Thursday, April 20, 2023

वार्तालाप (9): अकस्मात तें राज्य सर्वे बुडाले


मना सांग पां रावणा  काय  जालें 
अकस्मात तें  राज्य सर्वे बुडालें.
म्हणोनी  कुडी वासना सांडिं  वेंगी 
बळें लागला काळ हा पाठिलागी.

समर्थ म्हणतात मृत्यू कुणालाच चुकलेली नाही. भगवंताने माणसाला 100 वर्षांचे आयुष्य दिले आहे. माणसाला, दुष्ट वासनांचा त्याग करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत चारी आश्रमांचे कर्तव्य पूर्ण करत, मृत्यू आली तर त्याचे दु:ख कुणालाच भोगावे लागत नाही. अशी मृत्यू प्रत्येकाला हवी असते. समर्थ पुढे म्हणतात, दुष्ट माणसांचा अकस्मात नाश होतो. कुडी म्हणजे दुष्ट वासनेच्या चक्रात रावण बुडालेला होता. त्यामुळे त्याचा अकस्मात नाश झाला. राक्षसी साम्राज्य बुडाले.  इथे समर्थांनी अकस्मात शब्द वापरला आहे. कारण रावणा जवळ दैवीय अस्त्र-शस्त्रानीं सुसज्जित सैन्य होते. देव आणि दानवांची त्याला भीती नव्हती. पण एका वनवासी श्रीरामाने वनात राहणाऱ्या  वानर, भिल्ल इत्यादींच्या मदतीने शक्तिशाली रावणाला सहज पराजित केले. दुष्ट वासनांचे परिणाम रावणाला आणि समस्त श्रीलंकेच्या प्रजेला भोगावे लागले. 

आज ही ओवी घेतली त्याला ही कारण आहे. नुकतीच दूरदर्शन वर अतीक  अहमदच्या हत्येची बातमी पाहिली. अतीक अहमद ज्याची गॅंग हप्ता वसूली करायची, धमकी द्यायची, जमिनी हडपायची, बलात्कार, लूटमार इत्यादि  करायची. विरोध करणाऱ्यांना तो यमसदनी पाठवायचा. न्यायाधीश ही त्याला घाबरायचे. जो जेल मधूनही लोकांना धमक्या द्यायचा. राजनेता ही त्याचे पाळीव होते. त्याच्या विरुद्ध तक्रार करायला ही सामान्य जनतेची हिम्मतच नव्हती. याच दुष्ट मार्गाने त्याने हजारो कोटींची माया जमविली होती. मोठे साम्राज्य उभे केले होते. पण काय  झाले, अकस्मात त्याच्या मुलाचे एनकाऊंटर झाले, पोलिसांच्या सुरक्षेत ही त्याची हत्या झाली आणि त्याची बायको पोलिसांच्या भीतीने वणवण फिरते आहे. आज दुष्ट वासनांचे परिणाम त्याला आणि त्याच्या परिवाराला भोगावे लागत आहे. 




No comments:

Post a Comment