Monday, September 24, 2012
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?
Saturday, September 15, 2012
एफ डी आई सुंदरी
स्वर्गातली अप्सरा
एफ डी आई.
घेउनी कवेत त्याला
म्हणाली ती कशी.
अमृताहुनी गोड
आणिली मी तुझ्यासाठीच.
घालुनी परिधान वालमार्टी.
तुझे मेहनती हात-पाय
आपले हातपाय मेहनती.
स्वप्ने स्वर्ग सुखांची.
आसमंतात गुंजला
विळखा होता राक्षसी.
ओरडला, चीत्कारला,
पण उपयोग नव्हता.
शोधात नव्या सावजाच्या
एफ डी आई राक्षसी
एफ डी आई अप्सरा.
Sunday, September 9, 2012
आरोग्य दलिया
दलिया नाव घेतल्या बरोबर गव्हाचा दलिया आपल्या डोळ्यांसमोर येतो. सहा-सात महिन्यांपूर्वी सहज कतुहल म्हणून पतंजलीतून आरोग्य दलिया आणला होता. या दलिया मध्ये गहू, मुगाची डाळ (साली सकट), सम प्रमाणात बाजरी आणि तांदूळ.
साहित्यआरोग्य दलिया २ वाटी, जिरे १/२ चमचे, काळी मिरी १/२ चमचे किंवा १ हिरवी मिरची,तूप (शुद्ध) किंवा तेल १ किंवा २ चमचे, मीठ आवडीनुसार, टमाटर दोन (१०० ग्राम), पाणी ८ वाटी
वैकल्पित साहित्य: कोथिंबीर आणि *भाज्या
कृती : गॅस वर कुकर ठेवावे. १ चमचा तूप घालावे, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व काळी मिरी घालावी. नंतर दलिया घालून एक ते दोन मिनिटे तुपावर परतवावा. नंतर पाणी, टमाटर व आवडीनुसार मीठ त्यात घालावे. दोन सीट्या झाल्यावर गॅस बंद करावा. दलिया जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी घालून पुन्हा एक ते दोन मिनिटे उकळी द्यावी.
टीप: आवडत असेल तर दुधी भोपळा, लाल भोपळा, खीरा, गाजर , तोरी, शिमला मिरची, बंद गोबी, सर्व प्रकारच्या शेंगा यात घालता येतात (दलिया चमच्यांनी खातात म्हणून या भाज्या बारीक चिरून घातल्या पाहिजे). (अर्धा किलो दलियाची किमत ३० रू आहे अर्थात स्वस्त आणि पोष्टिक ही)हा दलिया सर्वाना निश्चितच आवडेल ही अपेक्षा.
Wednesday, August 22, 2012
ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)
ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.
[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]
उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात हे ईशान उपनिषद वाचल्या वर कळते. भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता त्यांचात होती. ब्रह्मा द्वारा निर्मित पृथ्वी समस्त जीव व जाती ही कधी तरी नष्ट होणारच हे सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने जगले पाहिजे आणि त्या साठी मंत्रदृष्टा ऋषीने या मंत्रांद्वारे आपल्याला मार्ग दाखविला आहे.
पृथ्वीवरील आजचे वातावरण मानव आणि आज अस्तित्वात असेलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अनुकूल असे आहे. अर्थात वातावरणातील हवा (गॅस),पाणी आणि माती यांचे संतुलन. जो पर्यंत हे वातावरण अनुकूल राहील मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. पण माणूस बुद्धिमान आणि स्वत:ला भगवंताहून अधिक श्रेष्ठ समजतो. आपल्या स्वार्थासाठी वातावरणात बदल करण्याची क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी इतर प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वर्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे कस समजत नाही पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले तर मानवजाती ही नष्ट होईल. आपल्याच कर्माचे परिणाम मानवाला भोगावे लागेल. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे जेणे करून मानवजाती आपले अस्तित्व पृथ्वी वर टिकवू शकेल अर्थात आपली शंभर वर्ष जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल याचे मार्ग दर्शन ऋषीने केले आहे.
‘रोटी कपडा आणि मकान’ आपल्या तीन मूलभूत गरजा आहे. या साठी आपण काही वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि काहींचा ‘उपभोग’ करतो.
ऋषी “उत्पादन” या शब्दाचा अर्थ सांगतात, “पृथ्वीवरील वातावरणातल्या संतुलनात कुठलाही बदल न करता जी निर्मिती होते तिलाच आपण “उत्पादन’ हे म्हणू शकतो”. याच उत्पादित पदार्थांचा आपण उपभोग करतो. पण इथे प्रश्न उठतो कुठलीही वस्तूची निर्मिती वातावरण संतुलनात बदल केल्या शिवाय कसे शक्य आहे. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देतात जे काही आपण उपभोग करतो “त्याचा त्याग करा”.
उदाहरणार्थ: झाड-झुडपी ही जमिनीतून भोज्य पदार्थ व पाणी इत्यादी घेतात बदल्यात पिकलेली पाने परत जमिनीला परत करतात. वातावरणात प्राणवायू निर्माण करतात. पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात. जनावरे चारा खातात आणि विष्टा परत करतात. अशारीतीने वातावरणातले संतुलन कायम राहते. पण माणसाच्या गरजा मोठ्या आहे. उदाहरणार्थ जाळण्यासाठी, फर्निचर व घरांसाठी आपण लाकूड वापरतो पण तेवढेच झाडे लावून त्यांची पूर्ती करतो का? पृथ्वीच्या गर्भातून कोळसा व पेट्रोलियम पदार्थ काढून ‘दूषित वायू’ वातावरणात उधळतो या मुळे हवेतील प्राणवायू कमी होत चालली आहे. या मुळे वातावरणातले संतुलन बिघडत चालले आहे. ही ‘दूषित वायू’ परत पृथ्वीच्या गर्भात टाकण्यासाठी आपण काय करीत आहोत. जर आपल्याला हे करणे शक्य नाही तर या पदार्थांचा वापर कशाला?
आपल्या स्वार्था साठी आपण दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क आपण काढून घेत आहोत. कळत, असूनही पृथ्वीवरचे वातावरण दूषित करीत आहोत. अधिक काळ जर माणसाची अशीच प्रवृत्ती राहील तर मानवाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील व मानवजाती ही नष्ट होईल.
सारांश: जे काही आपण वातावरणातून घेतो ते आपल्याला परत करता आल पाहिजे. अन्यथा त्या पदार्थांचा उपभोग करण्याचा मोह टाळावा. ज्या पदार्थांना मानवाला परत करणे शक्य आहे त्यांचाच उपभोग घ्यावा अर्थात त्याग सहित भोग म्हणजे “सर्वोत्तम उपभोग”. अशा रीतीने जगल्यास आपण निश्चित शंभरी गाठू शकू.
Sunday, August 19, 2012
सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.
अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.
विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते. अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण दोघ मिळून राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू.
राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.
तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही. बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही. आपण मूर्ख बनलो, हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.
सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.
साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति.
आजचा कवी
-
आज आपल्या देशाचे सरकार वाढती जनसंख्या नियंत्रित करण्यासाठी “ हम दो , हमारे दो ” योजना राबवून कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देते...
-
एआई म्हणजे अंतरजालावर पसरलेला डाटा. त्याचे विश्लेषण करणारे वेगवेगळे अप. प्रत्येक अप वेगळ्या फोर्मुल्या अनुसार विश्लेषण करणार. मी माझ्या व्य...
-
रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे बंगले, तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी. हे महानगरातील नेहमीचं दृश्य. दहा वर्षांचा चिन्या अशाच एका झोपडपट्टीत रा...