प्रधानमंत्री कार्यालयातील मीडियाच्या एका अधिकार्याच्या घरी लग्न झाले होते. लग्नानंतर तीन-चार दिवसांनंतरची गोष्ट, लंच करून मी सहज त्या अधिकार्याच्या पीए रूममध्ये गेलो. एका टेबलावर ५०–६० शगुनाचे लिफाफे ठेवलेले होते. पीए संगणकावर त्याची नोंद चढवत होता. मी सहज विचारले, “लिफाफ्यातील पैसे मोजणे हे तर घरच्यांचे काम असते ना?” तो म्हणाला, “हे फक्त मीडिया वाल्यांचे आहे. साहेबांसाठी मी लिस्ट तयार करतो आहे.” मी पुन्हा विचारले, “एवढ्या सार्यांना खरंच बोलावले होते का?” तो हसत म्हणाला, “यातल्या दहा टक्क्यांना तर निमंत्रणही नव्हते. तरीही सर्वांनी शगुन पाठविला. कदाचित साहेबांच्या लक्षात राहिले तर किमान बांग्लादेशचा दौरा मिळू शकतो.”
बाकी या घडीला दावणीला बांधलेल्या पत्रकारांची परिस्थिती वाईटच आहे. सरकारी
सुखसुविधांपासून ते वंचित झाले आहेत. मोदी सत्तेतून बाहेर कधी पडतील याचीच ते वाट
पाहत आहेत. सद्यपरिस्थिती पाहता त्यांना २०३४ पर्यंत वाट पाहावी लागेल.

No comments:
Post a Comment