(हा
लेख अराजकीय आहे.)
कोकरोच हा
पृथ्वीवरील अतिशय प्राचीन जीवांपैकी एक आहे. डायनासोरसारखे महाकाय प्राणी काळाच्या
ओघात नष्ट झाले, तरी कोकरोच आजही टिकून आहे आणि आपल्या घरातही मुक्तपणे
वावरताना दिसतो. प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहण्याची त्याची क्षमता विलक्षण
आहे. अन्नाच्या बाबतीतही तो फारसा चोखंदळ नसतो. ज्या घरात त्याला आश्रय मिळतो,
त्या घराशी त्याची कोणतीही निष्ठा नसते; उलट
घरातील अन्न, धान्य, कपडे, कागद अशा सर्वच वस्तू तो कुर्तडतो आणि नष्ट करतो. अस्वच्छता आणि रोगराई पसरवितो. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक ठरते.
पावसाळ्यातील
दमट वातावरणामुळे कोकरोचांसह अनेक कीटकांची वाढ होते. प्रकाश आणि ज्ञानाचे पर्व दिवाळीच्या आगमनापूर्वी आपण आपल्या घराची कसून
स्वच्छता करतो. "घरात आजार आणि रोगराई पसरवणारे
झुरळे व इतर कीटकांना हीट फवारा मारून नायनाट करतो.".
पावसाळ्यात साचलेला कचरा आणि त्यासोबत लपून बसलेले हे उपद्रवी कीटक नष्ट करून आपण
आपले घर चकाचक करतो. स्वयंपाकघरातील कोपरे, कपाटांच्या मागचा
भाग, नळाजवळील जागा आणि गटारांची तोंडे यांची विशेष काळजी
घेतल्यास हे कीटक पुन्हा डोके वर काढत नाहीत.
अशा प्रकारे
घराची स्वच्छता करून घरात निरोगी आणि प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचाही
प्रयत्न करतो. त्यानंतर घराची सजावट, रंगरंगोटी आणि दिव्यांची
आरास करून आपण दीपावलीचे उत्साहात स्वागत करतो. दिवाळीचा खरा आनंद केवळ घर
उजळवण्यात नाही, तर घर स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यातही आहे.
स्वच्छ
घर, निरोगी कुटुंब आणि प्रकाशमय वातावरण- हीच खरी दिवाळी.
No comments:
Post a Comment