Monday, April 7, 2025

सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन

  

(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार) 

काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी ....

 मी: वडिलांना दुकान टाकून दिले...

ती: नाही हो,

मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल. 

ती: नाही हो, हा जो  दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली. 

मी विचार करू लागलो, हा साईन बोर्ड जास्तीसजास्त पाच किंवा दहा हजाराचा असेल. सिप मध्ये नियमित गुंतवणूक करून तिला एवढेच पैसे मिळाले... 

सर्वांनी सिप गुंतवणूक करण्यापूर्वी, हे विज्ञापन अवश्य पाहिले पाहिजे. 

No comments:

Post a Comment