समर्थ रामदास सार्थ दासबोधातील एकोणिसाव्या दशकातील राजकारणनिरूपणनाम समासात राजाच्या किंवा नेत्याच्या गुणधर्मांचे वर्णन करताना म्हणतात :
तेणे अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥१॥
प्राणीमात्राची स्थिती गती । कळून येते ॥२॥
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामध्ये ॥१८॥
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥१६॥
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ॥२३॥
समर्थ म्हणतात की राजकारणात दुर्जन लोकांचेही एक वेगळे महत्त्व असते. असे लोक राजकार्यात सतत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित न करता, त्यांच्या स्वभावाचा योग्य उपयोग करून घ्यावा. मात्र योग्य वेळ आली की त्यांच्या काटा निर्धाराने काढून टाकायचा.
जनामध्ये दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट ।
याकारणे ते वाट । बुझूनि टाकावी ॥२४॥
समर्थ पुढे म्हणतात राज्याचे अहित करणार्यांचा आणि दुर्जनांचा काटा काढताना कुणाला कळू दिले नाही पाहिजे. राजावर कुणीही शंका घेतली नाही पाहिजे. समर्थ म्हणतात देशहिताचे राजकारण करताना, राजाने मोठा समुदाय तयार केला पाहिजे, पण त्यातील संबंध बळकट आणि सुसंवादी ठेवले पाहिजेत; फक्त बाह्य दिखावा न करता परस्पर विश्वास आणि एकजूट टिकवणे हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर राजा शत्रूंच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवणारा, सजग आणि परमार्थासाठी कार्य करणारा असावा—जणू परमार्थासाठी उडणारा पक्षीच. राजाने दुर्जन लोकांशी वागताना त्यांना त्यांच्या स्वभावानुसारच उत्तर द्यावे; योग्य वेळी कठोर कारवाई करावी. पण स्वतःला थेट गुंतवून न घेता दूरदृष्टी ठेवून कारभार करावा. समाजाची एकजूट, राजाची सजगता आणि दुर्जनांचा योग्य उपयोग ही राजकारणातील तीन महत्त्वाची तत्त्वे आहेत.
समर्थ रामदास स्वामींच्या राजकारणनिरूपणनाम मधील गुणधर्मांचे आजच्या काळात एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ते ज्ञानी आणि उदास असूनही, देशाच्या हितासाठी अविरत परिश्रम करतात – कधीच सुट्टी न घेता, रात्रंदिवस देशाच्या विकासासाठी समर्पित आहेत. मुख्य सूत्रे हाती घेऊन ते स्वतः निर्णय घेतात आणि कारभाराची अंमलबजावणी इतरांना सोपवतात, ज्यामुळे भारताची अर्थव्यवस्था उंचावली, रस्ते आणि रेल्वे विकास, डिजिटलायझेशन आणि स्वच्छ भारत योजनांमध्ये क्रांती घडली. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर भारताने संरक्षण उत्पादनातही मोठी झेप घेतली आहे, ज्यामुळे भारताची सुरक्षा अधिक बळकट झाली. दुर्जनांचा चतुराईने उपयोग करून ते राजनैतिक विरोधकांना सुद्धा राष्ट्रीय हितासाठी सामावून घेतात. एकांत चिंतनाने ते दीर्घकालीन धोरणे आखतात, जसे की आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल. दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानमध्ये केलेल्या ठोस कारवाईतून त्यांनी शत्रूंना योग्य धडा दिला आणि देशाची ताकद जगासमोर दाखवली. मोदीजींच्या नेतृत्वाने भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रगती करत आहे, आणि समर्थांच्या शिकवणीप्रमाणे ते कैपक्षी परमार्थी आहेत – सांसारिक हव्यास नसलेले, पण लोककल्याणासाठी स्वतंत्रपणे उडणारे. अशा नेत्यामुळे दासबोधाची शिकवण केवळ ग्रंथात न राहता, प्रत्यक्ष जीवनात उतरते आणि राष्ट्राची उन्नती सुनिश्चित होते.
सज्जनापरीस आळवावे । महत्त्व देऊनी ॥२३॥
याकारणे ते वाट । बुझूनि टाकावी ॥२४॥
No comments:
Post a Comment