हिवाळ्यात गर्मागरम सूप पिण्याचा आनंद काही औरच असतो. एक तर हिवाळ्यात टोमॅटो स्वस्त असतात आणि खिश्याला परवडतात. अनेकांची तक्रार असते घरी बाजार सारखे टोमॅटो सूप बनत नाही. सूप पातळ बनते. सूप घट्ट करण्यासाठी त्यात मैदा इत्यादि पदार्थ मिळविणे केंव्हाही उचित नाही. या शिवाय बाजारात लाल भडक टोमॅटो मिळत ही नाही. देसी टोमॅटो आंबट असतात, ते जास्त टाकले तर सूप ही आंबट बनणार. त्यात साखर घालणे ही योग्य नाही. आता एक स्वास्थ्यवर्धक स्वादिष्ट सूप बाजार सारखे घरी कसे करायचे. सौ. घरात टोमॅटो बनविते. तिने यावर सौपा उपाय शोधला. यासाठी ती टोमॅटो, गाजर आणि बिट्स रूट (हिंदीत चुकुंदर) वापरते. गाजर गोड स्वाद देते आणि बिट्स रूट लाल भडक रंग देते. दोन्ही टाकल्याने सूप किती घट्ट करायचे आपण स्वत: ठरवू शकतो. आता तर मी ही सूप बनविण्यात एक्स्पर्ट झालो आहे. चार ते सहा लोकांसाठी सूपची विधी: पाच ते सहा सामान्य आकाराचे टोमॅटो (टोमॅटो जास्त आंबट असतील तर कमी ही चालतील), एक गाजर आणि एक लहान आकाराचे बिट्स रूट (मोठे असेल तर अर्धे). या शिवाय एक हिरवी मिरची (नाही टाकली तरी चालेल). टोमॅटो, गाजर, बिट्स रूटचे छोटे तुकडे करून आणि साबूत मिरची कुकर मध्ये टाकून थोडे पाणी घालून उकळून घ्यायचे. (कोथिंबीरीच्या काड्या ही टाकू शकतात त्या ही स्वाद वाढवितात). गॅस वर दोन शिट्या पुरे. त्यानंतर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घ्यायचे. सूप एका भांड्यात काढून आता तुम्हाला जेवढे घट्ट पाहिजे त्यानुसार त्यात पाणी मिसळायचे. स्वादासाठी, जिरे, मिरपूड, आणि मीठ घालून चार- पाच मिनिटे उकळून घ्यायचे. सूप बाउल किंवा कपात सर्व करताना, एक चमचा क्रीम किंवा ताजे लोणी. ते ही घरात नसेल तर दुधावरची साय ही टाकता येते. इथे चित्रात दुधावरची साय टाकली आहे. स्वाद अप्रतिम लागतो. आवडत असेल तर कोथिंबिर ही सूप वर टाकाता येते.
हिवाळ्यात पालकचे सूप ही छान लागते. पालक सूप बनविताना त्यात एखाद टोमॅटो घातला की ते ही स्वादिष्ट लागते आणि लहान मुले ही पिताना नखरे करत नाही. भाज्यांच्या मिक्स सूप मध्ये ही टोमॅटो आणि बिट्स रूट घातले की ते ही स्वादिष्ट बनते.
No comments:
Post a Comment