Friday, November 28, 2025

भारतीय युद्ध : गांधारची विजयी गर्जना

  

(मध्यरात्र. शकुनि आपल्या शिविरात एका कोपऱ्यात मंचकावर ठेवलेल्या चतुरंगाच्या पटाकडे नजर लावून विचारात मग्न होता. त्या शांततेत एक आवाज घुमला, आणि त्याच्या विचारांची शृंखला तुटली).

शकुनि (चमकून):"ताई? तू इथे? मध्यरात्रीच्या या वेळी? तुझ्या डोळ्यांत हे अश्रू... त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाहीत ना?"

गांधारी (शांत पण ठाम स्वरात): "शकुनि, गांधार सोडताना घेतलेला आपला प्रण अजूनही माझ्या स्मरणात ताजा आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले, तरी ते सर्पाची पिल्ले आहे. गांधारच्या शत्रूची आहेत ती. त्यांच्यासाठी मी अश्रू ढाळणार नाही.आज रणांगणात शल्याचा वध झाला. युद्धाचा शेवट जवळ आला आहे.(हुंदका देत)शेवटची भेटायला आले आहे तुला... उद्या रणभूमीवर कदाचित..."

शकुनि (तिचं वाक्य मध्येच तोडत, कटू हास्य करत):"हा! हा! हा! म्हणजे मी उद्या मरणार, एवढंच ना? हे सत्य तर युद्धाच्या पहिल्या दिवसापासून तुला आणि मलाही ठाऊक होतं. त्यात रडण्यासारखं काय आहे? भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य नष्ट झालं. तीन पिढ्या संपल्या. आणि आपल्या गांधारचं काय नुकसान? माझ्या सहित केवळ बोटावर मोजता येईल इतके सैनिक. इतिहासात कधी असं घडलं होतं का?

आता कुणा भीष्माचं सैन्य गांधारात प्रवेश करणार नाही. कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचं बलिदान द्यावं लागणार नाही. गांधारला आता भारताची भीती नाही. मूर्ख भारतीय राजा सत्तेसाठी विदेशी तालावर नाचतात, हे जगाला कळलं आहे. हस्तिनापुरात मूर्ख बुद्धिजीवींचा भरणा होता—म्हणून आपलं कार्य सिद्ध झालं. गांधारी, डोळ्यांतील अश्रू पुसून टाक. आता भविष्याकडे बघ.

सप्तसिंधु प्रदेशातील मूर्ख हिंदू आणि बौद्ध राजे स्वार्थासाठी सिंधु नरेश दाहीरची मदत करणार नाहीत. बघ, गांधारची अश्वसेना सप्तसिंधु प्रदेशाला उध्वस्त करण्यासाठी सज्ज झाली आहे..."

(दोघेही एकत्र गर्जना करतात)

"गांधारचा विजय असो!"

ही कथा जुनी असली तरी भारताच्या गुलामीचा  खरा इतिहास यात दडलेला आहे. 

 

No comments:

Post a Comment