Friday, May 8, 2026

ययातिच्या मनातील द्वंद: भोग की त्याग

 



(चित्र मोठे करून चित्र कथा पाहू शकतात) 

बुद्धीमान आणि सर्व प्राण्यांमध्ये शक्तीशाली ययातिला पृथिवीचे साम्राज्य प्रदान करत ऋषि त्याला उपदेश देतात पृथ्वीवरील जड चेतन सर्वांची रक्षा करणे तुझे कर्तव्य आहे. ऋषी म्हणतात की क्षमा, दया आणि सहिष्णुता ही मानवतेची खरी भूषणं आहेत. त्यागासह भोग केल्यानेच जीवनाचे सार्थक होते.  तू हा मार्ग स्वीकारला तर प्रलय पर्यन्त पृथ्वीला भोगू शकेल. 

पण ययाति आपल्या ज्ञानाच्या आणि शक्तीच्या नशेत चूर आहे. त्याला वाटते "क्षमा आणि दया" ही दुर्बलांची भाषा आहे. पृथ्वी वीरांच्या भोगण्यासाठी आहे, दुर्बलांना इथे जगण्याचा अधिकार नाही.

तो शूद्र जीवांना आपल्या पायतळी तुटवतो. जे मोठे प्राणी होते त्यांना स्वत:च्या मनोरंजनाचे साधन बनवितो. तो  चिरतरुणी वसुंधरेचं सौंदर्य मोहात पडतो. वसुंधरेचं सौंदर्य त्याच्या राक्षसी लालसेला बळी पडतं. तो  विक्षिप्त, बलात्कारी बनतो. तो वसुंधरेच्या हिरव्यागार वस्त्रांना छिन्न-भिन्न करून टाकतो. त्याच्या पाशवी क्रूरतेमुळे पृथ्वीच्या शरीरावर जागोजागी खोल जखमा होतात. त्या जखमा उपाय न केल्याने सडू लागतात. त्यातून दुर्गंध युक्त विषारी वायू निघून वातावरणात पसरू लागतो.  आता ययातिचा श्वासही कासावीस होऊ लागतो. स्वर्गीय देव ही त्याला चेतावनी देतात "तुझं जीवन धरणीशी जोडलेलं आहे. भोगाचा मार्ग सोड आणि धरणीला वाचव." अन्यथा धरती सोबत तू ही नष्ट होईल. 

ययाति देवांकडे तुच्छतेने पाहतो, तो  ज्ञानाच्या मदतीने अंतरिक्षात दुसरी पृथ्वी शोधण्याचा विचार करू लागतो. तर कधी तो शक्तीच्या जोरावर स्वर्गातिल देवांना अपदस्थ करून, स्वर्गात अप्सरांसोबत नित्य नवीन भोग अनुभवण्याचं स्वप्न पाहतो.  पण कधी-कधी त्याला वाटतं स्वर्गातील अमृत त्याची तृप्त तहान भागवू शकेल का?

काळातच दडलेलं आहे मनुष्यपुत्राचं भाग्य. ययाति नीच भोगमार्ग सोडून त्याग आणि तपस्येचा मार्ग स्वीकारेल का? की तो हरवून जाईल अंतरिक्षाच्या असीम अंधारात? सध्या तरी ययाति किंकर्तव्यविमूढ आहे .

 

No comments:

Post a Comment