बॉलीवूडमध्ये सोमरसाचे चुकीचे चित्रण केले जाते. ते दारूसारखे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात ऋग्वेद काळापासून सोम ही एक औषधी वनस्पती आहे. ती व्याधी दूर करते, शरीराला बळ देते आणि आरोग्य सुधारते. ऋग्वेदात सोमलतेचे महत्त्व आणि सोमरस तयार करण्याची विधी स्पष्टपणे सांगितली आहे. सोम ही औषधि आहे, वर्णन करणार्या ऋचा:
सोमः प्रथमो विविदे ओषधीनाम् । विश्वा रूपाणि संददत् ॥
(ऋग्वेद १०.९७.७)
सोमाने सर्वप्रथम औषधी ओळखल्या. त्याने सर्व रोगांचे रूप एकत्र केले. म्हणूनच सोम हा औषधांचा राजा मानला जातो—तो रोगांचे मूळ जाणतो आणि त्यावर उपाय शोधतो. ही ऋचा औषधी सूक्तात आहे, जिथे वनस्पतींचे वैद्यकीय महत्त्व वर्णन केले आहे.
गोभिः संनादति सोमः पवमानो अजायत ॥
(ऋग्वेद ९.१.९) सोम दूधात मिसळून गर्जना करतो, पवित्र होऊन जन्म घेतो. ही ऋचा सोमाच्या शुद्धीकरण प्रक्रियेचे वर्णन करते. दूधात मिसळल्यावर सोम शक्तिशाली आणि पवित्र होतो. ऋग्वेदात यज्ञात ही इंद्रला पुरोडाश सोबत सोम अर्पित करण्याचे आहे. हे इन्द्र! तुझ्यासाठी घृताने माखलेला पुरोडाश आणि दूध-दही-मधात मिसळलेला सोमरस आम्ही अर्पण करतो. ऋग्वेद (१.८.१ व १.८.४) म्हणतो: इन्द्र इद्धर्योः सचाँ सोमं विश्वा अच्युत । पुरोडाशं च नो घृतात् ॥ आ त्वा पुरोडाशं नो घृतात् सोमं विश्वा अच्युत । इन्द्र विश्वेभिर्याहि ॥ यजुर्वेद (तैत्तिरीय संहिता २.१.११) स्पष्ट विधी सांगतो: इन्द्राय पुरोडाशं एकादशकपालं निर्वपति । सोमं च दधिमधुघृतसंयुतं जुहोति ॥ म्हणून आजही सोमयाग व इन्द्र-पूजेत प्रथम सातू + घी + दूध + साखर याची गोलाकार एकादशकपाली पुरोडाश (११ भागांची पुरी/खीर) बनवतात, नंतर सोमलता रस काढून त्यात दूध + दही + मध + घी मिसळतात. दोन्ही एकत्र हवनकुंडात ठेवून “इन्द्राय इदं पुरोडाशं च सोमं च न मम” हा मंत्र तीन वेळा म्हणतात आणि आहुती देतात. असा हा सोम-पुरोडाशयुक्त हवन केल्याने इन्द्र धावत येऊन विजय, बल आणि समृद्धी देतो – हीच ती वैदिक काळापासून चालत आलेली अनिवार्य यज्ञ-विधी आहे!
No comments:
Post a Comment