समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या ग्रंथातील ओव्या क्रमांक १०६ ते ११५ मुख्यतः मनाच्या शुद्धीकरण, सज्जनसंग, विवेक, दया, भक्ती आणि विशेषतः वाद-संवादाच्या हितकारक भूमिकेवर केंद्रित आहेत. या ओव्यांमध्ये समर्थ मनाला सज्जन संगाची शिफारस करतात, व्यर्थ वाचाळपणा टाळण्यास सांगतात आणि असे वाद-संवाद उपयुक्त ठरतात जे अहंकार तोडून विवेक जागृत करतात. संसारात वैभवशाली जीवन जगायचे असेल तर लोकांना सोबत जोडावे लागते. उद्योग धंधा असो किंवा नौकरी लोकांसोबत, कर्मचार्यांसोबत संवाद कसा करावा या हेतूने समर्थांच्या ओव्यांच्या अर्थ सांगण्याचा प्रयत्न आपल्या अल्प बुद्धीने केला आहे.
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा। विवेके मना आवरी
स्थानभ्रष्टा।
दया सर्वभूती जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला॥१०६॥
समर्थ म्हणतात, माणसाने रोज सकाळी उठून स्नान करून संध्यावंदन करावे. हे केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनाला शिस्त लागते. प्रत्येक कार्य नियमित करण्याची सवय लागल्याने मन स्थिर होते, चंचलपणा कमी होतो आणि एकाग्रता वाढते. एकाग्रता वाढल्याने विवेक जागृत होतो, मनाला योग्य–अयोग्य कालू लागते. सर्व प्राण्यांप्रती दया–प्रेम वाढते आणि भक्तीचा भाव मनात स्थिर होतो. मन शुद्ध होते.
मना कोपआरोपणा ते नसावी। मना बुद्धि हे साधुसंगी वसावी।
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी। मना होइ रे मोक्षभागी
विभागी ॥१०७॥
समर्थ म्हणतात, काही चुकीचे घडले तरी लगेच दुसऱ्यावर दोषारोप करू नये. अशाने मन अशांत होते. विनाकारण राग धरल्याने द्वेष वाढतो, म्हणून तो टाळावा. समर्थ म्हणतात, क्रोध आवरण्याचा सोपा उपाय म्हणजे सज्जनांचा संग करणे आणि दुष्ट लोकांची संगती सोडणे. असे केल्याने मन शुद्ध राहते. राग–द्वेष नष्ट झाल्यावर मन मोक्षमार्गावर सहजपणे चालू लागते
समर्थ म्हणतात, माणसाने सदा सज्जन लोकांच्या संगतीत राहावे. सज्जनांच्या संगतीमुळे क्रिया पालटतात अर्थात आपण चुकीच्या मार्गांपासून दूर होतो. समस्त प्राण्यांप्रती दया भावना उत्पन्न झाल्याने आपण आपसूक भक्ति मार्गावर चालू लागतो. कर्मांशिवाय बोलणे उचित नाही. माणसाने आधी कर्म करून लोकांना दाखविले पाहिजे, मगच बोलले पाहिजे. तेंव्हाच तुमच्या बोलण्याचा दुसर्यांवर परिणाम होतो. वाद एवजी संवाद सुरू होतो. समर्थ पुढे म्हणतात, खरा संवाद दुसर्यांचे शोक दूर करणारा आणि हीतकारी असतो.
अहंतागुणे वाद नाना विकारी। तुटे वाद संवाद तो हीतकारी
॥११०॥
समर्थ म्हणतात की, सर्वांना पटेल असा सुखकारी संवाद साधण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. ‘मी म्हणेल तीच दिशा’ हा आग्रह सोडावा लागतो. अहंकारामुळे योग्य आणि सर्वमान्य निर्णय घेता येत नाहीत, त्यामुळे विवाद वाढतो. ज्यात संपूर्ण समाजाचे हित आहे तेच सत्य मानावे. पूर्वी सरकारकडून जनतेच्या हितासाठी खर्च केलेल्या एका रुपयापैकी फक्त १५ पैसे जनतेकडे पोहोचत होते. मन की बात माध्यमातून पंतप्रधान थेट जनतेशी संवाद साधतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतात. पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री जनधन योजना राबवून जनतेची बँक खाती उघडून दिली. त्यामुळे गरीबांना विविध योजनांमधून मिळणारे १०० टक्के अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. हे हितकारी संवादाचे उत्तम उदाहरण आहे. समाजाच्या हितासाठी निरर्थक वाद सोडून हितकारी संवाद करणे अधिक उचित आहे
समर्थ पुढे म्हणतात, व्यर्थ वाद–विवाद मनुष्याचा जन्म वाया घालवतात आणि संशय व दंभ वाढवतात. अहंकारामुळे विद्वानांचे ही पतन होते, म्हणून मनाने अहंकाराचा त्याग करून परमेश्वरात रमावे. फुकट बोलणे आणि गर्व निरर्थक आहेत; त्याऐवजी आत्मशोध करावा. खरा संवाद तोच जो वाद तोडतो, विवेकाने अहंकार बदलतो, बोलणे आणि आचरण यांचा मेळ घालतो आणि कर्म भक्तिपंथाकडे वळवतो. अशा हितकारी संवादानेच संसारात ही माणसाला वैभव प्राप्त होते आणि मन शुद्ध होऊन मोक्षमार्ग सुलभ होतो.
No comments:
Post a Comment