Monday, October 14, 2024

आरक्षण चोरी

आरक्षण एकाला मिळाले आहे आणि दुसरा त्याच्या आरक्षणाचा फायदा घेऊन त्याच्या जागी नोकरीला लागतो. विचित्र वाटले ना. पण हे सत्य आहे. आरक्षणाची ही चोरी होते आणि तीही "डंके के जोर प

सरकारी नोकरी लागून मला तीन चार वर्ष झाले असतील. एक दिवस चार्टर बस मध्ये एका बाबू ने ही कहाणी सांगितली. त्यांच्या कार्यालयात काम करणारा एक शिपाई सुशील एका रविवारी, आपल्या नातलगला भेटायला डीटीसी बसने गेला. जिथे तो उतरला, त्या बस स्टॉप जवळ एक चर्च होते. तिथे त्याला सतीश दिसला. दोघांनी एका दुसऱ्याला नमस्कार चमत्कार केला. सुशील ने सतीशला विचारले, तू इथे चर्च बाहेर काय करतो आहे. सतीश म्हणाला, मी इसाई आहे. दर रविवारी, प्रार्थनेसाठी इथे येतो.


सोमवारी ऑफिस मध्ये आल्यावर सुशीलच्या लक्षात आले. सतीशची क्लार्क पदावर नियुक्ती एससी कोट्यातून झाली होती. सुशील ही एससी होता. तो गेल्या तीन चार वर्षापासून एसएससीची क्लार्क ग्रेडीची परीक्षा देत होता, पण त्याच्या हाती निराशा येत होती. सरकारी भरतीत इसाई लोकांना आरक्षण नाही, हेही सुशीलला माहीत होते. आपण नापास झालो त्याचे कारण सतीश सारखे आरक्षण चोर. त्याची तळपायातील आग मस्तकात गेली. तो सतीशची तक्रार करायला प्रशासनिक अधिकाऱ्याच्या चेंबर मध्ये गेला. तो म्हणाला सर, सुशील हा एससी नाही, इसाई आहे. अधिकाऱ्याने विचारले, हे तुला कुणी सांगितले. सुशील म्हणाला, स्वतः सतीश ने मला हे सांगितले. तुम्ही म्हणाल तर मी लिखित तक्रार करायला तैयार आहे. त्याची इन्क्वायरी करून त्याला नोकरीतून बरखास्त करा. अधिकारी सुशीलला समजावत म्हणाला, चर्च जाणे, गळ्यात क्रॉस घालणे, घरात मदर मेरीची मूर्ती ठेवल्याने कोणी इसाई होत नाही. सरकारी कागदावर तो एससी आहे. जोपर्यंत तो सरकारी कागदावर तो एससी आहे, तो पर्यंत आपण काहीही करू शकत नाही. सुशील नेत्याच्या ओळखीच्या दलित ने

त्यांना ही याबद्दल माहिती दिली पण कोणीही काहीही केले नाही.


ही तर झाली चाळीस वर्षांपूर्वीची कथा. आज पर्यंत लाखो दलितांचे धर्म परिवर्तन झाले आहे. पण सरकारी नौकरीसाठी कागदावर ते आज ही दलित हिंदू आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकाही दलित नेत्याने या आरक्षण चोरीचा कधी विरोध केलेला मला तरी स्मरणात नाही. आता तर धर्मांतरित कर्मचारी नौकरी लागल्या नंतर डंके की चोट पर आपण मसीह आहोत सांगतात. २६ डिसेंबरला केक घेऊन कार्यालयात येतात, वाटण्यासाठी. हिंदू दलित कर्मचारी विवश होऊन हा तमाशा बघतात.


बाकी वेगळा विषय. फक्त दलित नव्हे तर इतर जातींचे लाखो लोग धर्म परिवर्तन केल्या नंतर ही सरकारी कागदांवर आणि सार्वजनिक जीवनात हिंदू राहतात. यात अनेक नेता ही असतील. हिंदू शब्द याच लोक असते. क्रिफ्टो क्रिश्चन हा शब्द या लोकांसाठीच वापरला आहे.

No comments:

Post a Comment