काही दिवसांपूर्वी एका छुट्भइया आणि कॉँग्रेसच्या कट्टर समर्थक एक 70हून जास्त वयाच्या व्यक्तीसोबत कांग्रेसच्या भविष्यावर चर्चा केली. त्यासाठी मी पण कांग्रेस समर्थक आहे, असे त्याला दाखविले. तो म्हणाला आपल्या देशात अल्पसंख्यक समाज 15-25 टक्के अधिकान्श राज्यांत आहे. तो कधीच भाजपला मत देत नाही. पूर्वी कांग्रेसला मत द्यायचा पण मंडल कमिशन नंतर तो स्थानीय क्षत्रपांच्या पक्षांना मत देऊ लागला. कांग्रेस ने भाजपला पराजित करण्यासाठी या क्षत्रपांच्या ठगबंधन सोबत युती केली. ही सर्वात मोठी चूक. कारण हे ठग काँग्रेसला कधीच जास्त जागा देणार नाही. 230 जागा लढवून कांग्रेस सत्तेवर येऊ शकत नाही. 2024 निवडणूकीत कांग्रेस ने ठगबंधन सोबत युती केली होती. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामिळनाडु महाराष्ट्रात आणि दिल्ली कांग्रेस (44 जागा) आणि बंगाल मध्ये ही फक्त 13 जागांवर कांग्रेस चुनावी मैदानात उतरली. अर्थात 274 जागांपाकी फक्त 55 जागांवर कांग्रेस ने निवडणूक लढवली. असेच सुरू राहिले तर सत्ता मिळणे शक्य नाही. दुर्भाग्य हे कठोर सत्य राजकुमारला कळत नाही. तेलंगणा मध्ये कांग्रेस एकटी लढत होती. अखेर चन्द्रशेखर राव सोबत गेलेले अल्पसंख्यक मते पुन्हा कांग्रेस मिळाली आणि कांग्रेस सत्तेवर आली. देशात सत्ता प्राप्त करण्यासाठी आजच्या राजनीतिक परिस्थितीत लोकसभेत किमान 200 जागा जिंकणे गरजेचे आहे. कांग्रेस एकटी निवडणूकीत उतरेल तर अल्पसंख्यक पुन्हा कांग्रेसकडे वळतील. राजकुमार जर आपल्या देशाच्या लोकतांत्रिक प्रणालीवर विश्वास ठेवेल तर 2034 मध्ये निश्चित प्रधानमंत्री पदावर विराजमान होऊ शकतील. पण ठगबंधन मध्ये राहिले आणि युपीए जिंकली तरी गांधी परिवारातील व्यक्ति पंतप्रधान होऊ शकणार नाही. मला त्याचे म्हणणे पटले. बहुतेक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांचे असेच मत आहे. पण राजकुमार हे कळत नाही, हीच पंचाईत आहे.
आपल्या खानदानला देशावर राज्य करण्याच्या विशेषाधिकार आहे. हे राजकुमारला वाटते. राजकुमाराला आता वाटू लागले आहे निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे बिना निवडणूक सत्ता प्राप्तीचा मार्ग ते शोधत आहे.
नुकतेच बांग्लादेश मध्ये जिहाद्यांनी आर्मीच्या मदतीने सत्ता काबिज केली. नेपाळ मध्ये ही राजशाही समर्थक आणि सीआयए पोषित हामी नेपाळ ज्यांना वामपंथी सरकार नको होती रस्त्यावर उतरली. 2020 नंतर अमेरिकी पोषित संस्थांनी $900 दशलक्ष हून जास्त निधि नेपाळ मध्ये दिली. त्यातला काही भाग हामी नेपाळ संघटनेला पोहचला. कोकाकोला, अल जझिरा मलबेरी हॉटेल्स इत्यादि विदेशी संस्था ही हामी नेपाळला आर्थिक मदत करतात. रमन मेगासेसे पुरस्कार प्राप्त डॉक्टर संदूक रुईतही या संथेचे मार्गदर्शक आहेत. या शिवाय भ्रष्टाचारचे अनेक आरोपी ही संस्थेचे मार्गदर्शक आहे. अमेरिका नियंत्रित सोशल मीडिया ने ही हिंसा आणि तोडफोड करण्याचे वातावरण तैयार केले. परिणाम नेपाळला हजारो कोटींचे नुकसान झाले आणि नेपाळी लोकांना रोजगार देणारा पर्यटन उद्योग ही बुडाला. वामपंथी सत्तेतून बाहेर झाली.
जे नेपाळ मध्ये झाले ते भारतात ही होईल या आशेने लोकांचा निवडणूकीवर विश्वास उडविण्याचे काम युवराज करत आहे. खुद योगेन्द्र यादव म्हणाले चुनाव आयोग विरोधी प्रचार वोट चोरी सत्यापित करण्यासाठी नाही परंतु लोकांच्या मनात निवडणूकी बाबत भ्रम पसरविण्यासाठी आहे. त्यात राहुल गांधी सफल होत आहे. बाकी दिल्ली हैदराबाद आणि पंजाब विश्व विद्यालयांच्या निवडणूकीत युवा पिढी कोणासोबात आहे हे राजकुमारांना कळले असेलच.
लद्दाख मध्ये झालेल्या आंदोलनाचे प्रेरणा स्त्रोत सोमन वांनचुकला ही रमन मेगाससे पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या सामाजिक कार्यांना ही अनेक अमेरिकी आणि विदेशी संस्थांची मदत मिळते. याहून अधिक काही लिहत नाही. सरकार विरोधाच्या नावावर तिथेही मोठ्या प्रमाणात हिंसा पसरविण्याचा प्रयत्न झाला. देशात अनेक राज्यांत युपीए सरकार आहे. जिथे नाही, तिथे ही मोठ्या प्रमाणात पार्षद, विधायक इत्यादि आहेत. लद्दाख प्रमाणे देशात अधिकान्श भागात हिंसा पसरवली जाऊ शकते. सीआयए पोषित विदेशी संस्था या आगीत तूप टाकतील यात शंका नाही. पण याचे परिणाम काय होतील, हा विचार राजकुमारांनी केला पाहिजे. त्यांना सत्ता मिळेल का? 99 टक्के नाही. एकदा अराजकता पसरली की सत्तेत कोण येईल कुणीच सांगू शकत नाही. पण देशाचे आर्थिक नुकसान होईल हे शंभर टक्के सत्य आहे.
शेवटी राजकुमाराला सत्ता पाहिजे असेल निवडणूकी बाबत दुष्प्रचार करण्याएवजी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तैयारी ठेवली पाहिजे. या शिवाय सत्ता प्राप्तीचा दूसरा मार्ग नाही.
No comments:
Post a Comment