Saturday, March 24, 2018

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).


आज दिनांक २५..२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे लाख कोटी कुठून येतील  कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल.  दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही. त्यांना  फक्त चमको नेतागिरी करायची आहे. 

आज शेतकरी समस्या म्हणजे, एमएसपी (गहू, धान, डाळी, ऊसाची इत्यादी). वीज माफी, कर्ज माफी. यासाठी धरणे, आंदोलने इत्यादी. कुठल्या हि वस्तूचा भाव 'मांग आणि पूर्ती' चा निर्दयी सिद्धांत ठरवितो.  या कठोर सिद्धांताच्या विपरीत जाण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार नावाचा दैत्य जन्म घेतो. आपल्या शेतात काय लावायचे हे आज शेतकरी ठरवू शकत नाही. जगात अधिकांश देशांत किमान ३० टक्के शेतमाल प्रसंस्करीत होतो पण आपल्या देशात टक्के हि नाही. शेतकरी शेतातील तैयार माल हि रस्ते,रेल्वे वीज नसल्याने शीघ्र दूरवर पाठवू शकत नाही.  दुसरे काही लावले तर योग्य भाव मिळणार नाही. मजबूरीने शेतकरी अत्यंत कमी पाऊस येणाऱ्या भागात हि जमिनीतून खोलवरून पाणी काढून ऊस, धान आणि गहू इत्यादी लावतो. परिणाम भरलेल्या गोदामांमध्ये गहू, तांदूळ सडतो आणि साखर कारखान्यांना सरकारी अनुदान मिळतात, कर्ज माफी मिळते. मोठे घोटाळे होतात. परिणाम महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट कोट्याधीश झाले   नेता हि झाले. स्वयंभू शेतकरी नेता हि आमदार आणि खासदार झाले.  

शेती असो उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे. तीव्र्गतीने शेतमाल असो किंवा औद्योगिक माल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचला पाहिजे. आज एका ठिकाणी शेतकरी टमाटर, गोबी इत्यादी रस्त्यावर फेकतो किंवा शेतातच नांगर फिरवितो तर दुसरीकडे दिल्ली मुंबईत ग्राहकला तीच वस्तू ५० रुपये किलोच्या कमी भेटत  नाही. कारण १००० किमी जायला ट्रकला किमान - दिवस लागतात. रेल्वे वर एवढा ओझे  आहे कि मालगाड्या दिवसातून १५० किमी हि चालत नाही. दुसरी कडे अमेरिकेत केलिफोर्नियाहून भाज्यांची गाडी न्युयॉर्क पर्यंत जाते. आपले दुर्भाग्य या स्वतंत्रता प्राप्त झाल्यावर अधिकांश सरकारांनी या बाबतीत जास्त लक्ष दिले नाही.  

भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी सरकारला सर्वप्रथम पायाभूत सुविधांच्या महत्वााची जाणीव झाली. सर्वप्रथम ग्रामीण रस्ते बनविण्याचे कार्य प्रधानमंत्री ग्रामीण योजनेच्या अखत्यारीत आणलें. आज लाखो किमी ग्रामीण रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे. देशातील रस्त्यांना जोडण्यासाठी सुवर्ण चतुर्भूज योजनेत कार्य सुरु केले. रस्त्यांचे रुंदी कारण हि सुरु झाले. मालगाड्यांसाठी स्पेशल कारीडोर परीयोजानेवर कार्य सुरु झाले. सरकार बदलली आणि १० वर्ष रस्ते आणि रेल्वेचे विकास कार्य जवळपास थांबले. कदाचित त्या सरकारच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. २०१४ नंतर पुन्हा सरकार बदलली. त्यावेळी ४००च्या वर रस्त्यांचे थांबलेले कार्य पुन्हा सुरु झाले. अनेक राज्य  सरकारांच्या अधीन रस्ते अर्थात स्टेट हाईवे NH अंतर्गत आणले. रस्ते रुंद करण्याची गती वाढली.  पूर्व -पश्चिम, उत्तर-पश्चिम रेल कारीडोर जोमात कार्य सुरु झालेले आहे. किमान कारीडोर पुढील वर्षांत पूर्णपणे सुरु होतील. हीच सरकार राहिली तर २०२४ पर्यंत चारी कारीडोर पूर्ण होतील हि आशा करता येईल. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हि पूर्ण होईल मध्य महाराष्ट्रात रेल्वे हि पोहचेल. अर्थात हे सर्व झाले तर मालगाडी २४ तासांत १००० किमी ट्रक हि ७०० ते ८०० किमी गतीने धाऊ शकतील. 

गावांत वीज पोहचली पाहिजे आणि २४ तास मिळाली पाहिजे. या बाबतीत हि उदासीनता होती. आता सर्व गांवात वीज पोह्चोविण्याचें कार्य शीघ्र गतीने होते आहे. वीजेच्या बाबतीत भारताची रेंक जगात ७२ वरून २६ वर आली. अर्थात सरकार या बाबतीत निश्चितच गंभीर आहे.  २४ तांस ग्रामीण भागात वीज मिळाली पाहिजे या कडे सरकारने अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची अजून आवश्यकता आहे. वीज असेल तर ग्रामीण भागात शीतगृहे उभारता येतील. त्या शिवाय खाद्य प्रसंस्करण उद्योग विशेषकरून छोटे शेतकर्याने स्थापित केलेले उभे राहू शकत नाही.  शेतकर्यांचे वीजेचे माफ करण्या एवजी स्वस्तात सोलर सयंत्र ग्रामीण भागात पुरविले पाहिजे. जेणेकरून शेतकरी वीजेच्या बाबतीत परावलंबी राहणार नाही. 

या पायाभूत सुविधांचा शेतकर्यांना फायदा कसा होणार.हा प्रश्न येणारच. शेतकरी आपला शेतमाल कमी खर्चांत जास्त दूर पाठवू शकतो.  रस्ता वीज असेल तर ग्रामीण भागात हि खाद्य प्रसंस्करण उद्योग लागतील. शेतकरी आधी भाव ठरवेल आणि मग शेतात बियाणे पेरेल. एमएसपीची गरज भासणार नाही. आज रस्त्यांची आणी वीजेची समस्या काही अंशी दूर झाल्याने देशात खरोखर फूडपार्क निर्मित होऊ लागले आहेत. तेजपूर आसाम सारख्या जागी हि एक फूडपार्क सुरु झाला आहे. विदर्भात हि नागपूर येथे देशातील सर्वात मोठा फूडपार्क बहुतेक याच वर्षी सुरु होईल.  अनेक देशी-विदेशी मोठ्या कंपन्या अनेक छोट्या कंपन्या, शेतकरी समूह हि खाद्य प्रसंस्करण उद्योगात उतरत आहे. फ्रेट कारीडोर पूर्ण झाल्यावर या उद्योगाला अधिक गती मिळेल.  या शिवाय मोठ्या शहरांच्या ५०० किमी परीधीत राहणारा शेतकरी हि शेतातच भाजी-पाला धुऊन चिरून शहरी ग्राहकांना पाठवू लागतील. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होईल. 

आपले दुर्भाग्य स्वत:ला शेतकर्यांचे हितैषी समजणारे शेतकरी नेता असो, मुंबईत शेतकरी मोर्चा काढणारे असो किंवा अण्णा हजारे यांच्या मुखातून पायाभूत सुविधांबाबत एक हि शब्द निघालेला मी ऐकला नाही. अर्थात यांना शेतकर्यांशी काही हि सरोकार नाही. 

Thursday, March 22, 2018

मैकाले शिक्षणपद्धती आणि विद्यार्थींची आत्महत्या


डिस्कव्हरी जीत स्वामी रामदेव वर आधारित मालिका पाहत होतो.  एका आंग्ल मिडियमच्या प्रस्थापित शाळा. शाळेचा मुख्य सिद्धांत आमची शाळा सर्वश्रेष्ठ आमचे विध्यार्थी सर्वात पुढे, कधी पराजित न होणारे. चांगले मार्क्स मिळविणार्या विध्यार्थांना विदेशात शिक्ष्णासाठी शाळा पाठविणार.  सूर्या नावाचा एक हुशार विद्यार्थी.  एक प्रतियोगिता जिंकण्याचा दबाव त्याच्यावर आहे. ती जिंकली तर शाळा त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठविणार. याच सर्व दबावामुळे, ऐनवेळी त्याची स्मरणशक्ती दगा देते. शाळा पराजित होते. विदेशात जाण्याचे त्याचे स्वप्न भंग होते. आपण नालायक आहोत, काहीच करू शकत नाही.  याच हीन भावनेने ग्रस्त हा विद्यार्थी आत्महत्या करतो.  

दोन दिवसांनी वर्तमान पत्रात बातमी वाचली.  नवव्या वर्गात एक विध्यार्थिनी नापास झाली.  "मी मूर्ख आहे, मी पराजित झाली, मी स्वत:शीच घृणा करते. असे लिहून तिने आत्महत्या केली. वहीत लिहिताना स्वत:च्या नावापुढे तिने डॉक्टर हे बिरूद  लावले होते. टीवी वर समाचार पाहताना लक्षात आले बहुतेक तिच्या पालकांची ती डॉक्टर बनावी अशी इच्छा होती.  स्वत:ची अपूर्ण  इच्छा, मुलांद्वारे पूर्ण करण्याची मानसिकता ठेवणारे पालक, शाळेचे प्रबंधक आणि  मैकाले द्वारा प्रस्थापित शिक्षणपद्धती.  ह्या सर्वांचा परिणाम विध्यार्थीनीची आत्महत्या. 

स्वत:च्या पायावर उभे राहणारे व्यक्तिमत्व घडविणारी आपली गुरुकुल पद्धती नष्ट करून मैकाले महोदयांनी नवीन शिक्षणपद्धती आपल्या देशात रुजवली. या नवीन शिक्षणपद्धतीचा उद्देश्य सरकारी सेवेसाठी क्लार्क पासून अधिकारी  निर्माण करणे. त्या अनुषंगाने शालेय सिलेबस तैयार केले गेले. आज हि आपण हीच शिक्षण पद्धती वापरतो आहे. याच शिक्षणपद्धतीमुळे मी सरकारी नौकर झालो. दुसर्या शब्दांत नौकरी/ गुलामगिरी करण्यासाठी तैयार केलेले एक आकर्षक पेकेज म्हणजे आजची शिक्षणपद्धती. 

मी दिल्लीत पाहतो, सरकारी कारकून असो किंवा छोटे छोटे दुकानदार हि आपल्या मिळकतीचा अधिकांश भाग मुलांचा शिक्षणावर खर्च करतात. मोठे डोनेशन देऊन प्रतिष्ठित शाळेंत मुलांना प्रवेश मिळवून देतात. उद्देश्य मुलगा या शाळेत शिकेल तर डॉक्टर किंवा इंजिनिअर बनेल. विदेशात जाईल. समजा विदेशात जायला नाही मिळाले, डॉक्टर व इंजिनिअर नाही बनला तरीही या प्रतिष्ठित शाळेत शिकला आहे, याच आधारावर त्याला चांगली सरकारी नौकरी किंवा निजी क्षेत्रात नौकरी मिळेल. या शिक्षणपद्धतीत व्यक्तिगत स्वार्थाला महत्व आहे. ज्या मातीत मी जन्मलो  त्या मातीचे  ऋण फेडण्याच्या कर्तव्याची जाणीव  हि शिक्षणपद्धती देत नाही.

आता विशिष्ट प्रतिष्ठित शाळेत/ कॉलेजमध्ये शिक्षणाचा आणि नौकरीचा  काय संबंध? एका IAS अधिकारी ज्याच्या सोबत मी कार्य केले होते. एकदा मी प्रश्न विचारला, साहेब आपण दक्षिण दिल्लीत रहात होता मग उत्तरी दिल्लीतल्या विशिष्ट कोलेज मध्ये अडमिशन का घेतली? तो म्हणाला त्याने बीए (इतिहास) हा विषय घेऊन IAS तैयारी सुरु केली.  विशिष्ट शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असेल तर सरकारी नौकरी नव्हे तर निजी क्षेत्रातल्या नौकरीच्या इंटरव्यू मध्ये चांगले मार्क्स मिळतात. अर्थात नौकरीची मिळण्याची शक्यता जास्त. हे वेगळे त्या वेळी त्याला विशिष्ट कालेजमध्ये बसमधून जायला २ तास आणि यायला २ तास लागायचे.  

अधिकांश पालक याच उद्देश्याने आपल्या मुलांना अश्या शाळेत टाकतात. शाळा संचालकांना हि पालकांचा हा उद्देश्य माहित असतो. ते हि विद्यार्थांवर चांगले मार्क्स आणण्यासाठी भरपूर दबाव टाकत राहतात. पालकांचेही आपण भरपूर पैसा खर्च करतो, तर मुलाने हि चांगले मार्क्स आणले पाहिजे. विद्यार्थीच्या मनात काय आहे, त्याचे स्वप्न काय, त्याला भविष्यात काय करायचची इच्छा आहे, याचा विचार कुणीच करीत नाही. फक्त पेकेजच्या अनुसार विशिष्ट पद्धतीने मुलाने शिकले पाहिजे, हाच या शिक्षणपद्धतीचा हेतू. जो विद्यार्थी या  शिक्षणाच्या पकेजच्या हिशोबाने प्रदर्शन करण्यास असमर्थ ठरतो तो निराश होऊन आत्महत्या करतो. गुलाम आणि नौकर पैदा करणारी आजची हि शिक्षण पद्धती. विद्यार्थांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिक्षण या व्यवस्थेत नाही.  

या शिक्षणपद्धतीच्या आहारी जाऊन पालक मुलांना आंग्ल मिडीयमच्या विशिष्ट प्रसिद्ध शाळेंत टाकतात. आपले पालक आपल्यावर भरपूर पैसे खर्च करतात, पण आपण त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहोत. नापास झाल्यास कुणाला हि तोंड दाखविण्या लायक राहणार नाही. आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपल्याला कुठेही नौकरी मिळणार नाही. आपल्या पालकांना हि लोक नवे ठेवतील. आपण लोकांना तोंड दाखवायच्या लायक नाही. ह्या भावनेने ग्रस्त निराश विद्यार्थी आत्महत्या करतो. 

खरे म्हणाल तर, आजच्या युगात हि शिक्षणपद्धती निरर्थक झाली आहे. हा विचार न तर पालक करतात न हि शिक्षण विकणारे दुकानदार करतात.  विद्यार्थांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे शिक्षण देणारी शिक्षणपद्धती  आणण्याची काळाची गरज आहे. या शिवाय  शिक्षणाचा उपयोग तो स्वत: आणि देशासाठी कसा करणार याचे ज्ञान  हि त्याला मिळाले पाहिजे.  त्या शिवाय विद्यार्थांच्या आत्महत्या थांबणार  नाही. 

व्यवस्था आपली शिक्षणपद्धतीत मूलभूत  बदल करेल हि आशा व्यर्थ आहे. निजी क्षेत्रातल्या शिक्षण संस्था हे कार्य करू शकतात. आज स्वामी रामदेवांनी आचार्यकुलंच्या माध्यमातून प्राचीन आणि आधुनिक ज्ञानावर आधारित नवीन शिक्षणपद्धती सुरु केली आहे. जिथे विद्यार्थी शिक्षणासोबत शारीरिक आणि मानसिकरूपेण सक्षम होतील. स्वत:च्या पायावर उभे राहतील आणि स्वत:ला आणि देशाला समृद्ध बनवतील.  



Tuesday, March 20, 2018

ग्राहक हित : मधुवर चर्चा




गेल्या महिन्यात विदर्भात गेलो होतो. एका दुकानात  मधावर चर्चा होत होती.  दुकानदार म्हणाला, मी कुठल्याच ब्रांडेड कंपनीचे मध विकत नाही कारण त्यात साखर असते. मग ते डाबर असो किंवा पतंजलि.  मी विचारले, तुम्हाला कसे माहित. तो म्हणाला, शुद्ध शहद पाण्यात सहज विरघळते आणि साखर असेल तर सरळ खाली जाते, हळूहळू  विरघळते. मी विचारले, मग तुम्ही कुठून मध घेतात.  इथे जंगलातून मधाचे पोळे घेऊन गावकरी येतात, त्यांचाच कडून आपल्या डोळ्यांदेखत  ताजे काढलेले मध घेतो.  हे मध ६ वर्ष खराब होणार नाही किंवा साखरी सारखे जमणार नाही. 

दुकानासमोर उभे काही ग्राहक कि त्याच्याशी सहमत होते. दिल्लीत हि मधाचे पोळ, काही लोक दारोदारी जाऊन मध विकतात.  हा त्यांचा पुश्तैनी धंधा. हे लोक ९० टक्के नकली मध विकतात आणि ग्राहकांना मूर्ख बनवितात. अधिकांश ग्राहक हि नकली मधालाच  खरे समजतात.

खरे मध पाण्यात टाकले कि लगेच खाली जाते.  सामान्यत: ग्राहक २५० ग्रम किंवा ५०० ग्रम मध विकत घेतात. ते महिन्याभरात संपते हि. पण फ्रीज मध्ये जास्तीकाळ ठेवल्यास त्याचे क्रिस्टीलाईजेशन  होते अर्थात ते साखरी सारखे जमते.  थंडीत हि मध हे जमतेच. त्याच मुळे ग्राहकांचा गोंधळ होतो. नकली मध विकणारे ग्राहकाच्या याच गोंधळाचा फायदा घेतात आणि महागात नकली मध त्यांच्या डोक्स्यावर मारतात.  छोट्या शहरांत आणी गावांत  अधिकांश दुकानदार  भेसळयुक्त मधच विकत घेतात.  ब्रान्डेड मध १०० टक्के शुद्धच असते. वेल्यू एडिशन साठी इतर पदार्थ अदरक इत्यादी मिसळले असेल तर ते पॅकेट वर लिहलेले असते. 

शहरी दुकानदार हि ग्राहकांना दुसर्या प्रकारे लुटतात.  ज्या वस्तूवर जास्त कमिशन मिळेल तीच वस्तू ग्राहकाच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करतात. चांगला 2० वर्षांपासूनचा ओळखीचा दुकानदार.  मी रोज सकाळी कोमट मध घेतो. (हृदयरोगाच्या  एलोपेथी औषधांमुळे पोटात गॅस होते. पेन्टासीड पेक्षा कोमट पाण्यात मध घेतलेले जास्त चांगले). एका संध्याकाळी घरी परत येताना  लक्ष्यात आले, मध संपलेले आहे.  दुकानदरला पतंजलिचे  २५० ग्रम मध मागितले.  सहज दुकानदार शेल्फकडे बघत म्हणाला शायद माल खतम हो गया. दुसर्या कंपनीचे घेऊन जा.  तुम्ही जुने ग्राहक आहात १२०च्या जागी १०० रुपये दिले तरी चालतील.  मी म्हंटले, जी वस्तू ७० रुपयांत मिळते त्यासाठी मी १०० रुपये का मोजू? नंतर येऊन घेऊन जाईन. तेवढ्यात दुकानात काम करणारा पोरगा म्हणाला, पतंजलि का शहद  उस ब्रांड के शहद के पीछे रखा है. दुकानदार त्याच्यावर डाफरला, तुझे कितनी बार कहा है, हर ब्रांड कि एक एक शिशी  शेल्फ में सामने रखा कर( तुला कितीदा सांगितले आहे, प्रत्येक ब्रांडच्या एक एक बाटली  समोर ठेवत जा).  मी त्याला म्हंटले, कशाला उगाच नौकरावर ओरडतो आहे, तू १५ वर्षांचा होता त्या वेळ पासून मी तुला ओळखतो. तो ओशाळला,  साहेब चूक झाली पुन्हा होणार नाही. बाकी  तुम्हाला माहितच आहे, जो जास्त कमिशन देतो त्याच्या माल विकण्याचा प्रयत्न दुकानदार करणारच.  आता काय बोलणार. बाकी शहरी ग्राहकांची हि एक विचारधारा असते, महाग आणि आकर्षित करणार्या पॅक  मिळणार्या  वस्तू  चांगल्या. 


शतशब्द कथा - मोबाईल वाली ती

https://vivekpatait.blogspot.in/2013/12/blog-post_29.html

Monday, March 19, 2018

आनंदवन : दिव्यांग - दान नको घामाचे दाम द्या


 (आनंदवन बघितल्या वर, मला जे वाटले तेच शब्दांत मांडले आहे)

फरवरी २३ ला आनंदवन येथे गेलो होतो. आनंदवन म्हणजे भारतातील सर्वात स्वच्छ सुंदर व स्वयंपूर्ण  गाव म्हंटले तरी चालेल. दानावर आधारित कुठली हि संस्था जास्त काळ जगू शकत नाही.  स्वामी रामदेव यांनी आपल्या प्रवचनांत एकदा म्हंटले होते 'धर्मस्य मुले अर्थ'  याच्या अर्थ कुठले हि सामाजिक कार्य करायचे असेल तर त्या साठी अर्थ हे लागणारच. त्याच अर्थासाठी दीड हजाराहून जास्त दिव्यांग आनंदवन येथे कठीण पुरुषार्थ करतात. त्यांच्या पुर्षार्थाला योग्य मोबदला मिळाला तर दानाची गरज लागणार नाही. 

आनंदवन येथे दिव्यांगजन  हस्तशिल्प (चित्र, लाकडाची खेळणी व शिल्प), हंडलूम वर वस्त्र तैयार करणे, शेती, गोशाला, कॅन्टीन, चप्पल मेकिंग, व्हील चेअर मेकिंग  इत्यादी इत्यादी अनेक प्रकारची कार्य दिव्यांग जन करतात. वेळ कमी होता म्हणून पूर्ण आनंदवन पाहताआले नाही. 

आनंदवन येथे होममेड कागदांपासून ग्रीटिंग कार्ड्स आणि लग्नाच्या पत्रिकांची हि निर्मिती होते. याच विभागात श्री रमेश अमरु (टेलीफोन न. 090110 94604) यांची भेट झाली.  मी दिल्लीहून आलो हे कळळ्यावर त्यांनी सहज म्हंटले आम्हाला आजपर्यंत दिल्लीहून ऑर्डर्स मिळाल्या नाहीत. मला ओशाळल्या सारखे झाले. अधिकांश दिल्लीकर मराठी लग्नात ५ ते १५ लाख फक्त मेजवानीवर खर्च करतात. तरीहि काही तरी उत्तर द्यायचे  म्हणून मी म्हंटले, बहुतेक लोकांना माहित नाही. आता हे कार्य तुम्हीच करा. त्यांनी माझा ई-मेल घेतला.  २५ला  दिल्लीत परतलो. २७ला   डॉक्टर विकास आमटे यांची मेल आली.  त्यात ग्रीटिंग कार्ड्सचे 92   नमुने हि पाठविले. सोबत किमंत हि (किमान २० रुपये ). (आपला ई-मेल दिला तर मला आलेली ईमेल पाठवू शकतो ) लग्नपत्रिका हि किमान ५० रुपये.

आपण  लग्नात नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण देण्यासाठी  ३०० ते ५०० पत्रिका हि लागतात किमान १०० लग्न पत्रिकांची ऑर्डर आनंदवनला दिली तरी जास्तीसजास्त दिव्यांग लोकांना रोजगार मिळेल. तसेच ग्रीटिंग कार्ड्स चे ऑर्डर हि देऊन या कार्यात हातभार लावू शकतात.   ग्रीटिंग कार्डवर चित्र काढण्यासाठी केळीचे व इतर वनस्पतींच्या पाने इत्यादीचा वापर केल्या जातो.  एक नमुना खाली देतो आहे. 

e


तसेच भिंतीवर टांगण्यासाठी व कार्यालयाची शोभा वाढविण्यासाठी दिव्यांग लोकांनी काढलेल्या  पेंटिंग्ज हि मिळतात. (३०० रुपयांपासून सुरवात होते). 

आशा आहे वाचक यावर सकारात्मक दृष्टीने विचार करतील. 


अधिक विचारपूस करण्यासाठी डॉक्टर विकास आमटे यांचा ई-मेल व पत्ता खाली देतो आहे.



Dr. Vikas Amte
Secretary,
Maharogi Sewa Samiti, Warora,
At & Post : ANANDWAN - 442 914
Tahsil: Warora , Dis
trict: Chandrapur, 
Maharashtra, India
vikasamte@gmail.com

श्री रमेश अमरु (Shri Ramesh Amru)(टेलीफोन न. 090110 94604)





Saturday, March 17, 2018

गुढीपाडवा: स्वदेशी स्वास्थ्यवर्धक वस्तूं वापरण्याचा संकल्प


नवीन वर्षाच्या शुभ दिवसापासून आपण स्वदेशीचा संकल्प केला पाहिजे.  दैनदिन उपयोगासाठी स्वदेशी कंपन्यांचा वस्तू वापरल्या पाहिजे.  विदेशी कंपन्या या देशात नफा कमविण्यासाठी आल्या आहेत. मोठे नाव आणि  शरीराला अपायकारक कचरा वस्तू विकतात.  मजा म्हणजे अधिकांश शिक्षित उच्चशिक्षित लोग हा कचरा आनंदाने घेतात. रोगी झाल्यावर विदेशी औषधी हि विकत घेतात. 

प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टूथपेस्ट, शेम्पू, तेल, साबण, शेविंग क्रीम, फेसवाश, सर्व शृंगाराच्या वस्तू. ज्या वर हिरवे निशाण असते. त्या शरीराला हानिकारक नसतात.  आपल्या अनेक स्वदेशी उद्योग डाबर, हिमालय, विको आणि पतंजलीचे तर सर्व वस्तू प्राकृतिक पदार्थांपासूनच बनतात.  घरीझाडू पोंछासाठी  गौमूत्र, कडूलिंब, युकेलिप्टसच्या तेल असलेले,गोनाइल वापरा.  स्थानीय गौशाला, खादी ग्रामोद्योग व पतंजली गौनाईल विकतात. संडास स्वच्छ करण्यासाठी प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टोईलेट क्लीनर वापरा. 


अधिकांश मध्यमवर्ग व उच्चवर्ग रोजच्या उपयोगात रिफाइंड तेल वापरतात.  तेल बियातून अधिकांश तेल काढण्यासाठी  कंपन्या अधिकांश विदेशी रासायनिक पदार्थ वापरतात व फिल्टर करून विकतात. कंपनीला मुनाफा जास्त होतो.  याच तेलाला रिफाइंड तेल असे म्हणतात.  आपल्या देशात हृदयरोगाचे मुख्य कारण हे रिफाइंड तेल आहे.  मजेदार गोष्ट अमेरिका व युरोपियन देशात फिल्टर केलेले वर्जिन तेल जास्त वापरतात. स्वस्तात मिळणारे विदेशी पामोलीन तेल जे आजकाल अधिकांश हॉटेलांमध्ये व अज्ञानमुळे लोक घरात वापरतात. स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक आहे. आज ७०% विदेशी पामोलीन देशात वापरले जाते. परिणाम आपल्या शेतकर्यांना तेल बियांचा भाव मिळत नाही व खाणारे लोग हि बिमार होतात.  महाराष्ट्रात आपण मूंगफली व तिळाचे तेल जास्त खातो.  काही महिन्यांपासूनआपल्या देशात हि एक स्वदेशी कंपनी फिल्टर केलेले वर्जिन तेल विकते. आजकाल मी तेच विकत घेतो आहे.

आता उन्हाळा सुरु झाला आहे, पेप्सी, कोकच्या जागी, खस, ब्राह्मी, आंब्याचे पने, गुलाब आणि बेलाचे शरबत हि स्वदेशी कंपन्या विकतात. हे शरबत स्वास्थ्यासाठी हि चांगले असतात.  या शिवाय उन्हात फिरताना कोल्ड ड्रिंक्स एवजी स्वदेशी कंपनींचे  लस्सी आणि छाछ हि पिऊन तहान भागवू शकतो आणि लू पासून हि आपले संरक्षण होते. दिल्लीत आजकाल अधिकांश सरकारी बाबू लंचमध्ये मदर डेरी आणि अमूलची लस्सी व छाछ पितात. पण दुर्भाग्य नवीन पिढी पिझ्झा आणि कोक मध्येच बुडालेली आहे. 

पॅक बंद फळांचा रस असो व टोमाटो प्युरी विदेशच्या जागी स्वदेशी कंपनींचे वापरले पाहिजे. (चीनच्या शेतकर्यांच्या जागी भारतीय शेतकर्यांचा फायदा झाला पाहिजे). 

स्वदेशी वस्तू वापरल्याने देशातील शेतकर्यांचा हि फायदा होतो. आपल्याला हि चांगल्या गुणवत्तेच्या वस्तू स्वस्तात मिळतात.  आज पासूनच स्वदेशीचा संकल्प केला तर देशात लाखो रोजगार तैयार होतील.  बळीराजाला आत्महत्या करावी लागणार नाही. प्रत्येकाला जेवढे जमेल तेवढे स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे.   


टीप: जर ३० कोटी लोक हि गौनाईल वापरू लागले, अर्थात रोज १ कोटी लिटर गौनाईल. तर घर तर स्वच्छ होईल, शिवाय शेतकर्यांची आमदनी हि वाढेल. गौमूत्र  हि आजकाल ७-८ रु प्रती लिटर विकल्या जाते.  उतराखंड येथील शेकडो शेतकर्यांना आज फायदा मिळतो आहे.  शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होणार.


Thursday, March 15, 2018

प्रदूषण (१९) पाणी : मी /तुम्ही काय करू /करतो/शकतात


आम्ही तर बा शहरात राहतो. फ्लेट मध्ये किंवा दिल्लीत सारखे १५x ६० च्या घरात. पाण्याचे प्रदूषण कमी करण्यात आम्ही काहीच योगदान देऊ शकत नाही. अशी बहुतेकांची धारणा असते. आपण पाणी वापरतोच. तोंड धुवण्यासाठी, संडासात, आंघोळीसाठी, भांडे घासण्यासाठी, कपडे धुवण्यासाठी, घराला पोंछा मारण्यासाठी, संडास स्वच्छ कार्ण्यासाठी.  हेच पाणी नाल्यातून  जमिनीत झिरपत-झिरपत नदीमध्ये जाते आणि जमीनीच्या खालच्या पाण्याला व नदीला प्रदूषित करते. कारखान्या व्यतिरिक्त दिल्लीचे २.५  कोटी लोक किमान ६०० कोटी lलिटर पाणी रोज प्रदूषित करतात. बाकी शहरात हि हेच गणित असेल. हे प्रदूषण कमी करणे आपल्या हातात आहे.  

तुम्ही म्हणाल. पटाईतजी उपदेश कुणीही देऊ शकतो, तुम्ही या साठी काय केले. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आपण कुणाला उपदेश करू नये.  मी बाह्य दिल्लीत बिंदापूर येथे राहतो,  इथे पाण्याची कमतरता नेहमीचीच. कमी पाण्याचा योग्य वापर करण्याची कला हि शिकावीच लागली.  पाणी आपण दोन रीतीने प्रदूषित करतो, एक प्राकृतिक पदार्थांचे  प्रदूषण  आणि दुसरे रासायनिक पदार्थांचे प्रदूषण  पाण्यात जातात. प्राकृतिक पदार्थांचे प्रदूषण दूर करण्याची शक्ती पाण्यात नेसर्गिक रूपेण आहे,पण रासायनिक पदार्थांचे प्रदूषण पाणी दूर करू शकत नाही.

सकाळी उठल्यावर आपण तोंड धुवतो. बाजारात रसायनिक पदार्थ असलेले टूथपेस्ट आणि नेसर्गिक पदार्थ असलेले टूथपेस्ट मिळतात. सर्व नेसर्गिक पदार्थांच्या पेकेजिंग वर हिरवे निशाण असते. मजेदार अधिकांश भारतीय कंपन्या डाबर, विको आणि पतंजलीचे इत्यादींचे  टूथपेस्ट प्राकृतिक  पदार्थांपासून बनलेले आहे.  मी यातली एक वापरणे सुरु केले आहे. 

आंघोळीसाठी साबण, शेम्पू इत्यादी हि हिरवे निशाण असलेले वापरले पाहिजे. पतंजलीचे सर्व साबण आणि शेम्पू  फेसवाश, क्रीम एवढेच काय दाढीसाठी क्रीम हि हिरव्या निशाण वाली आहे.  हिमालय, डाबर  व अनेक भारतीय कंपन्या प्राकृतिक पदार्थांपासून वस्तू बनवितात. आजकाल मी तेच वापरतो.  

आंघोळ करताना पाण्याची बचत हि केली पाहिजे. मी सामान्यत: ५ लिटर पाण्यात आंघोळ पूर्ण करतो.  एक मग (६०० ml)  पाणी घेऊन सर्वांगाला साबून आणि डोक्याला शेम्पू लावतो. नंतर  दोन मग  पाणी हळू हळू डोक्यावर टाकून डोके स्वच्छ करतो. दोन मग पाण्याने बाकी शरीर हि. शेवटी २ मग  पाणी अंगावर टाकून आंघोळ पूर्ण करतो. प्रयत्न करून बघा. ५ नाही तर १० लिटरच्या आत आंघोळ करणे निश्चित जमेल.

घरीझाडू पोंछा लावण्यासाठी बाई येते. पूर्वी रासायनिक Sनाईल वापरायचो. पोंछा लावल्या नंतर, जमीन सुकल्यावर, सुष्म रासायनिक पदार्थ नाकाच्या वाटे शरीरात जाणारच. शरीर हि रोगी होणार व शिवाय पाणी हि प्रदूषित. मी गेल्या दोन वर्षांपासून गौमूत्र, कडूलिंब, युकेलिप्टसच्या तेल असलेले,गोनाइल वापरणे सुरु केले आहे. स्थानीय गौशाला, खादी ग्रामोद्योग व पतंजली गौनाईल विकतात. घर स्वच्छ, शरीराला अपाय हि नाही आणि प्रदूषण हि कमी. तसेच अधिकांश लोक अज्ञानवश संडास स्वच्छ करण्यासाठी रासायनिक पदार्थ असलेले  टोईलेट क्लीनर वापरतात. या मुळे पाणी भयंकर रित्या प्रदूषित होते. त्या जागी मी प्राकृतिक पदार्थांनी बनलेले टोईलेट क्लीनर वापरायला सुरुवात केली. आपले दुर्भाग्य सध्या तरी माझ्या माहिती प्रमाणे फक्त एकच स्वदेशी कंपनी नेसर्गिक टोईलेट क्लीनर बनविते आहे. मी तेच वापरतो. 

भांडे घासण्यासाठी पूर्वी राख वापरली जायची. आता गॅसवर स्वैपाक बनतो. आपण भांडे घासण्यासाठी हि शक्तिशाली रसायन युक्त भांडे घासायचे साबण किंवा लिक़्विड वापरतो. भांडे वाळल्या वर व्यवस्थित पाहिल्यास काही पांढरे निशाण भांड्यांवर दिसतील. हे रासायनिक पदार्थ जेवताना आपल्या शरीरात हि जातात. शरीर रोगी होणार हे १०० टक्के. राख शरीरात गेली तरी काही नुकसान होत नाही. आज बाजारात राखेपासून (राख + लिंबू) बनलेले भांडे घासायचे एका स्वदेशी कंपनीचे साबण मिळते. मी तेच वापरणे सुरु केले आहे. बहुतेक काही काळात अनेक कंपन्या हि बाजारात येतील. भारतीयच.

आमची सौ. नेहमीच संध्याकाळी ५ वाजतानंतर कपडे धुवते. त्या वेळी टाकीचे पाणी गरम असते. साबण (पावडर)  हि कमी लागते. वाशिंग माशिनीत कपडे फिरविल्यानंतर कपडे व्यवस्थित पिळून ड्रायर मध्ये टाकते.  पाण्याची ६० ते ७० टक्के बचत होते. शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होते. 

सारांश एवढाच.आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो.  हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे. 


टीप: जर ३० कोटी लोक हि गौनाईल वापरू लागले, अर्थात रोज १ कोटी लिटर गौनाईल. तर घर तर स्वच्छ होईल, शिवाय शेतकर्यांची आमदनी हि वाढेल. गौमूत्र  हि आजकाल ७-८ रु प्रती लिटर विकल्या जाते.  उतराखंड येथील शेकडो शेतकर्यांना आज फायदा मिळतो आहे.  शिवाय पाण्याचे प्रदूषण हि कमी होणार.











Saturday, March 10, 2018

क्षणिका-शेतकरी मोर्चा



मेंढपाळ मेंढ्या हाकतो
घेरावला मेंढ्या नेतो
प्रदर्शनाला मेंढ्या नेतो
मेंढ्यांच्या पाठीवर 
पोळ्या भाजतो

मेंढपाळ खासदार बनतो, 
मेंढपाळ आमदार बनतो
साखर सम्राट ही बनतो

मेंढ्यांच्या नशिबी येतो
मात्र सूखा चारा

Monday, March 5, 2018

प्रदूषण १८: यक्ष-युधिष्ठिर संवाद


बर्याच वेळ वाट पाहून अखेर युधिष्ठिर आपल्या भावंडांना शोधायला निघाला. दूर-दूर पसरलेल्या वाळवंटात एकही वृक्ष दिसत नव्हता. सूर्य आग ओकीत होता. तहानेने त्याचा गळा कासावीस झाला. अखेर युधिष्ठिरला वाळवंटात दूर एक सरोवर  दिसले. आता पाणी मिळेल, तहान भागेल या आशेने तो त्वरित सरोवर जवळ पोहचला. पाहतो काय, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडलेले होते. हे बघून युधिष्ठिर दुखी झाला. त्रिलोक विजयी भीम आणि अर्जुनाची अशी अवस्था कुणी केली असावी. बहुतेक सरोवराच्या रक्षक  यक्षाचे काम असावे. त्याची आज्ञा घेता बिना तहानलेल्या भावंडानी पाणी पिऊन तहान भागवली असेल, म्हणून यक्षाने त्यांना दंडित केले असेल. युधिष्ठिराने यक्षाचा पुकारा केला, हे यक्ष, तुम्ही दयाळू आहात, या वाळवंटात पाण्याचे संरक्षण करून, प्रवास करणाऱ्या लोकांची तहान भागविण्याचे पुण्य कार्य करीत  आहात.  माझ्या भावंडांच्या हातून  चूक झाली त्यांना क्षमा कर. 

युधिष्ठिरचा पुकारा ऐकून यक्ष प्रगट झाला. युधिष्ठिराने यक्षास प्रणाम केला आणि आपल्या भावंडांच्या प्राणाची भीक मागितली. यक्ष म्हणाला, युधिष्ठिर मी कोण क्षमा करणारा? तुझी तहानेने व्याकूळ भावंडे या सरोवरावर आली. त्यांनी पाणी पिण्यासाठी माझी आज्ञाही मागितली. पण या सरोवराचे पाणी अत्यंत दूषित आणि विषाक्त असल्यामुळे, मी नकार दिला.  पण त्यांनी माझे ऐकले नाही. पाणी प्राशन केले व मृत्यूमुखी पडले. युधिष्ठिराने पुन्हा हात जोडून विनंती केली, यक्षदेव आपण सर्वज्ञ आहात, यावर काही उपाय असेल. हो पूर्वी हिमालयात संजीवनी बुटी मिळायची. तीच आणून हनुमानाने लक्ष्मणाचे प्राण वाचविले होते. पण आज  हिमालयावर एक वृक्षही नाही, संजीवनी बुटी मिळण्याचा प्रश्नच येत नाही.  क्षणभर थांबून त्याने युधिष्ठिराला विचारले, जीवनाचे अखेरचे सत्य काय आहे. युधिष्ठिर म्हणाला, मृत्यू हेच जीवनाचे शेवटचे सत्य आहे. यक्ष जोरात अट्टहास करत म्हणाला, युधिष्ठिर तुला जीवनाचे सत्य माहित आहे, हे चांगलेच. तुझे बंधू काही जिवंत होऊ शकत नाही. इथे दूर-दूर पिण्यालायक पाणीही नाही. तुझ्या समोर दोनच मार्ग आहेत. एक  या सरोवराचे विषाक्त पाणी पिऊन तुला काही क्षणातच  मृत्यू मिळेल किंवा दुसरा तहानेने तडफडत तुला मृत्यू भेटेल. यक्ष अदृश्य झाला. युधिष्ठिराने काही वेळ विचार केला, मरण निश्चित आहे तर भावंडासोबत मेलेले बरे. युधिष्ठिराने विषाक्त पाण्याचे प्राशन केले, त्याची तहान शांत झाली. काही क्षणात  तोही निष्प्राण झाला. 

पाच हि पांडव सरोवराच्या काठावर निष्प्राण पडले होते. महाभारताचा अवेळीच अंत झाला. सत्याची असत्या वर नव्हे तर प्रदूषणाची मानवावर विजय झाली

टीप: हे भविष्याचे सत्य आहे, दहा-वीस वर्षानंतर विषाक्त पाणी पिऊन सर्वात जास्त लोक मारतील. पाण्यासाठी होणारे  गृहयुद्ध/युद्ध  आपल्या डोळ्यांसमोर पाहू.  

(डॉक्टर सुभाष स. नाईक यांच्या यक्ष या हिंदी कवितेची  प्रेरणा घेऊन लिहिलेली गोष्ट- त्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या कवितेंच्या आधारावर क्षणिका, लेख इत्यादी लिहायला अनुमती दिली आहे). 




क्षणिका : भांडणारी बायको



अनुभव पांढर्या केसांचा 
सांगतो तुम्हा सर्वांना 
भांडणारी बायको कधी 
सोडूनी जात नाही.


टीप:सर्व प्रकारच्या संसाराचे हे सत्य आहे.