Friday, April 11, 2025

काळाजी गरज: मेकाले नव्हे कौशल युक्त गुरुकुल शिक्षण पाहिजे

  


आजच्या शिक्षणाचे दोन वाक्यात वर्णन करता येते. पहिले वाक्य विषय पाठ करा. दुसरे वाक्य पाठ केलेले कागदावर लिहा किंवा टंकित करा. याचे एक उदाहरण एकदा एक मुनि  जंगलातून जात होते. मुनिला शिकारीच्या जाळ्यात अटकलेले काही पोपट दिसले. मुनिने पोपटांना जाळ्यातून मुक्त केले. मुनि ने विचार केला, आज मी या पोपटांना शिकार्‍याच्या जाळ्यातून मुक्त केले. पण भविष्यात पुन्हा हे पोपट जाळ्यात अटकू शकतात.   मुनिने शिकारी पासून सावधान राहण्यासाठी पोपटांकडून पाठ करून घेतले, शिकारी येणार, जाळे टाकणार, त्यावर दाणे टाकणार, आम्ही दाणे खाणार नाही, शिकारीच्या जाळ्यात अटकणार नाही. पोपटांना हे पाठ झाले याची खात्री झाल्यावर मुनि आपल्या मार्गाने निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिकारीने पुन्हा जाळे  लावले, त्यावर दाणे टाकले. पोपट जाळ्याकडे पाहत जोरात बोलू लागले, शिकारी आला, जाळे टाकले, त्यावर दाणे टाकले, आम्ही दाणे खाणार नाही. असे ओरडत सर्व पोपट दाणे खाण्यासाठी जाळ्यावर उतरले. मुनिने पोपटांकडून पाठांतर करून घेतले होते पण प्रात्यक्षिक ज्ञान दिले नव्हते.   

आपल्या देशातील मैकाले शिक्षण व्यवस्थेत 90 टक्के शिक्षण यातच येते. सरकारी नौकरी सोडून कुठेही कौशल रहित  शिक्षणाचा उपयोग नाही. 21 वर्षे (18+3) वर्ष शिक्षण घेऊन ही अधिकान्श तरुणांसमोर पुढे काय कराचे हा भला प्रश्न चिन्ह असतो. कारण त्यांच्यापाशी कोणत्याही विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान नसते.  मग शिक्षण कसे असावे हा प्रश्न मनात येणार. याचे उत्तर अथर्ववेदात गुरुकुलात प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार केले पाहिजे यात सापडते.

आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्तः ।

तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवाः

॥ अथर्व० ११।५।३ ॥


शब्दार्थ : आचार्य उपनयन संस्कार करून शिष्याला गुरुकुलात प्रवेश देतो. ज्या प्रमाणे आई आपल्या उदरात गर्भाचे पोषण करते तसेच आचार्य तीन रात्री शिष्याचा सांभाळ करतो. त्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्या तेजस्वी ब्रह्मचारीला आशीर्वाद देण्यासाठी देवता/ विद्वान जन तिथे येतात.

इथे तीन रात्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण. त्यासाठी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक विद्यार्थीला गरजेचे.  अज्ञानी ब्रम्हचारी हा पशु समान असतो. आचार्यचे पहिले कार्य आपल्या शिष्यावर उत्तम संस्कार करणे. विद्यार्थी, धैर्यवान, क्षमाशील, संयमी, शरीर आणि मन शुद्ध ठेवणारा, चोरी न करणारा, असत्य न बोलणारा, इंद्रियांवर नियंत्रण असलेला अर्थात हिंसा, द्वेष, लोभ, मोहांपासून दूर राहणारा, मानवीय गुणांनी संपन्न असा निर्मित झाला पाहिजे. अशक्त शिष्य ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ ठरतो. गुरुकुलांत ब्रम्हचारी  शारीरिक व्यायाम, योग, प्राणायाम कार्याचे. त्यांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ झाल्याने ज्ञान  प्राप्त करण्यासाठी  परिश्रम  ते करू शकत होते.  ज्ञान प्राप्ती नंतर  पुरुषार्थ करून धर्म मार्गावर चालत अर्थ अर्जित करून, संसारीक भोग भोगून, मोक्षाच्या वाटेवर चालण्याची क्षमता निर्मित करणे ही गुरूचे कार्य. गुरुकुलातून ज्ञान प्राप्त करून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना सर्व साधुवाद देतीलच.  याचे उदाहरण, वैदिक गुरुकुलात शिकलेले स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत.

गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी मेकाले पूर्व भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांचा उल्लेख आपल्या "रमणीय वृक्ष' (The Beautiful Tree) या पुस्तकात केला आहे. यात विलियम अडम्स, जी.डब्लू लिटणर सहित अनेक ब्रिटीश अधिकार्यांनी १८२० ते १८४० च्या कालखंडात पंजाब, मुंबई, बिहार, ओडिशा आणि चेन्नई प्रांतात केलेले भारतीय शिक्षणाचे दस्तावेज आहेत. या दस्तावेजानुसार काही निष्कर्ष मी काढण्याचा प्रयत्न केला.

शिक्षण सर्व जातीतल्या मुलांसाठी खुले होते. मद्रास प्रांतात तिन्नेवेली जिल्ह्यात शुद्रांची संख्या ८४ टक्के तर, सेलम मध्ये ७०टक्के होती.  ब्राम्हणांची मुले ५ ते ६व्या वर्षी तर शुद्रांची ६ ते ८ वर्ष झाल्यावर शिक्षण सुरू करायची. प्राथमिक शिक्षण ज्यात विद्यार्थी  स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि आणि त्या वेळचे सामान्य ज्ञान प्राप्त करायचे. आजच्या हिशोबाने ८ वी पास झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे कौशल धातू विद्या, लोह, तांबा पितळ, स्वर्ण इत्यादी. लाकडाचे कार्य, दगडावर शिल्प, तलावांची निर्मिती, स्थापत्य कला, साबण निर्मिती, विभिन्न प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती, इत्यादी इत्यादि. या शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आयुर्वेद आणि  औषधी निर्मिती, सांख्य, साहित्य, तंत्र शास्त्र ही शिकवल्या जात असे. शिष्याला विषय100 टक्के आत्मसात झाल्या शिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होत नसे. गुरुकुलांत शिक्षणाचा उद्देश्य विद्येचा व्यावहारिक पक्ष ही शिष्याने आत्मसात केला पाहिजे हा होता. त्या विषयाच्या विद्वानांकडून प्रात्यक्षिक ज्ञान  विद्यार्थी घेत असे. एक विद्यार्थी 8 वर्षांत ज्ञान प्राप्त करत असे तर दुसर्‍याला 16 वर्ष ही लगायचे. १८२५ मध्ये चेन्नई प्रांतात १,५०,००० विध्यार्थी शिक्षा ग्रहण करायचे इंग्लेंड पेक्षा दुप्पट.बिहार आणि बंगाल मध्ये १ लाख गुरुकुल होते. १०० उच्च शिक्षा देणारे संस्था होत्या. वस्त्र, भोजन, निवारा इत्यादी सुविधा स्थानिक गावातील लोक पुरवायचे. अधिकांश शिक्षक ब्राह्मण कायस्थ असले तरी ३० जातींचे शिक्षक होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक त्याकाळी सर्वात  अंत्यज  समजणार्‍या चांडाळ जातीचे होते. दक्षिणेत ब्राम्हणेतर शिक्षकांची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त होती. 

त्याकाळी अस्पृश्यता असली तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले होते. मलबार जिल्ह्यात वैद्यक शास्त्र शिकणाऱ्या १९४ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के शूद्र  होते. फक्त ३१ ब्राह्मण होते. तर खगोल शास्त्र शिकणाऱ्या ८०० पैकी फक्त १३१ ब्राम्हण होते. स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर, ब्राम्हण मुली ३७ टक्के तर वैश्य शूद्र इत्यादी ११ ते १९ टक्के. त्याकाळी भारतात बहुतेक जगात सर्वात जास्त स्त्री शिक्षण होते. याचा अर्थ 1857 आधी जगात सर्वात जास्त साक्षरता भारतात  होती. 

1857 नंतर ब्रिटीशांना, फूट डालो आणि राज करो नीती राबवून जाती-जातीत वैमनस्य वाढविण्यासाठी खोटे प्रतीक आणि खोटा इतिहास जनतेच्या मनात रुजविणे गरजेचे होते. जुनी पाटी पुसल्या शिवाय नवे प्रतीक मनावर ठसवले जाऊ शकत नाही हे ब्रिटीशांना माहीत होते. त्यासाठी सर्व प्रथम भारतातील शिक्षण संस्थान नष्ट करण्याची गरज होती.  आपल्या शक्तीच्या जोरावर गुरुकुलांची आर्थिक नाळ कापून टाकली. सर्व गुरुकुलांना समाप्त केले. गावो-गावी असलेले 6 लाख गुरुकुल समाप्त झाले.  पुढील दोन पिढीत, अर्थात 50 वर्षांत, देशाची अधिकान्श जनता साक्षर पासून निरक्षर झाली. ब्रिटीशांना फक्त सरकारी कर्मचारी हवे होते  म्हणून  शाळा जास्त उघडल्या नाही. ज्या उघडल्या त्या ही मोठ्या शहरांमध्ये.  याचा सर्वात जास्त फटका आजच्या भाषेत म्हणाल तर ओबीसी आणि दलित समुदायला बसला. 90 टक्के दलित समुदाय निरक्षर झाला. ब्रिटीशांनी प्रचार माध्यम आणि खोट्या इतिहासाच्या माध्यमातून यासाठी उच्च वर्गाला जवाबदार ठरविले. उत्तर भारतात शिक्षण नष्ट झाले. थोड्या बहुत ब्राम्हण आणि वैश्य जनतेला घरात किमान साक्षर होण्याचे शिक्षण मिळत होते. फक्त दक्षिण भारतात, काही गुरुकुल विपरीत परिस्थितीत जिवंत राहिली. त्यामुळे वेदांचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान वाचले. आपले ज्ञान नष्ट झाल्याचे एक उदाहरण-  पाणीदार शहरांचा, गावांचा आणि घरांचा निर्माण करण्याची विद्या जवळपास नष्ट झाली. मी जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात राहत होतो तिथे पावसाचे सर्व पाणी बेड्यात (आंगणात) पडायचे. (आयताकार वाड्याच्या मध्यभागी बेडा होता). 30 फुट खोल असलेल्या हेंडपंपचे पाणी गोड असायचे. 150 पूर्वी पाण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर घरांची आणि नगरांची निर्मिती व्हायची. 1947 मध्ये दिल्लीची जनसंख्या 4 लक्ष होती आणि 500 वर तलाव होते.  आजच्या वास्तुविदांना हे ज्ञान नाही. गुरुकुल शिक्षण मेकाले शिक्षणपेक्षा जास्त उत्तम आणि व्यावहारिक होते, हे कळते.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वेक्षणानुसार साक्षर भारतीयांना निरक्षर बनविण्याचे कार्य ब्रिटीशांनी मेकाले शिक्षण लादून केले.   आज जे स्वत:ला मागास म्हणवितात, अश्या जनतेला ब्रिटीशांनी निरक्षर आणि मागास  बनविले  हे ही कळते. 

भारताला स्वात्यंत्र मिळून 75 वर्ष झाली. अजूनही देशात मेकाले शिक्षण सुरू आहे. आज ही 18 वर्षाचा युवा कौशलहीन असतो. प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या उत्तम बाबी नवीन शिक्षण  व्यवस्थेत घेण्याचे गरजेचे आहे. आठवी नंतर 100 टक्के विद्यार्थ्यांना कौशल युक्त शिक्षण अनिवार्य करणे काळाजी गरज आहे.  बिना प्रात्यक्षिक शिक्षण देता स्नातक निर्माण करणे म्हणजे अशिक्षित बेरोजगार पैदा करणे.

 

 


Monday, April 7, 2025

सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन

  

(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार) 

काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी ....

 मी: वडिलांना दुकान टाकून दिले...

ती: नाही हो,

मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल. 

ती: नाही हो, हा जो  दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली. 

मी विचार करू लागलो, हा साईन बोर्ड जास्तीसजास्त पाच किंवा दहा हजाराचा असेल. सिप मध्ये नियमित गुंतवणूक करून तिला एवढेच पैसे मिळाले... 

सर्वांनी सिप गुंतवणूक करण्यापूर्वी, हे विज्ञापन अवश्य पाहिले पाहिजे. 

Saturday, March 15, 2025

दोष व्हीआय पी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी  इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. 

महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी. कारण दुर्योधनाला माहीत होते, जो पर्यन्त कुरुक्षेत्रच्या युद्ध भूमीवर पितामह भीष्म आहेत, तो पर्यन्त पांडवांचा विजय होणे शक्य नाही. राजा जिवंत असेल तरच युद्ध जिंकणे किंवा शत्रूपासून राज्याची सुरक्षा करणे संभव असते.  बिना राजा राज्य सुरक्षित राहू शकत नाही. 

आज एसपीजी भारताच्या प्रधानमंत्रीची सुरक्षा करते. एसपीजीत प्रतिनियुक्ती वर सुरक्षा दलांतून अंगरक्षक भरती केले जातात. अंगरक्षक निश्चित अवधिसाठी नियुक्त केले जातात. एसपीजीचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्रीचे अंगरक्षकांची ड्यूटी कोण करणार हे नियमिपणे ठरवत राहतात. आज परिस्थिति पाहून एसपीजी प्रधानमंत्रीचे कार्यक्रम ही बदलू शकते. प्रधानमंत्रीला त्यांच्या सुरक्षेची चिंता करण्याची गरज नसते. ते त्यात हस्तक्षेप ही करत नाही. या शिवाय एसपीजी असो किंवा प्रधानमंत्री कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कसून चौकशी होते. त्यांच्या परिवाराची ही चौकशी केली जाते. त्यानंतरच त्यांची नियुक्ती होते. थोडी ही शंका असेल तर त्यांची नियुक्ती केली जात नाही किंवा केली असेल तर त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात पाठवून दिले जाते. 

एसपीजीच्या स्थापने पूर्वीही सुरक्षा दलांचे कर्मचारी प्रधानमंत्रीची सुरक्षा करायचे. सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी अंगरक्षकांची नियुक्ती करायचे. शंका असेल तर अंगरक्षकांना बदलण्याचा अधिकार ही त्यांना होता. पण त्याकाळी प्रधानमंत्रीच्या इच्छेनुसार अंगरक्षक कितीही वर्ष तिथे काम करू शकत होते. ही सुरक्षा यंत्रणेची सर्वात मोठी चूक होती. 

जे अधिकारी प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी जवाबदार असतात. त्यांच्यात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीच्या इच्छेच्या विरोधात जाऊन निर्णय घेण्याची क्षमता ही असली पाहिजे. मी एसपीजीत होतो तेंव्हा  प्रधानमंत्री नेहरूजींच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली होती. त्यात किती सत्य होते, हे अजूनही मला माहीत नाही. एकदा भाषण संपल्यावर  जनता  त्यांच्या भोवती गोळा झाली. कुणाला त्यांचे चरण स्पर्श करायचे होते, कुणाला हात मिळवायचे होते. कुणाला त्यांच्याशी बोलायचे होते. पण असे करताना पंडितजींना लोकांचे धक्के लागत होते. त्यांच्या सुरक्षेत असलेल्या अधिकार्‍याला वाटले, लोकांचे प्रेम जरा अति होत आहे. तो पंडित नेहरू जवळ गेला. त्यांचे हात पकडून त्यांना थोड्या दूर उभ्या असलेल्या कार जवळ ओढत घेऊन जाऊ लागला. पंडित नेहरूंनी विरोध केला, पण अधिकार्‍याने त्याकडे लक्ष दिले नाही. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्याला आपल्या कार्यालयात बोलविले. अधिकार्‍याला वाटले, आता प्रधानमंत्री त्याला फायर करतील. पण नेहरूजींनी त्याच्या कर्तव्य परायणता आणि समय सूचकतेचे कौतुक केले. मला वाटते या गोष्टीचा एकच उद्देश्य होता, राष्ट्र प्रमुखाची सुरक्षा, ही राष्ट्र प्रमुखाच्या इच्छेपेक्षा जास्त महत्वपूर्ण असते, हे राष्ट्र प्रमुखाच्या सुरक्षेत असलेल्या सर्वांनी सदैव लक्षात ठेवले पाहिजे.  

प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या अंगरक्षक दलात दोन सिख ही होते. अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती. त्यांचे प्रधानमंत्री इंदिरा गांधी सोबत पारिवारिक स्नेह संबंध ही स्थापित झाले होते. आपरेशन ब्लू स्टार नंतर सिखांच्या धार्मिक भावना दुखविल्या गेल्या होत्या.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षा व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना त्या दोन्ही सिख अंगरक्षकांना प्रधानमंत्रीच्या सेवेतून मुक्त केले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी आपली शंका प्रधानमंत्रीला बोलावून दाखविली आणि त्यांची बदली करण्याची अनुमति मागितली. साहजिक होते, प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी ती दिली नाही. नियमांनुसार अधिकारी त्या सिख अंगरक्षकांची बदली करू शकत होते. प्रधानमंत्रीची अनुमति घेण्याची गरज नव्हती. इथे ही  स्वामीची इच्छा स्वामी निष्ठेवर भारी पडली. अधिकार्‍यानी स्वामी हिताचा निर्णय घेतला नाही.  त्यांच्या चुकीचा परिणाम प्रधानमंत्री सहित हजारो लोकांना जीव गमवावा लागला.  

छत्रपति संभाजी राजांच्या काळी राजाला अधिकान्श निर्णय स्वत: घ्यावे लागायचे. जनतेत जाऊन न्याय निवडा ही करावा लागत असे. त्यासाठी राज्यभर फिरावे लागत असे. छत्रपति संभाजी राजांना शत्रू आपल्यावर चालून येत आहे. ही माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांच्या सोबत अंगरक्षक, मित्र आणि सरदार ही होते. त्यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या अधिकार्यांनी  सारासार विचार केला असता  तर त्यांना समजले असते.  मुगल फौजेला राजा कुठे आहे ही माहिती मिळाली आहे. याचा अर्थ फितुरी झाली आहे.  राजा सोबत किती सैनिक आहे, हे ही मुगल फौजेला माहीत झाले असेल. मुगलांनी राजांच्या मागावर  निवडक आणि प्रशिक्षित सैन्य पाठविले असेल.  ते वेगाने इथे पोहचण्याचा प्रयत्न करतील. जे फितूर झाले आहेत, ते मुगल फौजेचा मार्गदर्शन ही करू शकतात. अश्या बिकट परिस्थितीत बिना अधिक विचार करता छत्रपति संभाजी राजांना त्वरित तेथून हलविले पाहिजे होते. पण काय झाले. राजांचे सर्व सोबती स्वामी भक्त होते, स्वामी आज्ञेचे पालन करताना मरण पत्करू शकत होते. पण ते परिस्थितीचा सारासार विचार करून स्वामींच्या  हिताचा निर्णय घेण्यास ते असमर्थ ठरले. 

या घटनांपासून एकच धडा मिळतो. शत्रूला तुमच्या राजाला नष्ट करायचे असते. त्यासाठी समोरा-समोर युद्धा एवजी तो साम, दाम, दंड, भेद हे सर्व हत्यार ही वापरू शकतो. तो फितुरांची मदत ही घेऊ शकतो. राजाच्या सुरक्षेत असलेल्या सर्व अधिकार्‍यांना, सरदारांना हे माहीत असले पाहिजे. त्यांच्यात राजाच्या सुरक्षेसाठी, राजाच्या इच्छे विरुद्ध ही जाण्याचे धाडस असले पाहिजे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी असो किंवा छत्रपति सभाजी राजे दोघांचे प्राण वाचले असते जर त्यांच्या सुरक्षेत असलेल्या जवाबदार अधिकार्यांनी स्वामीची सुरक्षा प्रथम ह्या सिद्धांतंनुसार निर्णय घेतला असता.

व्हीआयपी सुरक्षा ही सामूहिक जिम्मेवारी असल्याने कुणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपण फक्त इतिहासातून धडा घेऊ शकतो. प्रत्येक राजकर्त्यांने समर्थांचे बोल  "अखंड सावधान असावे... नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. 


Wednesday, March 5, 2025

राजकुमार, बुटका आणि राक्षस : युक्रेन आणि अमेरिका


एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.  

आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.   

रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेनने रशियाची मैत्रीपूर्ण संबंध ठेवले असती तरी समस्या उत्पन्न झाली नसती. युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला आणि रशियाच्या मित्र देशांविरोधात अर्थात भारत विरोधी भूमिका ही घेत राहिला. युक्रेनमध्ये रशियन लोकांवर आत्याचार सुरू झाले. नंतर मीडिया आणि पैश्यांच्या मदतीने एका मूर्ख व्यक्तीला युक्रेनच्या सिंहासनावर बसविले. परिणाम रशियाला संपूर्ण रशियन भाषिक प्रदेश युक्रेनपासून तोडण्यासाठी युद्ध करण्यास भाग पाडले. अमेरिकाने 300 बिलियनहून जास्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला दिले. (अर्थात तो पैसा अमेरिकन शस्त्र उत्पादकांना मिळाला). तसेच युरोप ने ही केले. शस्त्र माफिया खुश झाला.  रशियावर अनेक प्रतिबंध लावले. तीन वर्ष झाले युद्धाचा काही परिणाम निघलेला नाही. युक्रेनचे काही लक्ष सैनिक युद्धात शहीद झाले. अमेरिकेला अपेक्षित होते तेवढे रशियाचे नुकसान झाले नाही. रशिया ही आपल्या रशियन मूळच्या जनतेला वार्‍यावर सोडून परत जाणार नाही. जो पर्यन्त आर्थिक क्षमता आहे, नुकसान सोसेल. चीनला या युद्धाचा जास्त फायदा झाला. आफ्रिका आणि दक्षिणी अमेरिकेत त्याचे आर्थिक हस्तक्षेप वाढले. युक्रेन युद्धात जास्त पैसा ओतणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे नाही. हे अमेरिकेला कळून चुकले आहे. आता अमेरिकेला  युक्रेन मध्ये खर्च केलेल्या 300 बिलियन डालरच्या मोबदल्यात त्याला युक्रेनची खनिज संपत्ति पाहिजे. युरोप ही त्याच उद्देश्याने युक्रेनला शस्त्र पुरवठा करता आहे. झेलेंस्की आता युरोपला या युद्धात भाग पाडण्याचा विचार करतो आहे. युरोप प्रत्यक्ष युद्धात उतरणार नाही.  युरोप फक्त अस्त्र-शस्त्र युक्रेनला पुरवीत राहणार. तबाही मात्र युक्रेनची होणार. 





Wednesday, February 26, 2025

घरच्या देव्हार्‍यातील देव आणि भगवान बुद्धाची शिकवण.

 
सनातन धर्मात घरात ही देवांची पूजा करण्याची परंपरा आहे. घरच्या देव्हार्‍यात पाच देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. ही संख्या  व्यक्तीच्या श्रद्धेनुसार कमी जास्त राहू शकते. (काही लोक फक्त एकाच देवाची पूजा करतात). हे पाच देव आहेत गणपती, शंकर, सूर्य, देवी आणि विष्णू. आज अधिकान्श घरातील देव्हार्‍यात सूर्य देवाला स्थान नसते. त्या एवजी भगवान दत्तात्रयाची मूर्ती किंवा कुळ देवता/कुळ देवीच्या मूर्ती असते.  भगवान विष्णु एवजी बाळकृष्ण असतो. भगवान शंकरच्या मूर्ती एवजी चांदीची छोटी पिंडी असते. घरातील पूजा आपण अर्ध्या तासाच्या आत करतो त्यामुळे सर्व देवतांना घरच्या देव्हार्‍यात स्थान देणे कठीणच आहे. बाकी देवतांच्या दर्शनाला आपण मंदिरात जातो, देव दर्शनासाठी यात्रा करतो, वारीत जातो. भगवान बुद्ध ही विष्णूचे अवतार असल्याने घरच्या देव्हार्‍यात त्यांना अप्रत्यक्ष स्थान मिळाले आहे. सर्वच मंदिरांत दशावतारात भगवान बुद्धाला स्थान आहे. उदा. महाराष्ट्रातील कोपेश्वरचे (शंकराचे) यादव काळातील मंदिरांत खांबांवर विष्णूचे दशावतार चित्रित आहे. त्यात भगवान बुद्ध ही आहेत. अयोध्येच्या राम मूर्तीत ही भगवान बुद्ध आहेत. 

भगवान बुद्धांचा जन्म शाक्य कुळात झाला. सूर्य वंशातील  राजा शाक्य पासून शाक्य कुळ सुरू झाले. बौद्ध ग्रंथ दशरथ जातक अनुसार भगवान बुद्ध हे पूर्व जन्मी श्रीराम होते. त्याकाळी सनातन धर्मात आलेले  दोष दूर करण्यासाठी भगवान बुद्धाने सम्यक ज्ञानाची अवधारणा आपल्याला दिली. 

भगवान बुद्धाची सम्यक ज्ञानाची शिकवण सनातन धर्मात सांगितलेल्या धर्माच्या दश लक्षणांसाखीच आहे. धर्माचे दहा लक्षण- धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, स्वच्छता पाळणे, इंद्रियांना वश मध्ये ठेवणे, बुद्धि, विद्या, सत्य आचरण आणि क्रोध न करणे आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील धर्म मार्गावर चालणार्‍या स्थितप्रज्ञ (सम्यक) व्यक्तीचे जे लक्षणं आहेत त्याच अनुसार भगवान बुद्धाने धर्माची हीच लक्षणे सम्यक् दृष्टि,सम्यक् संकल्प, सम्यक् वाक् सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव-सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति सम्यक् समाधिच्या माध्यमाने सांगितली आहे.  

बाकी भगवान बुद्धाच्या शिकविणेचे पालन सनातन धर्मीय करतात. समाजात तेढ निर्माण करण्याची घातक वृती पासून दूर राहावे हीच अपेक्षा. 

Sunday, February 23, 2025

शिक्षण आणि विटाळ पाळणे


 "शिक्षण  प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात. असे अर्ध-शिक्षित लोक त्यांच्या कृतीने ते अशिक्षित आहेत हे दाखविण्याचा कोणताही मौका सोडत नाही. 

आता दूसरा प्रश्न विटाळ म्हणजे काय? स्त्रीच्या शरीरातून  महिन्यातून  काही दिवस अनुपयोगी आणि अपायकारक  स्त्राव  बाहेर पडतात. या दिवसांना, स्त्रीची मासिक पाळी किंवा स्त्री विटाळशिण झाली, असे शब्द भाषेत आहे. अश्या अनुपयोगी, अपायकरक स्त्रावतून कुणाचाही जन्म होत नाही. अजून तरी जेंव्हा स्त्री आणि पुरूषांचे बीज एकाकार होतात आणि त्यांचे पोषण स्त्रीच्या गर्भात होते, तेंव्हाच नवे बाळ जन्माला येते. विटाळातून कुणाचाच जन्म होत नाही.असो. स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्राव जमिनीवर पडू नये, त्यामुळे रोगराई पसरू नये म्हणून आजच्या आधुनिक स्त्रीया पैड इत्यादि वापरतात. पण शंभर वर्षांपूर्वी आपल्या देशात अधिकान्श स्त्री आणि पुरुष अंतर्वस्त्र वापरत नव्हते. मी स्वत: सहावीत गेल्या पहिल्यांदा अंडर वेयर घातली होती. ही 1980 पूर्वी महानगरातील परिस्थिति होती. बहुतेक ब्रा-पेंटी इत्यादिंचा वापर महानगरात 100 वर्षांपूर्वी सुरू असेल. अजूनही 100 टक्के ग्रामीण भागात या अंतर्वस्त्रांचा प्रसार झाला नसेल.  पूर्वीच्या  काळात  स्त्रीच्या शरीरातील बाहेर पडणारे अनुपयोगी आणि अपायकरक स्त्रावाने घरातील आणि बाहेरचे  वातावरण प्रदूषित होऊ नये यासाठी उपाय शोधणे गरजेचे होते. या शिवाय मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव होण्याने स्त्रीला शारीरिक विश्रांतीची ही गरज असायची. त्या काळच्या  शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली. स्त्री विटाळशिण झाली की तिला विश्रांति मिळावी या हेतूने विटाळशिण स्त्रीला वेगळे ठेवण्याची परंपरा समाजात रूढ झाली. त्याकाळच्या सामाजिक स्वास्थ्य दृष्टीने ती व्यवस्था सर्वोत्तम होती.  आजच्या काळात अधिकान्श कामांसाठी आधुनिक उपकरण उपलब्ध असतात तरी ही शिक्षित डॉक्टर स्त्रीला मासिक पाळीच्या काळात जास्त शारीरिक श्रमांचे काम न करण्याचा सल्ला देतात. 

काळानुसार समाज आणि परिस्थिति बदलत रहाते. कोणतेही विधान करण्यापूर्वी त्याकाळच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितींचा विचार करणे ही गरजेचे असते. मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने  सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.  पण चिंतन आणि मनन करण्याची क्षमता नसलेले अर्ध-शिक्षित  सर्व जुन्या सामाजिक परंपरांबाबत निरर्थक विधान करतात त्यासाठी हा लेख. 



Monday, February 10, 2025

दिल्ली मराठी साहित्य सम्मेलन : दिल्ली कर मराठी कवींच्या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले.




दिल्लीत मराठी साहित्य सम्मेलांनाच्या निमित्ताने दिल्लीकर मराठी कवींच्या कवितांचे संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यात माझ्या ही दोन कविता होत्या. 

बजेट आले आणि लग्न तुटले.


ही कथा आहे. आमच्या नागपुरकर सदाशिवाची. एका बजेटमुळे लग्न तुटते हे ऐकून कानावर विश्वास बसला नसेल. पण सदाच्या बाबतीत असेच झाले. आमचा सदा आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा साधभोळा, कुठलेही व्यसन नसलेला एकुलता एक मुलगा. तरीही त्याचे लग्न तुटले. सदाचे वडील नागपूरमध्ये एका सरकारी शाळेत शिक्षक होते. दहा वर्षांपूर्वी नागपुरात 2500 चौरस फुटच्या फ्लॅट वर त्यांनी घर बांधले.  ग्राऊंड फ्लोर वर  एक मोठा हॉल, दोन बेड रूम,  मोठे स्वैपाकघर, एक स्टोअर रूम  आणि एक देवघर ही. वरच्या माल्यावर  पाहुण्यासाठी एक रूम ही.  घरात पेरू, लिंबू, आंबा आणि शेवगाच्या शेंगांचे झाडे होती. जाई जुई, मोगरा, गुलाब, सदाफुली  इत्यादि फुलांच्या झाडे आणि वेली ही होत्या. मुंबई पुण्याच्या भाषेत एक बंगलो त्यांनी बांधला होता.

सदाने नागपूरच्या एका महाविद्यालतून आयटी शिक्षण घेतले. एमबीए ही केले. पण  भरपूर प्रयत्न करून ही त्याला नागपुरात नौकरी मिळाली नाही.  अखेर त्याने पुण्याची वाट धरली. त्याला पुण्यात एका आयटी कंपनीत 25 हजार पगारावर नौकरी मिळाली. एका बंगल्यात राहणारा सदा पुण्यात दोन-चार तरुणांसोबत एका फ्लॅट मध्ये राहू लागला. पुण्यात पंचवीस हजारात  एका व्यक्तीचे  जीवन निर्वाह होणे कठीण, संसार थाटणे शक्यच नाही. सदाचा पगार कमी असल्याने पुण्याच्या नौकरी करणार्‍या मुलींनी त्याला भाव देणे शक्यच नव्हते. तसे ही पुण्याच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात. त्यामुळे सदाने लग्नाचा विचार सोडून दिला. त्यात करोंना आला, कंपनी ने दोन वर्ष पगार वाढ रोखून ठेवली. पण अखेर सदाचे नशीब बदलले. 

नागपुरात ही आयटी कंपन्या येऊ लागल्या होत्या. सदाला गेल्यावर्षी एका कंपनीत 50 हजारची नौकरी मिळाली. त्यात नौकरी ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्तची. सदा तर भलताच खुश झाला. नुकतीच त्याची 30 उलटली होती. त्याला लग्नाची घाई झाली होती. नौकरी करणारी मुलगी भेटली नाही तरी वडिलांची पेन्शन आणि त्याच्या पगारात उत्तम रीतीने जगता येणे शक्य होते. त्याच्या वडीलांनी वधू संशोधांनाची मोहीम हाती घेतली.  पण इथेही लोचा झाला. जिथे पुण्या-मुंबईच्या मुलींना अमेरिकेचे डोहाळे लागलेले असतात, तिथे नागपुरकर मुलींना पुण्या-मुंबईचे डोहाळे लागलेले असतात. अखेर गेल्या महिन्यात एका मुलीने होकार दिला. 

एक तारखेला निर्मला ताईंनी बेजेट पेश केले. इन्कम टॅक्स लिमिट 12 लाखांपर्यंत वाढविली. पाच फेब्रुवारीच्या माघाष्टमीच्या शुभ दिवशी  सदाचे वडील पुढील बोलणीसाठी मुलीवाल्यांकडे केले. सदा ऑफिसात गेला. संध्याकाळी सदा घरी पोहचला. वडील बैठकीत बसलेले दिसले नाही. त्याने आईला विचारले बाबा कुठे, त्याची आई म्हणाली बाबा वरती गच्चीवर गमल्यातील फुलांच्या झाडांना पाणी देत आहे. तू हात पाय धूऊन कपडे बदलून ये, मी चहा ठेवते. सदा हात पाय धूऊन कपडे बदलून बैठकीत आला. त्याची आई चहा घेऊन आली. वडील ही चहासाठी खाली आले. सदाने वडिलांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. त्याचे वडील म्हणाले सदा, मुलीवाल्यांनी नकार दिला. सदाने त्याचे कारण विचारले. त्याचे वडील म्हणाले मुलीवाले म्हणतात मुलगा किमान इन्कम टॅक्स भरणारा असावा. .....

होणारा जावई इंकम टॅक्स भरत नाही. ही तर आम्हासाठी लजास्पद बाब आहे. अश्या घरी मुलगी देणे शक्य नाही. सदा आपल्या पे स्लिपला पाहत विचार करू लागला पगार पन्नास हजार ते लाख रुपये पोहचायला किमान पाच वर्ष तरी लागतील. पाच वर्षांनी पुन्हा इन्कम टॅक्स लिमिट वाढली तर आपले कधीच लग्न होणार नाही. 



Thursday, January 30, 2025

एका आगीची छोटीशी गोष्ट

 (काल्पनिक कथा)

दिल्लीच्या रायसिना भागात केंद्र सरकारच्या सचिवलयांच्या इमारती आहेत. अधिकान्श इमारती पाच ते सात माल्यांच्या आहेत. अग्नि शामक नियमांच्या अनुसार कर्मचार्‍यांना इमारतीत चढण्या उतरण्यासाठी किमान दोन वेगवेगळ्या पायर्‍या असल्या पाहिजे. पण जागेची कमतरता असल्याने इमारतीच्या कोपर्‍यांवर जी मोकळी जागा असते तिथे ही निर्माण झाले असल्याने कर्मचार्‍यांना उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध असते. इमारतींत अवैध निर्माण असल्याने अधिकान्श इमारतींना अग्नि शामक विभागाचे प्रमाण पत्र नाही. तरीही अग्निपासून असुरक्षित इमारतींत मंत्री ते संत्री हजारो कर्मचारी काम करतात. मी ज्या इमारतीत कामाला जात  होतो. ती आयतकार इमारत होती. मध्यल्या मुख्य दरवाज्यातून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला पायर्‍या आहेत. प्रथम माल्यावर डाव्या बाजूला माझ्या अधिकार्‍याचे आणि माझे केबिन ही आहे. या भागात ही सर्वच माळ्यांवर कोपर्‍यावर अवैध निर्माण असल्याने आम्हाला उतरण्यासाठी एकच पायरी उपलब्ध आहे. मजेदार बाब पाचव्या फ्लोर वर अश्याच अवैध निर्मित  भागात आमच्या मंत्र्याचे चेंबर होते.  

त्या दिवशी सकाळी पाउणे नऊ वाजले असतील. मधल्या दरवाज्यातून प्रवेश करताच जाणवले काही वेळापूर्वी डाव्या बाजूच्या पायर्‍यांजवळ आग लागली होती. माझ्या मॅडम अधिकारीने आल्या-आल्या चेंबर मध्ये शिरताच मला बोलावले.  पीएस साहब (दिल्लीत शिपाई सोडून सर्वांना साहब म्हणण्याची पद्धत आहे), सकाळी आग लागली होती का? मी उतरलो, यस मॅडम. पीएस साहब, हे सांगा, आपण इथे असताना पुन्हा अशीच आग लागली आणि जोरात पसरली  तर आपण कसे बाहेर पडणार? दुसर्‍या बाजूला तर बाहेर जाण्याचा मार्ग बंद आहे. मी काही बोलणार त्या आधीच ती उतरली, अरे, आपण पहिल्या माल्यावर आहोत. खिडकीतून खाली उडी मारू शकतो. जास्तीसजास्त एखादा पाय तुटेल. पण प्राण वाचतील. मी उतरलो, मॅडम, आपण खिडकीतून उडी मारू शकत नाही. माकडे आत येऊ नये म्हणून या भागात सर्वच इमारतींच्या खिडक्यांना लोखंडाच्या मजबूत जाळ्या लागलेल्या आहेत. तिने मागे वळून खिडकी कडे पहिले आणि अत्यंत मरगळलेल्या आवाजात मला पाहत म्हणाली, मग आपले प्राण कसे वाचतील? खरे तर तिच्या प्रश्नावर मला हसू येत होते तरीही ही चेहरा गंभीर करत म्हणालो, मॅडम, आपण पहिल्या माल्यावर आहोत. आपण पाणी अंगावर शिंपडून तोंडाला हाताने झाकून आगीतून खाली उतरू शकतो. जास्तीसजास्त एखाद मिनिट लागेल. जर आपल्या कपड्यांना आग असे वाटले तर इमारतीतून बाहेर पडताच जमिनीवर लोट मारून घेऊ. बाहेर असलेले लोक आपल्याला वाचवून घेतील. तिने पुन्हा विचारले, असे उतरणे कितपत योग्य. मी उत्तर दिले, बहुतेक 1992-93 मध्ये कृषि मध्ये आग लागली होती त्यात प्राण हानी ही झाली होती. आगीत अधिकान्श लोकांचे प्राण, विषाक्त वायु फुफ्फुसात आत गेल्याने, जातात. आग आणि धूर युक्त विषाक्त वायु नेहमीच वर जाते. त्यामुळे इमारतीत आग लागल्यावर खाली उतरणे जास्त योग्य. वर जाणार्‍यांची मरण्याची शक्यता जास्त. त्यानंतर काही कर्मचार्‍यांना आग लागल्यावर काय करायचे याचे प्रशिक्षण दिले होते. मी ही ते घेतले होते. माझ्या या उत्तराने तिचे समाधान झाले. ती म्हणाली, म्हणजे आग लागली तरी आपण जीवंत राहू. पण पाचव्या माल्यावर बसणार्‍या आपल्या मंत्र्याचे काय होईल. ते अश्या  आगीत पाच माले खाली उतरु शकतील का. मी म्हणालो, त्यांना वाचवायला हेलिकॉप्टर येईल. फक्त त्या वेळ पर्यन्त ते जीवंत राहिले पाहिजे. माझ्या या उत्तरावर ती हा! हा!हा! करत जोरात हसली. त्या हसण्याचे गूढ मात्र मला कळले नाही. पण  अधिकारी सकाळी प्रसन्न असेल तर त्याच्या खाली काम करणार्‍या सर्वांचा दिवस ही उत्तम जातो. असो 

मोदी सरकार आल्या नंतर सरकारला जाणवले, सचिवालयाच्या अधिकान्श इमारती जुन्या आणि असुरक्षित आहेत या शिवाय जागेची कमतरता ही आहे. सरकारने नवीन सुरक्षित इमारती बांधण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. संसद भवन सहित अनेक मंत्रालये आज नव्या इमारतीत शिफ्ट ही झाले आहेत. नव्या इमारती आगीपासून जास्त सुरक्षित आहे. निदान पुढील काही वर्ष तरी या इमारतींच्या आत अवैध निर्माण होणार नाही ही अपेक्षा आपण ठेऊ शकतो. 


Tuesday, January 21, 2025

हिवाळ्यातील मौज: टोमॅटो मिक्स सूप

हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात. अनेकांची तक्रार असते घरी बाजार सारखे  टोमॅटो सूप बनत नाही. सूप पातळ बनते. सूप घट्ट करण्यासाठी त्यात मैदा इत्यादि पदार्थ मिळविणे केंव्हाही उचित नाही. या शिवाय बाजारात लाल भडक टोमॅटो मिळत ही नाही. देसी टोमॅटो आंबट असतात, ते जास्त टाकले तर सूप ही आंबट बनणार. त्यात साखर घालणे ही योग्य नाही. आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे. सौ. घरात टोमॅटो बनविते. तिने यावर सौपा उपाय शोधला. यासाठी ती टोमॅटो, गाजर आणि बिट्स रूट (हिंदीत चुकुंदर) वापरते. गाजर गोड स्वाद देते आणि बिट्स रूट लाल भडक रंग देते. दोन्ही टाकल्याने सूप किती घट्ट करायचे आपण स्वत: ठरवू शकतो. आता तर मी ही सूप बनविण्यात एक्स्पर्ट झालो आहे. चार ते सहा लोकांसाठी सूपची विधी:  पाच ते सहा सामान्य आकाराचे टोमॅटो (टोमॅटो जास्त आंबट असतील तर कमी ही चालतील), एक गाजर आणि एक लहान आकाराचे बिट्स रूट (मोठे असेल तर अर्धे). या शिवाय एक हिरवी मिरची (नाही टाकली तरी चालेल). टोमॅटो, गाजर, बिट्स रूटचे छोटे तुकडे करून आणि साबूत मिरची कुकर मध्ये टाकून थोडे पाणी घालून उकळून घ्यायचे. (कोथिंबीरीच्या काड्या ही टाकू शकतात त्या ही स्वाद वाढवितात).  गॅस वर दोन शिट्या पुरे. त्यानंतर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घ्यायचे. सूप एका भांड्यात काढून आता तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे त्यानुसार त्यात पाणी मिसळायचे. स्वादासाठी, जिरे, मिरपूड, आणि मीठ घालून चार- पाच  मिनिटे उकळून घ्यायचे. सूप बाउल किंवा कपात  सर्व करताना, एक चमचा क्रीम किंवा ताजे लोणी. ते ही घरात नसेल तर दुधावरची साय ही टाकता येते. इथे चित्रात दुधावरची साय टाकली आहे. स्वाद अप्रतिम लागतो. आवडत असेल तर कोथिंबिर ही सूप वर टाकाता येते. 


हिवाळ्यात पालकचे सूप ही छान लागते. पालक सूप बनविताना त्यात एखाद टोमॅटो  घातला की ते ही स्वादिष्ट लागते आणि लहान मुले ही  पिताना नखरे करत नाही. भाज्यांच्या मिक्स सूप मध्ये ही टोमॅटो आणि बिट्स रूट घातले की ते ही स्वादिष्ट बनते. 





Saturday, January 18, 2025

दिल्ली विधानसभा निवडणूकीची तैयारी : निष्पक्ष विश्लेषण

दिल्लीत येत्या पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार.  दिल्लीत भाजप आप आणि कांग्रेस मध्ये तिरंगी लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे ठरविण्यासाठी तिन्ही पक्षांची निवडानूकीसाठी किती तैयारी आहे हे पाहण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

कांग्रेस दिल्लीत पंधरावर्ष सत्तेत होती. अल्पसंख्यक, दलित आणि पूर्वांचली  हा कांग्रेसचा वोट बँक होता. आज ही दिल्लीत 8-10 टक्के निष्ठावंत मतदाता कांग्रेसपाशी आहे. इतर राज्यांप्रमाणे दिल्लीत ही अल्पसंख्यक समुदाय  भाजपा विरोधातात असलेल्या प्रमुख पक्षाला एक गठ्ठा मतदान करतात.  अल्पसंख्यक मतदार तेलंगना प्रमाणे कांग्रेसकडे वळविण्यात कांग्रेस नेतृत्व यशस्वी झाले असते तर आप पार्टीचे अस्तित्व बर्‍यापैकी संपविण्यास कांग्रेस यशस्वी झाली असती.  पण तसा काही प्रयत्न काँग्रेसने गेल्या सहा महिन्यात केला नाही. या वेळी ही जास्तीस्जास्त 5 ते 10 जागांवर कांग्रेस लढताना दिसेल. बाकी जागांवर भाजपाची मते कापण्याचा प्रयत्न करेल. बहुतेक यामुळेच माननीय केजरीवाल एका भाषणात म्हणाले दिल्ली निवडणूकीच्या काळात ते माननीय राहुल गांधींची निंदा करणार नाही.

आप पार्टीला दिल्लीत अल्पसंख्यक समुदायाचे समर्थन आहे. दुसर्‍या शब्दांत  मतदानपूर्वीच +10 मतांची लीड त्यांच्या पाशी आहे. दिल्लीत डीटीसी बसेस मध्ये महिलाना तिकीट घ्यायची गरज नाही. रोज किमान दहा ते पंधरा लाख महिला डीटीसी बसेस मधून प्रवास करतात. या शिवाय वीज, पाणी अनेक फ्री बी आहेत. एका वर एक बाटली फ्रीचा लाभ आप पक्षाला मिळणार. या शिवाय निवडणूकीची तैयारी कशी केली जाते हे आप पार्टी कडून शिकण्यासारखे आहे. विधानसभा निवडणूकीसाठी डिसेंबर महिन्यात आपने आपले उमेदवार जाहिर करून टाकले होते. पण अधिकान्श जागांवर तीन  महीने आधीच अनौपचारिक रीतीने उमेदवार निश्चित झाले होते. त्यांनी प्रचार ही सुरू केला, विशेषकरून ज्या भागांत लोकसभेत आपला कमी मते मिळाली होती. निवडणूकीच्या घोषणे पूर्वी केलेली कामे आचार संहितेत येत नाही. याचा लाभ आप पक्षाने पूर्णपणे घेतला. त्यात काहीही गैर नाही.  बाकी आमच्या उत्तम नगर भागातील निवर्तमान विधायक बल्यान पुण्यकर्म करून तिहाड तीर्थ क्षेत्री विश्राम करत असल्याने त्यांच्या श्रीमतीला तिकीट मिळाले आहे आणि तिचा प्रचार जोरदार सुरू आहे.   

भाजप लोकसभा निवडणूकीत तिसर्‍यांदा विजयी झाली आणि बहुतेक तिसर्‍यांदा विधानसभा निवडणूकीत मार खाणार. सध्या तरी तीच परिस्थिति दिसत आहे. लोकसभा निवडणूकी नंतर एक भाजप कार्यकर्ता मला म्हणाला होता. जर भाजपने मुख्यमंत्री चेहरा देऊन दोन महीने आधी उमेदवार घोषित केले तर भाजप विधानसभा निवडणूक जिंकू शकते. पक्षाचा उमेदवारला विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक भागातील प्रधानांना, छूटभैये नेत्यांना पक्षाशी पुन्हा जोडायचे असेल तर एवढा वेळ पाहिजे. पण भाजप ने मुख्यमंत्रीचा चेहरा ही दिला नाही आणि नॉमिनेशन सुरू झाले तरीही भाजपचे सर्व  उमेदवार निश्चित झाले नाही. अनेकांना वाटते भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची इच्छा दिल्ली जिंकण्याची नाही. बहुतेक विधानसभेत आप आणि लोकसभेत भाजपा हे समीकरण भाजप शीर्ष नेतृत्वाला जास्त योग्य वाटते. भाजप विधानसभा जिंकली तर कांग्रेस दिल्लीत पुन्हा प्रबळ होईल. लोकसभेत कांग्रेस पक्षाच्या जागा वाढू शकतात. भाजप चुकून विधानसभा जिंकली तर त्याचे श्रेय फक्त दिल्लीच्या जनतेला जाईल. भाजप नेतृत्वाला नाही. 

बाकी आपल्या देशात भ्रष्टाचार, विकास, शिक्षण, स्वास्थ्य, शांति व्यवस्था  इत्यादि मुद्दे कधीच निवडणूकीचे विषय रहात नाही.  माननीय गडकरींच्या शब्दांत जर जनतेने काम पाहून मत दिले असते तर त्यांना  400 जागा निश्चित मिळाल्या असत्या. 


Wednesday, January 15, 2025

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो.  लोकसभा निवडणूकीच्या वेळी  दोन्ही पक्षांचे  बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: 

सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी बूथ प्रबंधकांची नियुक्ती करण्यासाठी दोन-तीन मीटिंग्स घेतल्या. गेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच्या बूथ वर 50 टक्के पेक्षा थोडे जास्त मतदान झाले होते. यावेळी पक्षाने मला बूथ व्यवस्थापक नियुक्त केले. मी आपल्या बूथ वर 60 टक्के पेक्षा जास्त मतदान होईल याचे आश्वासन दिले आहे. सचिन या एका महिन्यात अनेक वेळा मीटिंग्ससाठी पक्ष कार्यालयात किंवा पक्ष नेत्यांचा कार्यालयात गेला. त्याचा पेट्रोलचा खर्च ही झाला असेलच. या शिवाय तिथे त्याला चहा पाणी आणि लंच/ डिनर  ही मिळाले असेलच. 

पक्षाचे अस्थायी स्थानीय कार्यालय हे बूथ व्यवस्थापनाचे पहिले पाऊल आहे. बहुतेक जवळपासच्या तीन ते चार मतदान केंद्रांची व्यवस्था पाहण्यासाठी एक अस्थायी स्थानीय कार्यालय स्थापित केले जाते. पक्ष कार्यालयात खुर्ची, टेबल, स्टेशनरी इत्यादींची व्यवस्था करावी लागते. पक्षांचे प्रचार साहित्य वाटण्यासाठी इथे ठेवावे लागते. या शिवाय एक किंवा दोन व्यक्ति पगारी कर्मचारी ही ठेवावे लागतात. कार्यालयाचे भाडे दहा ते वीस हजार, पगारचे ही 10 ते 20 हजार होतात. या शिवाय रोज 50 ते 100 कप चहा, समोसा किंवा वडा पाव  इत्यादि.  या सर्वांवर 10 ते वीस हजार खर्च होत असेल. एका मतदान केंद्रात 1000 मतदाता असतील तर प्रति मतदार 10 ते 20  रुपये पक्ष कार्यालयाचा खर्च येणार. मुंबई सारख्या शहरात याहून जास्त असू शकतो. 

मतदान यादी तपासण्यासाठी सचिन तीन दिवस त्याच्या भागात चार-पाच  कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरला. प्रत्येक घरात जाऊन यादी तपासली. 40 ते 50 बोगस नावे त्याने यादीतून रद्द करवून घेतली. दहा- बारा लोकांचे नाव यादीत टाकले. या शिवाय त्याचे दोन दिवस प्रचार साहित्य वाटण्यात गेले. अर्थात पाच कार्यकर्त्यांनी पाच दिवस काम केले. एका माणसाचे एका दिवसाचे 500 रुपये धरले तरी दहा ते 15 हजार रुपये  खर्च  झालाच असेल. अर्थात प्रति मतदार खर्च 10 ते 15 रुपये. सचिन ने घेतलेल्या मेहनती मुळे सचिनच्या मतदान केंद्रावर 65 टक्के मतदान झाले. 

मतदांनाच्या दिवशीचा खर्च फार मोठा असतो. मतदान केंद्राच्या 100 मीटर दूर गल्लीत पक्षाच्या बूथसाठी दोन टेबल आणि चार खुर्च्या भाड्यांनी आणल्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसभरात चार ते पाच थंड पाण्याचे मयूर जग लागले. मतदार केंद्रात एक अजेंट आणि बाहेर पक्षाच्या बूथवर सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजे पर्यन्त किमान आठ ते दहा लोकांची गरज असते. पक्षाच्या बूथ पाशी तीन-चार कार्यकर्ता पूर्ण दिवस असले पाहिजे. दोन ते तीन टक्के मतदाता पक्षाच्या बूथवर वर्दळ पाहून मतदान करतात. या शिवाय सकाळी चहा. सकाळी 9 वाजता किमान दहा ते बारा कार्यकर्त्यांना नाश्ता ही द्यावा लागतो. दिल्लीचे म्हणाल तर, ब्रेड-पकोडे, कचोरी आणि बटाट्याची भाजी, छोले भटुरे इत्यादि आणि चहा. कार्यकर्त्यांसाठी दुपारच्या जेवणासाठी व्यवस्था ही करावी लागते. संध्याकाळी पुन्हा चहा-समोसा इत्यादि. मतदान उकरल्यावर पाच किंवा सहा लोकांचे डिनर ही. ईव्हीएम जमा करण्यासाठी जाण्याचा आणि मतमोजणीच्या दिवसाचा खर्च वेगळा. या शिवाय पान-तंबाकू इत्यादीचा खर्च ही. थोडक्यात एका मतदान केंद्राचा खर्च 15 ते 20 हजारांचा घरात जातो. प्रति मतदार हा खर्च 15 ते 20 रु. 

किती खर्च झाला हा प्रश्न  विचारल्यावर  सचिन ने प्रश्नाचे उत्तर दिले नाही. खर्च कुणी उचलला हे ही सांगितले नाही. तरीही अंदाजे वरील सर्व खर्च मोजला तर पक्षाला एक मतदार 30 ते 50 रूपयांचा पडतो.  

अफवांवर विश्वास ठेवला तर निवडनूकीच्या दिवशी दारू आणि पैसा ही वाटला जातो. या शिवाय पक्ष नेत्यांच्या रोड शो, रॅलीचा खर्च, नेत्यांचा प्रवासाचा खर्च ही मोठा असतो. या सर्वांवर मोठ्या पक्षांचे काही अब्ज नक्कीच खर्च होत असतील. दिल्लीत एक कोटी 55 लक्ष मतदार आहेत. याचा अर्थ फक्त मतदान केंद्र व्यवस्थापनेचा खर्च मोठ्या पक्षांना 100 कोटीच्या जवळपास पडेल. ज्या पक्षाजवळ बिना मजुरी घेता कार्य करणारे कार्यकर्ता असतील त्याला खर्च कमी येऊ शकतो. विधानसभा निवडणूकीच्या वेळी लोकसभा निवडणूकी पेक्षा जास्त खर्च येतो. कारण उमेदवारांना त्या भागातील विभिन्न समुदाय प्रमुख, कालोनी प्रधान आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना ही प्रसन्न करावे लागते. 

आपल्या देशात लोकसभा, विधानसभा, स्थानीय निकाय इत्यादींची  निवडणूक वेगळी घेतली जाते.  प्रत्येक वेळी पक्षांना अब्जावधी रुपये खर्च करावा लागतो. कुणीतरी हा खर्च उचलणार आणि जो खर्च उचलेल निवडणूक जिंकल्यावर त्याचे भले राजनीतिक पक्षांना करणे भागच असते. किमान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाच वेळी झाली तर कितीतरी अब्जावधीचा खर्च पक्षांचा वाचेल. पक्षांचा निवडणूक लढविण्याचा खर्च ही अर्धा होईल.



Monday, December 16, 2024

दुर्योधन: बेलेट पेपर वर निवडणूक झालीच पाहिजे.

शकुनी मामा (दुर्योधनाचा रडका चेहरा पाहून): दुर्योधन, पुन्हा पडला का निवडणूकीत. 

दुर्योधन: होय मामा, यंदा ही जनतेने मला मत दिले नाही. या वेळी तर भीमाने तब्बल 50 हजार मतांनी पराजित केले. त्या हलकट अर्जुनाने तर तब्बल लाख मतांनी कर्णा वर विजय मिळविला. धर्मराज पुन्हा राजा झाला आहे. मामा, एक ही निवडणूक मी जिंकू शकलो नाही. पण  मामा, मला एक कळत नाही, तुम्ही दहा वेळा निवडणूका कश्या काय जिंकल्या. तुमच्या सारख्या नीss.. म्हणता-म्हणता दुर्योधन मध्येच थांबला. शकुनी म्हणाला, दुर्योधना, तुला काय म्हणायचे आहे, मला कळले आहे. फक्त तूच माझे खरे स्वरूप ओळखतो याचा मला आनंदच आहे. म्हणूनच मी तुला वारसा हक्क दिला आहे. जनता मला मत देत होती, हा तुझा भ्रम आहे. भांजे, मी साम दाम दंड भेद वापरुन निवडणूका जिंकल्या आहेत. म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते. मी जनतेची कधीच पर्वा केली नाही. मी फक्त जनतेला मूर्ख बनविले आहे. पन्नास वर्षांपूर्वी पहिली निवडणूक तुझा मामाने गुंडांच्या मदतीने बूथ लुटून जिंकली होती. पण काळ एक सारखा रहात नाही. जेंव्हा बूथ लुटणे अशक्य झाले तर मामा नकली बेलेट पेपर छापून निवडणूक जिंकायचा. अश्या रीतीने वेगवेगळे मार्ग वापरुन तुझ्या मामाने दहा निवडणूका जिंकल्या आहेत आणि अब्जावधी संपत्तिचे मोठे साम्राज्य स्थापित केले आहे.  

दुर्योधन: मामा तो काळ गेला, आता ईव्हीएम आली आहे. त्या बदलणे शक्य नाही. त्यात हेराफेरी ही करता येत नाही. तसे असते तर तुमच्या या भाच्याने कधीच हेराफेरी करून निवडणूक जिंकली असती. आता तर मला वाटते, माझ्या भाग्यात फक्त वनवास आहे. 

शकुनी: एवढ्यात निराश होऊ नको, तुझा मामा जिवंत आहे. आपल्या जवळ भरपूर पैसा आहे. आपण मीडिया विकत घेऊ, एनजीओ  विकत घेऊ, सामाजिक संस्थांना विकत घेऊ. ईव्हीएम विरुद्ध जोमाने प्रचार करू. जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत शंका उत्पन्न करु. मग जनताच म्हणेल बेलेट पेपर वर मतदान घ्या. एकदा की बेलेट पेपर वर मतदान घेतले की तुझा विजय निश्चित समज.

दुर्योधन: मामा,  खरोखर असे होईल? तो मायावी कृष्ण असे होऊ देईल का. 

शकुनी मामा: का नाही होणार. आपण प्रचार करू मायावी कृष्ण ईव्हीएम हेक करतो आणि पांडव निवडणूक जिंकतात. मायावी कृष्ण संविधान विरोधी आहे, प्रजातंत्र विरोधी आहे, तांनाशाह आहे. हस्तिनापूरची संपत्ति लुटून तो द्वारकेत नेतो आहे. जो पर्यन्त शकुनी जीवंत आहे, कृष्णाला असे करू देणार नाही. .. दुर्योधना कसे वाटले माझे उद्याचे भाषण?

दुर्योधन: मामा. आता माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली आहे. तुम्ही आदेश द्या, मी ईव्हीएम विरोधात उद्या पासूनच देशभराचा दौरा सुरू करतो. 

असे म्हणत दुर्योधनाने जोरात घोषणा केली, ईव्हीएम मुर्दाबाद, बेलेट पेपर झिंदाबाद. पुढची निवडणूक, बेलेट पेपर वर. त्याच बरोबर कावळ्यांनी ही कांव-कांव करत प्रतिसाद दिला. 


Friday, December 13, 2024

शिक्षित मध्यमवर्ग मोक्षाच्या वाटेवर

दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे  दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव)  होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्‍यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो. त्याला जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेलो. आम्ही कॉफी हाऊस मध्ये दोन तास बसून एका दुसर्‍याच्या राम कहाण्या ऐकल्या.    


त्याच्या मुलाने आयटीतील डिग्री घेतली आणि त्याला पुण्यात नौकरी लागली. प्रदीप ने ही निवृत झाल्यानंतर पुण्यात घर विकत घेतले. त्याच वर्षी मुलाचे लग्न ही केले. त्यानंतर मुलाने नौकरी बदलली आणि तो अमेरिकेत गेला. मुलाने अमेरिकेत घर विकत घेतले होते. त्याचा भारतात परतण्याचा विचार नाही. प्रदीप ने विचारले, पटाईत, तुझ्या मुलाचे लग्न झाले का? मी उत्तर दिले, गेल्या वर्षी झाले. तो म्हणाला तीसी उलटल्यावर झाले असेल. मी म्हणालो, काय करणार, मुली होकार देत नव्हत्या.  विषय बदलण्यासाठी  मी त्याला गमतीने विचारले, तू दोन-चार नातवांचा आजा झाला असेल? त्याच्या चेहरा गंभीर झाला, तो म्हणाला नाही रे.  मी विचारले "मुलाने लग्न केले नाही का"? तो म्हणाला, केले आहे. गेल्या दहावर्षांपासून अमेरिकेत आहे. पण त्या दोघांची मूल पैदा करण्याची इच्छा नाही. आता तर त्याची चाळीसी ही उलटली आहे. बहुतेक माझा वंश इथेच संपणार.  याचा दोष आपलाच.  आपल्या पिढीतील अधिकांश नौकरीपेशा  मध्यमवर्गीय लोकांनी एकच मूल पैदा केले.  त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. त्याने त्याचाच नातेवाईकांचे अनेक उदाहरणे दिली. नव्या पिढीतील अधिकान्श मुलांचे लग्न 30- 35 उलटल्यावर होत आहे. एकाच्या वर अपत्य नाही. काहींना मूल पैदा करण्याची इच्छा ही नाही. तो पुढे म्हणाला असेच सुरू राहिले तर आपल्या पैकी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांचे  वंश पुढील 100 वर्षांत संपुष्टात येतील. मी वातावरण हलके करण्यासाठी म्हणालो, याला  मोक्ष  म्हणतात.  प्रदीप ने पुण्यात एक वृद्धाश्रम पाहून ठेवले होते. त्याच संदर्भात तो म्हणाला, आमचे दुर्दैव, आमचा शेवट वृद्धाश्रमात होणार. बहुतेक अग्नि देण्यासाठी कुणी नातेवाईक ही जवळ नसणार. जाता-जाता प्रदीप मला  म्हणाला, तुझ्या मुलाला म्हणा, दोन किंवा तीन पोर पैदा कर.  मी ही हसत- हसत उत्तर दिले ते माझ्या हातात नाही.  आमची कितीही इच्छा असली तरी ही मुलगा आणि सून दोन्ही नौकरी करणारे असल्याने, पुढची पिढीत एकच्या वर वृद्धी होण्याची संभावना कमीच.  


त्याची कहाणी ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. पण त्याचे म्हणणे खरेच होते. माझ्या आजोबांच्या वंशात आम्हा दोन तृतीयांश भाऊ आणि बहीणींचे एकच अपत्य आहे. दोनच्या वर कुणाचेही नाही. पुढची पिढी म्हणाल, तर एकच्या वर कुणाचे ही नाही. हीच परिस्थिति अधिकान्श मध्यमवर्गीय नातेवाईकांच्या घरची आहे.  पुढच्या पिढीचा जन्मदर पाहता,  पुढील 100 वर्षानी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांच्या वंशजांना मोक्षाची प्राप्ती झालेली असेल. 

Saturday, December 7, 2024

सासर्‍याचा सैपाक: पित्झा

 

गेल्या शनिवारी सकाळी सौ. माहेरी गेली. आता घरात  मुलगा, सून आणि मी. सौ. नसताना अस्मादिकांना खाण्याचे नवीन प्रयोग करायला स्वैपाकघर मोकळे होते. माझी सून  म्हणाली बाबा आपण रविवारी ब्रेकफास्ट साठी डोमिनो मधून पित्झा मागवू. मी उत्तर दिले, बाजारातून महागडा पित्झा मागविण्यापेक्षा स्वैपाक घरात ओवन आहे घरीच पित्झा बनवू. ओवनचा काही उपयोग तरी होईल. या शिवाय विदेशी कंपनीचा पित्झा मागवून आपल्या देशाचे नुकसान कशाला करायचे. आमच्या लेकाने माझ्या मताशी सहमति दाखविली. बाजारात जाऊन चार पित्झा बेस (त्यावर दोन फुकट मिळाले), अमूलचे ग्रेटेड चीज आणि पनीर, शिमला मिरची, बेबी कॉर्न आणले. घरात स्वदेशी कंपनीचा  चिली सौस आणि टमाटो सौस  आणि पित्झा वर टाकण्यासाठी हर्ब ही होते (फोटू टाकला आहे). पित्झावर भपुर सौस पसरवावे लागते म्हणून तो ही तैयार करण्याचा विचार केला. एक किलो लाल भडक हायब्रिड टमाटो शनि बाजारातून विकत आणले. रविवारी सकाळी चहा पिताना  चार टमाटो, दोन  हिरव्या मिरच्या, सहा सात काळी मिरी, एक  छोटा अदरकचा तुकडा इत्यादि साहित्य एका भांड्यात घालून अर्धा वाटी पाणी टाकून उकळून घेतले. थंड झाल्यावर टमाटोचे साल काढून सर्व साहित्य त्यात थोडे लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्सित ग्राइंड करून टमाटो प्यूरी बनवून घेतली. प्यूरी थोडी पातळ वाटली म्हणून गॅस वर थोडी गाढी करून घेतली.  


पित्झा बाजार सारखा बनविण्याची एक ट्रिक आहे. माइक्रो ओवन खालून जास्त हिट देत नाही. त्या मुळे पित्जा बाजार सारखा करारा बनत नाही. आधी ओवन 200 डिग्री वर प्री हिट करून घ्यावे. नंतर पित्झा घेऊन खालच्या बाजूने तीन मिनिटे कन्वेंशन मोड वर शेकून घ्यावे. यामुळे पित्झाची खालची बाजू थोडी करारी होते. आता तो पित्झा घेऊन वरच्या बाजूला घरात बनविलेला भरपूर टमाटो पसरवून घेतला.  त्या नंतर पनीर, कांदे, टमाटो, बारीक कापलेले बींस, बेबी कॉर्न, पनीर आणि  शेवटी ग्रेटेड चीज  पित्झा वर पसरविले. नंतर चिली सौस आणि बाजारातील विकत घेतलेले टमाटो सौस पित्झा वर शिंपडले. आता पित्झा ओवन मध्ये स्टँड वर ठेऊन 20 मिनिट कन्वेंशन मोड वर शेकून घेतला. अश्यारीतीने बाजार सारखा करारा पित्जा तैयार झाला. त्यावर हर्ब टाकून गर्मा-गर्म पित्झाचे तीन हिस्से करुन लगेच खायला घेतले. चार पित्झे आम्ही तिघांनी तासाभरात फस्त केले. पित्झाचे फोटू काढून सौ.ला व्हाट्सअप वर पाठविले. तिची प्रतिक्रिया इथे देणे उचित नाही. पण मजा आली. दोन पित्झा उरले  होते.  दुसर्‍या दिवशी पनीर आणि शिमला मिरी नव्हती. पण भरपूर चीज आणि टमाटो कांदा स्वीट कॉर्न टाकून पुन्हा पित्झा नाश्ता केला. पहिला फोटो दुसर्‍या दिवशीचा आहे. 

Monday, December 2, 2024

आज मी साबणाने आंघोळ केली


या कथेत माझ्या एका मित्राचा अनुभव आहे. जो मी माझ्या शब्दांत मांडला आहे. निवृत झाल्यानंतर मी दिल्ली पासून दूर उपनगरात एका फ्लॅट मध्ये राहू लागलो. मुलाचे लग्न होऊन चार किंवा पाच महीने झाले असतील. मुलगा आणि सून दोघेही नौकरी करणारे. त्यांची कार्यालये ही घरापासून 20 ते 25 किलोमीटर दूर. एनसीआरचे रस्त्यावरचे ट्रॅफिक पाहता दोघांना ही स्वतच्या गाडीने ऑफिस जायला दीड एक तास रोजच लागतो. घरातून आठच्या आधी त्यांना कामावर निघावेच लागते. सासू आणि सुनेने स्वैपाकाचे काम वाटून घेतले आहे. सौ. नेहमीप्रमाणे सकाळी साडे पाचच्या आधीच उठते. सौ. सकाळी उठून ब्रेकफास्टची तैयारी करते, मा की दाल, राजमा, छोले किंवा भाजी इत्यादिला फोडणी देते आणि कणीक मळून ठेवते. त्या नंतर सौ. चहा करते. सून ही सहाच्या आधी उठते. चहा पिऊन, पराठे, पोळ्या इत्यादि करते. नंतर आंघोळ करून, तैयार होऊन, नाश्ता करून, धावत-पळत आठच्या आधी घरातून निघते. संध्याकाळी सून साडे सात पर्यन्त घरी परतते. त्या आधी सौ. स्वैपाकाची कच्ची तैयारी करून ठेवते. सौ.च्या हातचा चहा पिऊन, सून स्वैपाकाचे काम बघते. त्यामुळे न मागता, मला ही संध्याकाळचा दुसरा चहा मिळतोच. ऑफिस मधून घरी यायला मुलाला ही रात्रीचे 9 वाजतात. रात्री साडे नऊ नंतर जेवण. मग सर्व आटोपता-आटोपता रात्रीचे साडे दहा-अकरा रोजच होतात. दुसर्‍या शब्दांत म्हणा, लेक आणि सून दोघांचे एका रीतीने यंत्रवत जगणे सुरू झाले आहे. महानगरात जगण्याचा संघर्ष हा यंत्रासारखाच असतो. 

एक दिवस संध्याकाळी सात वाजता मित्रांसोबत पार्क पे चर्चा करून घरी परतलो. पाहतो काय सौ.ने भाजीला फोडणी टाकलेली होती आणि पोळ्या करत होती. मी आश्चर्याने तिच्या कडे पाहिले. सौ. म्हणाली सून थकून घरी येते, म्हंटले आज संध्याकाळचा स्वैपाक करून टाकते. मला आपल्या कानांवर विश्वास झाला नाही. मी म्हंटले, खरे सांग, तुला सुनेचा एवढा पुळका काहून आला. सौ. माझ्या कडे पाहत हसत म्हणाली, तुमचा लेकरू आज सकाळी ऑफिस जाताना सुनेला म्हणत होता, आज त्याने साबण लाऊन आंघोळ केली आहे. सौ.चे शब्द कानात पडले आणि मी भूतकाळात पोहचलो. 

मुले शाळेत जाऊ लागली होती. मुलांची शाळा सकाळची होती. मुलांना शाळेत घेऊन जाण्यासाठी रिक्शा सकाळी पाउणे सातला यायचा. मला ही सकाळी सातला घरातून निघावे लागायचे. त्याचे कारण बसस्टॉप घरापासून एक किमी दूर होता. या शिवाय त्यावेळी दिल्लीत मेट्रो सुरू झाली नव्हती. बस ने कमीत-कमी दीड तास कार्यालयात पोहचायला लागत असे. आम्ही दोघ सकाळी पाचला उठायचो. चहा पिऊन सौ. सर्वांसाठी सकाळचा नाश्ता आणि तिघांचे डब्बे तैयार करायची. मुलांसाठी सौ.ला दुपारी ही स्वैपाक करावेच लागायचा. या शिवाय घराची साफ-सफाई, कपडे धुणे, भांडे घासणे सर्वच सौ.ला करावे लागायचे. आता किमान झाडू-पोंछा आणि भांडे घासण्यासाठी बाई आहे. मला रोज संध्याकाळी घरी यायला रात्रीचे नऊ किंवा साडे नऊ होत असे. मुले ही रात्री दहा-साडेदहा पर्यन्त अभ्यास करायाची. रोजचे रुटीन आटोपता-आटोपता रात्रीचे 11 व्हायचेच. दिवसभराच्या कामाने सौ. थकून जायची. भारत सरकारात पीएसची नौकरी, त्यात मोठ्या कार्यालयात मोठ्या अधिकार्‍यांसोबत, असल्याने शनिवार आणि रविवारची सुट्टी क्वचित मिळायची. अश्या बिकट परिसस्थितीत रात्रीच्या नाटकाचा चौथा अंक सुरू करणे जमत नव्हते. शेवटी यावर उपाय काढला. ज्या दिवशी इच्छा अनावर होत असे, सकाळीच आंघोळ झाल्यावर सौ.ला म्हणायचो, आज साबणाने आंघोळ केली आहे. सौ. दिवसाचे काम त्या हिशोबने आटपायची. त्या दिवशी संध्याकाळी बहुधा वरण भात किंवा खिचडी इत्यादि करायची. त्यात वेळ आणि मेहनत कमी लागते. रात्री साडे नऊ होताच, सौ. मुलांवर तोफ डागायची, तुम्हाला दिवसभर अभ्यास करायचा नसतो. रात्री पुस्तके उघडून बसता आणि  सकाळी उठताना नखरे करतात. मी दिवा बंद करते आहे, निमूट पणे जाऊन झोपा आणि सकाळी वेळेवर उठा. मुले झोपली तरच आमचा नाटकाचा चौथा अंक सुरू व्हायचा. 

काही क्षणात मी भानावर आलो, च्यायला, आपला परवलीचा शब्द मुलांना माहीत आहे. आज तोच शब्द लेकराने वापरला. याचा अर्थ आपले गुपित सुनेला ही माहीत झाले असेल. मी हसत सौ.ला म्हणालो, अब पोल तो खुल चुकी है, आज अपुन भी सोने से पहले साबण लगाकर आंघोळ करेगा. तुमच्या जिभेला काही हाड...... काहीही म्हणा, सौ. लाजल्यावर या वयात ही सुंदरच दिसते. 



Tuesday, November 26, 2024

आकड्यांचे विश्लेषण: महाराष्ट्राचा निकाल

महाराष्ट्राचा निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असेल. महाराष्ट्रातल्या गेल्या लोकसभा निवडणूकीचे आकडे तपासले तर सहज लक्षात येते हा निकाल अपेक्षित होता. निवडणूकीचे आकडे तपासल्यावर अनेकांचे भ्रम दूर होतील. या वेळी 66 टक्के मतदान झाले. लोकसभेपेक्षा 4.70 टक्के जास्त मतदान झाले. अल्पसंख्यक समुदाय 90 टक्के मतदान करतो मग मतदान 55 टक्के असो की 65 टक्के. याचा अर्थ वाढलेली 90 टक्के मते बहुजन समाजाची होती. त्यातील 90 टक्के  मते महायुतीच्या खात्यात जाणार हे स्पष्ट डोळ्यांनी दिसत होते. दिल्लीत ही 2019 असो की 2024 लोकसभेत विधानसभेपेक्षा 5 टक्केपेक्षा जास्त मतदान जास्त झाले होते. याचा परिणाम दोन्ही वेळा लोकसभेत सात ही जागा भाजप ने जिंकल्या. ज्या राज्यांत अल्पसंख्यक मतदाता 10 टक्के पेक्षा जास्त आहेत त्या राज्यांत जास्त मतदानाचा फायदा भाजपला होतो. दिल्लीत जर आगामी विधान सभा निवडणूकीत जर महाराष्ट्र प्रमाणे 66 टक्के मतदान झाले तर भाजप दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकू शकते. निष्कर्ष एकच -महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत अर्धा टक्के मतांचा परिणाम एनडीएला लोक सभेत भोगावा लागला होता. विधानसभेत मतदान 5 टक्के जास्त झाल्याने महाराष्ट्रात त्सुनामी येणारच होती. 

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 2019 पेक्षा 5 लाख मते जास्त पडली होती. महा विकास आघाडीला (राऊंड फिगर)  2.50 कोटी मते मिळाली होती तर महायुतीला 2.48 कोटी मते मिळाली होती. मतांचे अंतर 2 लक्षपेक्षा कमी होते. भाजपला 2019च्या  लोकसभा निवडणूकीत 1.49 कोटी मते मिळाली होती जवळपास तेवढीच मते 2024 लोकसभा निवडणूकीत मिळाली होती. भाजपा लोकसभेच्या निवडणूक निकालात विधानसभेच्या 83 जागांवर पुढे होती. शिंदे सेनेला 73.77 लक्ष मते मिळाली आणि ती विधानसभेच्या 38 जागांवर पुढे होती. अजित दादांच्या एनसीपीला 20.53 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 6 जागांवर पुढे होती. महायुती विधानसभेच्या 128 जागांवर  पुढे होती. अर्थात फक्त बहुमतापेक्षा 17 जागा  कमी होत्या. 

कॉंग्रेसला लोकसभेत 96.40 लक्ष मते मिळाली होती. ती विधानसभेच्या 63 जागांवर पुढे होती. शरद पवारच्या एनसीपीला 58.50 लक्ष  मते मिळाली ती  विधानसभेच्या 32 जागांवर पुढे होती. ठाकरे सेनेला 95.23 लक्ष मते मिळाली होती. ती 56 जागांवर पुढे होती. अर्थात लोकसभा निवडणूकेनुसार विधानसभेत 151 जागांवर महा विकास आघाडी पुढे होती. बहुमत  पेक्षा फक्त 7 जागा जास्त. 

विधानसभा निवडणूकीत भाजपला 1.73 कोटी अर्थात 24 लक्ष मते जास्त मिळाली. शिंदे सेनेला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा जवळपास 6 लक्ष जास्त मते मिळाली. इथे मजेदार बाब अशी की शरद पवारांच्या एनसीपीला ही जवळपास 73 लक्ष मते मिळाली. तिला लोकसभेपेक्षा जवळपास 14 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ कांग्रेस आणि उद्धव सेनेच्या अधिकान्श समर्थकांची मते शरद पवारांच्या एनसीपीला मिळाली. अजित पवारांना 58 लक्ष मते अर्थात तब्बल 38 लक्ष मते जास्त मिळाली. याचा अर्थ भाजप आणि शिंदे समर्थकांनी आपली 100 टक्के मते दादांच्या कडे वळवली. भाजप मतदार पक्षा प्रति किती एकनिष्ठ आहेत, याची कल्पना येते. दादा आणि शरद पवारांना मिळालेल्या मतांच्या आधारावर माझा निष्कर्ष - बहुतेक दादांच्या मतांमध्ये 50-60 टक्के मते भाजप आणि शिंदे समर्थकांची असण्याची शक्यता जास्त. युतीत राहणे दादांना जास्त फायद्याचे आहे. 
 
मग मते कुणाला कमी मिळाली, हा प्रश्न समोर येणारच. कॉंग्रेस पक्षाला जवळपास 80 लक्ष मते मिळाली. लोकसभेपेक्षा 16.40 लक्ष मते कमी मिळाली. उद्धव सेनेला 64.43 मते मिळाली, लोकसभेपेक्षा तब्बल 30 लक्ष मते कमी मिळाली. 

उद्धव सेनेला विधानसभा निवडणूकीत लोकसभेपेक्षा 30 लक्ष मते कमी मिळाली. लोकसभा निवडणूकीच्या वेळी उद्धवला शिवसैनिकांची सहानभूती मिळाली. अधिकान्श शिवसैनिकांना वाटत होते, भाजपला धडा शिकवून, उद्धव पुन्हा भाजप सोबत युती करतील. लोकसभेत भाजपला पाठिंबा देतील. पण असे काही घडले नाही. आपल्या सैनिकांच्या मनात काय आहे, हे उद्धवला कळले नाही. अधिकान्श हिंदुत्ववादी शिवसैनिक निराश झाले. विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजप आणि शिंदेंच्या बाजूने मतदान केले. कॉंग्रेस आणि अल्पसंख्यक मतांची साथ मिळाली नसती तर शिवसेनेचे 5 आमदार ही निवडून  आले नसते. 

कांग्रेस भाजप विरुद्ध 74 जागांवर लढत होती. त्यातल्या फक्त दहा जागा कांग्रेस ने जिंकल्या. याचा एकच अर्थ होतो,अधिकान्श जागांवर उद्धव सेनेच्या समर्थकांची मते काँग्रेसला मिळाली नाही. त्यांनी पूर्वी प्रमाणे भाजपला मतदान केले.  माझा निष्कर्ष- महाराष्ट्रात कांग्रेसने पुढे स्वबळावर निवडणूक लढवावी. उद्धव सेनेसोबत युती करण्याचा काहीही फायदा कांग्रेसला मिळणार नाही. 

या वेळी मतदान जास्त होण्याचे कारण मौलवींचे फतवे, त्यांच्या 25 कलमी मागणीवर कांग्रेसचा सकारात्म्क प्रतिसाद. याशिवाय बंगलादेशात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते मौन राहिले. योगींच्या "एक रहा, सेफ रहा" चा प्रभाव ही मतदारांवर पडला. बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात एक गठ्ठा मतदान केले. यावेळी शिक्षित मतदारांनी ही मतदानात भाग घेतला. माझ्या अनेक पुणेकरी मित्रांनी प्रथमच मतदान केले.   

महाराष्ट्राचा हा निकाल अनेपक्षित नव्हता, हा निष्कर्ष आकड्यांवरून सहज काढता येतो.   






Monday, November 25, 2024

इलेक्शनी चारोळ्या

 
(१)
समुंदर हूं मैं
लौटकर आऊंगा.
त्सुनामी घेऊन आला
वाहून गेले त्यांचे
स्वप्नांचे मनोरे.

(२)
चित भी मेरी
पट भी मेरी
सरडे माझे
सारे जिंकले.

(३)
शेअर बाजाराचा फंडा
त्याला कळलाच नाही.
शॉर्ट टर्म गेन साठी 
लाँग टर्म तोटा केला.