Monday, May 8, 2023

वार्तालाप (12): अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले

जनी हीत पंडीत सांडीत गेले
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले.

ब्रह्मराक्षस हा शब्द समर्थांनी कुणा विशिष्ट व्यक्ति विशेषसाठी प्रयुक्त केलेला नाही. समर्थांच्या मते ब्रह्मराक्षस म्हणजे भूत प्रेतांची योनी ही नाही. समर्थ म्हणतात, पंडीत अहंकारामुळे ब्रह्मराक्षस झाले. साहजिकच आहे, मनात प्रश्न उत्पन्न झाला पंडीत कोण. त्यांचे कार्य काय?

सौप्या शब्दांत, ज्या व्यक्तीने समस्त सांसारिक आणि आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. ज्याला उत्तम प्रपंच करून मोक्षाच्या वाटेवर जाण्याची विद्या माहीत आहे, तो ब्रम्हज्ञानी आहे. त्याला पंडीत किंवा ब्राम्हण म्हणतात.

एक पंडीत आपल्या ज्ञानाचा वापर करून भावसागर तरून जातो. दूसरा लोकांच्या कल्याणसाठी त्यांना सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा उपदेश देतो आणि स्वत: ही सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो. या श्रेणीत समर्थ रामदास, संत तुकाराम, स्वामी दयानन्द सहित सर्व संत महात्मा येतात.

तिसरा पंडीत ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीतील समस्त जीवांचे कल्याण व्हावे, आणि त्यांना मुक्ति मिळावी, हा उद्दीष्ट मनात ठेऊन समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटत राहतो. वेळ प्रसंगी सृष्टीच्या रक्षणासाठी असुरांचा संहार ही करतो. अश्या ब्रम्हज्ञानी लोकांना आपण भगवंताचे अवतार मानतो. श्रीराम आणि श्रीकृष्ण सारखे महापुरुष याच श्रेणीत येतात.
 
आता ब्रह्मराक्षस कोण याची कल्पना आलीच असेल. रावणाने वेद उपनिषद सहित समस्त शास्त्रांचा अभ्यास केला होता. कठोर तपस्या करून दिव्य अस्त्र-शस्त्र ही प्राप्त केले होते. रावण ब्रह्मज्ञानी होता. पंडीत होता. पण त्याला ज्ञानाचा अहंकार झाला. ज्ञानाच्या बळावर त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केली. सत्य आणि धर्माचा मार्ग सोडून, भौतिक सुखासाठी, अधर्माचा मार्ग पत्करला. सोन्याची लंका करण्यासाठी भरत खंडातील जनतेवर आत्याचार केले, आश्रम, गुरुकुल उध्वस्त केले. इथली संपत्ति लुटून नेली. भारतात ही राक्षसी साम्राज्याची स्थापना केली. या ओवीत रावणासारख्या सत्य आणि धर्माच्या मार्ग सोडून अधर्म मार्गावर चालणार्‍या पंडितांना समर्थांनी ब्रह्मराक्षस म्हणून संबोधित केले आहे.No comments:

Post a Comment