Thursday, September 24, 2026
पेपरफुटीवर कायमचा उतारा: 'ओपन क्वेश्चन बँक' संकल्पना
Monday, September 21, 2026
अग्निमीळे पुरोहितम् : जीवनाचा रक्षक, ज्ञानाची अखंड ज्योत”
वेद हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत, तर गहन वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या ऋषींची अनुभूत ज्ञानपरंपरा आहेत. त्यांनी सूक्ष्म संशोधन करून हे जाणले की हे जग काय आहे, कसे निर्माण झाले आहे आणि कोणत्या नियमांनी चालते. ऋषींनी केवळ सृष्टीचे रहस्य उघड केले नाही, तर मनुष्याने आपले संपूर्ण जीवन कसे जगावे आणि कोणत्या तत्वांचे रक्षण करून स्वस्थ, सशक्त व सार्थक अस्तित्व साध्य होईल हेही सांगितले. आपण ऋग्वेदाच्या पहिल्या मंत्राचा विचार करणार आहोत. ऋषी मधुच्छंद यांनी दृष्ट केलेला हा मंत्र असा आहे
“ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य
देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्॥”
हा मंत्र केवळ
धार्मिक उच्चार नाही, तर जीवनाचा मूलाधार सांगणारा उद्घोष आहे.
‘अग्निमीळे’ म्हणजे मी अग्निची स्तुती करतो. ही अग्नि
फक्त भौतिक ज्वाला नाही, तर ज्ञानाची ज्योत आहे जी अज्ञानाचा
अंधार दूर करते. जशी रात्रभर अंधारात दिवा लावला की मार्ग दिसतो, तशीच ही ज्ञानरूपी अग्नि काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यांसारख्या चित्तातील सर्व
विकारांना भस्म करून जीवनाला परमसत्याच्या प्रकाशाने उजळवते.”
‘पुरोहितम्’ म्हणजे पुराची रक्षा करणारा अर्थात शरीररूपी नगराचा रक्षक. आपले शरीरही
कोशिकांनी बनलेले एक नगर आहे. या नगराच्या पुढे उभा राहून रक्षण करणारा तत्व
म्हणजे अग्नि. जशी एखाद्या किल्ल्याच्या दरवाज्यावर पहारेकरी उभा राहतो, तशीच ही अग्नि आपल्या शरीराचे रक्षण करते.
आयुर्वेद सांगते
की शरीरात तेरा अग्नि कार्यरत असतात, जठराग्नि, पाच भूताग्नि आणि सात धात्वाग्नि. या अग्नि अन्नाचे रूपांतर करून रस, रक्त, मांस,
अस्थि, मज्जा आणि शुक्र यांचे पोषण करतात. जर ही अग्नि नीट काम करत असेल तर शरीर
सशक्त राहते; जर ती मंद झाली तर रोग उद्भवतात.
अग्नि शिवाय
जीवन अशक्य आहे. जसे वाहनात इंधन असूनही स्पार्क-प्लगची चिंगारी नसल्यास ते चालत
नाही, तसेच शरीरात अग्नि नसल्यास कोणतीही
क्रिया होत नाही. हृदयाची धडधड, कोशिकांना ऊर्जा मिळणे, विचारांची स्पंदने, हे सर्व अग्निवरच अवलंबून आहे. अग्नि
शांत झाली की शरीर मृत घोषित होते.
ऋषींनी अनुभवले
की सूर्यरूपी अग्नि आणि शरीरातील प्राणऊर्जा हीच जीवनाची मूळ शक्ती आहे. म्हणूनच
त्यांनी ज्ञानपरंपरेची सुरुवात अग्निदेवतेपासून केली. आजही आपल्या गावात स्त्रिया पोळी
करताना पहिला तुकडा चुलीतील अग्निला अर्पण
करतात. हेच वैदिक परंपरेचे जिवंत रूप आहे. अन्न आधी अग्निला, मग आपल्याला.
ऋग्वेदातील
ऋषींनी कधीही काल्पनिक गोष्टी सांगितल्या नाहीत, ते महान द्रष्टे आणि वैज्ञानिक होते. त्यांनी प्रत्यक्ष
अनुभवातून जाणले की ब्रह्मांडात सूर्याच्या रूपाने, आणि मानव शरीरात प्राणऊर्जा व
ऊष्मा यांच्या रूपाने, अग्निच जीवनाचे संचालन करते. अग्नि ही
केवळ यज्ञकुंडात जळणारी बाह्य ज्वाला नसून, ती चेतना आणि
ऊर्जा आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शरीररूपी ‘पुरा’चे रक्षण करत राहते.”सारांश
असा की: अग्नि हीच जीवनाची रक्षक आहे. ती शरीराला
पोषण देते, मनाला प्रकाश देते आणि आत्म्याला
मार्गदर्शन करते. म्हणूनच ऋग्वेद म्हणतो,“अग्निमीळे पुरोहितम्”,
मी त्या दिव्य अग्निची स्तुती करतो जी माझ्या जीवनाचा
पुरोहित आहे.
Friday, September 18, 2026
वेदवाणी :मत्सर: वैयक्तिक अधोगतीपासून ते राष्ट्रीय प्रगतीच्या विरोधापर्यंत
मानवी मनाच्या दुर्गुणांमध्ये
‘मत्सर’ (ईर्ष्या किंवा जळफळाट) हा सर्वात घातक विषारी विकार आहे. अथर्ववेदातील हा
सूक्त मानवाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि मत्सररूपी विकाराला मनात उमलताच मुळासकट
उपटून नष्ट करण्याचा सखोल आध्यात्मिक व मानसिक संदेश देतो. वेद आपल्याला सावध
करतात की, मत्सर इतरांचे वाईट करण्यापूर्वी स्वतः आपलीच आंतरिक शांती
आणि सारासार विवेक भस्म करून टाकतो. अथर्ववेदात ऋषि म्हणतात,
ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां
प्रथमस्या उतापराम्।
अग्निं हृदय्यं शोकं तं ते
निर्वापयामसि॥ (अथर्ववेद ६/१८/१)
दुसऱ्याची प्रगती, यश किंवा आनंद पाहून आपल्या मनात जी मत्सराची ठिणगी पडते, तिच्या पहिल्या तीव्र वेगाला आपण लगेच शांत केले पाहिजे. जर
काही कारणास्तव तो पहिला आवेग थांबला नाही, तर त्यानंतर निर्माण होणाऱ्या
दुसऱ्या आवेगाला तरी निश्चितच शांत केले पाहिजे. हे माणसा! तुझ्या अंतःकरणात
धगधगणारी ही मत्सराची आग आणि त्यातून उत्पन्न होणारा शोक-संताप आम्ही पूर्णपणे
विझवून शांत करतो.
पहिल्या
ओळीत ऋषि म्हणतात, ‘ईर्ष्याया ध्राजिं प्रथमां
प्रथमस्या उतापराम्’ मत्सर एका प्रचंड झंझावाताप्रमाणे
मनात प्रवेश करतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा सहकाऱ्याला पुढे
जाताना पाहतो, तेव्हा मनात पहिला विचार सहजपणे
मत्सराचा किंवा तुलनेचा येऊ शकतो. मंत्र सांगतो की, त्या
पहिल्या आवेगाला (झटक्याला) तिथेच रोखा. जर तो विचार अनावधानाने मनात रुजलाच, तर त्यातून निर्माण होणारी दुसरी मंद किंवा कायमस्वरूपी
भावना (द्वेष, षड्यंत्र) तरी कोणत्याही
परिस्थितीत विझवून टाकली पाहिजे.
कार्यालयात (Office) जेव्हा तुमच्या सहकाऱ्याला बढती मिळते, तेव्हा "ही मला का नाही मिळाली?" असा पहिला विचार मनात डोकावू शकतो.
हा पहिला आवेग आहे. समजूतदार व्यक्ती लगेच
स्वतःला समजावते की, "त्याने मेहनत केली, त्याला फळ मिळाले; मीही अधिक प्रयत्न करेन." अशा प्रकारे तो पहिला आवेग शांत होतो. मात्र जो
स्वतःवर ताबा ठेवत नाही, तो मनातल्या मनात जळफळत राहतो आणि
हळूहळू त्या सहकाऱ्याविरुद्ध कटकारस्थाने रचू लागतो.
ऋषि पुढे म्हणतात, ‘अग्निं हृदय्यं शोकं तं ते निर्वापयामसि’ मत्सर ही बाहेर नसून हृदयाच्या आत धगधगणारी आग आहे. ही आग
केवळ समोरच्या व्यक्तीलाच नाही, तर सर्वात आधी त्या मत्सरी
माणसालाच मानसिक संताप, तणाव आणि दुःखात लोटून देते. वेद
सांगतात की, ही अंतर्गत आग तातडीने विझवणे हेच
कल्याणकारी आहे.
मत्सराने ग्रासलेल्या माणसाचे
खाणेपिणे आणि झोप उडते. दुसऱ्याची प्रगती पाहून तो दिवस-रात्र स्वतःच दुःखी राहतो.
हळूहळू त्याचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडू लागते, रक्तदाब, नैराश्य, निद्रानाश इत्यादि व्याधींनी तो ग्रस्त होतो. मत्सराच्या आगीत तो स्वत:च विनाश ओढवून घेतो. वआपल्या
आप्तेष्टांची, मित्रांची किंवा सहकाऱ्यांची
प्रगती पाहून आनंद वाटणे हे निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे. परंतु जेव्हा माणूस
मत्सराने पछाडला जातो, तेव्हा त्याचा विवेक नष्ट होतो:
समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या
कर्तृत्वाने किंवा कष्टाने यश मिळवले आहे, हे तो मान्यच करू शकत नाही.
"त्याने नक्कीच काहीतरी गैरमार्ग अवलंबून प्रगती केली असणार," असे तो गृहीत धरतो. तो नकारात्मक विचाराने ग्रस्त होऊन अकार्यक्षम
बनतो. नौकरी धंद्यात अपेशी ठरतो.
मत्सराचे रूपांतर हळूहळू द्वेषात
आणि नंतर सूडबुद्धीत होते. समोरच्या व्यक्तीची प्रतिमा डागाळण्यासाठी तो खोटा
प्रचार करू लागतो, त्याच्या मार्गात अडथळे निर्माण
करतो आणि शेवटी त्याचे वैभव नष्ट व्हावे अशी इच्छा बाळगू लागतो. ही अवस्था माणसाला
नैतिकदृष्ट्या पूर्णपणे अधःपतित करते. आजकाल तर सोशल मीडियावर अश्या खोट्या बातम्यांचा
पूर आलेला आहे.
कधी कधी
मत्सर केवळ व्यक्तीपुरता मर्यादित
नसतो; तो सामूहिक आणि बौद्धिक पातळीवर देशविरोधी रूपही धारण करतो.
जेव्हा एखादा देश स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी होऊ लागतो, तेव्हा काही संकुचित प्रवृत्ती आणि विरोधी शक्तींना ती
प्रगती पचनी पडत नाही.
भारताच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा
स्वावलंबन आणि ऐक्याची चर्चा झाली, तेव्हा अंतर्गत मत्सर आणि संकुचित
विचारांनी देशाचे मोठे नुकसान केले. जयचंदसारखी ऐतिहासिक मानसिकता याच गोष्टीचा
पुरावा आहे, जिथे स्वतःच्याच शेजारील राज्याची
प्रतिष्ठा सहन न झाल्यामुळे परकीय आक्रमकांना आमंत्रण दिले गेले.
#अथर्ववेद #वैदिकदर्शन #मानवमनोविज्ञान #ईर्ष्या #आत्मनिर्भरभारत #राष्ट्रनिर्माण #विचार
प्रतिकृया अवश्य द्या।
Tuesday, September 15, 2026
दुर्वा : गणेशाच्या चरणी वाहिलेलं अमरत्वाचं वरदान
गणपतीला दुर्वा का वाहावी, हा प्रश्न आजच्या पिढीच्या मनात नेहमी येतो. याचे उत्तर शोधताना यजुर्वेदातील एक श्लोक सापडला,
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च॥ (यजुर्वेद १३.२०)
मी ज्ञान से जीवन चॅनलची सुरुवात केली आहे. या चॅनलचा उद्देश्य वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेतील शाश्वत विचार आधुनिक जीवनाच्या संघर्षात प्रत्येकाला
योग्य दिशा देणारे ठरतील. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने मानवी मनातील संभ्रम दूर
करून प्रत्येक व्यक्तीला कर्तव्याची आणि कर्माची अचूक जाणीव करून दिली जाईल.
अतीताच्या समृद्ध वारशाला वर्तमानकाळाशी जोडून आत्मविश्वासाने भारलेली एक विवेकी,
विचारशील आणि सुसंस्कृत पिढी घडवणे हे यामागचे ध्येय आहे.
या ज्ञानाच्या प्रकाशझोतातून वैयक्तिक प्रगती साधत राष्ट्रउभारणीच्या आणि
समाजहिताच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचे सकारात्मक योगदान सुनिश्चित केले जाईल.
चॅनल लिंक (2) ज्ञान से जीवन - YouTube
Saturday, September 12, 2026
गणपती: प्रजासत्ताकाचा नायक ते अग्रपूजेचा देव
गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. घराघरांत
लाडक्या बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली असून, पुढील दहा दिवस आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावाने गणपतीची
पूजा-अर्चा करणार आहोत. पण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात सर्वप्रथम गणपतीच्याच
पूजेने का केली जाते, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
आजच्या चिकित्सक तरुण पिढीच्या मनात हा प्रश्न स्वाभाविकपणे डोकावतो,
आणि या परंपरेमागचा नेमका इतिहास जाणून घेण्याची त्यांची उत्सुकताही
रास्तच आहे.
ऋग्वेदात गणपतीचा उल्लेख करताना ऋषी म्हणतात,
अर्थात, "हे ब्रह्मणस्पते, तुम्ही सर्व गणांचे (समूहांचे)
नायक आहात, म्हणून आम्ही तुमचे आवाहन करतो. तुम्ही ज्ञानी
जनांत श्रेष्ठ द्रष्टे असून तुमची कीर्ती अतुलनीय आहे. आमच्या प्रार्थना ऐकून
आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या यज्ञस्थानी विराजमान व्हा." या
ऋचेत ऋषींनी गणाध्यक्ष निवडीची पात्रताच स्पष्ट केली आहे, तो सर्वांत ज्ञानी, द्रष्टा (कवी) आणि श्रेष्ठ कीर्तीचा असावा.
प्राचीन वैदिक काळात भारतात विविध जनसमूह एकत्र येऊन आपापले संघ अथवा 'गणराज्य' चालवत असत. एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील नागरिक शासन, कायदा आणि सुरक्षेसंबंधी निर्णय घेण्यासाठी प्रजातांत्रिक पद्धतीने एकत्र येत आणि आपापसांत चर्चा करून योग्य नेत्याची 'गणाध्यक्ष' किंवा 'गणपती' म्हणून निवड करत. या गणप्रमुखाच्या संमतीनेच समाजकल्याणाचे महत्त्वाचे निर्णय आणि सामूहिक कार्ये पार पडत.
ही संकल्पना आजच्या आधुनिक प्रजासत्ताक व्यवस्थेशी विलक्षण
साधर्म्य दाखवते. आजही आपण लोकसभा, विधानसभा किंवा ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
लोकप्रतिनिधी निवडतो, आणि त्यांच्या संमतीनेच धोरणे व
सामूहिक निर्णय राबवले जातात. लोकशाहीचा हाच गाभा सामूहिक सहमतीने नेतृत्व निवडणे, हजारो
वर्षांपूर्वीच्या गणराज्य पद्धतीतही दिसतो. वेळ बदलली, राजेशाही आली-गेली, तरी
लोकशाही मूल्यांचे व सामूहिक ऐक्याचे प्रतीक असलेला 'गणपती' गाणाध्यक्ष जनमानसाच्या हृदयातून
कधीच पुसला गेला नाही.
लोकांनी आपल्या या लाडक्या लोकनायकाला ईश्वराचे रूप मानून पूजनीय स्थान दिले. समाजहिताचे प्रत्येक कार्य गणाध्यक्षाच्या अनुमतीने सुरू करण्याची हीच प्राचीन परंपरा पुढे धार्मिक स्वरूपात आपल्या संस्कृतीत रुजली. म्हणूनच आजही कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ करताना आपण सर्वप्रथम गणपतीची पूजा करून त्याला अग्रपूजेचा मान देतो, एका प्राचीन लोकशाही परंपरेचा हा जिवंत वारसा आहे.
मी ज्ञान से जीवन चॅनलची सुरुवात केली आहे. या चॅनलचा उद्देश्य वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेतील शाश्वत विचार आधुनिक जीवनाच्या संघर्षात प्रत्येकाला
योग्य दिशा देणारे ठरतील. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने मानवी मनातील संभ्रम दूर
करून प्रत्येक व्यक्तीला कर्तव्याची आणि कर्माची अचूक जाणीव करून दिली जाईल.
अतीताच्या समृद्ध वारशाला वर्तमानकाळाशी जोडून आत्मविश्वासाने भारलेली एक विवेकी,
विचारशील आणि सुसंस्कृत पिढी घडवणे हे यामागचे ध्येय आहे.
या ज्ञानाच्या प्रकाशझोतातून वैयक्तिक प्रगती साधत राष्ट्रउभारणीच्या आणि
समाजहिताच्या कार्यात प्रत्येक नागरिकाचे सकारात्मक योगदान सुनिश्चित केले जाईल.
चॅनल लिंक (2) ज्ञान से जीवन - YouTube
Tuesday, September 8, 2026
दासबोध: - दशक १७, समास ६, देहात्मनिरूपण
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या सतराव्या दशकात "प्रकृतिपुरुष" हा विषय हाताळला आहे. जड सृष्टी म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे पुरुष अर्थात आत्मा. यांचा संबंध. समर्थ देहात्मनिरूपण समासात सांगतात की जो पर्यन्त जीवात्मा हा देहाशी जोडलेला (देहबुद्धीयुक्त) असतो, तोपर्यंत त्याला सुख-दुःख, जन्म-मृत्यू, वार्धक्य, रोग हे सर्व भोगावेच लागते. मग प्रश्न येणारच देह बंधंनातून जीवत्म्याला मुक्ति काशी मिळणार. मग आपल्या शरीरात आत्मा आपण कसा ओळखणार.
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥"
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥ ६ ॥"
इतिहासातही याची अनेक उदाहरणे सापडतात. मोठमोठे सम्राट, ज्यांच्या एका आदेशावर लाखो लोकांचे भवितव्य ठरत असे, तेही शेवटी एका साध्या तापाने किंवा वृद्धापकाळाने खितपत पडलेले दिसतात. आजच्या काळातही, मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा सेलिब्रिटींना जेव्हा गंभीर आजार होतो, तेव्हा त्यांचे पैसे उत्तम उपचार मिळवून देऊ शकतात, पण मृत्यूचा अंतिम क्षण, ती शारीरिक वेदना आणि हतबलता टाळू शकत नाहीत. यावरून हेच सिद्ध होते की देहावर आधारित कोणतीही श्रीमंती किंवा प्रतिष्ठा शेवटी तात्पुरतीच ठरते.
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥
येरां नसोनीच जडलें । सदृढ अविवेकें ॥१४॥(आत्माराम)
Saturday, September 5, 2026
मी लेक आहे मुद्गलानीची
"उत् स्म वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ..."
रणांगणी ती प्रथम उतरली, बैल जुव्याला बांधला खंबीर,
गर्जून उठला वृषभ पराक्रमी, दुमदुमले रणांगण गंभीर।
लगाम हाती, रथ चौफेर उधळला, शत्रूचा थरकाप उडाला,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिच्यामुळे विजय उजाडला॥
वारा उधळीत होता पदर, तरी वस्त्रांकडे नसे तिचे भान,
डोळ्यांसमोर एकच ध्येय, गोधनरक्षा, धर्माचा मान।
बैलाच्या गर्जेने सैन्य चेतले, शौर्याचा जळला अग्निकुंड,
मी लेक आहे मुद्गलानीची, जिने जिंकले रण अखंड॥
गोधन पुन्हा स्वधर्मी आले, दस्यूंचा झाला पूर्ण पराभव।
ऋषींनी ऋचांत अमर केली, मुद्गलानीच्या शौर्याची गाथा॰
स्वाभिमानी तेजस्वी मी देश धर्म सत्यासाठी आज ही भिडते।
मी लेक आहे मुद्गलानीची, रणरागिणी त्या मातृशक्तीची.
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ..."
लगाम हाती, रथ चौफेर उधळला, शत्रूचा थरकाप उडाला,
वारा उधळीत होता पदर, तरी वस्त्रांकडे नसे तिचे भान,
बैलाच्या गर्जेने सैन्य चेतले, शौर्याचा जळला अग्निकुंड,
गोधन पुन्हा स्वधर्मी आले, दस्यूंचा झाला पूर्ण पराभव।
ऋषींनी ऋचांत अमर केली, मुद्गलानीच्या शौर्याची गाथा॰
स्वाभिमानी तेजस्वी मी देश धर्म सत्यासाठी आज ही भिडते।
मी लेक आहे मुद्गलानीची, रणरागिणी त्या मातृशक्तीची.
Wednesday, September 2, 2026
धनाचा खरा उपयोग : धर्म, रक्षण आणि कल्याण”
ऐन्द्रं सानसिं रयिं सजित्वानं सदासहम्। वर्षिष्ठमूतये भर॥
(ऋषी: मधुच्छंदा वैश्वामित्र, देवता: इंद्र, ऋग्वेद १.५.३)
Friday, August 28, 2026
विश्वरूप दर्शन: सर्वांमध्ये एकच परमात्मा
महाभारताच्या कुरुक्षेत्रात जेव्हा अर्जुन आपल्याच स्वजनांविरुद्ध युद्ध करण्यापासून विमुख झाला, तेव्हा त्याचा हा द्वंद्व केवळ कौटुंबिक मोहाचा नव्हता, तर तो त्या खोल मानवी प्रश्नाचा होता- सत्य आणि धर्म काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी हीच द्विधा मनःस्थिती शांत करण्यासाठी आपले विराट स्वरूप दाखवले. गीतेच्या अकराव्या अध्यायात वर्णिलेले हे विश्वरूप दर्शन काही साधे चमत्कार नव्हते, तर संपूर्ण सृष्टी, सर्व जीव, सर्व लोक एकाच परमात्म्यामध्ये सामावलेले आहेत हे दाखवण्याचे माध्यम होते. याच अध्यायात कृष्ण सांगतात की जे योद्धे रणभूमीवर उभे आहेत, ते सर्व आधीच त्या विराट रूपात विद्यमान आहेत- निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता, तर संपूर्ण मानवतेसाठी होता। प्रत्येक प्राणी, प्रत्येक रूप त्याच एका अविनाशी सत्तेची अभिव्यक्ती आहे.
प्राचीन संस्कृतींमध्ये हाच भाव वेगवेगळ्या रूपांत प्रकट होत राहिला आहे. वैदिक काळात सूर्य, अग्नी, वरुण, इंद्र, पृथ्वी आणि नद्यांना देवत्व मानले गेले. वृक्ष, नाग, गाय, पर्वत सर्वांमध्ये दिव्यता पाहिली गेली. हा काही अंधश्रद्धेचा भाग नव्हता, तर हा भाव होता की निसर्गाचा प्रत्येक अंश त्याच परम चैतन्याचा विस्तार आहे. भारताबाहेरही इतर प्राचीन संस्कृतींमध्ये हीच प्रवृत्ती दिसून येते. प्राचीन इजिप्त संस्कृतीत सूर्यदेवता रा, सृष्टी आणि पुनर्जन्माचे देवता ओसायरिस, मातृत्व आणि जादूची देवी आयसिस, तसेच आकाशदेवता होरस अशा अनेक देवी-देवतांची पूजा होत असे, आणि तिथेही प्राण्यांना, जसे मांजर, बैल आणि श्येन पक्षी,पवित्र मानले जाई. मध्य अमेरिकेतील माया संस्कृतीत पावसाचा देव चाक, सृष्टिकर्ता कुकुल्कान (पंख असलेला सर्प), तसेच मक्याच्या देवतेची उपासना प्रचलित होती, जी शेती आणि निसर्गचक्राशी जोडलेली होती. दक्षिण अमेरिकेतील इंका संस्कृतीत सूर्यदेवता इंती हे सर्वोच्च देवता मानले जात, त्याचबरोबर गर्जनेचा देव इल्यापा आणि पृथ्वीमाता पचामामा यांचीही पूजा होत असे. या सर्व संस्कृतींमध्ये एक समान भाव दिसून येतो, निसर्गाच्या शक्तींमध्ये आणि जीवनदायी घटकांमध्ये परमात्म्याला पाहण्याची प्रवृत्ती, मग तो भारत असो, इजिप्त असो किंवा अमेरिका खंड असो. ऋग्वेदातील हे वचन याच भावनेचे सार आहे- एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति, म्हणजेच सत्य एकच आहे, विद्वान त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. ईशावास्य उपनिषदही सांगते की, ईशावास्यमिदं सर्वम्, या जगाचा कणकण ईश्वराने व्यापलेला आहे. हाच विचार पुढे गीतेत अधिक स्पष्टपणे प्रकट झाला.
आज जेव्हा धर्माच्या नावाखाली जगाच्या अनेक भागांत वैमनस्य, हिंसा आणि जिहादसारख्या प्रवृत्ती दिसून येत आहेत, तेव्हा गीतेचा हा उपदेश अधिकच प्रासंगिक ठरतो. माणूस आजही त्याच द्विधा मनःस्थितीत आहे ज्यात अर्जुन होता॰ आपली श्रद्धा श्रेष्ठ आणि इतरांची श्रद्धा कनिष्ठ मानण्याची प्रवृत्ती आजही संघर्षाचे मूळ कारण बनलेली आहे. गीता आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक उपासना पद्धतीच्या मुळाशी तोच एक परमात्मा विराजमान आहे, हे जर मान्य केले, तर मतभेद आणि द्वेषाचे कोणतेही औचित्य उरत नाही. हे तत्त्वज्ञान धर्मांमधील सहअस्तित्व, सहिष्णुता आणि परस्पर सन्मानाचा पाया रचते. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ही भावना जर आजच्या माणसाने आत्मसात केली, तर धार्मिक कट्टरता आणि हिंसेचा मोठा भाग आपोआप संपुष्टात येऊ शकतो. गीतेचे विश्वरूप दर्शन म्हणूनच केवळ एक पौराणिक प्रसंग नाही, तर आजच्या विभाजित आणि अशांत जगासाठी एक जिवंत मार्गदर्शक तत्त्व आहे.
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...






