पहिली कथा: ठाम निर्णय
राज्यभर अनेक नागरिकांना डसणारा एक विषारी नाग अखेर सैनिकांच्या हाती लागतो. सैनिक बंदिस्त नागला घेऊन राजदरबारात उपस्थित होतात.
“महाराज, हा नाग अनेकांचे प्राण घेऊन गेला आहे. आज्ञा द्या, काय करायचे?”
राजा क्षणभरही न थांबता म्हणतो, “विचार कसला? ठेचून टाका त्याला.” सैनिक आज्ञेप्रमाणे नागाचा अंत करतात.
दुसरी कथा: विचारांचा संघर्ष
पुन्हा एकदा तोच नाग, तोच गुन्हा. पण यावेळी राजा थेट निर्णय घेत नाही. तो मंत्र्यांचा सल्ला मागतो.
पहिला मंत्री:
“महाराज, नाग विषारी आहे. त्याला जिवंत ठेवणे म्हणजे पुन्हा संकटाला आमंत्रण. ठार मारणेच योग्य.”
दुसरा मंत्री:
“महाराज, नागाचा स्वभावच विषारी आहे. तो डसतो, हे त्याचे नैसर्गिक वर्तन. आहे. प्रजा असो वा प्राणी. विचार न करता प्राण घेणे हे अन्यायकारक आहे.” राजा विचारात पडतो. तो नगरातील प्रतिष्ठित नागरिकांची समिती बोलावतो त्या समितीत होते बुद्धिमान, कलासंपन्न, पुरोगामी विचारांचे लोक.
समितीचा सल्ला:
“राजा, नाग दोषी नाही. तो त्याच्या स्वभावानुसार वागला. त्याला शिक्षा देणे म्हणजे त्याच्या अस्तित्वालाच नाकारणे. त्याऐवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवावे. दर नागपंचमीला दुधाचा नेवेद्य दाखवावा.”
राजा समितीचा सल्ला मान्य करतो. नागाला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले जाते. दरवर्षी नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. एके दिवशी, नेवेद्य दाखवताना नाग राजाला डसतो. राजाचा मृत्यू होतो.
राजाच्या मृत्यूला जबाबदार कोण? नाग? की प्रतिष्ठित नागरिकांची समिती? डसणार्या शत्रूला राज्यात आश्रय देण्याचा परिणाम राजा सहित समस्त प्रजेला भोगावा लागतो.
No comments:
Post a Comment