Saturday, April 11, 2026

उद्योग–व्यवसायासाठी व्यवस्थापनाचे नैतिक मार्गदर्शन

 समर्थ रामदास स्वामींचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे १७व्या शतकातील अमूल्य साहित्य आहेत, जे केवळ आध्यात्मिक नाहीत तर जीवनव्यवहार आणि नेतृत्वाचे उत्कृष्ट सूत्र आहेत. उद्योगातील व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन या ग्रंथांत आहे. या दोन्ही ग्रंथांत समर्थांनी उद्योगात सफलतेसाठी शिस्त, प्रेरणा आणि नैतिकतेवर भर दिला आहे. त्यांनी सांगितलेले व्यवस्थापनाचे त्रिकोणप्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठाखालील उदाहरणांसह मी आपल्या अल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

. प्रयत्न आणि शिस्त: अपयश टाळण्याचे सूत्र

"अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना

आपला अवगुण जाणवेना काहीं केल्यां "

(दशक १२, समास , ओवी ):

अपयशाचे कारण अविवेकी प्रयत्न; स्वदोष ओळखा. 

"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा " मनाचे श्लोक (श्लोक ):

रामदास म्हणतात जर दुकानदार जास्त नफ्यासाठी खोटे बोलून निकृष्ट दर्जाची वस्तू महागात विकेल, तर कधी ना कधी ग्राहकाला सत्य कळेल आणि तो पुन्हा त्या दुकानात येणार नाही. कारण काठ की हांडी फक्त एकदाच चढते.  दुकानदार GST आणि इतर कर वाचवण्यासाठी खोटे बिल देत असेल तर तो  कधीतरी  कायद्याच्या चक्रात अडकेल.  मानहानी होईल आणि त्याला जेलमध्ये ही जावे लागेल. परिणाम  संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल. उद्योग धंदा करायचा असेल तर तो सत्याच्या आधारावरच केला पाहिजे.

. नम्रता आणि संवाद:  मनाच्या श्लौकांत समर्थ  म्हणतात,

"मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे

मना बोलणे नीच सोशीत जावें

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे "

दुकानदार असो की उद्योगपती, कर्मचाऱ्यांच्या चुका झाल्यावर त्यांच्यावर आरडाओरडा करण्याऐवजी नम्रतेने त्या चुका कशा सुधाराव्यात यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्यांनी चूक केली त्यांना तात्काळ काढून टाकण्या ऐवजी धैर्याने विचार करून त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे. नम्रतेने केलेले मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना प्रेरणा देते आणि व्यवसाय टिकवते.  उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याने बिलिंगमध्ये चूक केली, तर त्याला रागावण्याऐवजी शांतपणे ती चूक दाखवून दुरुस्त करायला शिकवावे. पुढे अशा चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. यामुळे कर्मचारी सुधारतो आणि ग्राहकांचा विश्वासही टिकतो.

. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा: दीर्घकालीन यश

 "ज्या ज्याचा जो व्यापार तेथें असावे खबर्दार " (दासबोध दशक ११// १९):

समर्थ म्हणतात, व्यापारात नेहमी खबरदारी ठेवली पाहिजे. उदाहरण:  जर परचेस विभागातील अधिकारी लाच घेऊन उत्तम दर्जाच्या ऐवजी निकृष्ट दर्जाचे टोमॅटो आणतील, तर त्यापासून बनलेली सॉसही निकृष्ट दर्जाची बनेल. ग्राहकांना दर्जाहीन माल मिळाला तर ते तुमची सॉस विकत घेणे बंद करतील. म्हणून मालकाने डोळे उघडे ठेवून प्रत्येक कामावर लक्ष ठेवले पाहिजे. उत्पादनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी मालकाने कारखान्यातील प्रत्येक भागावर; खरेदी, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री; इत्यादींवर  बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. यासाठी त्याला स्वतःही कामात सहभागी व्हावे लागते. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात कामेविण राहू नये. मालक जर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणारा असेल तर कर्मचारीही इमानदारीने काम करतील. ग्राहकांना दर्जेदार माल मिळाला तर त्यांचा विश्वास बसतो. परिणामी कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढते आणि व्यवसायही अधिक यशस्वी होतो

 . शिकण्याची वृत्ती: मूर्खपणा दूर करणे

 "ऐसीं हें मूर्खलक्षणें श्रवणें चातुर्य बाणे

चित्त देउनियां शहाणे ऐकती सदा " (दशक / / ७२):

समर्थ म्हणतात, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पूर्वी त्या क्षेत्रात लोकांनी केलेल्या चुका नीट समजून घेतल्या पाहिजेत. त्या चुका पुन्हा करू नयेत, कारणदुसऱ्यांना काय समजते, मीच शहाणाहे मूर्खपणाचे लक्षण आहे. शहाणपण म्हणजे इतरांच्या अनुभवातून शिकणे, उत्तम सल्लागारांचे विचार ऐकणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे. त्यानंतर चातुर्याने ते मार्गदर्शन आपल्या उद्योगात लागू करणे आणि व्यवस्थित पद्धतीने राबवणे. यामुळे चुका टळतात, वेळ वाचतो आणि व्यवसाय अधिक मजबूत होतो. उदाहरण: एका नवीन स्टार्टअपने सुरुवातीच्या काळात गुणवत्ता नियंत्रण प्रणाली बसवली नव्हती. त्यामुळे ग्राहकांना एकसारख्या दर्जाचे उत्पादन देऊ शकले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि व्यवसायावर परिणाम झाला. मग तज्ञांचे ऐकून त्यांनी गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष दिले. परिणामी त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला आणि ब्रँडवर विश्वास बसला.

समर्थ रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे व्यवस्थापनासाठी नैतिक मार्गदर्शन देणारे ग्रंथ आहेत. यात प्रयत्न आणि शिस्त यावर भर देऊन सत्याच्या आधारावर व्यवसाय करावा, अन्यथा अपयश निश्चित ठरते असे सांगितले आहे. नम्रता आणि संवादाने कर्मचाऱ्यांच्या चुका सुधाराव्यात, प्रशिक्षण मार्गदर्शनाने संघटना मजबूत होते. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो, ब्रँड टिकतो आणि व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी राहतो. तसेच इतरांच्या चुका ऐकून शहाणे होणे हेच खरे चातुर्य आहे; शिकण्याची वृत्ती व्यवसायाला दीर्घकालीन यश देते. अशा रीतीने हे ग्रंथ आधुनिक व्यवस्थापनात प्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा या त्रिकोणातून यशस्वी आणि नैतिक नेतृत्वाचे सूत्र देतात।

 

No comments:

Post a Comment