या वेळी सर्वच सर्व्हे वाल्यांचे अंदाज चुकले. कारण काय. काही दिवसांपूर्वी पार्क मध्ये फिरताना एका चॅनल साठी सर्व्हे करणाऱ्या कंपनीत काम करणारा भेटला. त्याला हा प्रश्न विचारला. तो म्हणाला सर्व्हे करताना आम्ही प्रत्येक लोकसभेच्या मतदारांचे ही विश्लेषण करतो. उदाहरण उत्तर प्रदेशचा विचार केला तर किती अल्पसंख्यक आहेत. यादव किती इत्यादी.(कारण यादव+ मुस्लिम युती होती). महाराष्ट्रात मराठा समाजाचाही विचार (M+M युती) केला. वंचितांचा ही विचार केला. पण एक चूक झाली जिथे अल्पसंख्यक मतदार १५ टक्के होते. सर्व्हेत त्यांना १५ टक्के वजन दिले. जगात इजरायल हमास युद्ध, युरोपातील आंदोलने पाहता अल्पसंख्यक समाजाला वाटते भारतात ही लवकर शरिया राज्य येईल. यासाठी अल्पसंख्यक समाजाने ८० टक्यांच्या वर मतदान केले. त्यात ही ९५ टक्के अल्पसंख्यक मतदारांनी इंडीला मतदान केले. इंदोर मध्ये इंडी उमेदवार नव्हता तरीही २.१४ लक्ष अल्पसंख्यक समाजाने नोटाला मतदान केले. तो म्हणाला जिथे १५ टक्के अल्पसंख्यक आहेत आणि मतदान ५० टक्के झाले असेल तर सर्व्हेत अल्पसंख्यक मतांना वजन २६ टक्के दिले पाहिजे, ५५ टक्के मतदान असेल तर २२-२३ टक्के आणि ६० टक्के असेल तर २० टक्के. असे केले असते तर अंदाज चुकले नसते. त्याने आपल्या उच्च अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला होता पण त्यांनी तो लक्षात घेतला नाही. त्यामूळे अधिकांश सर्व्हे चुकले.
महाराष्ट्रात मुस्लिम इसाई मिळून १८ टक्के आहेत. ते भाजपला कदापि मत देणार नाही. कसाबला फासावर लटकवणारे उज्ज्वल निकम ही पराजित झाले. त्यांच्यासाठी ही मतदान करायला मुंबईची जनता आली नाही. देशातील मध्यम वर्ग मतदान बाबत भयंकर उदासीन आहे. दिल्लीतील एका सोसायटीत २७० मते होती फक्त ९० लोकांनी मतदान केले. उज्ज्वल निकम जर दिल्लीतून उभे राहिले असते तर रिकॉर्ड मतांनी जिंकले असते. असो.
मला ही त्याचे म्हणणे पटले. दिल्लीत मतदान २०१९ पेक्षा दोन टक्के कमी झाले. जिंकण्याचे मार्जिन ही कमी झाले. महाराष्ट्रात भाजपला २०१९ जेवढे मते मिळाली. पण शिवसेनेचे २४ टक्के मते होते त्यातली १६ टक्के उद्घव आपल्या सोबत टिकविण्यास सफल झाले. दादा फक्त तीन टक्के मत आणू शकले. त्यामुळे युतीला ५१ टक्के जागी ४३ टक्के मते मिळाली. आघाडीला ही ४३ टक्के हून थोडी जास्त पण जागा जास्त मिळाल्या.
महाराष्ट्र विधानसभे बाबत बोलायचे तर अल्पसंख्यक समाजाच्या १८ पैकी १५ मतदान करतील. सर्व युती विरोधातच. आघाडीच्या खिश्यात १५ मते आधीच आहे. उरलेल्या ८२ टक्के हिंदू जैन इत्यादी पैकी किती मतदान करणार, किती जातीला महत्त्व देतात. त्यावर विधान सभेचा निकालाची भविष्यवाणी केली जाऊ शकते. मतदान टक्का वाढला नाही तर युतीचा पराभव अटळ आहे.
No comments:
Post a Comment