त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.
Monday, August 3, 2015
आनंदाचा क्षण आणि ....
त्याचा आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. हि आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटल वर पोहचला.
Saturday, August 1, 2015
मोड आलेल्या मूग आणि मोठ यांचे घावन (धिरडे)
रात्री मूग आणि मोठ भिजायला टाकले होते. सकाळी कपड्यात बांधून ठेवले. वातावरण ढगाळ व थोडे थंड असल्यामुळे संध्याकाळ पर्यंत जास्ती अंकुरण झाले नव्हते. मोड थोडी बहुत आली होती. संध्याकाळचे ५ वाजले होते. बाहेर पाऊस सुरु होता. अश्यावेळी चटक-मटक खाण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. घरात आम्ही दोघेच होते. मी सहज सौ.ला म्हणालो भूक लागली आहे, पटकन काही चटक-मटक खायला करून देते का? सौ.ने विचारले, मुगाचे आणि मोठ्चे धिरडे चालतील का पटकन हेच बनविता येतील? मी हो म्हणालो.
कृती: मिक्सरमध्ये मोठ, मूग, हिरवीमिरची, आले लसून टाकून आणि अर्धीवाटी पाणी घालून पेस्ट तैयार करून घ्या. एका भांड्यात पेस्ट टाकून त्यात हळद, तिखट, धने आणि जिरे पूड आणि मीठ घालून फेटून घ्या. Wednesday, July 29, 2015
सर्पदंश -दोन लघुकथा
दुसरी कथा:
महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला.
पहिला मंत्री: महाराज अधिक विचार न करता ह्या विषारी नागाला ठार मारले पाहिजे, जर हा सुटला तर पुन्हा लोकांना डसेल. याला जिवंत सोडले तर शेजारच्या जंगलातून अनेक नाग या नगरात येऊन प्रजेला डसतील.
दुसरा मंत्री: महाराज, आपण नागाची बाजू हि लक्ष्यात ठेवली पाहिजे. नाग हा विषारी असतो,नागाचा दंश प्राण घेणारच. आपण सभ्य मानव आहोत. 'खून का बदला खून' हि आपली नीती नाही. आपली प्रजा असो वा नाग. दोघांना एक समान न्याय मिळाला पाहिजे. बिना विचार करता त्याचे प्राण घेणे योग्य नाही. राजाला दुसर्या मंत्रीचे विचार पटले. त्याने नगरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचा सल्ला घेण्याचे ठरविले. या समितीत अतिशय बुद्धिमान नाना कलासंपन्न आणि पुरोगामी विचारांचे प्रजाजन होते.
प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीने राजाला सल्ला दिला. राजा नाग हा विषारी असतो, तो लोकांना डसतो. हा त्याच्या स्वभाव आहे. त्याने त्याच्या स्वभावानुसारच लोकांना डसले आहे. दंश विषारी असल्यामुळे लोक मेले. त्या साठी नाग जवाबदार कसा. त्याला ठेचून मारण्याची शिक्षा देणे हा त्याच्यावर अन्याय आहे. आमची सिफारीश आहे, नागाचे प्राण घेण्याएवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले पाहिजे. दर नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखविला पाहिजे. असे केल्याने तो कुठेही पळून जाणार नाही.
राजाला प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचे विचार पटले. त्याने नागाला जीवदान दिले. एका सोन्याच्या पिंजर्यात नागाला ठेवले. दर नागपंचमीला तो दुधाचा नेवेद्य नागाला दाखवू लागला. एका नागपंचमीला नागाला दुधाचा नेवेद्य दाखवीत असताना तो नाग राजाला डसला. नाग दंशाने राजाची मृत्यू झाली.
आता प्रश्न आहे, राजाच्या मृत्यूला कारणीभूत कोण? नाग कि प्रतिष्ठित नागरिकांची समिती.
स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला याचे उत्तर कळेल, त्याची सर्पदंशाने कधीच मृत्यू होणार नाही.
Sunday, July 26, 2015
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो
दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला—"पटाईतजी, सच-सच बताओ, आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया?" त्याचा प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहायला सुरुवात का केली? नकळत समर्थांचे वचन आठवले—"मरावे परी कीर्तिरूपे उरावे."
प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्युलोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही, पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनातही ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरीही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले...
काहीतरी भव्य-दिव्य केले तर नामरूपी कीर्ती युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजींपर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यामुळे कीर्ती आजही जिवंत आहे. आता निम्नवर्गीय कुटुंबात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किल सरकारी कारकून झालेला माझ्यासारखा माणूस आयुष्यात काही भव्य-दिव्य करेल, असं कधीच वाटलं नाही.
बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी समाजसेवा करण्याची इच्छाशक्तीही नव्हती. सारांश, काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते. समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामाबरोबर रावणही अमर झाला, आणि गांधीजींसोबत गोडसेही.
तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे—"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या तिन्ही लोकी झेंडा." आता माझ्यासारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडू मध्यमवर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. हा मार्गही बंद.
आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर इत्यादींची नावे काही काळ लोकांच्या लक्षात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच निघून गेली होती.
आता संसारात राहत असताना थोडंफार समाजकार्य केलं किंवा त्याचा दिखावा केला, तर निदान जिवंत असताना तरी आपलं नाव काही लोकांच्या लक्षात राहतं. पण इथेही लोचा झाला. एक तर सरकारी नोकरी, तीही स्टेनोग्राफर, पीए आणि पीएस. "येस येस" करण्यात ३३ वर्षं निघून गेली. त्यातही १८ वर्षं पंतप्रधान कार्यालयात. सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९–११ च्या दरम्यान घरी पोहोचणे.
गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाजकार्य तर सोडाच, घरची सर्व कामं सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्यस्थितीत अशी अवस्था आहे की गली-मोहल्ल्यातही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.
आता एकच मार्ग उरला होता—लेखक बनण्याचा. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावं लागत नाही, मेहनत आणि अभ्यासही करावा लागत नाही.
फक्त मनातील कल्पना कागदावर उतरवायच्या असतात. वयाच्या पंचविशीत लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठवल्या होत्या. पण कोणीही त्या छापल्या नाहीत, किंवा परतही पाठवल्या नाहीत. फक्त पोस्टखात्याची शंभर रुपयांची कमाई झाली. अखेर थकून-भागून कवी/लेखक बनण्याचा नाद सोडून दिला. "आपलं काही नाव होऊ शकत नाही" हे सत्य स्वीकारलं.
पण म्हणतात ना—एक मार्ग बंद झाला की दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षं निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावलं. कदाचित माझ्यासारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा. या वेळेपर्यंत माझ्या मनात "आपण मराठी आहोत" याचा स्वाभिमान जागृत झाला होता.
इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट "मराठीसृष्टी" होती. या साईटमध्ये चक्क "आपल्यातला सुप्त लेखक जागवा" असं आव्हान होतं. आंधळा एक डोळा मागतो—इथं तर दोन डोळे तेही मुफ्त में! प्रथम विश्वासच बसला नाही.
भीतभीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला. आश्चर्य म्हणजे पहिला लेख दुसऱ्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय—मनातील दडलेली अमर होण्याची, प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली.
स्वतःचा ब्लॉगही स्वतःच्या नावानेच बनवला. जे जे मनात आलं, ते टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची कसलीही चिंता करावी लागत नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती दुरुस्त करतात.
चिंता करण्याची गरजच नाही. काही महिन्यांतच मराठीच्या इतर साईट्स—जसं की मिसळपाव, ऐसी अक्षरे, बाबत कळलं. डोळे बंद करून आपला लेख सर्व ठिकाणी टाकू लागलो. अशा रीतीने मीही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो.
इंटरनेटवर लेखांची चोरीही होते. माझे काही लेखही चोरी झाले. खरं सांगायचं तर, चोरी झाल्याचं कळल्यावर दुख होण्याऐवजी कुठेतरी आनंदच झाला—"बंदे में कुछ दम है" असं वाटलं! आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे.
पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवरही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिलं तरी निदान ५००–१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईट्सवर वाचतीलच. (मराठीत लिहिलेली अधिकांश छापील पुस्तकं ३०० लोकही वाचत नाहीत.)
एक मात्र खरं—निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपलं नाव लक्षात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. (असं निदान मला तरी वाटतं.) तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी आपलीही दखल घेईल, अशी आशा वाटते.
Wednesday, July 22, 2015
वार्तालाप (२५) समर्थ विचार - दुसर्यांवर विश्वास/ ऑउटसौर्स
Sunday, July 19, 2015
स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा
सिंहासनावर विराजमान महाराज विक्रमाचे डोके भडकलेले होते. आज सकाळी त्यांनी सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला. नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला. आता असे चालणार नाही. काही ही करा मला पुन्हा कधी नगरीत घाण दिसता कामा नये. पण एक लक्षात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.
Thursday, July 16, 2015
माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी
आता भाजीचे साहित्य बघू. अर्धा किलो पनीरचे चौकोर आकाराचे तुकडे कापून घ्या. ४ टमाटर मध्यम आकाराचे, प्रत्येक टमाटरचे ६ भाग करून घ्या. कांदे ही थोडे जाडसर कापा. शिमला मिरचीचे ही थोडे मोठे आकाराचे तुकडे करा. या शिवाय ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. अर्धा ईंच आले बारीक चिरून घ्या. खालील चित्रात चिरलेली भाजी दाखविली आहे.

या शिवाय विनेगर , टमाटर सोया साॅस, काळी मिरीची पावडर आणि जिरे ही वापरले.
मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ
Tuesday, July 14, 2015
मोड आलेल्या मुगाची उसळ
Friday, July 10, 2015
कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी
हिंदी अंग्रेजीचा तडका असलेले भाजीचे नाव वाचताना तुम्हाला किती छान वाटले असेल. कालचीच गोष्ट आमचे चिरंजीव म्हणाले मिळमिळीत भाजी कुणाला ही खायला आवडत नाही, तसेच भाजीचे मिळमिळीत नाव बघून कुणी रेसिपी वाचणार नाही. आता या भाजीचे मराठी नाव 'दुधीचे भजे हिरव्या रस्यात' असे काही तरी ठेवले असते, तर बहुतेक खादाड खाऊ लोकांनी भाजीची रेसिपी वाचण्याचे कष्ट घेतले नसते. असो.
भाज्यांचे लोणचे
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...






