"यावर्षी महाराष्ट्रात भीषण अतिवृष्टी झाली. आपण नेहमीप्रमाणे हवामान बदलालाच दोष दिला. पण एके दिवशी स्वप्नात नारद मुनी भेटले आणि त्यांनी या अतिवृष्टीमागचं खरं कारण सांगितलं. जे पृथ्वीवर कुणालाही माहीत नव्हतं!" काय घडले ते जाणण्यासाठी थेट इंद्रच्या दरबारात जाऊ या:
इंद्रदेव(दाढी वाढलेल्या नारदांकडे पाहत): काय बातम्या आहेत जंबुद्वीपाच्या? ही दाढी अशी का वाढवलीस नारदा? त्या दाढीवाल्यांसारखी दाढी वाढवून तुला काही जंबुद्वीपाचं राज्य मिळणार नाही!
इंद्रदेव (चकीत होऊन): हे काय ऐकतोय मी, नारदा! यावेळी तर तुमच्या सल्ल्यानुसारच वरुणदेवांना मी आदेश दिला होता, सर्व वादळचालकांनी उन्हाळ्यातच भारतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी तरीही एवढी दिरंगाई? बोलवा रे, वरुणदेवांना!
(वरुणदेव दरबारात प्रवेश करतात)
इंद्रदेव (कडक आवाजात): वरुणदेवा, पावसाळा अर्धा संपला तरी तुम्ही भरतभूमीवर वादळांचे टँकर पाठवले नाहीत. काय प्रकार आहे हा?
वरुणदेव (नम्रपणे): महाराज, क्षमा असावी. अजून वादळी टँकर भारतात पाठवू शकलो नाही.
इंद्रदेव: पण का?
इंद्रदेव (थोडा वैतागून): मग मागण्या तरी काय आहेत त्यांच्या?
वरुणदेव: महाराज, ते म्हणतात, सोमरसाचा कोटा वाढवा. तो मिळाल्याशिवाय ते काम सुरू करणार नाहीत. शिवाय, अजून एक मागणी आहे...
इंद्रदेव: थांबा वरुणदेवा, एकदाच सगळं सांगा, आणखी काय हवंय त्यांना?
वरुणदेव: ते म्हणतात, वादळवाडीत भारतातून आलेल्या बी-ग्रेड अप्सरांचं नृत्य होतं. त्यांच्या वाडीतही महिन्यातून एकदा तरी रंभा, उर्वशी यांचं खास नृत्य व्हावं, अशी मागणी आहे.
इंद्रदेव(काही क्षण विचार करून, कपाळावर हात मारत): कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी मी त्यांच्या मागण्या मान्य करतो. सोमरसाचा कोटा वाढवून तात्काळ वितरित करा आणि वादळचालकांना भरतभूमीवर पावसाचा बॅकलॉग पूर्ण करायचे आदेश द्या. मग रंभा-उर्वशीचं नृत्य ठेवू वादळवाडीत ठेऊ!
वादळचालकांच्या मागण्या पूर्ण होताच, त्यांनी सोमरसाच्या बाटल्या गटागट रिकाम्या केल्या आणि पावसाचा कोटा पूर्ण करण्यासाठी भरतभूमीवर पावसाचा मारा सुरू केला. नशेत झिंगलेल्या अवस्थेत कुठे किती पाऊस टाकतोय याचं भान त्यांना उरले नाही. त्यांना डोळ्यांसमोर दिसत होती फक्त नृत्य करणार्या रंभा आणि उर्वशी.
वादळचालकांच्या दिरंगाईमुळे महाराष्ट्रात एकच हाहाकार माजला. मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या नगरी पाण्यात बुडाल्या. शेती उध्वस्त झाली, गुरं-ढोर वाहून गेली. शेकडो लोक थेट स्वर्गात पोहोचले. पण वादळचालकांनी दोन महिन्यांचा बॅकलॉग आठवड्यातच पूर्ण केला आणि आता गेल्या वर्षाचा बॅकलॉगही पूर्ण करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत.....
No comments:
Post a Comment