Tuesday, November 26, 2019

हातवारे आणि मंदीचा तडका






नमस्कार, मी हातवारे, मंदीचा तडका या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहितच आहे. आज आपला देश मंदी नावाच्या रोगाने ग्रस्त आहे. मोठे-मोठे कारखाने बंद पडत आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहे.  डॉक्टर अर्थशास्त्री बाई त्यावर उपाय शोधत आहे. पण म्हणतात ना "मर्ज बढता गया जूं जूं दवा की". आता तर छोटे-छोटे धन्धे ही बंद पडू लागले आहे. उदाहरण ब्युटी पार्लरचा धंधा. आपल्याला वाटत असेल मंदीचा ब्युटी पार्लरशी काय संबंध. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे "शूर्पनखा  ब्युटी पार्लरची मालकीण मंदी ताई. 



हातवारे: ताई एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुझ्या  पार्लरचे नाव 'शूर्पणखा ब्युटी पार्लर" का ठेवले?



मंदी ताई: सुंदर मुलींचे तोंड रंगवून त्याना अप्सरे समान सुंदर कुणीही बनवू शकतो. शूर्पनखेसारख्या मुलींना अप्सरा बनविण्याची कला फक्त या मंदी ताईच्या हातात आहे. 



हातवारे: वा! वा! शूर्पनखेलाहि अप्सरा बनविण्याची कला तुझ्या हातात आहे. तरीहि तुझा ब्युटी पार्लरचा धंधा मंद झाला? सरकारच्या कुठल्या जनविरोधी धोरणामुळे तुझ्यावर हि वेळ आली?



मंदी ताई: मल्या पळून गेला. 



हातवारे: यात मल्याचा काय संबंध?



मंदी ताई: मल्या जिथे जातो, तिथे त्याच्या सोबत अप्सरे सारख्या सुंदर कोवळ्या नाजूक पोरींचा घोळका असतो.  त्या पोरींना ब्युटी ट्रिटमेंट देऊन अप्सरा बनविण्याचे काम मीच करीत होते. एका सिटींगचे तब्बल दहा-दहा हजार मिळायचे. मल्या पळून गेला आणि पैशे हि उडून गेले...



हातवारे: (जोरात हात हलवत व ओरडत) प्रेक्षकानों, सरकारच्या जनविरोधी नीतीमुळे मल्या सारख्या उद्यमीनां देश सोडून पळून जावे लागले. मल्या सोबत फिरणार्या त्या कोवळ्या नाजूक पोरींचा कुणी विचार केला का? आभाळ कोसळले असेल त्यांच्यावर. पोरक्या झाल्या त्या. मल्या नाही तर मायाहि नाही. कसा गुजराण होत असेल त्यांचा. दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले असतील. पोट भरण्यासाठी काय-काय करावे लागत असेल त्या नाजूक पोरींना.  छे! छे!, त्या पोरींना भेटून  सत्य परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. कदाचित बार बाला प्रमाणे त्यांच्यावर हि .....



मंदी ताई: मेल्या, हातवाऱ्या, तुझ्या जिभेला हाड आहे कि नाही. वाट्टेल ते बरळतो आहे. काहीही झाले नाही त्या पोरींना. पुढच्या फ्लाईटने त्याही लंडनला पोहचल्या. चैनीत आहेत त्या. पण धंधा माझा मंद झाला आहे. माझा विचार कर.



हातवारे: मंदच झाला आहे ना!, तुझा धंधा. तू काही उपाशी मर नाही. विचार कर जर त्या पोरींना मल्या  इथेच सोडून गेला असता तर. त्यांची मुलाकात घेतली असती. त्यांची व्यथा जगासमोर मांडली असती. चांगला मौका मिळाला असता कार्यक्रमाची टीआरपी वाढविण्याचा, तो हि हातून गेला. चॅनलच्या टीआरपी सोबत वाढला असता माझा पगारहि..... हे! हे! ठीक नाही केले मल्या तू.  .....आता माझे काय होणार, बहुतेक मंदीचा पुढचा बळी मीच......











No comments:

Post a Comment