लग्नकरून एक हक्काची स्त्री घरात आणली. तिच्या पुढ्यात चारा टाकला. चार्याच्या बदल्यात बदल्यात तिने भरपूर दूध दिले. ती तिचे कर्तव्य चोख बजावत होती. त्यात कसले आले प्रेम, हा माझा शूद्र पुरुषी विचार होता. हास्पिटलच्या बेड वर मृत्यशी झुंज देत होतो. माझ्या थरथरत्या शरीराला तिने दोन्ही हातांनी पकडून बेडवर बसविले. त्यावेळी तिच्या डोळ्यांत डोकावून पहिले. तिथे होते निखळ निरागस प्रेम. मनात विचार आला, का ओळखू शकलो नाही तिचे प्रेम. मला माझीच लाज वाटू लागली. मी तिचा हात घट्ट पकडला आणि कांपर्या आवाजात म्हणालो, भीती वाटते मला. ती कणखर आवाजात म्हणाली, काही नाही होणार तुम्हाला. मी आहे, ना! त्या क्षणी ती मला आपल्या पतीसाठी यमराजाशी झुंज देणारी सावित्री वाटली. प्रेमाच्या माणसांसाठी सर्वस्व अर्पण करणारी , संसारात सुखाचे रंग भरणारी, खरोखर कामधेनुच ती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्...
-
कचरा आम्हाला आवडतो आमच्या घरात कचरा गल्लीत कचरा रस्त्यावर कचरा नाक्यावर कचरा अड्यावर कचरा स्टेशन वर कचरा जिथे पहा तिथे...
-
शनिवारी संध्याकाळी आमचे चिरंजीव घरात आले, त्यांच्या हातात एक आलू भुजीयाचे पॅकट होते. आल्या बरोबरच, आई भूक लागली आहे, भेळ करून द...
No comments:
Post a Comment