विक्रमादित्याला सत्तेचा उपयोग करून प्रजेचे दुःख, दारिद्र्य आणि अन्याय दूर करायचा होता. त्याला वाटत होते शासन हे जनतेसाठी असावं, त्याने विचार केला राज्यलक्ष्मीची आराधना करून, तिला प्रसन्न करून, प्राप्त सत्तेचा उपयोग तो प्रजेच्या भल्यासाठी करणार होता. प्रजा क्षणासाठी गरुडासारखी तीव्र नजर ठेवून प्रेजेला त्रास देणार्या भ्रष्ट मंत्री आणि i अधिकार्यांना दंडित करून तो गरिबांच्या आणि शेतकर्यांच्या हितांची रक्षा करणार होता. त्याने राज्यलक्ष्मीची आराधना केली. अखेर राज्यलक्ष्मी प्रसन्न झाली.
एका शुभ मूहर्तावर विक्रमादित्य सिंहासनावर विराजमान होण्यासाठी सिंहासनाच्या पायर्या चढू लागला. पहिल्या पायरी वर डोळ्यांवर पट्टी बांधलेली पुतळी होती, ती राजाला म्हणते , “राजाने वाईट पाहू नये.” सर्वत्र भ्रष्टाचार, अन्याय, शोषण करणारे अधिकारी आणि मंत्री दिसत असेल तरी दुर्लक्षित करावे. त्याशिवाय तुला पुढची पायरी चढता येणार नाही. राजा ही अट मान्य करतो.
दुसर्या पायरी वर कान झाकलेली पुतळी राजाला म्हणते, राजाने वाईट ऐकू नये, जनतेच्या वेदना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरिबीचे आक्रोशच्या कथा ऐकू नये. विक्रम कान झाकतो. राजा ही अट ही मान्य करतो.
तिसर्या पायरीवर ओठांवर बोट ठेवलेली पुतळी म्हणते, “राजाने वाईट बोलू नये.” मंत्री, अधिकारी कितीही भ्रष्ट असले तरी त्यांच्यावर टीका न करता मौन राखावे. विक्रम मौन ही स्वीकारतो.
शेवटी चौथी पुतळी प्रकट होते. ती म्हणते, “हे सर्व झाकले तरी आत्मा अस्वस्थ होतो. आत्मा अस्वस्थ झाली की राजा सत्ता गमावतो. तुझी आत्मा मला अर्पण कर.” विक्रम पुतळीला आत्मा अर्पण करतो आणि सिंहासनावर बसतो.
सिंहासनावर बसताच विक्रमादित्याच्या मनःचक्षूंसमोर एक दिव्य दृश्य उभं राहतं—संपन्न हिरवळीत न्हालेली शेती, कष्टकरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाची झळाळी, रस्त्यांवर खेळणारी आनंदी बालके, बाजारात उत्साहाने खरेदी करणारी प्रजा, आणि सर्वत्र एक शांत, समृद्ध, आणि सुसंस्कृत समाज. राज्यात कुठेही दुःख, दारिद्र्य, किंवा अन्यायाचा लवलेशही नाही. प्रत्येक घरात हास्य, प्रत्येक मनात आशा, आणि प्रत्येक पावलात आनंद भरलेला आहे. विक्रमादित्याला वाटते—हीच ती राज्यलक्ष्मीची कृपा, जिच्या आशीर्वादाने त्याचं राज्य स्वर्गासमान झालं आहे.
आज ही जनतेचे दुख दूर करणारे आणि इमानदारीच्या बाता करणारे सत्ता मिळताच बदलून जातात. सत्ता मिळताच त्यांना जनतेचे दुख दिसत नाही. त्यावरून सुचलेली ही कथा.
No comments:
Post a Comment