वेद आणि गीतेचा संदेश अत्यंत व्यापक आणि उदात्त आहे, संपूर्ण विश्व हे आपले मित्र आणि आपले कुटुंब आहे. अथर्ववेदातील ऋषी म्हणतात, “विश्वेभिः सखिभिः सह”, अर्थात, सर्वांशी मैत्रीभावाने आणि सहकार्याने जीवन जगावे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो केवळ स्वतःसाठी जगत नाही; तर इतरांना मदत करतो, गरजेच्या वेळी इतरांकडून मदत घेतो आणि परस्पर सहकार्याच्या भावनेतून आपले जीवन अधिक समृद्ध व सार्थक बनवतो.अश्या रीतीने आपले जीवन सार्थक बनवतो. हाच भाव भगवद्गीतेतही व्यक्त झाला आहे:
देवान्भावयतानेन
ते देवा भावयन्तु वः।
परस्परं
भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ॥
अर्थात यज्ञाने
देवतांना प्रसन्न करा, आणि त्या देवता तुम्हाला सुख-समृद्धी देतील. अशा प्रकारे परस्पर सहयोग
करताना तुम्ही परम कल्याण प्राप्त कराल.
इथे यज्ञाचा
अर्थ फक्त हवन कुंडात आहुती देणे नाही, तर मनुष्याने जीवन जगण्यासाठी केलेले
प्रत्येक कर्म आहे. हा सहयोग फक्त मनुष्यांपुरता मर्यादित नाही, तर अग्नी, वायु, जल, पृथ्वी आणि आकाश या
पंचतत्त्वांशी संतुलन राखून कर्म करणे हाच
खरा धर्म आहे. मनुष्य जेव्हा प्रकृतीकडून
घेतो, तेव्हा त्याने तितकेच परत करणे आवश्यक आहे. हाच संतुलन यज्ञाचा मूल भाव आहे.
पाणी याचे उत्तम
उदाहरण आहे.आपण पिण्यासाठी आणि शेतीसाठी भूजलाचा उपयोग करतो. ट्यूबवेलद्वारे
जेव्हा आपण पृथ्वीपासून जल घेतो, तेव्हा आपले कर्तव्य आहे की तितकेच जल पुन्हा पृथ्वीला परत
करावे. यासाठी गावांमध्ये तलाव, विहीर किंवा आधुनिक भाषेत
‘रेन हार्वेस्टिंग सिस्टम’ उभारणे आवश्यक आहे. हाच नियम शहरांनाही लागू होतो। प्रत्येक घर आणि सोसायटीत वर्षा जल संचयनाची
व्यवस्था असली पाहिजे. तेव्हाच प्रकृतीचे संतुलन टिकेल आणि आपल्याला पिण्यास व
शेतीसाठी पुरेसे जल मिळेल.
जसे जलासोबत
संतुलन आवश्यक आहे, तसेच वायु, अग्नी आणि भूमीसोबतही संतुलन राखणे
मनुष्याचे कर्तव्य आहे. वृक्षारोपणाने वायु शुद्ध ठेवणे, ऊर्जा
विवेकाने वापरणे, भूमीची सुपीकता जपणे ,समस्त प्राणिमात्रांचे संरक्षण करने हे सर्व कर्म यज्ञाचेच विविध रूप आहेत. मनुष्य
जितके प्रकृतीकडून घेतो, तितकेच परत करणे आवश्यक आहे. हाच
परस्पर सहयोगाचा व्यावहारिक स्वरूप आहे.
वेद आणि भगवद्गीता
शिकवतात की मनुष्य एकटा जगू शकत नाही, ना समाजात, ना
प्रकृतीसोबत. यज्ञ म्हणजे कर्म करताना आपण जे काही प्रकृती आणि समाजाकडून घेतो,
तेवढेच निष्ठेने परत करणे. अशा संतुलित कर्म-यज्ञाने देवता प्रसन्न
होतात, प्रकृती सुरक्षित राहते, आणि
मनुष्य दीर्घकाळ स्वस्थ जीवन जगून शेवटी मोक्ष प्राप्त करतो. म्हणूनच वेदांनी मानवाला जड-चेतन आणि प्रकृतीसह संपूर्ण
विश्वाला सखा मानण्याचा उपदेश केला आहे .

No comments:
Post a Comment