Thursday, April 27, 2023

वार्तालाप (10): बोलण्यासारिखें चालणें. तयाचीं मानिती जनीं .

बोलण्यासारिखें चालणें.  स्वयें करून बोलणें.
तयाचीं वचनें प्रमाणें. मानिती जनीं। १२.१०.३९ ॥

समर्थ म्हणतात, जो बोलण्याप्रमाणे स्वत: वागतो आणि आधी स्वत: करून मग बोलून दुसर्‍यास उपदेश करतो, त्याची वचने लोक प्रमाण मानतात. एक सर्व साधारण अनुभव, आपण छोट्या-छोट्या कारणांनी शेजारी-पाजर्‍यांशी खोटे बोलते. आपण काही चूक करतो, असे ही आपल्याला वाटत नाही.  मग आपण आपल्या मुलांना कितीही खरे बोलण्याचा उपदेश केला तरीही आपली मुले आपल्यासोबत खोटेच बोलतात. त्याचे आपल्याला दु:ख होते. पण खोटे बोलताना आपलीच मुले आपलेच अनुकरण करत असतात, हे सत्य पचणे कठीणच. समाजात राहणार्‍या लोकांची सहज प्रवृती असते आपल्यापेक्षा  मोठ्यांचे अनुकरण करणे, मग पालक असो की नेता.  

आता दुसरे एक उदाहरण 2016 च्या एका मन की बात या कार्यक्रमात आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी देशवासीयांना खादी वस्त्रे वापरण्याचा सल्ला दिला. देशांत खादीची विक्री तीन पट जास्त वाढली आणि गेल्या वर्षी 1 लाख कोटींच्या वर झाली. कारण आपले प्रधानमंत्री स्वत: खादीचे वस्त्र घालतात. त्यामुळे जनतेने त्यांचे अनुकरण केले. देशात खादीची विक्री वाढली. 

सारांश एवढाच कुणालाही उपदेश करण्यापूर्वी खात्री केली पाहिजे की आपण स्वत: त्याचे पालन करतो की नाही. अन्यथा आपल्या सांगण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 

 

No comments:

Post a Comment