Thursday, November 18, 2021

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

माणसाचे शरीर पंच तत्व -  माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन)  पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे.  आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे  या पद्धती सामान्य जनतेपासून  दूर गेल्या. 

आधुनिक काळात भारतात प्राकृतिक चिकित्सा प्रचलित करण्यात  महात्मा गांधी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एडोल्फ जूस्टची पुस्तक रिटर्न टु नेचर या पुस्तकाने महात्मा गांधींना प्रभावित केले. त्यांनी  18 नोव्हेंबर 1945 मध्ये 'ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट' स्थापना केली. आज या जागेत आयुष मंत्रालयच्या अंतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आहे. आयुष मंत्रालयाने 2018 मध्ये 18 नोव्हेंबर हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून घोषित केला. आज अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्रात  औषधांचा वापर न करता, माती, पाणी, ऊन, वाष्प, योग, आहार नियंत्रण इत्यादि द्वारा रुग्णांचा  उपचार केल्या जातो. आयुर्वेदातील पंचकर्म, षटकर्म चिकित्सा ही दिली जाते. भारतातील विद्यमान अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्र सामाजिक संस्थांद्वारे चालविले जातात. स्वस्त असूनही ही चिकित्सा पद्धतील लोक मान्यता मिळाली नाही. लोकांचा विश्वास या पद्धतीवर बसत नव्हता. मुख्य कारण, आधुनिक मापदंडवर प्रमाणिकता सिद्ध करण्यासाठी अनुसंधानवर खर्च करणे या संस्थांच्या आवाक्या बाहेर आहे. याशिवाय सरकारची भारतीय चिकित्सा पद्धतींबाबत अनास्था. आयुष मंत्रालयाची स्थापनाच 2014 मध्ये झाली. अल्प बजेट असले तरी थोडे फार अनुसंधान कार्य ही मंत्रालयाने  सुरू झाले आहे. भविष्यात बजेट ही वाढेल आणि परिणाम ही उत्तम मिळतील ही अपेक्षा. 

करोना काळात आमच्यापाशी औषध नाही. तरीही प्रोटोकॉलानुसार  एलोपैथीची रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्वीन , फेबुफ्लू इत्यादि कोरोंना विषाणू विरुद्ध निरर्थक औषधी दिल्या गेल्या.  परिणाम हजारो डॉक्टर सहित लाखो रुग्ण दगावले. करोना आणि औषधींचे साईड इफेक्ट ही  मुख्य कारणे.  दुसरीकडे  प्रकृति प्रदत्त  गिलोय, अश्वगंधा  इत्यादि  औषधी प्रभावी ठरल्या. परिणाम, दिल्लीचेच बघा प्रोटोकॉल मध्ये नसतानाही दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल रुग्णांना काढा देऊ लागले.  का? याचे उत्तर मला एक ही डॉक्टर देऊ शकला नाही. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये कार्य करणारे अधिकान्श कर्मचारी स्वतचा प्राण वाचविण्यासाटी  ज्याला आयएमए शिव्या देते त्या रामदेवचे कोरोनील घेऊ लागले. सकाळी उठून योग आणि प्राणायाम करू लागले. अधिकान्श करोना रुग्णांनी एलोपैथी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली, हे सत्य मेडिकल माफियाला पचणे कठीणच. अर्थात खर्‍या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण असणार्‍या डॉक्टरांनी कधीच प्रामाणिक आयुर्वेदिक औषधींचा करोना काळात विरोध केला नाही. 

पतंजलिने योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सेवर अनुसंधानासाठी पतंजलि रिसर्च फाउंडेशन आणि पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटची स्थापना केली आहे.  करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. पतंजलिने जगातील सर्वात मोठे प्राकृतिक चिकित्सा केंद्र योगग्रॉमची स्थापना 2009 मध्ये केली होती जिथे  400  निवासी रुग्ण एका वेळी निवासी  प्राकृतिक  चिकित्सा घेऊ शकत होते. पण 2020 एप्रिल पासून ही  क्षमता नवे निर्माण करून अल्पावधीत 1000 पर्यन्त वाढवावी लागली. सीजीएचएस ने ही सरकारी कर्मचार्‍यांसाठी  एप्रिल 2021 पासून काही आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सा केंद्रांना पंचकर्म, षटकर्म सहित प्राकृतिक चिकित्सेसाठी अनुमति दिली. आज अनेक प्राकृतिक चिकित्सा केंद्र ही आपले विज्ञापन, फेसबूक वर का होईना, देऊ लागले आहे. करोना काळात लोकांचे डोळे उघडले. अधिकान्श रोगांत  प्राकृतिक उपायच अधिक कारगर आहे, हे कळले.   निसर्ग प्रदत्त चिकित्सेचे भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. प्राकृतिक चिकित्सा दिवसाची सर्वांना शुभेच्छा.No comments:

Post a Comment