अथर्ववेदात ऋषि म्हणतात, मा पुरा जरसो मृथा: आम्हाला अकाली मृत्यू येऊ नये; आम्ही निरोगी आणि दीर्घायुषी होऊन वृद्धत्वापर्यंत सुखाने जगावे. वेद म्हणतात, अकाली मृत्यूचे मुख्य कारण पाप दुराचार आहे. आयुर्वेद महर्षि चरक ही म्हणतात, सत्यं भूते दया दानं बलयो देवतार्चनम्।.. मराठी भावानुवाद,
सत्य-दया-दान, देवपूजा, सदाचार जीवनात असू दे,
पापाचार आणि दुराचाराने ग्रस्त व्यक्तीच्या मनात सतत भीती, चिंता आणि अस्वस्थता निर्माण होते. एक पाप लपविण्यासाठी त्याला अनेक खोटे, कपट आणि चुकीची कृत्ये करावी लागतात. या दुष्टचक्राचा परिणाम हळूहळू त्याच्या मनावर आणि शरीरावर होतो; मानसिक तणाव वाढतो, आरोग्य बिघडते आणि अनेक व्याधी त्याला घेरू लागतात.
थोडक्यात, आरोग्यपूर्ण आणि दीर्घ आयुष्याचे खरे रहस्य बाह्य उपचारांत नसून सद्गुणी आचरणात दडलेले आहे. सत्य, दया, दान, संयम आणि सात्त्विक सहवास हीच खरी ‘अमृतौषधी’ होय; तर पाप-दुराचार मन, शरीर आणि जीवन, तिन्हींनाही हळूहळू क्षीण करतो. म्हणूनच सदाचारी जीवनशैली स्वीकारणे हाच निरोगी व दीर्घायुष्याचा खरा मार्ग आहे.

No comments:
Post a Comment