जीवन
कितीही धरली
तरी निसटली
हातातून रेत.
आकाशी उडाले
वाळवंटी गिधाडे
एक श्वास तुटला
एक श्वास जगला.
गेल्या रविवारी पहाटे-पहाटे दहीवड्याचे स्वप्न पडले. पहाटेचे स्वप्न खरे ठरतात हि म्हण आहे. पण स्वप्न खरे करण्यासाठी प्रयत्न हा करावाच लागतो. सौ. सहज-सहजी वडे करणार नाही. आजकाल तिला अस्मादिकांच्या सेहतची चिंता जास्त असते. मलाच काहीतरी करावे लागणार होते. सौ. आंघोळीला गेली. मला मौका मिळाला. पटकन स्वैपाघरात गेलो. डब्बे उघडणे सुरु केले. पहिल्या डब्ब्यात चण्याची दाळ होती. अचानक आठवले सौ. नागपंचमीला चण्याची दाळ टाकून उकडीचे वडे करते. अर्धी वाटी चण्याची दाळ घेतली. एका डब्ब्यात उडीदाची धुतलेली दाळ सापडली. तीहि अर्धी वाटी घेतली. मुगाची डाळ शोधू लागलो. एका डब्यात छिलके वाली मुगाची डाळ दिसली तीहि अर्धी वाटी घेतली. सर्व डाळी धुऊन पाण्यात भिजायला एका भांड्यात ठेवल्या. चटणीसाठी चिंच आणि ६ ते ७ खारका शोधल्या. त्याही वेगवेगळ्या वाटीत भिजवून ठेवला. फ्रीज मध्ये दही थोडेसे होते पण गॅस वर सकाळी एका भांड्यात तापवून ठेवलेले जवळपास अर्धा किलो गायीचे दूध होते. दूध कोमट आणि दही लावण्यास उपयुक्त वाटले. पटकन विरजण टाकून दहीहि लाऊन टाकले. स्वैपाकघरातून बाहेर पडलो.
सर्वात शेवटी दह्याला पाणी न टाकता व्यवस्थित घुसळूण पातळ केले. जर दही थोडे आंबट असेल तर थोडी साखर त्यात मिसळता येते. आजकाल उन्हाळा असल्यामुळे दह्यात बर्फहि टाकली. आता वड्यांसोबत मीठ तिखट, काळी मिरी, पावडर, जीरा पावडर आणि दही ठेऊन सर्व साहित्याचा एक फोटू काढला. एवढी मेहनत केल्यानंतर साहजिकच आहे वडे खाताना मस्त लागले.