Friday, September 12, 2025

तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्‍या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा.

स्वातंत्र्यानंतर जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधानांनी या शोषणकारी व्यवस्थेला आव्हान दिले. काही मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले. 80% आयकर लादून धनसंपत्तीच्या एकाधिकाराला लगाम घालण्यात आला. समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार पुढे आला. जनतेला शोषणातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण हे स्वप्न अपूर्ण राहिले. सरकारला पुन्हा ब्राह्मणी उद्योगपतींची मदत घ्यावी लागली.

आता भारतातील जनतेचे शोषण करणार्‍या या ब्राह्मणी उद्योगपतींच्या विरुद्ध लढ्याला मदत देण्यासाठी अमेरिका मैदानात उतरला. भारतीय कोल्ड ड्रिंक उद्योगपती जनतेचे शोषण करत होते. त्यांना नष्ट करण्यासाठी कोका कोला, पेप्सी भारतात आली. मिशन फत्ते केले. भारतातील ब्राह्मणी कोल्ड ड्रिंक उद्योग नष्ट झाला. भारतातील गरीब कामगारांना स्वस्त जेवण देण्यासाठी अनेक अमेरिकन पित्झा कंपन्या डोमिनो इत्यादि भारतात  आल्या.  कारगिल आणि बंजे ऑइल खाद्य तेल घेऊन भारतात आले. डालडा गगन ते गिन्नी इत्यादि अनेक खाद्यतेल ब्रांड दोन्ही कंपन्यानी आपल्या खिश्यात टाकले। पोस्टमन आणि इंद्रधनुषची मक्तेदारी उद्ध्वस्त केली. भारतातील गरीब जनतेला स्वस्त तेल उपलब्ध करून ब्राह्मणी अर्थव्यवस्थेची कंबर मोडून टाकली। 

आज भारतातील जनतेला दूध ही अत्यंत महागत घ्यावे लागते. भारतातील ब्राह्मणी उद्योगपती अमूल, मदर डेअरी, नंदिनी इत्यादि जनतेचे शोषण करत आहे. ट्रंप तात्यांना हे पाहावले नाही. त्यांनी भारतात स्वस्त दूध विकून दूध पिणार्‍या जनतेला शोषण पासून मुक्ति द्यायची आहे. पण आज भारतात मनुवाद समर्थक, ब्राह्मणवादी शेटजी सत्तेवर आहेत. ते काही अमेरिकेला भारतीय जनतेचे भले करू देत नाही. उलट रशियाकडून क्रूड ऑइल घेऊन, स्वच्छ करून भारतील ब्राह्मणवादी उद्योगपती अरबो डॉलर कमवितात आहे. भारतीय जनतेचे शोषण करून रशियाला युद्धात मदत करत आहे.   

तात्यांनी टेरिफ लावून भारतातील गरीब जनतेला ब्राह्मणवादाविरुद्धच्या संघर्षात मदत केली आहे. सर्व पुरोगामी मंडळींनी तात्यांचे आभार मानले पाहिजेत—कारण हा संघर्ष केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचा यज्ञ आहे.

 
 

No comments:

Post a Comment