Thursday, June 29, 2023
वार्तालाप (14) : रेड्यामुखी वेदवाणी
Friday, June 9, 2023
यक्षप्रिया आणि आषाढचा पहिला पाऊस
आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार? काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे आणि समुद्रात रिकामे करावे. पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला.
Thursday, May 25, 2023
पौलोमी शची : नवरा माझ्या मुठीत
अहं तत् विद्वला पतिं अभि आसाक्षि वि-ससहिः
स्वत:ची आत्मस्तुती करताना ती म्हणते. मीच घराण्याची शोभा आहे. मीच मस्तक आहे. मी कठोर स्वभावाची आहे. मी विजय शालिनी आहे. मी सर्व सवतींचा वर चष्मा नाहीसा केला आहे. माझे पुत्र शत्रूचा फडशा उडवितात. माझी पुत्रीहि चक्रवर्ती आहे. माझे पती ओजस्वी व सर्वश्रेष्ठ आहेत. जो भक्त त्यांना हविभाग अर्पित करतो त्यांचे इच्छित पूर्ण करतात. तेच मीहि केले आहे अर्थात मीही भक्तांकडून हवि भाग स्वीकार करते आणि त्यांचे मनोरथ पूर्ण करते. त्यामुळे मी सवत रहित झाले आहे. माझ्या प्रत्येक कृत्याचे अनुमोदन माझे पती करतात. (करणे भाग आहे). मी माझ्या पतीला पूर्णपणे वशमधे केले आहे. तो माझ्या मुठीत आहे. जसे मी माझ्या पतीवर अधिकार गाजवते तसेच मी इतरांवरहि गाजवते.
Monday, May 8, 2023
वार्तालाप (12): अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले
Thursday, May 4, 2023
वार्तालाप (11) नामाची महिमा
Thursday, April 27, 2023
वार्तालाप (10): बोलण्यासारिखें चालणें. तयाचीं मानिती जनीं .
Wednesday, April 26, 2023
पर्यावर्णीय शीतयुद्ध : धरण ते मेट्रो इत्यादि
पूर्वी युद्धाचा मुख्य उद्देश्य दुसर्या देशांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कडून अप्रत्यक्ष रूपेण चौथ वसूली करणे हो होता. आज युद्ध अत्यंत महागडा प्रकार आहे. फायदा कमी नुकसान जास्त आहे. आजच्या काळात शत्रू देशांच्या प्रगतिच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणे, हा ही युद्धाचा एक प्रकार आहे. बिना एक ही गोळी चालविता फक्त काही कोटी खर्च करून शत्रू देशाचे हजारो कोटींचे नुकसान सहज केले जाते. त्यासाठी शत्रू देशातील स्वार्थी मीडिया, स्वार्थी राजनेता आणि तथाकथित सामाजिक संगठनांचा वापर केला जातो. काही कोटी फेकून दुसर्या देशात जनतेच्या हितांच्या प्रोजेक्टस विरुद्ध मोठे-मोठे आंदोलन उभे केले जातात.
या आर्थिक शीत युद्धात आजपर्यन्त आपल्या देशाला लाखो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी जनता आर्थिक प्रगति आणि रोजगार पासून वंचित राहिली. सरकारला ही शत्रू देशांच्या षड्यंत्राची माहीत असते. पण भारतासारख्या प्रजातांत्रिक देशातिल कमकुवत कायदे आणि त्यावर न्यायपालिकेची, कासवला ही लाजवेल अशी कार्य पद्धती, विकासाच्या प्रोजेक्ट्सवर न्याय व्यवस्थेकडून हिरवा कंदील मिळे पर्यन्त लाखो कोटींचे नुकसान देशाला होऊन गेलेले असते. अश्या व्यवस्थेत शत्रूच्या तालावर नाचणार्या तथाकथित सामाजिक संगठनांवर कठोर कारर्वाई करणे ही अशक्यच असते.
आज देश खाद्यान्न बाबतीत आत्मनिर्भर आहे. एवढेच काय तर आज अनेक देशांना मदत ही करत आहे. आपल्या देशात झालेल्या हरित क्रांति मागे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथे बांधण्यात आलेल्या धरणांचे आणि मैदानी भागात निर्मित कालव्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तीन वर्षांपूर्वी टिहरी धरण बघायला गेलो होतो. धरण आतून दाखविण्यासाठी एक कर्मचारी सोबत दिला होता. (आतून धरण पाहण्याचे भाग्य फार कमी लोकांना मिळते) त्या कर्मचार्याचे गाव ही धरणात बुडाले होते आणि त्या बदल्यात त्याला नौकरी आणि परिवाराला घर ही मिळाले होते. धरणाचा विषय निघणे साहजिकच होते. तो म्हणाला ह्या प्रोजेक्टमध्ये अनेक अडथळे आल्याने धरणाचा खर्च ही अनेक पटीने वाढला. या धरणाला पांढरा हत्ती असे संबोधित केले जाते. माझ्या मनात माझे गाव, घरदार बुडण्याचे शल्य सदैव टोचत रहात होते. केदारनाथ घटना झाली. त्यावेळी या भागत भयंकर पाऊस सुरू होता. या धरणाने अब्जावधी लीटर पानी पोटात साठवून हरिद्वार पर्यन्त लाखों लोकांच्या प्राणांची रक्षा केली आणि हजारो कोटींच्या संपत्तीचे ही रक्षण केले. अप्रत्यक्ष रूपेण धरणावर झालेला संपूर्ण खर्च त्या तीन दिवसांत वसूल झाला. तो म्हणाला आज मला या धरणावर गर्व आहे. बोलता-बोलता तो सहज म्हणाला, आंदोलनकारी नेत्यांना आमच्या पुनर्वसन एवजी धरणाचे काम लांबविण्यात जास्त रस होता. अखेर उशिरा का होईना आम्हाला हे सत्य कळलेच. स्थानिक जनतेने आंदोलनकारी नेत्यांच्या विरोधाला न जुमानता सरकारची मदत स्वीकार केली. धरणाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला.
त्या नंतर काहीच दिवसांनी 2019-20 डिसेंबर-जानेवारी मध्ये गुजरातची भटकंती केली. सरदार सरोवरच्या काठावर बांधलेल्या नर्मदा टेंट सिटीत दोन दिवस राहून तिथला परिसर बघितला. त्या परिसरात झालेला विकास डोळ्यांनी स्पष्ट दिसत होता. तिसर्या दिवशी अहमदाबादकडे निघताना रस्त्यात आरोग्यवन पाहिले. त्यावेळी त्याचे उद्घाटन झालेले नव्हते. दुपारची वेळ होती. तिथे ग्रामीण महिला सेल्फ हेल्प ग्रुप एक भोजनशाळा, तिथे काम करणार्या कर्मचारी आणि आमच्या सारख्या चुकून आलेल्या पर्यटकांसाठी सोयीसाठी, चालवीत होत्या. भोजन शाळेत पांढर्या मक्याची ताजी पोळी, वांग्याची भाजी, गुजराती कढी आणि छाज हा मेनू होता. घरी जेवल्या सारखे वाटले. तिथल्या महिलांशी बोलताना कळले आंदोलनकार्यांनी त्यांना मूर्ख बनविण्या पलीकडे काही एक केले नाही. त्यांच्या उद्देश्य फक्त धरणाचे काम थांबविणे होता. आता स्थानिकांना कामाच्या शोधात अहमदाबाद, सूरत, मुंबई जाण्याची गरज नाही. शेतकरी आता भाजी-पाला आणि दुग्ध व्यवसाय ही करू लागले आहेत. दोन्ही ठिकाणी आज आंदोलनकारी लोकांना स्थानिक जनता जवळ ही उभे करणार नाही.
सरदार सरोवर प्रोजेक्ट्सची काही माहिती. कालवे इत्यादी पूर्ण झाल्यावर गुजरातमधील 15 जिल्ह्यांतील 45 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार. धरणातून उत्पन्न वीज निर्मितीचा लाभ महाराष्ट्र, गुजरात आणि मध्ये प्रदेशला मिळत आहे आणि राजस्थानला पाणी. या शिवाय राजस्थानमध्ये २.४६ लाख हेक्टर, महाराष्ट्रात ७३ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पंजाब, हरियाणा, प. उत्तर प्रदेश प्रमाणे इथले शेतकरी ही समृद्ध होतील आणि त्याच सोबत शेतकर्यांवर निर्भर असलेला इतर समाज ही. गुजरातच्या गावांत राहणार्या कोट्यवधी लोकांचे जीवनस्तर उन्नत होणार. या धरणाने गेल्या काही वर्षांतच 16000 कोटीहून जास्त कमाई केली आहे. पुढील काही वर्षांत धरण निर्मितीचा खर्च भरून निघेल. या शिवाय उद्योग, पर्यटन वाढल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणारच.
धरणाची निर्मिती उशिराने झाल्याने सरदार सरोवर प्रोजेक्ट्सचा खर्च 6400 कोटींहून वाढून 50000 कोटींच्यावर गेला.वर्ल्ड बँकचे स्वस्त कर्ज ही मिळाले नाही. प्रोजेक्ट्स पूर्ण व्हायला 40 वर्षांहून अधिक काळ लागला. हे धरण जर 20 एक वर्षांपूर्वी पूर्ण झाले असते तर शेती सोबत उद्योगांचा विकास तेंव्हाच झाला असता. तो हिशोब केला तर काही लाख कोटींचे नुकसान निश्चित देशाला झाले. माननीय मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री नसते तर कदाचित आज ही हा प्रोजेक्ट पूर्ण झाला नसता.
मेट्रो प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण कमी करतात. वीस वर्षांपूर्वी दिल्लीत बस आणि ऑटोने प्रवास करणार्या प्रवासींच्या डोळ्यांना खाज सुटणे, पाणी निघणे, खोकला येणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादि सामान्य बाबी होत्या. आज जवळपास 400 किमी हून जास्त मेट्रो नेटवर्क मुळे हवेच्या प्रदूषण मुळे प्रवासींना होणारे त्रास बर्यापैकी कमी झाले आहे. मेट्रो नसती तर आजच्या घटकेला दिल्लीच्या प्रदूषणाची कल्पना करणेच अशक्य होते. याशिवाय मेट्रोने कापलेल्या झाडांपेक्षा दहा पट जास्त झाडे जगवून दिल्लीत हिरवळ वाढीला ही मदत केली आहे. मुंबईत आरे कारशेडच्या विरोध ही पर्यावरणच्या नावाने केला. ज्यांनी विरोध केला त्यांच्या उद्देश्य मेट्रोचे कामात बाधा उत्पन्न करणे होता. आता मेट्रो प्रोजेक्ट उशिराने पूर्ण होणार आणि बजेट ही दहा हजार कोटींपेक्षा जास्त वाढणार. प्रवासींना ही रस्त्याचे प्रदूषित पर्यावरण ही जास्त काळ सहन करावे लागणार. दुसर्या शब्दांत पर्यावरणाच्या नावाने मेट्रोचा विरोध करण्याचा उद्देश्य जवळपास पूर्ण ही झाला. आरे कारशेडचा विरोध करणारे खर्या अर्थाने पर्यावरण विरोधी होते. असेच जनहित याचिका टाकून दिल्लीच्या नव्या मेट्रो-IV मार्गांत अनेक अडथळे निर्माण केले गेले. नुकताच मेट्रो-IV प्रोजेक्टस बाबत न्यायालयाने सकारात्मक निकाल दिला आहे. भूतपूर्व मुख्यमंत्री शीला दीक्षितच्या काळात सर्व मेट्रो प्रोजेक्टस वेळेच्या आधी पूर्ण झाले होते. पण आज दिल्ली सरकार ही काही न काही कारण काढून समस्या निर्मित करत आहे. या सर्व कारणांमुळे प्रोजेक्ट्स पूर्ण होण्यास अनेक वर्ष उशीर होणार आणि प्रोजेक्ट कॉस्ट ही हजारो कोटींनी वाढणार. पर्यावरणाची हानी ही होणार, हे वेगळे.
आज तथाकथित पर्यावरणवादी जनहित याचिकांच्या माध्यमाने, मीडियाच्या मदतीने, विकासाचे अनेक प्रोजेक्ट्स थांबवून/ लंबित करून देशाला लाखों कोटींचे नुकसान पोहचवत आहे. व्होट बँक राजनीति करण्यासाठी अनेक राजनेता ही यात पोळी भाजतात आणि त्या भागातील जनतेचे नुकसान करतात.
Thursday, April 20, 2023
वार्तालाप (9): अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले
Thursday, April 13, 2023
वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ
Tuesday, March 28, 2023
वार्तालाप (8): "वर्णानां ब्राम्हणो गुरु:"
ब्रम्हज्ञानाचा विचारू. त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.वर्णानां ब्राम्हणो गुरु:(14/7/30)
समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते.
महाभारतात युधिष्ठिर-सर्प संवाद आहे. नागाने युधिष्ठिराला विचारले, "ब्राह्मण कोण आहे?" युधिष्ठिर म्हणाले की ज्या व्यक्ति मध्ये सत्य, दान, क्षमा, अस्तेय,आणि दया इत्यादि सात्विक गुणांचा वास असतो. जो विद्वान तपस्वी असतो, तो ब्राम्हण". नाग म्हणाला की "शूद्रामध्येही हे गुण असू शकतात." युधिष्ठिर म्हणाले की “जर एखाद्या शूद्रा मध्ये वरील वैशिष्ट्ये असतील तो शूद्र, ब्राह्मण आणि ज्याच्यात हे गुण नाहीत तो ब्राम्हण ही शूद्र असतो.
आपल्या सनातन धर्मात अनेक मत आणि मतांतरे आहेत. अनेक देवी देवता आहेत. त्यांची पूजा उपासना आणि उत्सव करणारे सर्वच वर्णांचे पुजारी आहेत. अनेक मठ आणि महंत आहेत. भक्त त्यांना गुरु मानतात आणि ते भक्तांना उपदेश करतात. पण ते सर्वच ब्रम्हज्ञानी नसतात. अनेक फक्त महंत फक्त त्यांच्या गुरूंच्या चमत्कारांच्या गाथा सांगून भक्तांना भुलवितात. चमत्कारांच्या गाथा ऐकून भक्त ही सदा सर्वदा चिलमच्या नशेत राहणार्या ज्ञानहीन व्यक्तीला गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या भक्तीत लीन होतात. अश्या चमत्कारी बाबांना गुरु मानणार्या भक्तांचा इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडणारच. समर्थ म्हणतात "गुरुत्व नेले कुपात्री". गुरुच ब्रम्हज्ञानी नसतील तर ते आपल्या भक्तांना सांसारिक आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा उपदेश करूच शकणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.
आपले सौभाग्य आज किमान आपला नेता तरी ब्रम्हज्ञानी आहे, त्यामुळे करोंना काळात ही आपल्या देशात कुणी उपाशी झोपले नाही किंवा ब्रिटेन अमेरिका सारख्या मोठ्या अर्थ व्यवस्थेला ही तडा गेला नाही. पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे.
Saturday, March 18, 2023
वार्तालाप (7) : मनातील मूषक वृतीला दूर करा.
दूरम् अधि स्रुतेः अज॥
(ऋ.१/४२/३)
आपल्या मनातील मूषक प्रवृती म्हणजे दुर्विचार. बिना कष्ट करता दुसर्यांच्या वस्तु हडपण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी कपट कारस्थान रचणे, दुसर्यांना धोका देणे, चोरी,डाका, रिश्वत घेऊन कार्य करणे, इत्यादि-इत्यादि. या ऋचेत ऋषि आपल्या मनातील मूषक वृतीला दूर करण्याची प्रार्थना परमेश्वराला करत आहे. आपल्याला माहीत आहे उंदीर सदा कुरतडत राहतो. तो शेतातील, घरातील अन्न-धान्य कागद, कपडे इत्यादि काहीही सोडत नाही. सर्व काही तो त्याच्या बिळात सतत एकत्र करत राहतो. दुसर्यांची संपती हडपण्याची त्याची हाव कधीच संपत नाही. परिणाम उंदीराचा शेवट पिंजर्यात होतो किंवा विषाक्त पदार्थ खाऊन तो मरतो. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात:
अति स्वार्थ बुद्धीन रे पाप सांचे.
घडे भोगणे पाप तें कर्म खोटे
न होतां मनासारिखें दु:ख मोठें.
आजकाल संपूर्ण समाज या मूषक वृतीने ग्रसित आहे. काही काम न करता वीज, पाणी, जेवण सर्व फुकट पाहिजे ही मनोवृती समाजात बळावत आहे. व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. परिणाम स्वरूप या खोट्या कर्मांचे फळ समस्त समाजाला भोगावे लागेल. भूक, अराजकता आणि हिंसेने जनता त्रस्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही स्वत:ची आणि समाजाच्या मूषक प्रवृतीला आळा घालण्याची गरज आहे. असो.
Wednesday, March 15, 2023
मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप
बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे. बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे.
Friday, March 10, 2023
वार्तालाप: (6): सकारात्मक विचारांसाठी मनाचे श्लोक
मनात विचार उत्पन्न होतात, विचारांनी स्मृति तैयार होतात आणि स्मृतिच्या निर्देशानुसार आपण कृती करतो. मनात सकारात्मक विचार उत्पन्न होतील तर कृती ही सकारात्मक होणार. मनात नकारात्मक विचार उत्पन्न झाले की आपण नकारात्मक कृती उदा. तळीरामाणे दारू पिणे, शिव्या देणे किंवा हत्या इत्यादि घृणीत कृती ही आपण करू शकतो. मन तर अभौतिक आहे, त्यात विवेक पूर्ण सकारात्मक विचार कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे?
समर्थ रामदास स्वामी म्हणतात:
मन दिसते मां धरावे. ज्याचे त्याने आवरावे.
आवरून विवेके भरावे. अर्थांतरी (द. 18.10.17)
आपल्या मनाला भटकण्यापासून वाचविण्याचे कार्य आपल्यालाच करावे लागते. मनात विवेकपूर्ण विचार भरून मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपण संसार आणि परमार्थात सफल होऊ शकतो. पण समर्थ फक्त उपदेश करणारे नव्हते. त्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांत मनाला उद्देश्यून मनोबोधाची निर्मिती केली. मनाच्या श्लोकांच्या सुरवातीलाच समर्थ म्हणतात जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें. जनीं वंद्य ते सर्व भावें करावें अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादींचा वाईटांचा त्याग करणे. वंद्य धरण्यासाठी समर्थ म्हणतात, सज्जनांची संगती धरावी, पापबुद्धी नको रे, विषयांची कल्पना नको रे, मना वासना दुष्ट कामा नको रे, दुसर्यांचे द्रव्य नको रे, अति स्वार्थ बुद्धी सोडणे, अहंकार सोडणे, दुसर्यांचे नीच बोलणे ऐकून ही सर्वांशी नम्र बोलणे, शोक-चिंता न करणे, इत्यादि इत्यादि. मनाच्या श्लोकांचे नियमित वाचन/ पाठांतर केल्याने मनात विवेकपूर्ण उत्तम विचार सहज भरतील आणि उत्तम स्मृति निर्माण होतील. उत्तम स्मृति उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देतील. संसारात आणि परमार्थात सफल होण्यास मदत होईल.
Tuesday, March 7, 2023
वार्तालाप: (5) मनातील विचार सकारात्मक आणि नकारात्मक
समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या मनात सदैव उसळी भरत राहतात. सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे. विचारांनी स्मृती निर्मित होते आणि कोशांच्या स्मृति ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून सतत वृद्धिंगत होत राहतात आणि त्यानुसार जीवांची निर्मिती करतात. मानवाची निर्मितीही कोशांतील स्मृति अनुसारच झाली आहे. आपल्या शरीरातील कोश ही सतत निर्मितीत व्यस्त राहतात, शरीरात होणारी क्षती सतत दूर करत राहतात. मनुष्य आपल्या विचारांच्या स्मृती पुढच्या पिढीलाही प्रदान करतो. मानवाचे आचार व्यवहार - धर्म, अर्थ, काम जीवन सर्वच विचारानुसार ठरते आणि भविष्यासाठी स्मृतीत सुरक्षित होते. सकारात्मक विचार सकारात्मक स्मृति निर्माण करतात. मानवाला शारीरिक आणि मानसिक रूपेण निरोगी ठेवतात. नकारात्मक विचार नकारात्मक स्मृति निर्मित करतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरातील कोशिका भ्रमित होतात, निर्मितीच्या जागी शरीरलाच नष्ट करू लागतात. अधिकान्श आजारांचे हेच मुख्य कारण आहे. मानवाला होणारे आनुवंशिक आजारांचे मुख्य कारण ही नकारात्मक विचार आहे. आत्महत्येचे मुख्य कारण ही हेच आहे.
Saturday, March 4, 2023
रतिपाल: एक आत्मघातकी प्रवृती
रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल होता. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनला रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीने राजा हम्मीरदेवला शांति प्रस्ताव पाठविला. मंत्री रतिपाल शांतिवार्तेसाठी अल्लाउद्दीनच्या छावणीत आला. अल्लाउद्दीन रतिपालचे जंगी स्वागत केले. अल्लाउद्दीन त्याला म्हणाला आमचे युद्ध फक्त हम्मीरदेवशी आहे. इतर राजपूतांशी नाही. या युद्धात नाहक तुमचा बळी जाईल. तसेही रणथम्बौरवर शासन फक्त चौहान वंशीय राजपूतच करणार. तू आणि इतर वंशीय राजपूत उपेक्षित चाकरच राहणार. तू आमची मदत कर आम्ही तुला बूंदीचे राज्य देऊ. तू सार्वभौम राजा होईल. मंत्री रतिपालला अल्लाउद्दीनचे म्हणणे पटले. स्वार्थात आंधळा झाल्यामुळे तो हे ही विसरला अल्लाउद्दीन खिळजीचा उद्देश्य हिंदूंचा विनाश करून देशात इस्लामी राज्य स्थापित करणे आहे. रतिपालने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. एका दिवशी भल्या पहाटे त्यांनी दुर्गाचा दरवाजा उघडला. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिली. अल्लाउद्दीनने बक्षीस म्हणून मंत्री रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार.तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. रणथम्बौर महास्मशानात बदलले. आज तिथे फक्त वन्य प्राणी विचरण करतात.
आज ही आपण भारतीय याच आत्मघातकी प्रवृतीने ग्रस्त आहोत. आमच्या समाजाची उपेक्षा होते, आम्हाला वतन (आमदारकी खासदारकी) पाहिजे. नाही मिळाले तर आम्हाला नष्ट करण्याच्या मनसुबा रचणार्या शत्रूशी ही आम्ही हात मिळवू. मग आम्ही नष्ट झालो तरी चालेल. महाराष्ट्राचे म्हणाल तर फक्त वतन साठी स्वकीय नातेवाईकने छत्रपति संभाजी महाराजांना दगा दिला होता, हा इतिहास आहे. परिणाम, स्वराज्यासाठी लाखो मराठी वीरांना प्राणांची आहुति द्यावी लागली.
Friday, February 17, 2023
वार्तालाप: (4) आत्महत्या एक तमोगुण
Tuesday, February 14, 2023
प्रेम दिन: मिठी - काही क्षण कथा
त्याने गायीला मिठी मारली. गायीने त्याला शिंगे मारली. ..... डॉक्टर काकांनी बायकोला नवी पैठणी गिफ्ट केली. प्रेमदिन साजरा केला.
त्याने तिला मिठी मारली. तिने त्याच्या मुस्कटात मारली. हवालदार ने शिट्टी वाजवली. .....त्याच्या बापाने वकिलाची फी भरली.
त्याच्या मिठीत ती सुखावली. ... .. अबार्शनच्या लाईनीत उभी राहिली.
मौजेसाठी तिला घेऊन तो बगीच्यात गेला. धर्मरक्षक आले..... लग्नाच्या बेडीत अटकला.
आमच्या काळी नव्हता डे. मिठी कुणाला मारली नव्हती. खुन्नस की बोर्डवर काढली.
Saturday, February 11, 2023
प्रपोज डे: लघु कथा
सदू, घरी येणार होतास ना!
"जमणार नाही काका".
का बरे?
"काका, काल प्रपोज डे होता, तिला प्रपोज केले."
वा! छान, पुढे काय ...
"तिच्या सोबत डॉगी होता."
(त्याने फोन ठेवला)
Sunday, February 5, 2023
ऋग्वेद:: प्राण रूपी औषधी आणि कमांडो तेवतिया
द्वाविमौ वातौ वात आ सिन्धोरा परावत: ।
दक्षं ते अन्य आ वातु परान्यो वातु यद्रप: ॥ (ऋ.१३७.१०.२.)
आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रप:।
त्वं हि विश्वभेषजो देवानां दूत ईयसे ॥ (ऋ १३७.१०.३)
ऋग्वेदात प्राणाला औषधी म्हंटले आहे. प्राणरूपी वायु श्वासाच्या रूपात हृदयात प्रवेश करून जीवनदायनी शक्ति वाढविते आणि प्रश्वासरूपी वायु रोगांना शरीरातून बाहेर काढते. वायु ही देवतांची औषधीरूपी दूत आहे. नियमित प्राणायाम केल्याने शरीरातील क्षतिग्रस्त कोशिका ही पुनर्जीवित होतात. माणसाला नवजीवन मिळते. अधिकान्श रोगांपासून सहज मुक्ति मिळते.
याचेच एक उदाहरण. २६ नोव्हेंबर २००८ रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पाकिस्तनी आयएसआय प्रायोजित आतंकी हल्ला झाला. ताज हॉटेल वर ही हा हल्ला झाला होता. त्यावेळी मरीन कमांडो प्रवीण तेवतियांनी ३ दशहतवाद्यांना कंठस्नान घातले आणि ताज हॉटेलमध्ये असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अडानी आणि चार सांसद सहित १५०हून जास्त लोकांचे प्राण वाचविले. पण लोकांना वाचविताना प्रवीण तेवतियाला पाच गोळ्या लागल्या. त्यांची फुफ्फुसे निकामी झाली. सरकारने शौर्यचक्र देऊन प्रवीणचा सम्मान केले.
गेल्या 26 नोव्हेंबर 2022ला सकाळी आस्था चॅनल लावले होते. कमांडो प्रवीण तेवतिया बाबा रामदेव सोबत मंचावर बसले होते. प्रवीण तेवतियांच्या शब्दांत - हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देण्यात ते यशस्वी ठरले. पण क्षतिग्रस्त फुफ्फुस्सांमुळे त्यांना 25 पावले ही चालणे शक्य होत नव्हते. डॉक्टरांचे मत होते आता भविष्यात त्यांना धावणे आणि पोहणे शक्य नाही. अश्या वेळी रोज सकाळी पाच वाजता उठून स्वामी रामदेव यांना आस्था वर पाहून योग आणि प्राणायाम सुरू केले. काही मिंनिटांपासून सुरू करून ते रोज चार-चार तास प्राणायाम करू लागले. परिणाम त्यांनी 2012 पुन्हा धावणे सुरू केले. 2015 पहिल्यांदा मुंबईत अर्ध मेराथन पूर्ण केली. नंतर पूर्ण मेराथन ही पूर्ण केली. 2017मध्ये प्रवीण तेवतिया निवृत झाले. 2018 मध्ये प्रवीणने दक्षिण आफ्रिकेत आयरनमेन प्रतियोगिता पूर्ण केली ज्यात 3.86 किमी समुद्रात पोहणे, 180 किमी सायकल चालविणे आणि 42 किमी धावणे असते. आज ही ते रोज 1 एक तास प्राणायाम, एक तास इतर व्यायाम करतात आणि दहा किमी धावतात. हाच किस्सा पाहताना मला ऋग्वेदातील वरील ऋचांचे स्मरण झाले. प्राणायाम रूपी औषधी आपल्याला निशुल्क उपलब्ध आहे तरीही आपला त्यावर विश्वास नाही, हेच दुर्दैव. सहज मनात विचार आला, अनंत अंबानी यांनी स्टओराइड घेण्या एवजी प्राणायाम केले असते तर त्यांचे वजन पुन्हा वाढले नसते. असो.
Wednesday, January 25, 2023
वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे
श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात:
नमस्कारास कष्टावें नलगे
नमस्कारास कांहींच नलगे
उपकरण सामग्री. (४/६/२२)
Monday, January 16, 2023
वार्तालाप :(2) जीभ आणि सर्वनाश
जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर आपल्याला जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 19/3/१३॥
याचेच एक उदाहरण - महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते. या आयोजनाचा एक उद्देश्य कौरवांशी मैत्री संबंध्द दृढ करणे ही होता. पण झाले काय मय दानवाने बांधलेल्या मायावी महालात दुर्योधन सहित सर्व कौरव पाण्यात पडतात. त्यांना असे पाण्यात पडताना पाहत द्रोपदी त्यांचा उपहास करत आपल्या सखींना म्हणाली पहा "आंधळ्याचे पुत्र आंधळे" कसे सर्व पाण्यात पडले हा! हा! हा!". जिभेचा हा वार दुर्योधनाला जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याचा प्रण केला. पांडवांच्या सर्वनाशासाठी त्याने नाना षड्यंत्र केले. परिणाम, महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरुवंशाचा संहार झाला. जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो कुणालाही तो कितीही दीनहीन किंवा मूर्ख का असेना, जिभेने कधीच चुकूनही कटू वचन बोलले नाही पाहिजे.
Tuesday, January 10, 2023
वार्तालाप : (1) श्रवण
जे जे उत्तम ऐकलेते ते उत्तम आचरले म्हणजे श्रवण.
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...
