नाव + कुप्रसिद्धी = पैसा या गणितीय समीकरणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. मराठी सिनेमांचे बजेट तसेच कमी असते. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी डोके वापरावे लागते. या निर्मात्यानेही डोक्याचा वापर केला आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळवून दिली.
ज्या सिनेमाचा समर्थ रामदास रचित मनाचे श्लोकशी काहीही संबंध नाही, त्या सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव दिल्यावर जनता भडकली पाहिजे, विरोधात उतरली पाहिजे—अशी निर्मात्याची अपेक्षा होती आणि तसेच घडले. एक पैसा खर्च न करता सिनेमाला प्रसिद्धी मिळाली. आता जेंव्हा तो सिनेमा नवीन नावाने पुन्हा रिलीज होईल, तेंव्हा तो चालण्याची शक्यता अधिक आहे.
- अल्पसंख्यकांच्या भावना दुखावल्या तर गेल्या नाही?कारण तसे झाले तर 'सर तन से जुदा' फतवा निघू शकतो. त्याचा त्रास कलाकारांना आणि निर्मात्याला होऊ शकतो.
- सिनेमात अश्लीलता आणि हिंसा कितपत आहे?बहुतेक निर्मात्याच्या वजनाच्या आधारावर किती कात्री लावायची, हे ठरवले जात असेल.
मनाचे श्लोक या सिनेमात वरील दोन्ही बाबी नसल्यामुळे तो सेन्सॉरने सहज पास केला.
मराठी कलाकारांची प्रतिक्रिया फेसबुकवर वाचली. अधिकांश मराठी कलाकार शिक्षित आहेत. मनात अनेक प्रश्न आले,चित्रपटाचे समर्थन करताना त्यांनी कोट्यवधी समर्थ भक्तांच्या भावनांचा विचार का केला नाही? मनाचे श्लोक बाबत दुष्प्रचार होतो आहे, असे त्यांना का वाटले नाही. फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचा दुरुपयोग करणाऱ्या निर्मात्याची निंदा त्यांनी का केली नाही.
जर मराठी सिनेसृष्टी आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करणार नसेल,आपल्या चुका सुधारण्या एवजी त्या चुकांचे समर्थन करीत राहील तर "मराठी सिनेमे मराठी दर्शकांनी पहावेत" ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरेल.
No comments:
Post a Comment