थांनी १२ वर्ष तप केले. वेद, उपनिषद सहित अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले. १२ वर्ष भ्रमण करून त्याकाळची देशाची परिस्थिती समजली. मोगलांच्या अत्याचाराने प्रजा त्रस्त होती, देवळे तोडली जात होती. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती.  लुटणार जाळ पोट हत्या नित्याचे काम होते. प्रजेत अत्याचारांच्या विरोधात लढण्याचे त्राण ही उरले नव्हते.  प्रजा खरा धर्म विसरून गेली होती. चमत्कारी पीर फकीर बाबांच्या नादी लागून चमत्कारात धर्म शोधत होती. मोगली राक्षसी अत्याचारांपासून प्रजेचे रक्षण करण्यासाठी श्रीराम आणि हनुमंता सारखे धर्म पारायण शूर वीर व्यक्तित्व कसे घडवायचे हा प्रश्न समर्थांच्या समोर होता. लहान मुलांसारखे असंख्य विचार त्यांच्या मनात ही उठले असतील. त्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधली. समर्थांनी त्या सर्व प्रश्नांचे समाधान श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून केले. श्री सार्थ दासबोधाचे नित्य पारायण करता-करता सहजच आपल्याला मनात उठणाऱ्या प्रश्नांची उत्तरे हळु हळु मिळू लागतात. संसारात आणि अध्यात्म दोन्ही क्षेत्रांत आपली उन्नती होते. 




Saturday, August 24, 2024

पैलवान गंगाबाई

पैलवान दादासाहेब पाटील मोठे जमींदार होते. तालुक्यात त्यांचे वचक होते. एकदा जिल्हा स्तरावर एक कुस्ती जिंकली होती. तेंव्हा पासून ते आपल्या नावासमोर पैलवान बिरूद लावायचे. गावाची आणि तालुक्याची कुस्ती चमू तेच निवडायचे. त्यांचीच मुलगी गंगाबाई अर्थात गंगू. गंगू १६-१७ वर्षाची असताना तिलाही कुस्तीचा शौक झाला. दादासाहेबांनी तिच्यासाठी मुलींच्या आखाड्याची स्थापना गावात केली. तालुका स्तरावर होणाऱ्या स्पर्धांसाठी ते गंगूला पाठवू लागले. गंगूला एक ही कुस्ती जिंकता आली नाही. शेवटी दादा साहेबांनी शक्कल लढवली. गंगू एक कुस्ती जिंकली. दादासाहेबांनी आखाड्याचे नाव "पैलवान गंगूबाई मुलींचा आखाडा" ठेवले. लवकरच योग्य मुलगा बघून तिला सासरी पाठवून दिले आणि दादा साहेबांनी मुक्तीचा श्वास सोडला.

आता गंगू दोन पोरांची आई आणि तीस वर्षाची झाली होती. पुढील आठवड्यातच तालुकाचा चमू निवडण्यासाठी पैलवानांची निवड होणार होती. सकाळची वेळ होती दादासाहेब झोपाळ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. अत्यंत गोड आवाज दादू, मी आले, त्यांच्या कानावर आदळला.  दादा साहेब मनात पुटपुटले, काही ना  काही काम घेऊन ही आली असेल. गंगू ने येताच दादासाहेबांना नमस्कार केला आणि आत केली.  गंगू एकटीच आली, हे दादासाहेबांना थोडे खटकले पण त्यांनी विचार केला, नातवांची शाळा बुडेल म्हणून त्यांना घरीच सोडून आली असेल. एक दोन दिवसात जाईल परत.

थोड्या वेळाने माय -लेकी दोन्ही बाहेर आल्या.  पाटलीन बाई कडकं आवाजात म्हणाल्या, अहो! पाटील लेक काय म्हणते ऐकून घेता का? तिची छोटीशी इच्छा आहे, तुम्हाला सहज जमेल. दादा साहेबांनी गंगू कडे पाहिले, दादू, मला किनई यंदाच्या निवड स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. काय, तुझे डोक्स  ठिकाणावर आहे का? कुस्ती सोडून दहा वर्ष झाली तुला. गंगू ,"त्यासाठीच लवकर आली आहे. पाच दिवसांत ट्रेन होऊन जाईल, बाकी तुम्ही पाहून घ्या". तिला टाळण्यासाठी दादासाहेब म्हणाले,  गंगू तुझे वजन किती,माहित आहे का? "म्या ६० किलो आहे", गंगू उतरली.  ६० किलोत तुझ्या मामे बहिणीची निवड केली आहे. गंगू , मला माहित आहे, मी ५० किलो वर्गात भाग घेईन. ५० किलो वर्गात चुलत्याची लेक आहे. गेल्या वर्षी ती निवड स्पर्धा जिंकली होती. पुढे जिल्हा स्तरावर तिने काय दिवे लावले होते ते ही मला माहित आहे, तिच्या जागी मी खेळणार. किंवा आम्ही दोन्ही खेळू.  पण, गंगू  तुला खेळवायचे ठरवले तर कुणाला तरी बाहेर करावे लागेल. "यमुला काढून टाका तशीही ती आपल्या नात्यात नाही".  पोरींची जिद्द पुरविण्यासाठी दादासाहेबांनी चयन स्पर्धे आधी यमुला बाहेर केले. गंगू ने हीआखाड्यात कुस्तीची जोरदार तैयारी सुरू केली. 

निवड स्पर्धा पाहायला जवळपासच्या गावांतून शेकडो लोग आले होते. गंगू ताई जिंदाबादचे नारे ही लागत होते. तिच्या वर्गात आठ स्पर्धक होते. तिने तिन्ही कुस्त्या सहज जिंकल्या. लोग तिचा जयजयकार करू लागले. सर्व कुस्त्या संपल्या. दादासाहेबांनी निकाल जाहीर केले. जास्त वजन असल्याने त्यांनी गंगूला अपात्र केले. तिन्ही कुस्त्या जिंकल्या म्हणून गंगूची भरपूर प्रशंसा केली. चुलत्याच्या मुलीचे चयन झाले.  दादासाहेबांनी नि:स्पृहता पाहून लोक त्यांचा जयजयकार करू लागले. पैलवान गंगू ताई जिंदाबादचे नारे ही हवे तरंगू लागले.

अपात्र झाली तरी काय झाले. तिन्ही कुस्त्या जिंकून ती निर्विवाद चॅम्पियन होती. दादा साहेबांनी त्याच संध्याकाळी तीची विजय मिरवणूक काढली. लोकांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. तालुक्यातील प्रस्थ मंडळींनी बक्षिसांची घोषणा केली. याच क्षणाचे स्वप्न गंगू पाहत होती. अखेर तीची इच्छा पूर्ण झाली. मनातल्या मनात तिने कुणाचे तरी आभार मानले. 

Friday, August 23, 2024

शतशब्द कथा: मला ते मेडल हवे

दहा वर्षाची चिऊ धावत-धावत आली आणि म्हणाली, बाबा-बाबा मी पैलवान बनणार, ओलंपिक खेळणार आणि मेडल आणणार. वा! छान, सुवर्णपदक आण बेटी. चिऊ नाक मुरडत म्हणाली, जमणार नाही, बाबा. अच्छा मग चांदीचे, चिऊ ने  नकारात्मक मान हलवली. अखेर बाबा म्हणाले, आम्हाला तर कांस्य पदक ही चालेल. आपल्या देशात कांस्य पदक जिंकणार्याला ही एखाद कोटी मिळतात. चिऊ चिडून म्हणाली, बाबा, जे पदक मिळाल्यावर लोकं माझा रोड शो करतील. माझ्या अंगावर गुलाब फुलांचा वर्षाव होईल आणि मला करोडो रुपये मिळतील, मला ते मेडल हवे आहे.

Thursday, August 22, 2024

जुनी कथा: बेडूक आणि सर्प

=फार जुनी नीती कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली.

सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्या  परिस्थितीत ही बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली. तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्याभराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. 

सर्पाने विचारले, ते कसे शक्य आहे? बेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहे, त्यात शेकडो बेडूक राहतात, त्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहीर पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहीरीत राहून, मी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकच, महिन्याभरानंतर तुला विहीर सोडावी लागेल. सर्पाला आनंद झाला, त्याने पटकन बेडकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटी प्रमाणे  सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, अटी वैगरे जुनी गोष्ट झाली, बेडूक माझे जेवण आहे, विहिरीतल्या सर्व बेडकांचा फडशा पाडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही. सर्पाने त्या बेडकाला गिळून टाकले. सर्पाला विहीरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच होता.

आज ही परिस्थिती बदललेली नाही. काही राजनेता विदेशी सर्पांच्या मदतीने सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरी कडे अज्ञानी मतदाता जातीच्या राजनीतीचा शिकार झालेला आहे. त्याला आपला विनाश ही दिसत नाही आहे. 


Monday, June 10, 2024

मतदान केंद्र व्यवस्थापन

मतदारांनी जास्त संख्येने येऊन आपल्या पक्षाला मतदान केले पाहिजे यासाठी मतदान केंद्राचे व्यवस्थापन गरजेचे असते. सौप्या भाषेत बूथ मॅनेजमेंट हा शब्द वापरला जातो. 

आपण जेंव्हा मतदान करायला जातो. केंद्राच्या बाहेर काही अंतरावर प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते, आपण टेबल खुर्चीवर बसलेले पाहतो. त्यांच्यापाशी मतदारांची लिस्ट असते. ते मतदाराला मत कसे टाकायचे याचे मार्ग दर्शन करतात. बूथ वर येणाऱ्या मतदारांचा  हिशोब ठेवतात. इत्यादी. मतदान केंद्रात ही आत प्रत्येक पक्षाचे एजंट असतात. ते मतदान सुरू आणि पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात. या शिवाय बोगस मतदारांवर ही लक्ष ठेवतात.

मतदान करणे हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. मग राजनीतिक पक्षांना बूथ मॅनेजमेंट करण्याची गरज काय हा प्रश्न मनात येणार.  ज्याचे मुख्य कारण मतदारांची असलेले भिन्न भिन्न प्रकार. 

कट्टर मतदाता हे आंधी,पाऊस किंवा भयंकर ऊन असो ते मतदान करणारच. अश्या मतदारांची संख्या २० ते २५ टक्के असते. दुसरा प्रकार संघटीत मतदाता. हे ही सामान्य मतदान पेक्षा जास्त मतदान नेहमीच करतात. 

बाकी उरलेल्या मतदारांनी मतदान केंद्रात घेऊन मत द्यावी यासाठी बूथ मॅनेजमेंटची गरज असते. पहिल्या प्रकारचे मतदार:  कुंपणावरचे आणि वाऱ्यावरचे मतदार. कुंपणावरचे मतदार कुंपणावर बसलेल्या पक्ष्यांसारखे असतात. ते दाना-पाण्यासाठी मतदान करतात. वाऱ्यावरच्या मतदारांच्या मनात फक्त एकच इच्छा असते त्यांनी ज्याला मत दिले आहे तो निवडून आला पाहिजे. यांचे स्वतःचे काहीही विचार नसतात. पक्षाच्या बूथवर असलेली भीड पाहून ते त्या पक्षाला मतदान करतात. या दोन्ही प्रकारातल्या मतदारांची संख्या पाच ते सात टक्के असली तरी अटीतटीच्या सामन्यात यांचे महत्त्व वाढते. उदाहरण माझ्या मतदार संघात 25 लक्ष वर मतदार आहे. कोणत्याही पक्षाला या लाख मताचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. 

आता उरले उदासीन मतदार. या मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी पक्षांना सर्वात जास्त मेहनत करावी लागते.  मतदानाच्या किमान आठवड्याभरात आधी पाच ते दहा कार्यकर्त्यांसोबत घरी-दरी जाऊन पक्षाचे प्रचार साहित्य, उमेदवाराची माहिती देऊन पक्षासाठी मत देण्याची विनंती करावी लागते. पदयात्रा, स्थानीय  नेत्यांच्या सभा इत्यादीसाठी भीड ही एकत्र करावी लागते. या शिवाय एक दिवस आधी प्रत्येकाच्या घरी जाऊन पर्ची ही द्यावी लागते. आमचे मतदान केंद्र अर्धा किमी दूर सरकारी शाळेत आहे.  मी तर प्रत्येक पक्षाच्या बूथ वर नमस्कार-चमत्कार करत मतदान करायला जातो. अनेकांशी गाठी भेटी हातात. पण आळशी मतदारांसाठी ई  रिक्षांची व्यवस्था ही करावीच लागते. मतदानाच्या दिवशी ही घरी जाऊन आठवण करून द्यावी लागते. 

आपल्याला कल्पना आलीच असेल. बूथ मॅनेजमेंट साठी प्रत्येक बूथवर  पाच ते दहा  कार्यकर्त्यांची गरज असते. आजच्या काळात कोणीही फ्री मध्ये काम करत नाही. बूथ मॅनेजमेंट म्हणजे गल्ली बोळ्यातील  स्वयंभू नेता आणि कार्यकर्त्यांसाठी  काही दिवसांचा रोजगार.  टेबल खुर्च्यांचे भाडे, स्टेशनरी खर्च. ई रिक्षाचा खर्च. याशिवाय मतदानाच्या दिवशी दोन वेळचा चहा नाश्ता, जेवण आणि रात्रीची पार्टी.  दिल्ली सारख्या शहरात एका मतदान केंद्राच्या बूथ मॅनेजमेंट खर्च २५ ते ५० हजार हा येतोच. अंदाजे खर्च पाच ते दहा कोटी प्रति लोकसभा सीट. याशिवाय कुंपणावरच्या पक्ष्यांसाठी होणारा दाणापाणीचा खर्च वेगळा.  बूथ मॅनेज करण्यासाठीं होणारा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात कधीच येत नाही कारण निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा पर्यादा घातली आहे. विभिन्न पक्षांचे कार्यकर्ता ही स्वतःच्या खिशातून एक पै खर्च करत नाही. पक्षाची मॉनिटरिंग कमी असेल तर गल्ली बोळ्यातील हे स्वयंभू नेता अधिकांश पैसा स्वतःच्या खिशातच घालतात आणि बूथ मॅनेजमेंट वर कमी खर्च करतात.  

उत्तम बूथ मॅनेजमेंट झाले तर पक्षाच्या उमेदवाराला पाच ते दहा टक्के मते जास्त मिळतात. पक्षाचा उमेदवार जिंकण्याची आशा वाढते. निवडणूक आयोग यासाठी खर्चाची व्यवस्थेबाबत निर्णय घेत नाही तो पर्यंत पांढरा पैसा यासाठी खर्च करणे राजनीतिक पक्षांना संभव नाही. निवडणुकीच्या दिवशी राजनीतिक पक्षाच्या बूथ वर भीड पाहून निकालाची भविष्यवाणी करता येते.






Thursday, May 16, 2024

पाकिस्तानचा सम्मान करा

पाकिस्तान हा भारताचा शेजारी आहे. एका अर्थाने भारताचा लहान भाऊ. पण सध्याच्या घटकेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिति बिकट आहे. महागाई 33  टक्क्यांनी वाढत आहे. जनता महागाई, बेरोजगारी इत्यादीने ने त्रस्त आहे. पाकिस्तानात सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. दुसरी कडे भारताची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशाची झपाट्याने प्रगति होत आहे. पण आपल्या लहान भावाची मदत करणे सोडून भारत त्याच्या छताडावर बंदूक रोखून उभा आहे. पाक व्याप्त कश्मीर मध्ये अराजकता माजवत आहे. पाकिस्तान मध्ये सर्जिकल स्ट्राइक करत आहे. अज्ञात व्यक्ति तिथल्या प्रसिद्ध शांतिपूर्ण लोकांची हत्या करत आहे. भारताचे पाकिस्तान सोबत असे वागणे निश्चितच उचित नाही. या परिस्थितीवर भारताच्या एका प्रसिद्ध अहिंसावादी नेता मनीशंकर यांनी विधान केले, हे असेच चालू राहिले तर तिथल्या पागल लोकांचे माथे भडकतील. त्यांच्या जवळ अणु बॉम्ब आहे. त्यांना तो बॉम्ब भारतावर फोडायला वेळ लागणार नाही. जर त्यांनी लाहोर मध्ये फोडला तरी अमृतसर नष्ट होणार. आपल्या देशाचे किती नुकसान होईल याची कल्पना करा.  हा विनाश थांबवायला असेल तर आपल्याला पाकिस्तानचा सम्मान केला पाहिजे. 

आता प्रश्न येतो. पाकिस्तानचा सम्मान कोणत्या रीतीने केला पाहिजे जेणे करून तो भारतावर अणु बॉम्ब टाकणार नाही. पाकिस्तानची भारताकडून काय अपेक्षा आहे यावर विचार करून काही उपाय शोधले. 

1. भारताने पाकिस्तान सोबत वार्ता पुन्हा सुरू करावी. 
2.  पाकिस्तानची सीमा पुन्हा खुली करून व्यापार सुरू करावा. 
3. ज्या प्रमाणे भारत आपल्या 80 कोटी लोकांना राशन फ्री देतो तसेच पाकिस्तानच्या जनतेला ही देण्यासाठी काही कोटी टन गहू, तांदूळ आणि  साखर उपहार स्वरूप पाकिस्तानला द्यावे. 
4. भारताने पाकिस्तान मध्ये शांतिपूर्ण लोकांची हत्या करणे त्वरित बंद करावे. 
5. भारतातील जेलांमध्ये बंद पाकिस्तानच्या शांतिपूर्ण नागरिकांची सुटका करून त्यांना पाकिस्तान मध्ये परत पाठविले पाहिजे. 
6.  पाकिस्तान मधून शांततेचा संदेश घेऊन भारतात येण्याचा प्रयत्न करणार्‍या शांतिपूर्ण पाकी नागरिकांची हत्या करणार्‍या सुरक्षा दलांच्या जवानांवर हत्येचे  केसेस दाखल करून त्यांना दंड दिला पाहिजे. बहुतेक पूर्वी असे होत होते. त्या वेळी कश्मीर घाटीतील भारतीय सुरक्षा दलांत एक म्हण प्रचलित झाली होती. "मर गये तो पेन्शन, बच गये तो टेंशन". 
6. नद्यांवर बांधलेले बंधारे तोडून सर्व पाची नद्यांचे संपूर्ण पाणी पाकिस्तानला दिले पाहिजे. जेणे करून तिथल्या शेतकर्‍यांना भरपूर पानी मिळेल. अन्न उत्पादन वाढल्याने तिथली महागाई दूर होईल. तिथल्या जनतेला स्वस्त अन्न धान्य मिळेल. 
7. सर्वात शेवटी कश्मीरचा भाग अत्यंत आनंदाने पाकिस्तानला सौपविला पाहिजे. असे केले की पाकिस्तान अत्यंत प्रसन्न होईल आणि भारतावर अणु बॉम्ब फोडणार नाही. 

जो पर्यन्त तानाशाह मोदीजींची सत्ता भारतात आहे. पाकिस्तानचा सम्मान होणे शक्य नाही. कारण आजच्या अशिक्षित सत्ताधीशांना विदेश नीतीचे ज्ञानच नाही. आपल्या शेजार्‍याला कसे प्रसन्न ठेवावे हेच कळत नाही. येत्या जून 4 नंतर मोदीजी पुन्हा सत्तेत आले तर पाकिस्तान मध्ये अराजकता माजवून पीओके घेण्याचा प्रयत्न भारत करू शकतो. अश्या परिस्थितित निराश होऊन पाकिस्तानी सैन्य भारतावर अणु बॉम्ब फोडू शकतो. येत्या निवडणूकीत पाकिस्तानचा सम्मान करणार्‍याच्या इरादा ठेवणार्‍यांना मत दिले तर भारतावर अणु बॉम्ब पडणार नाही. पाकिस्तानचा सम्मान करण्याचे आणिक काही उत्तम उपाय असतील तर ते प्रतिसादात सांगावे ही अपेक्षा. असो. 






Thursday, May 2, 2024

मध्यम वर्ग: मतदानासाठी कमालीची अनास्था

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा.  मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स.  हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार  मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान  केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत  मतदरांमुळे  शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहेत? खरे तर सर्वात  जास्त मतदान शिक्षित  मध्यम वर्गाने  केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते. 

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो.  मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही. 

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.



Thursday, April 18, 2024

किस्सा झीरो ऑईल मूगाच्या डाळीच्या गोळ्यांची कढ़ी

 दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी  प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात  आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 असते. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनकपुरी- विकासपुरी भागातील सांस्कृतिक चळवळींचे आदान-प्रदान करून, पोटातला भार हलका करून तीन एक वाजेपर्यंत सर्व  प्रसन्न मनाने घरी परततात.



सकाळी  लवकर उठून स्वैपाक केला कारण चिरंजीव आठ वाजता निघणार होते. चिरंजीव गेल्यावर सौ.अंघोळीला गेली. हा मौका साधून तृतीयांश वाटी मूग डाळ एका वाटीत गरम पाण्यात भिजवली. वाटी बैठीकीच्या खोलीत माझ्या पुस्तकांची रेक आहे. त्यात ठेऊन दिली. माझ्या बाबतीत सौ.चे नाक कान आणि डोळे अत्यंत  तीष्ण तरी तिला वास लागला नाही. अकरा वाजता सौ. बीसीला गेली आता तीन वाजेपर्यंत काळजी नव्हती. वाटी आणून स्वैपाक घरात ठेवली. 

दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली.  दोन चमचे  दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी  पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून  भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात  मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात  कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी  थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला. 

कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली.  दोघांना आवडली. 


Monday, April 15, 2024

बद्ध लक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ


आज श्रीमद् दासबोधातील बद्ध निरूपण समासाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्पबुध्दीने करत आहे. समर्थ म्हणतात सृष्टीत अनंत जीव आहेत तथापि त्यांचे चारच वर्ग आहेत.  बद्ध,  मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. पहिला प्रश्न मनात घेणार बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे बांधलेला जीव. याचे एक छोटेसे उदाहरण, एक माणूस कुत्र्याला साखळीने बांधून सकाळी फिरायला जातो. साखळीने बांधलेला कुत्रा प्रशिक्षित असेल तर तो मालकाच्या मागे निपुटपणे चालतो. पण प्रत्यक्षात आपण काय पाहतो. कुत्रा पुढे-पुढे पळत आहे आणि मालक त्याच्यामागे कसे तरी धडपडत साखळी पकडून कुत्र्याच्या मागे चालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कधी- कधी कुत्रा साखळी तोडून पळू लागतो. कुणालातरी चावतो. मग वादावादी, हाणामारी, ज्याला चावला त्याचा उपचाराचा खर्च, कधी-कधी कोर्ट केसेस इत्यादी ही मालकाच्या नशिबी येतात. कुत्रा पाळण्याचे सुख त्याला मिळत नाही. पण मनस्ताप मात्र नशिबी येतो. दुसऱ्या शब्दांत इथे कुत्र्याच्या मोहात पडून कुत्र्या ऐवजी मालकच साखळीने बद्ध झालेला आहे. आपल्यापाशी  नाक, कान, डोळे, स्वाद, स्पर्श, हात, पाय इत्यादी इंद्रिय रुपी कुत्रे आहेत. आपण जर या इंद्रिय रूपी कुत्र्यांच्या मोहात बद्ध झालो तर हे कुत्रे स्वैराचार करू लागतील. आपली दशा कुत्र्याच्या मालका सारखी होईल.


चौऱ्यांशी लक्ष योंनीत भटकल्या नंतर आपल्याला मानव जन्म मिळतो. मानवाला देवाने बुद्धी दिलेली आहे. आपण या बुध्दीचा उपयोग जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी परमार्थ साधण्यात करणे अपेक्षित. समर्थांनी, आपल्याला परमार्थ साधण्याचा सोपा मार्ग कळला पाहिजे आणि आपल्या इंद्रिय रुपी कुत्र्यांना  मोह- माया पासून दूर ठेवण्यासाठी या समासात बद्ध लक्षणांचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात:


आता बद्ध तो जाणिजे ऐसा 

अंधारींचा अंध जैसा. 

चक्षुविण दाही दिशा.

शून्याकार.


ज्याच्या डोळ्यांसमोर सर्वत्र अंधकार आहे त्याला:


न कळे सारासार विचार.

न कळे स्वधर्म आचार.

न कळे कैसा परोपकार.

दानपुण्य.


न कळे भक्ती न कळे ज्ञान.

न कळे वैराग्य न कळे ध्यान.

न कळे मोक्ष न कळे साधन.

या नाव बद्ध.


डोळे नसलेल्या माणसाला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याच प्रमाणे बद्ध माणूस अंधारातच चाचपडत असतो. त्याला धर्माचा मार्ग माहीत नसतो. त्याला कर्माचा मार्ग माहीत नसतो. स्वधर्म, आचार, विचार माहीत नसतो. तीर्थ, व्रत, दान, पुण्य,ज्ञान, वैराग्य  तो जाणत नाही. दया, करुणा,  मैत्री, शांती, क्षमा त्याला माहित नसते. तो सदैव इंद्रिय जनित स्वार्थ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. तो सदा सर्वकाळ काम, क्रोध, गर्व, मद, मत्सर आणि असूयात बुडालेला असतो.  अश्या बद्ध व्यक्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:

नैंत्री द्रव्यधारा पाहावी. 

श्रवणी द्रव्यदारा ऐकावी. 

चिंतनी द्रव्यदारा चिंतावी

 या नाव बद्ध.


समर्थ म्हणतात, असा व्यक्ती काया, वाचा, मनसा द्रव्य दारेच्या भजनात व्यस्त असतो. स्वार्थापोटी सदैव अविचार त्याच्या मनात येत राहतात. तो कपट- कारस्थान रचतो, भ्रष्टाचार करतो, निष्ठुर  होऊन दुसऱ्यांचा जीव ही घेतो. सर्व प्रकारचे पातक तो करतो. शेवटी कोर्ट, कचेरी जेल यात्रा त्याच्या नशिबी येते.  


इंद्रिय सुखांचा बहु आनंद घेतल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी माणूस ग्रस्त होतो.  सांसारिक भोगांचा आनंद ही त्याला घेता येत नाही. अश्या बद्ध जीवाला परमार्थ साध्य होण्याच प्रश्नच येत नाही. त्याची स्थिती कुत्र्याच्या मालका सारखी होते त्याला मालक आपण आहोत की कुत्रा हेच कळत नाही. अश्या व्यक्तींसाठी समर्थ म्हणतात:


न कळे परमार्थाची खूण.

न कळे अध्यात्म निरूपण.

न कळे आपणास आपण. 

न कळे तत्वतः केवळ.

या नावबद्ध


साडे तीनशे वर्ष आधी समर्थांनी ज्या बद्ध लक्षणांची वर्णने केली आहे ती आज ही आपण सर्वत्र पाहतो. आज आपण घर राहण्यासाठी नाही तर इंद्रियांना सुख देणाऱ्या एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादींनी सजविण्यासाठी घेतो. डोळ्यांना घर सुंदर दिसावे म्हणून भिंतींवर रासायनिक पेंट लावतो. अंघोळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तर शरीर सुंदर दिसण्यासाठी करतो. त्यासाठी रासायनिक साबण, शेंपू, क्रीम वापरतो. केसांना कलर करतो. जेवण शरीराच्या पोषणासाठी ऋतु अनुसार नव्हे, तर जिभेच्या स्वादासाठी करतो. पित्झा, बर्गर, चॉकलेट, केक, मैग्गी, इत्यादी खातो. स्टेटससाठी एसी कार वापरतो. स्वतःच्या अपरमित अनंत ईच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात नवरा बायको दोन्ही जीवापाड मेहनत करतात. क्षण भराचा अवकाश ही त्यांना मिळत नाही.


 इंद्रिय भोगात आत्मकेंद्रित झाल्याने ते अति व्यवहारी बनतात.  त्यांना आई वडील ही इंद्रिय सुखाच्या मार्गात बाधा वाटतात. काहींना तर मुल-बाळ ही नकोसे वाटतात. कुत्रा पाळून हौस भागवतात. आजच्या या अश्या पिढीसाठीच बहुतेक समर्थांनी साडे तीनशे वर्षापूर्वी म्हंटले आहे:


जागृति स्वप्न रात्रि दिवस

ऐसा लागला विषय ध्यास.

नाही क्षणाचा अवकाश.

या नाव बद्ध.


अश्या परिस्थितीत परमार्थ  देव धर्माचा विचार ही त्यांच्या मनात येणे  शक्य नाही.


पण शेवटी परिणाम काय.  त्वचेचे आजार,  वायू प्रदूषणामुळे होणारे अस्थमा  इत्यादी श्वसनाचे आजार. प्रदूषित पाणी आणि जेवणामुळे मधुमेह, हृदय रोग, कॅन्सर, इत्यादी आजार. लिव्हर किडनी खराब होतात. शरीराचे अवयव दुर्बल होतात. डोळे तर जवळपास सर्वांचे खराब होतात. जीवापाड मेहनत करून कमविलेला पैसा आजारात खर्च होतो. परिस्थीती अशी आहे जवळ पैसा असला तरी ५० टक्केहून जास्त वरिष्ठ नागरिक भविष्यात वृद्धाश्रमात दिसतील. आज जवळपास संपूर्ण समाज इंद्रिय सुखानसाठी बद्ध झाला आहे. माणसाच्या अति उपभोगामुळे पृथ्वीचे पर्यावरण बिघडले आहे. त्याचे वाईट परिणाम ही आपण भोगतो आहे. शेवटी बद्ध व्यक्ती संसारात तर अपेशी राहतोच, पण त्याला परमार्थ ही साध्य होत नाही.त्याची स्थिती ‘धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का’ सारखी होते.


समर्थांनी आजच्या पिढीला सावध करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रुपी कुत्र्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी, पहिली पायरी म्हणून या समासात जवळपास  १०० बद्ध लक्षणांचे विस्तृत वर्णन केले आहे. एकदा आपल्याला आपले इंद्रिय जनीत दोष कळले की आपण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूच. हे दोष कसे दूर करायचे याचे वर्णन समर्थांनी पुढील मुमुक्षु लक्षण या समासात केले आहेत.


जय जय रघुवीर समर्थ




Wednesday, April 3, 2024

वाढदिवस स्पेशल आलू बोंडे

आज माझा ६३वां  वाढदिवस. सौ. ने  वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून  गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत  शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.


पाच-सहा बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले. कोथिंबीर, कैरी, पुदिना (घरचा), आले, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची टाकून झणझणीत हिरवी चटणी बनवली. एक कांदा, चार टॉमेटो, लसूण, आले, आणि  थोडे तिखट टाकून थोडी टॉमेटोची लाल रंगाची सौम्य चटणी बनवली.

उकडलेले बटाटे थंड पाण्यात टाकून थंड करून किसले (असे केल्याने स्वाद उत्तम राहतो), त्यात १०० ग्राम पनीर ही किसून टाकले (पनीर हे पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही), थोडी फुल गोबी ही किसून टाकली.(चव मस्त येते). कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. हळद, आंबट, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एक जीव केले. हळद आणि मीठ टाकून बेसनाचा घोळ तैयार केला. मिश्रणाचे गोळे करून बेसनात बुडवून तेलात तळले.  सौ. ने सोम बाजारातून कमी तिखट वाल्या मोठ्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. उरलेल्या बेसनाच्या घोळात बुडवून मिरचीचे भजे केले. आलू बोंड्या सोबत चवीसाठी काही मिरच्या तेलात तळल्या. त्या मिरच्यांवर लिंबू पिळले.

झणझणीत भजे खाल्यानंतर. शिऱ्यावर ताव मारला. अश्या रीतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. 

Thursday, February 22, 2024

गजेंद्रू महासंकटि वाट पाहे

 जय जय रघुवीर समर्थ 

गजेंद्रू महासंकटि वाट  पाहे
तया कारणे श्रीहरी धांवता आहे.
उडी घातली जाहला जीवदानी 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी.(११८)

समर्थ म्हणतात, एकदा महा बलशाली गजेंद्र एका सरोवरात आपल्या परिवारासंगे जल क्रीडा करत होता. अचानक एका मगराने त्याचे पाय धरले आणि त्याला पाण्यात ओढू लागला. गजेंद्र जमिनीवर भल्या मोठ्या वृक्षांना सोंडेने उपटून टाकू शकत होता. सिंहलाही आपल्या पायदळी तुडवू शकत होता. पण पाण्यात या शक्तींचा काही एक उपयोग नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गजेंद्रने भगवंताचे स्मरण केले आणि मदतीची याचना केली. गजेन्द्रची आर्त हाक ऐकून भगवंत धावत गेले आणि गजेंद्रला मगर पाशातून मुक्त केले.

अनेक सुशिक्षित लोकांची ही धारणा असते, पुराण कथा म्हणजे भाकड कथा. प्रत्यक्षात पुराण कथा आपल्याला सांसारिक भोग भोगून ही परमार्थाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवितात. 

गजेंद्र म्हणजे बुद्धिमान मानव. सरोवरातील जलक्रीडा म्हणजे सांसारिक भोग. मगरपाश म्हणजे कधी न तृप्त होणारी भोगलिप्सा. भोगलिप्सेत बुडालेल्या मानवाच्या नशीबी अखेर फक्त सांसारिक दुःखच येतात. त्याला जन्म मरणाच्या  चक्रातून त्याला मुक्ती मिळणे अशक्यच. 

आजच्या घटकेला मानवाला आपल्या शक्ती आणि बुध्दीचा अहंकार झाला आहे. अहंकार सोबत मद, मोह, मत्सर आणि वासना ही बलवती होतेच. मानवाला वाटते सर्व पृथ्वी फक्त आपल्याच भोगण्यासाठी आहे. आपल्या अपरिमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समस्त वनस्पती आणि जीव सृष्टीचे विनाश करतो आहे. एक उदाहरण, कीटक, पशु-पक्षी शेतीला त्रास देतात. पशु - पक्षी, जनावरांना मारून टाका. जमिनीत जहर टाका, विषाक्त रसायन हवेत उडवा. कीटकांचा विनाश करा. असे करताना आपण विसरून जातो की हे विषाक्त अन्न आपल्यालाच खायचे आहे. मानवाचा अहंकार तर एवढा मोठा की जो कोणी माझ्या भोग मार्गात आडवा येईल त्याला मी नष्ट करणार, मग तो मानव का असेना. एवढे सर्व करून मानवाची भोगलिप्सा शांत झाली आहे का. उत्तर नाही. पण या सर्व मानवीय दुष्कृत्यांचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. पृथ्वी मातेच्या अति दोहनामुळे अन्न जल आणि वायू दूषित झाले आहे. ग्लोबल वॉर्मिग मुळे पृथ्वीच्या वातावरण बिघडले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ रोजचे झाले आहे. हजारो लोक दरवर्षी युद्धात मरत आहे, वनस्पती जीव सृष्टी वेगाने नष्ट होत आहे. दर दुसरा व्यक्ती  शारीरिक आणि मानसिक व्याधीने ग्रस्त आहे. आपण असेच भोगरुपी मगर पाशात अडकून राहू तर सांसारिक सुख मिळणार नाहीच आणि परमार्थ सिद्ध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  याशिवाय  मानव जातीच नष्ट झाली तर अब्जावधी वर्षे आपल्याला लक्षावधी हीन योनीत भटकावे लागेल. कारण मोक्ष मार्गावर चालण्याची बुद्धिमत्ता फक्त मानवापाशी आहे, असे विद्वानांचे मत आहे.

प्रश्न मनात येणारच, या भोगरूपी मगर मिठीतून मुक्तीसाठी कुणाला याचना करायची.  समर्थ म्हणतात,  

दीनानाथ हा राम कोदंडधारी
पुढें देखतां काळपोटीं भरारी.
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. (२८)

जेंव्हा श्रीराम हातात धनुष्य बाण  घेऊन दुःखी भक्तांच्या मदतीला धावत येतात, तेंव्हा काळाचेही काही चालत नाही. कारण कोदंडधारी राम आपल्या भक्ताची  कधीही उपेक्षा करीत नाही. समर्थ पुढे म्हणतात,"नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" माझे वाक्य १०० टक्के सत्य आहे.

भगवंताचे नामस्मरण सांसारिक भोगातून मुक्तीचा सर्वात सौपा उपाय आहे. गजेंद्रने भगवंताचे नामस्मरण केले आणि तो मोह पाशातून मुक्त झाला. भगवंताचे  नाव घ्यायला काहीही खर्च येत नाही. कोणत्याही विधि- विधानाचे पालन करावे लागत नाही. जेंव्हा ही वेळ मिळेल, तेंव्हा उठता-बसता, जेवता, काम करता भगवंताचे  नामस्मरण करता येते. सतत नामस्मरण केल्याने हळू-हळू आपली वृत्ती पालटते. अहंकार नष्ट होतो. सांसारिक जीवनात उभोगाची आणि वासनेची मर्यादा आपल्याला कळते. भगवंताने निर्मित केलेल्या समस्त जीवसृष्टी प्रति प्रेम उत्पन्न होते. उपनिषदात स्वयं भगवंत म्हणतात, जो सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो, कुणाशीही घृणा करत नाही, सर्वांच्या जगण्याचा अधिकार जपतो, तोच मला प्राप्त करतो. असा व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो आणि सांसारिक मोहपाशातून मुक्त होतो. भगवंताच्या नाम स्मरणाने परमार्थाचा मार्ग सहज सुगम होतो. एवढेच नव्हे तर या मार्गावर चालून आपण समस्त मानव जातीला ही विनाशापासून वाचविण्यात हातभार लावू शकू. माझ्या मते समर्थांनी मनाच्या या श्लोकाच्या माध्यमाने मानव जातीला हाच उपदेश केला आहे.



Monday, February 5, 2024

वार्तालाप (३०): अहल्या शिळा राघवे मुक्त केली

अहल्या शिळा राघवे मुक्त केली 
पदी लागतां दिव्य होऊनी गेली. 
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.

समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे?  समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे.

महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले. श्रीरामाने महर्षि विश्वामित्रांना विचारले या आश्रमात ऋषी, मुनी, आचार्य, ब्रह्मचारी इत्यादी कोणीच का दिसत नाही? ऋषी विश्वामित्र म्हणाले, हे आश्रम गौतम ऋषींचे आहे. पूर्वी  देवराज इंद्राने महर्षि गौतम ऋषींच्या पत्नी अहल्येवर बलात्कार केला होता. अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले आणि गौतम ऋषींच्या आश्रमावर बहिष्कार टाकला. आज ही परिस्थिती विशेष बदललेली नाही. स्त्रीवर अत्याचार झाला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात. त्यावेळी ही समाजाने इंद्रासोबत अहल्येलाही दोषी ठरवले. तिला वाळीत टाकले.

एकदा समाजाने ज्या व्यक्तीशी "रोटी आणि बेटीचा" व्यवहार बंद करून वाळीत टाकले की त्या व्यक्तीची स्थिती एखाद्या वाळवंटातील दगडा सारखीच होते. अहल्येची स्थिती अशीच झाली होती म्हणून समर्थाने तिला शिळा असे संबोधित केले. समाजाने बहिष्कृत केले तरी काय झाले, परमेश्वरापासून तिला कोणीच दूर करू शकत नव्हता. माता अहल्येने श्रीरामांच्या भक्तीत जगण्याचा आधार शोधला. आपले दुःख आणि पीडा विसरून ती तपस्वी,  प्रभुरामचंद्रांच्या  नाम  स्मरणात दंग झाली. असो.

समाजातील वरिष्ठ, प्रतिष्ठीत लोकांना, उदा. गावातील सरपंच ते राजा इत्यादींना,  बहिष्कृत व्यक्तिला पुन्हा समाजात घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. पण निर्णय राबविण्यासाठी समाजाने त्या व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करून त्याला पुन्हा समाजाने  स्वीकार केले याची पावती देणे ही गरजेचे. बहुधा यासाठीच बहिष्कृत व्यक्तीने समाजाला किंवा गाव जेवण देण्याची परंपरा सुरू झाली. सौप्या शब्दांत बहिष्कृत व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करणे म्हणजे समाजाने त्याला स्वीकार करण्याची पावतीच.

माता अहल्या निर्दोष आहे, समाजाने तिच्या स्वीकार केला पाहिजे या हेतूने श्रीराम गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषी आणि माता अहल्याने सर्वांची पाद्यपूजा करून स्वागत केले. स्वतः माता अहल्याने पाण्याने श्रीरामांचे चरण धुऊन ते वस्त्राने पुसले. श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श अहल्येला झाला. त्याचेच वर्णन समर्थांनी  श्लोकात केले आहे. श्रीराम आणि लक्ष्मणाने  माता अहल्या आणि गौतम ऋषींचे चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. श्रीराम, महर्षि विश्वामित्र, सहित अनेक ऋषी मुनींनी त्यांचे आतिथ्य स्वीकार केले. ते दृश्य पाहून स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी करून श्री रामांच्या कृतीचे समर्थन केले. असे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. माता अहल्येवर समाजाने टाकलेला बहिष्कार संपला. तिला पुन्हा समाजात मान ताठ करून जगणे शक्य झाले. गौतम ऋषींच्या आश्रमात पुन्हा ऋषी, मुनी आचार्य आणि  शिक्षणासाठी ब्रम्हचारी  येऊ लागले. पूर्वी प्रमाणे आश्रमात यज्ञादी कार्य पुन्हा सुरू झाले. असो.

अहल्या उध्दार ज्ञात इतिहासातील एकमेव अद्वितीय घटना आहे, जिथे एक राजा, एका पीडित निर्दोष स्त्रीला न्याय देण्यासाठी स्वयं तिच्या घरी गेला. तिचे आतिथ्य स्वीकार केले. समर्थ पुढे म्हणतात, श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. वंचित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामचंद्र सदैव तत्पर असतात. अश्या भक्तवत्सल प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी ही शिणली, त्यात आश्चर्य काय.

Tuesday, January 2, 2024

विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती ....

 
११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले. मीही तिला "हाय  करत विचारले, निशा कशी आहेस, नितीन दिसत नाही, मार्कशीट घ्यायला गेला आहे का". ती उतरली, नितीन, अशोक सुरेंद्र आणि मंजू ही आलेली आहे. मार्कशीट इत्यादी सोमवारी मिळणार आहे. तसा बोर्डच ऑफिस बाहेर लागलेला आहे. मी: "मग ते कुठे  आहेत". ती म्हणाली, ऑफिसमध्ये थोडे गप्पा मारत आहे. आता येतीलच. हो एक सांगायचे राहिले, विवेक मी दिल्ली सोडून जात आहे, पण मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. अडखळत ती कसेबसे म्हणाली, विवेक तू मला आवडतो. खरेतर तिचे ते गोड शब्द ऐकून मीही मनात सुखावलो होतो, पण काय बोलावे कळले नाही. एक तर घरची परिस्थिती आणि दुसरे त्यावेळी स्वतःच्या पायावर उभी राहण्याची औकात ही नव्हती. मी काहीच बोललो नाही. फक्त मनाला बेचैन  करणारी शांतता .... तेवढ्यात मागून नितीनच्या आवाज आला, विवेक तू पण आला आहेस, काही फायदा नाही. थोड्यावेळ गप्पा मारल्यानंतर मी सर्वांना म्हणालो माझे घर जवळ आहे. घरी जाऊन थोडा चहा नाश्ता घेऊ, काय माहित, पुन्हा आपली कधी भेट होईल की नाही. अशोक, नितीन सोबत कारच्या पुढच्या सीटवर बसला. आम्ही चौघ मंजू निशा अशोक आणि मी कसेबसे एकमेकांना चिकटून मागच्या सीटवर बसलो.  सडपातळ असल्याने निशा आणि मी मध्ये होतो. गाडी सुरू झाली. काही वेळाने निशाने माझा हात तिच्या हातात घेतला मी तिच्याकडे बघितले. तिच्या मोठ्या डोळ्यांत साठलेले अश्रू मला स्पष्ट दिसत होते. मी डोळे बंद केले.

साला सो गया क्या, तेरा घर आ गया है.  नितीनच्या आवाजाने तंद्रा भंगली. गाडी माझ्या उत्तम नगर येथील घरासमोर थांबलेली होती. मी गाडीतून उतरलो, घरात शिरलो आणि सोफ्यावर पसरलो. समोर बघितले तर आम्हा सर्वांची साठी उलटलेली होती. पण निशा काही दिसली नाही. मी मंजुला विचारले निशा, कुठे राहिली. ती माझ्याकडे पाहत ती म्हणाली तुला माहित नाही. निशा या जगात नाही. मी काहीच बोललो नाही. गप्पा गोष्टी सुरू झाल्या सौ.चहा घेऊन आली. चहाचे कप पहात मंजू म्हणाली भाभीजी से कहो एक कप चाय और लाए,  निशा को चाय पीने की इच्छा हो रही है. 
 
मी दचकलो, ताडकन डोळे उघडले. दिल्लीच्या कुडकुडत्या थंडीत ही कपाळावर घाम आलेला होता. अचानक सौ. झोपेत फुटपटलली "इथे काय करते आहे, दूर हो" काय झाले मी विचारले, सौ. ने उशीच्या शेजारी ठेवलेला मोबाईल उचलला, बापरे साडे पाच वाजले. सौ. पटकन उठली. तिने पाण्याची मोटार लावली. आमच्या भागात पाणी सकाळी चार ते सहा साडेसहा पर्यंत येते.  

सकाळी चहा पिता-पिता मी तिला झोपेत पुटपुटण्याबाबत विचारले. ती म्हणाली बहुतेक स्वप्न बघितले होते. पण आता आठवत नाही. आज सकाळी पूजा करताना तिने दिव्या सोबत धूपबत्ती ही लावली. देवघरातील धूपेचा सुगंध किमान तासभर घरात दरवळत  राहतो. पण आज पूजा झाल्यावर  धूपबत्ती घेऊन सौ. घरात सर्वत्र फिरली आणि शेवटी धूपबत्ती बेडरूम मध्ये आणून ठेवली.  मी सौ.ला विचारले धूप बेडरूम मध्ये का ठेवली. आधीच खिडक्या दारे बंद आहेत. धूर रूम मध्ये भरून जाईल. ती म्हणाली बेडरूम मध्ये डास जास्त झाले आहेत, म्हणून इथे आणून ठेवली. जानेवारीच्या  भयंकर थंडीत डास??? मी फक्त सौ. कडे बघत राहिलो पण काहीच बोलू शकलो नाही. 

आज राहवले नाही, मंजुला फोन केला. तिला निशा बाबत विचारले. ती हसत म्हणाली, क्या बात है विवेक, लगता है पुरानी यादें ताजा हो गई है. काश हमें भी कोई ऐसे याद करता. "मंजू फिरकी घेऊ नकोस, सिरीयस बाब आहे". काल रात्री पाहिलेल्या स्वप्नाबाबत मी तिला सांगितले. ती म्हणाली विवेक, निशा जेव्हाही मला भेटायची तुझी विचारपूस करायची. तीन वर्षांपूर्वी शेवटची भेट झाली होती. त्यावेळी मी तिला तुझा नंबर देऊ का विचारले. त्यावर ती म्हणाली, नको. पण असे म्हणत असताना  तिच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यात साठलेले अश्रू बरेच काही सांगून गेले. बहुतेक ती तुला विसरु शकली नाही. तुला त्रास होऊ नये म्हणून मी कधी ही निशाचा उल्लेख तुझ्यासमोर केला नाही. ... कारोनात ती गेली. ..

आज दुपारी जेवल्यानंतर ही गोष्ट टंकताना मनात विचारांचे काहूर उठले. शाळा सोडून तब्बल ४६ वर्ष झाले. निशा नावाच्या मुलीची मला कधीच आठवण आली नाही. अचानक ती, तिच्या मृत्यूनंतर माझ्या स्वप्नात येते. कदाचित् ती सौ. च्या स्वप्नात ही आली असेल??? तिचा इरादा अर्धवट भंगलेल्या कहाणीची पुन्हा सुरुवात करायची तर नाही ना... आज रात्री मला झोप येणार का? ... ती आपल्या सोबत तर घेऊन नाही ना जाणार.... भिती  वाटू लागली आहे. मनात विचार आला, सौ. ला दिलेल्या वचनांचे काय होईल. सौ. असे होऊ देणार नाही.  उद्या काय होईल....