Saturday, May 2, 2026

मनाचे श्लोक: भक्ति पंथ म्हणजे निंद्याचा त्याग आणि वंद्याचा स्वीकार

 
 
 
"मना सज्जना भक्ती पंथेस जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे"
जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
 
समर्थ म्हणतात, माणसाने सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरला तर श्रीहरी सहज प्राप्त होतो. म्हणजे सज्जनता ही भक्तीची पूर्व अट आहे. सज्जन व्यक्ति बनण्यासाठी निंदनीय कार्य सोडून दिले पाहिजे आणि वंद्य म्हणजे उत्तम कार्य केले पाहिजे.
 
सज्जन मन म्हणजे शुद्ध, निर्मळ, दयाळू, अहंकाररहित मनभक्ती पंथेस जावे म्हणजे अशा सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरावा.  
 
समर्थ म्हणतात निंद्य म्हणजे जे वाईट आहे, दोषपूर्ण आहे, ज्यामुळे स्वतःला आणि समाजाला हानी होते, ते सोडून द्यावे. उदाहरणार्थ: खोटे बोलणे, लोभ, द्वेष, परनिंदा, अपमान, भ्रष्टाचार.


वंद्य
म्हणजे जे पूजनीय आहे, आदरणीय आहे, व्यक्तीला आणि समाजाला हितकारक आहे, ते भावपूर्वक स्वीकारावे. उदाहरणार्थ: सत्य, दया, परोपकार, ज्ञान, भक्ती, सेवा इत्यादि. सज्जन व्यक्ती निंद्य गोष्टींचा त्याग करते आणि वंद्य गोष्टींना भावपूर्वक स्वीकारते.

राजकारणी निवडणुकीत जनतेला मोठमोठी आश्वासने देतात, पण सत्तेत आल्यानंतर ती पूर्ण करत नाहीत. ते पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करतात आणि स्वतःचा फायदा करून घेतात. जनतेच्या समस्या गांभीर्याने घेता त्यांची थट्टा करणे किंवा चुकीची माहिती देणे हेही निंद्य आचरण ठरते.
 
राजकारण्यांचे वंद्य आचरण म्हणजे निस्वार्थ भावनेने देशाच्या विकासासाठी कार्य करणे. समाजहितासाठी सतत प्रयत्न करणे, शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा; वीज, पाणी, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक यांचा विस्तार करणे  इत्यादि. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कार्य निस्वार्थ भावनेने केले आहे. गेल्या अकरा वर्षांत त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही आणि आपल्या नातेवाईकांना कधीच सत्तेच्या जवळ येऊ दिले नाही. त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त शासनामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे त्यांचे आचरण खरोखरच वंद्य ठरते.
 
समर्थ म्हणतात सज्जनता आणि भक्ती हे एकमेकांशी जोडलेले आहेत. सज्जन मनाने भक्तीचा मार्ग धरला तर श्रीहरी सहज प्राप्त होतो. समर्थांच्या मते सज्जनता ही भक्तीची पूर्व अट आहे.  "भक्ती पंथ" म्हणजे ईश्वराशी प्रेमाने जोडलेला मार्ग.  सज्जन व्यक्ती तीच, जी सत्यप्रिय, दयाळू, परोपकारी आणि धर्मशील असते; जी इतरांचा अपमान करत नाही, परनिंदा टाळते आणि समाजहितासाठी कार्य करते. अशा सज्जनतेने युक्त मन भक्तीचा मार्ग धरते तेव्हा ईश्वरप्राप्ती सहज होते, कारण भगवंताला कठीण साधना नव्हे तर निर्मळ मन आणि भक्ती हवी असते.
 

No comments:

Post a Comment