नवीन वर्षाचा पहिला दिवस, माया- बहिणींनी घर-आंगण धुऊन-पुसून साफ-सफाई केली होती. कधी नव्हे ते म्युन्सिपाल्टीने शहरातला कचरा उचलून, रस्त्यांचीही साफ-सफाई केली होती. एक डुक्कर बिचारा सकाळपासून कुजक-माजक, नासलेले व सडलेल्या अन्नाचा शोधात वणवण फिरत होता. तो भुकेन व्याकूळ झाला होता. रस्त्यात त्याला एक दारुडा भेटला. डुक्कर म्हणाला, दारुडा भाऊ, इथे कुठे कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न मिळेल का? दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, तुला माहित नाही आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, आज तुला कुजक-माजक, नासलेल- सडलेल अन्न कुठून मिळणार. आज तर ताजे-ताजे अन्न भेटेल. पुरण-पोळी, श्रीखंड खायला मिळेल. डुक्कर म्हणाला, दारुड्या भाऊ, असेल अन्न मी नाही खात! दारुडा म्हणाला, मग तुला काय पाहिजे? डुक्कर म्हणाला -
कुजक-माजक खाईन, झिंगात येईन.
गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
दारुडा म्हणाला, अरे डुक्करा, त्यासाठी वणवण फिरायची काय गरज. ये माझ्या जवळ बस, एक घोट घे, दोघही झिंगात येऊ, गळ्यात- गळे घालून , गटरात लोळू, एक-मेकांना चाटू व स्वर्गसुख भोगू.
पुढे काय जाहले ते सांगायची गरज नाही. दोघ ही दारू पिऊन गटरात पडलेले होते. त्यांच्या अंगावर माश्या भिणभिणत होत्या. दारुड्याच्या घरी त्याची बायको आणि पोर फाटक्या कपड्यात, भुकेले खंगलेले, घरात अश्रू गाळीत पडलेले होते, हे सांगायला नकोच. खर म्हणाल तर दारुडा दुर्गंधयुक्त गटरात नरक यातनाच भोगत होता. त्याचे घर-संसार उध्वस्त झालेले होते.
मायानो-बहिणीनो, बाप्यानो, तरुणानो असलेच स्वर्गसुख भोगायचे असेल तर अवश्य दारू प्या. पृथ्वीवर खरच स्वर्गसुख भोगायचे असेल तर बाबा रामदेव म्हणतात तसे, नवा वर्षाचा संकल्प घ्यावा:
सकाळी उठावे,
व्यायाम करावे,
मनाला व शरीराला कसवावे.
अभक्ष्य ते सर्व टाळावे,
फळांचे रस प्यावे,
शाकाहारी राहावे.
तन प्रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद तिथे लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.
कुजक-माजक खाईन, झिंगात येईन.
गटरात लोळीन, स्वर्गसुख भोगीन.
सकाळी उठावे,
व्यायाम करावे,
व्यायाम करावे,
मनाला व शरीराला कसवावे.
अभक्ष्य ते सर्व टाळावे,
फळांचे रस प्यावे,
शाकाहारी राहावे.
तन प्रसन्न, मन प्रसन्न तर घरात आनंदी-आनंद. जिथे आनंद तिथे लक्ष्मी सरस्वती आगमन होणारच. मग घरातच स्वर्ग निर्माण होईल.
No comments:
Post a Comment