Wednesday, November 12, 2025

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो. वैदिक काळात शूद्रांना शिक्षण मिळत होते की नाही.
 
शूद्रोऽपि विद्वान् भवति यद्यपि शूद्रजातः  
विद्या हि सर्वं विश्वस्य संनादति
(अथर्ववेद १९.६२.१)

शूद्रजन्म झालेलाही विद्वान होऊ शकतो, कारण विद्या सर्व विश्वात संनाद करते (सर्वांना उपलब्ध आहे).

वैदिक काळात शूद्र आणि अनार्य यांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार होता, ज्याचे ठोस पुरावे वेदांमध्येच आढळतात- ऋग्वेद .११२. मध्ये "ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्याय स्वाय चारणाय " असा उल्लेख करून वेदवाणी शूद्र आणि अनार्य (स्वायचारण) यांच्यासाठीही आहे असे स्पष्ट केले; ऋग्वेद १०.५३. मध्ये "यद् विश्वा अश्विना... शूद्राय वा ददथुरार्याय वा" म्हणून शूद्र आणि आर्य यांना ज्ञानयान (शिक्षण) समान दिल्याचे सांगितले; अथर्ववेद १९.६२. मध्ये "शूद्रोऽपि विद्वान् भवति... विद्या हि सर्वं विश्वं संनादति" असे म्हणून शूद्रजन्म असलातरी विद्वान होऊ शकतो आणि विद्या सर्व विश्वात संनाद करते हे तत्त्व प्रतिपादित केले; तर यजुर्वेद (वाजसनेयी संहिता) २६. मध्ये "शूद्राय परं ब्रह्म दत्तं भवति" असे सांगून शूद्रालाही परब्रह्मज्ञान प्राप्त होते असे नमूद केले.  स्पष्ट आहे, वेदकाळात वर्ण जन्माने नव्हे, विद्येने आणि कर्माने ठरत होते, आणि शूद्र-अनार्य यांना वेदपाठ, यज्ञ, युद्धकला, वैद्यकी नेतृत्व यांत समान सहभाग होता.

 शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम्  
क्षत्रियात् जातमेवं तु विद्वत्त्वात् सागरादयः
(महाभारत अनुशासनपर्व १४३.४९-५०):
 
शूद्र ब्राह्मण होऊ शकतो, ब्राह्मण शूद्र होऊ शकतो. क्षत्रिय जन्म असलेलाही विद्वत्ता मिळवून (ब्राह्मण) होऊ शकतो. महाभारताचे रचियता महर्षि व्यास  (जन्मानुसार  हीन संकर वर्ण)  पासून क्षत्रीय धृतराष्ट्र आणि पांडूचा जन्म झाला. 
शुकदेव ऋषी हे व्यासांचे पुत्र होते. त्यांनी वैदिक शिक्षण व आत्मसाक्षात्कार प्राप्त करून  ब्राह्मणत्व प्राप्त केले. 

जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते 
वेदपठात् भवेत् विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः 
(मनुस्मृती १०. ) 
 
जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात. व्यक्ति संस्काराने द्विज होतो.  उपनयन इतर धार्मिक संस्कारांमुळे तो द्विज (द्वितीय जन्म प्राप्त केलेला) होतो वेदाध्ययन केल्याने तो विद्वान (विप्र) होतोब्रह्मज्ञानाने ब्राह्मण होतो. स्वामी दयानन्द अनुसार आपल्या अधिकान्श ग्रंथांमध्ये भेसळ झाल्याने  काही विपरीत श्लौक मनुस्मृतीत मिळतात. भेसळ तपासण्यासाठी पूर्वीच्या ग्रंथांची मदत घेऊन भेसळ सहज ओळखल्या जाते. 
उदाहरणार्थ वाल्मीकि (शूद्र- रामायणकार ब्राह्मण) आणि विश्वामित्र ही नावे आपल्याला माहीत आहे. अधिक उदाहरणे: गदिवान ऋषी: मत्स्य पुराण (. १४५) मध्ये गदिवान (शूद्र जन्म) यांना वेदपाठाचा अधिकार दिला, ते ऋग्वेदाचे विद्वान झाले आणि यज्ञ करून ब्राह्मणत्व प्राप्त केले. जाबाली ऋषी: रामायण (अयोध्या कांड १००-१०८) मध्ये जाबाली (शूद्र/म्लेच्छ जन्म) रामाला नास्तिक दर्शन शिकवतात.  महाभारत (शांति पर्व १८०) मध्ये जाबाली सत्यकाम (शूद्र मातेचा पुत्र) गौतम ऋषींचे शिष्य होऊन उपनयन घेऊन ब्राह्मण झालेवेदव्यास: मत्स्य पुराण (. १४५) महाभारत (आदि पर्व ६३) मध्ये व्यास (कोली/मत्स्यगंधा पुत्री सत्यवती + पराशर) शूद्र/मिश्र जन्म असूनही वेद विभागकर्ते झाले, कृष्णद्वैपायन म्हणून ब्राह्मण ऋषी. त्याकाळी कर्माने वर्ण बदलत होते. 

शूद्र हे क्षत्रीय होऊन चक्रवर्ती सम्राट ही झाले उदाहरण- चंद्रगुप्त मौर्य (इ.पू. ३२१-२९७), जो मुरा दासी पुत्र असूनही तक्षशिला विद्यापीठात चाणक्य (कौटिल्य) यांच्याकडून अर्थशास्त्र, राजनीती आणि युद्धकला शिकून मौर्य साम्राज्य स्थापन केले. अर्थात तक्षशीला सारख्या विश्वविद्यालयात शूद्रना शिक्षणाचा अधिकार होता. अजातशत्रू (इ.पू. ४९२-४६०), बिंबिसाराचा दासी पुत्र (बौद्ध ग्रंथ 'महावग्ग' व जैन 'भगवती सूत्र' नुसार शाक्य कुळाने त्याला नीच समजून दासीशी लग्न लावले आणि मगधात हेर्यंका वंशाचा राजा होऊन त्याने कोसल, वैशालीवर विजय मिळवला. महापद्म नंद (इ.पू. ३८२-३२९), शूद्र दासी पुत्र (पुराणांनुसार महानंदीचा पुत्र) याने काशी, कोसल, कलिंग जिंकून नंद साम्राज्य वाढवले आणि चाणक्यसारख्या विद्वानांना आश्रय दिला. पुष्यमित्र शुंग (इ.पू. १८५-१४९), निम्न ब्राह्मण किंवा शूद्र वंशीय (मुद्राराक्षस नाटकात हीन वंशीय सांगितले), अशोकानंतर शुंग वंशाचा संस्थापक होऊन यज्ञ व शिक्षणाला प्रोत्साहन दिले; दिव्या (इ.पू. ५वे शतक), जलिया कैबर्त (निम्न मच्छीमार जाती)चा राजा, अवंती साम्राज्य विस्तारला आणि बौद्ध ग्रंथांमध्ये त्याच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. अशी उदाहरणे दाखवतात की प्राचीन भारतात जन्म नव्हे, विद्या-कर्माने राज्य मिळत असे.

वैदिककाळापासून ते मुगल येण्यापूर्वी (.. १५२६) भारतात शिक्षणाची समृद्ध परंपरा होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी, जगद्दल, सोमपुरी, काशी, नदिया, उज्जैन, मिथिला, तंजावूर, कांचीपुरम, पुष्पगिरी, श्रृंगेरी यांसारख्या ३२ प्रमुख विद्यापीठे  आणि लाखो लहान गुरुकुले होती. वेद, बौद्ध-जैन दर्शन, गणित, खगोल, वैद्यक, कला इत्यादींचे शिक्षण सर्व वर्ण-लिंगांसाठी खुले होते१८व्या शतकात ही ६ लाख+ गुरुकुले अस्तित्वात होती. साहजिकच शूद्र-दलित बहुसंख्य (७५-८०%) होते. गुरुकुलांत ७२ शिल्पकला (लोहारकी, विणकरकी, सुतारकी, कुंभारकी, रंगकाम, चित्रकला, वास्तुशास्त्र, धातुकाम, हस्तिदंतकाम, रत्नकाम, वाद्यनिर्मिती, कृषी यंत्रे, जहाजबांधणी .) शिकवल्या जात होत्या, ज्यामुळे गावागावांत स्वावलंबी अर्थव्यवस्था होती.  

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या " ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे ,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण ,५०,०००+ गावांप्रमाणेतर पंजाबमध्ये  लिटनरनुसार ,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे  बहुमत (७०%+) होतेप्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल.  मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.  

1857 नंतर ब्रिटिश सरकारने भारतावर अधिकार केला. दंडुकशाही वापरुन गुरुकुल बंद केले. नवीन मेकाले शिक्षणाला सुरुवात झाल्याने, राजा महाराजा, जमीनदार यांनी ही गावोगावी पसरलेल्या गुरुकुलांना मदत करणे बंद केले.  दुसरी कडे ब्रिटिश सरकारने गावो गावी शाळा उघडल्या नाही कारण  त्यांना फक्त बाबू पाहिजे होते. 

१९०१ मध्ये मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेच्या (इंग्रजी-प्रधान, पाश्चिमात्य अभ्यासक्रमावर आधारित सरकारी सहाय्यित शाळा) अंतर्गत भारतात सुमारे ९३,६०४ प्राथमिक शाळा आणि ,५००-,००० माध्यमिक शाळा अस्तित्वात होत्या, ज्यात एकूण शाळांची संख्या ९७,०००+ होती (ब्रिटिश भारतासाठी, १९०१-०२ च्या आकडेवारीनुसार), जरी पारंपरिक गुरुकुले नष्ट झाल्याने एकूण शाळा पूर्वीच्या लाखांपासून खूप खाली आल्या होत्या.  १९०१ च्या ब्रिटिश इंडियन एम्पायरच्या जनगणनेनुसार (ब्रिटिश प्रांत + देशी राज्ये मिळून) भारताची जनसंख्या *२९४,३६१,०५६ ज्यात पुरुष १४९.९५ दशलक्ष आणि स्त्रिया १४४.४० दशलक्ष होतेशिक्षणाचे प्रमाण (साक्षरता दर) एकूण .% (५३ प्रति ,०००) होते, ज्यात पुरुष .% आणि स्त्रिया .% होत्या.  पूर्वीच्या (१८व्या शतकातील) १५-२५% शिक्षण प्रसारापासून मोठा घसरण झाली (हे ब्रिटिश आंकडे आहेत. पण देशांत 6 लक्ष गुरुकुल असल्याने प्राथमिक शिक्षण निश्चित 80 ते 90 टक्के असेल). त्यात ही बंगालचे उदाहरण: ब्राह्मण(उच्चवर्ण) साक्षरता ४६७ प्रति ,००० पुरुष, क्षत्रिय/राजपूत ३००-४०० प्रति ,०००, वैश्य/व्यापारी (जसे जैन, बनिया) ३६०-८१८ प्रति ,००० (उच्च), पण शूद्र अन्य निम्न जाती (जसे चमार, महार, गोंड, कोली) -५४ प्रति ,००० (अत्यंत कमी). पूर्वी ७०-८४% शूद्र विद्यार्थी असताना आता -% पर्यंत घसरले); अनुसूचित जाती/दलित प्रति ,००० (अनिमिस्ट/अस्पृश्यांसह). याचा अर्थ मेकाले शिक्षण व्यवस्थेने 50 वर्षांत भारतातिल बहुसंख्यक जनतेला अशिक्षित बनविण्याचे कार्य केले. ब्राह्मण समाज शहरांत मधुकरी (भिक्षा) किंवा दिवस लाऊन जेवण करून शिक्षण घेत होता, ज्यामुळे मॅकॉलेच्या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेत त्यांना प्रवेश सोपा झाला. ते जास्त साक्षर झाले आणि सरकारी नौकरीत त्यांना जास्त स्थान मिळाले आणि दुसरीकडे दलित वंचित समाज गावांतच राहिला आणि अशिक्षित झाला.

निष्कर्ष:  मॅकॉलेच्या धोरणाने उच्चवर्णांना फायदा झाला, तर शूद्र-दलितांचे शिक्षण ७०-८०% घसरले, कारण गावी-गावी गुरुकुले बंद झाली. शाळा शहरी-इंग्रजी झाल्या होत्या. ब्रिटिश शिक्षण व्यवस्थने शूद्रांना शिक्षणापासून वंचित केले, हेच खरे सत्य आहे. बाकी आजमोठ्या प्रमाणात गावोगावी शाळा आहेत आणि शिक्षणात आरक्षण, छात्रवृती इत्यादि मुळे शाळेत जाणार्‍या आणि दलितांची संख्या पुन्हा वाढली आहे.

 जनसंख्या *२९४,३६१,०५६ (एआई वर वेगवेगळे आंकडे  आहेत) 



No comments:

Post a Comment