Monday, May 21, 2012

आयुष्यावर काही क्षणिका


कमरेच्या दुखण्या मुळे गेल्या चार दिवसांपासून घरीच होतो, बिस्तरावर पडल्या-पडल्या  मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.  

जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश,  दिवस आणि रात्र ...

         (१)

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले. 

        (२)

किती ही जोडा
उरणार शेवटी
 "शून्य".

        (३)

सकाळची चंचलता
दुपारची स्थिरता 
सायंकाळची उदासीनता
विराम रात्रीचा. 

        (४)
 
अस्ताचलचा सूर्य 
रोखण्यास धावतो.
हरणारे युद्ध 
रोज खेळतो.

Saturday, May 12, 2012

समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग



आपणास माहित आहे, परमेश्वराच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला "बिग बैंग" असे म्हणतात. त्या काळापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव/ पदार्थ "एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. आपल्या सृष्टीचा विकास या मुळेच होत आहे. जेन्ह्वाही इच्छा संपेल सृष्टीही संपेल. आपल्या ज्ञात ब्रम्हांडाचा अंत होईल.

परमेश्वरी इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होतात. परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसर्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते. केवल यौन आनंदा साठी होणार्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या संबंधा मुळे विकृत संतती निर्मित होते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी, स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाहया रूपाने परिभाषित केले.

समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलेन्गिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही.

आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलैंगिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो जिथे पुरुष वीर्य आणि स्त्री बीज फलित होऊ शकत नाही अश्या मानवजातीला विनाश्याच्या मार्गावर नेण्यार्या समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात.

खरे म्हणजे समलैंगिकता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक आजार आहे. समलैंगिक व्यक्ती कडे सहानभूतीने पाहून, योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. मानसिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. समलेन्गिक्तेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. तथाकथित बुद्धीजीवी (अति शहाणे) विकृतीला नेहमीच प्रोत्साहन देतात. पण विचार करा जर विधाता निर्मित अन्य जीव-जंतू (उदा: वनस्पती, कीटक, इत्यादी) समलैंगिक संबंध ठेऊ लागले तर त्या जीवांचे अस्तित्व संपेल. सृष्टीचे अन्न-चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?


Saturday, May 5, 2012

क्षणिका / कोर्टाची पायरी



म्हणतात शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. एकदा पायरी वर पाय ठेवला की ...त्या केव्हां संपतील कुणीच सांगू शकत नाही 

तो कोर्टाची पायरी चढला
आणि चढतच गेला चढतच गेला ......


अखेर !


दरबारी "चित्रगुप्ताच्या"
त्याचा "निकाल" लागला.

Saturday, April 21, 2012

कांक्रीटचे जंगल


महानगर म्हणजे कांक्रीटचे जंगल. सर्व सुखसोयी असणार वन किंवा टू रूम फ्लेट. पण मुंबई- दिल्ली सारख्या 'वेगवान' महानगरात कुणालाही कुणासाठी वेळ नसतो- अगदी घरच्या माणसांसाठीही. जीवांचे नातेही इथे व्यावसायिक रित्या जगले जातात. कधी-कधी असं वाटते या सुख-सुविधांसाठीच माणूस इथे जगत असतो. इथे घंटी वाजवल्यावर ही फार वेळाने दार उघडले जाते. ए. सी. युक्त अशा फ्लेट मधे प्रवेश करताच क्षणी इथल्या नात्यातला थंडपणा जाणवतो. जिथे वाऱ्यालाही प्रवेश नाही अश्या घरांत वसंत कसा बहरेल???

कांक्रीटचे जंगल आहे
कागदी मुखौटे आहे.
टेबलवर सजलेला
एक उदास कैक्टस आहे.
प्रेमाचा ओलावा इथे
ए. सी.पेक्षा ही थंड़ आहे.

वसंत इथे
कधीच 'बहरत' नाही'
कारण फ्लैटचा दरवाजा
सदैव बंद असतो.

Sunday, April 8, 2012

माहेरी गेली बायको


माहेरी गेली बायको
सुखाचे दिन आले.
मित्रांसोबत पत्त्यांचे
डाव रात्रभर रंगले.

खाण्याच्या आणि पिण्याच्या
मैह्फल सजल्या.
बदनाम मुन्नी -शीलाच्या
चर्चा ही भारी पेटल्या.

एक दिवस सकाळी
बायको पुढ्यात होती.
डोळ्यात होता अंगार
हातात होते लाटणे.

तेंव्हाच मला कळले
चार दिवस सुखाचे
आता अपुले संपले.

Thursday, April 5, 2012

कवितेची समीक्षा


कवी कल्पकतेची 
गगन  भरारी.
त्यांचा नाकावरची 
माशी हलली नाही. 

त्यांचा गालावर झळकली  
रेषा एक स्मिताची.
माशी उडाली आकाशी
कविता  फालतू होती. 


समीक्षकाच्या नाकावरची माशी हलली नाही म्हणजे कविता चांगली.  समीक्षकाच्या नाकावरची माशी उडाली म्हणजे कविता फालतू .

Sunday, April 1, 2012

यात्रा / यात्रेचे फळ -प्रत्येकाच नशीब



करून दांडी यात्रा 
मोहनदास 'महात्मा' झाला.


करून जेल यात्रा 

नेताही 'मंत्री' झाला. 

 

सकाळ - संध्याकाळ
करून 'मेट्रो ' यात्रा 

विवेक पटाईत 
बाबूच राहिला.

Friday, March 23, 2012

डुक्कर आणि दारुडा (बोध कथा - नवीन वर्षाचा संकल्प)


नवीन वर्षाचा पहिला दिवस, माया- बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते म्युन्सिपाल्टीने शहरातला कचरा उचलून, रस्त्यांचीही  साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिचारा सकाळपासून कुजक-माजक, नासलेले व सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी, श्रीखंड खायला मिळेल. डुक्कर म्हणाला, दारुड्या भाऊ, असेल अन्न मी नाही खात! दारुडा म्हणाला, मग तुला काय पाहिजे? डुक्कर म्हणाला -
कुजक-माजक खाईन, झिंगात येईन.
गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, त्यासाठी वणवण फिरायची काय गरज. ये माझ्या जवळ बस, एक घोट घे, दोघही झिंगात येऊ, गळ्यात- गळे घालून , गटरात लोळू, एक-मेकांना चाटू व स्वर्गसुख भोगू.

पुढे काय जाहले ते सांगायची गरज नाही. दोघ ही दारू पिऊन गटरात पडलेले होते. त्यांच्या अंगावर माश्या भिणभिणत होत्या. दारुड्याच्या घरी त्याची बायको आणि पोर फाटक्या कपड्यात, भुकेले खंगलेले, घरात अश्रू गाळीत पडलेले होते, हे सांगायला नकोच. खर म्हणाल तर दारुडा दुर्गंधयुक्त गटरात नरक यातनाच भोगत होता. त्याचे घर-संसार उध्वस्त झालेले होते.
मायानो-बहिणीनो, बाप्यानो, तरुणानो असलेच स्वर्गसुख भोगायचे असेल तर अवश्य दारू प्या. पृथ्वीवर खरच स्वर्गसुख भोगायचे असेल तर बाबा रामदेव म्हणतात तसे, नवा वर्षाचा संकल्प घ्यावा:
सकाळी उठावे,
व्यायाम करावे,
मनाला व शरीराला कसवावे.

अभक्ष्य ते सर्व टाळावे,
फळांचे रस प्यावे,
शाकाहारी राहावे.

तन प्रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद तिथे लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.

Thursday, March 15, 2012

पसार झाला कान्हा



सत्या रुक्मी , भामा
भांडत होत्या राण्या.

पाहुनी घरचे रणमैदान
संभ्रमित झाला योगीराज.

घेउनी सोबत 'गीता'
पसार झाला कान्हा.

Monday, March 5, 2012

प्रेमाची कविता



डोळ्यांत सजते
ह्रुदयात फुलते
मौनात बोलते
प्रेमाची कविता. 

डोळ्यांची भाषा 
स्पर्श भावनांचा 
जगते शब्दांविना 
प्रेमाची कविता. 

Thursday, March 1, 2012

निष्ठावंत ???


कौन म्हणतो मला दलबदलू
मी आहे एक वफादार पाया
माझी निष्ठा आहे अत्तूट
फक्त खुर्चीशी