Thursday, November 7, 2019

कृष्णाची बायको: राधा नव्हे रुक्मणीच



घनश्याम काही वर्ष विदर्भात राहिलेला वृंदावनवासी. तो  राधारानीचा भक्त होता. राधे-राधे म्हणून सर्वांना अभिवादन करायचा. 

एक दिवस तो म्हणाला साहेब, तुमच्या विदर्भात सर्वच काळे-सावळे असतात. रुक्मणीहि सावळीच. मी उतरलो, अरे स्पष्ट काळी म्हण न. विदर्भात सूर्य हा नेहमीच आग ओकतो, सर्व काळे- सावळेच राहणार. पण रुक्मिणी काळी असो वा सावळी त्याचे तुला काय करायचे आहे. तो म्हणाला साहेब "एक प्रश्न मला नेहमी सतावतो. आमची राधा एवढी सुंदर गोरीपान होती तरीहि कृष्णाने रुक्मणीत असे काय पहिले कि तो तिच्या जाळ्यात अटकला. तिला बायकू केली
 
मी म्हणालो घनश्याम त्याचे असे आहे, लग्न म्हणजे दोन जिवांचे एकरूप होणे. कृष्ण हा घननील म्हणजे अमावास्येच्या रात्री सारखा काळाकुट्ट. राधेसोबत लग्न केले असते तर त्याचाही शिवाप्रमाणे अर्धनारीश्वर झाला असता. राधेचा गोरा रंग कृष्णाच्या काळ्या रंगात मिसळणे शक्यच नव्हते. आजहि कृष्ण रास खेळायला रात्री वृन्दावनात जातो. आता तूच विचार कर पुनवेच्या रात्री  वृन्दावनातल्या सुंदर गोर्यापान गोपी अर्धनारीश्वर सोबत रास खेळायला कुंजवनात येतील का? त्याच्या अर्धनारीश्वर स्वरूपाला पाहून सर्व गोपी घाबरून पळून जातील. कृष्ण समझदार होता. रसियाहि होता. त्याने आमच्या विदर्भातल्या काळ्या रुक्मणीसोबत लग्न केले. रुक्मणीचा काळा रंग कृष्णाचा काळ्या रंगात सामावला अर्थात दोघेही एकाकार झाले. चतुर कृष्णहि गोपींसोबत रोज रात्री रास खेळायला मोकळा झाला. 

यावर घनश्याम काही वेळ काहीच बोलला नाही, मग म्हणाला साहेब, निवृत्त झाल्यावर तुम्ही वृंदावनात आश्रम उघडाच. तुमच्या दिव्य अध्यात्मिक ज्ञानाची जगाला आवश्यकता आहे


No comments:

Post a Comment