एक राजकुमारी होती. तिचे सौंदर्य म्हणजे तिच्या अस्तित्वाचा श्वास. तिचे दात मोती सारखे नाजुक मलिन होणारे नव्हते. तिचे दात होते हिर्यासारखे पांढरे शुभ्र, टणक, होते. जेंव्हा ती हसायची तेंव्हा असे वाटायचे जणू निसर्गाने पांढर्या शुभ्र फुलांची बरसात केली आहे.
राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची विलक्षण हौस होती. तिचा वार्डरोब म्हणजे एक जागतिक संग्रहालय होता. त्यात पॅरिसच्या रॅम्पवर चालणारे कपडे, राजस्थानच्या रंगीबेरंगी लहंग्यांपासून ते महाराष्ट्राच्या नववारी साड्यांपर्यंत विविध प्रकारचे वस्त्र होते. तिच्या प्रत्येक वस्त्रात सौंदर्याची एक नवी कथा विणलेली होती. महालात एक दर्पण होता— साधा नव्हे, बोलणारा. तो तिचा विश्वासू सखा होता. दर सकाळी ती नटून-थटून त्याच्यासमोर उभी राहायची आणि विचारायची,
राजकुमारीचा चेहरा क्रोधाने लालबुंद झाला. तिच्या सौंदर्याला तिच्याच प्रतिमेने आव्हान दिले होते. तिला ते सहन होणे शक्यच नव्हते.
दुसऱ्या दिवशी सफाईवाल्याला कचर्याच्या ढिगात काही काचेचे तुकडे सापडले...
No comments:
Post a Comment