Thursday, January 7, 2021

लाज वाटायलाच पाहिजे

 

एका मराठी अभिनेत्रीने आपल्या गोल-मटोल नग्न शरीराचे चित्र  सोशल मिडिया वर प्रदर्शित केले. तिने मोठ्या गर्वाने म्हंटले "मला माझ्या  शरीराचे प्रदर्शन करण्याची लज्जा वाटत नाही. मला माझ्या या बैडोल शरीरावर गर्व आहे."

आपण एक कार विकत घेतो. एक निश्चित अवधी नंतर कारची दुरुस्ती इत्यादी करतो. कारण आपल्याला माहित असते, कार खराब झाली तर दुर्घटना होईल आणि आपल्या प्राणांवर बेतेल. आपल्या घराचीहि आपण वेळो-वेळी साफ सफाई, दुरुस्ती इत्यादी करत राहतो. आपल्या प्राणाच्या  सुरक्षेसाठी. 

आपल्या शरीरात आपले प्राण सुरक्षित राहतात. प्रारब्ध कर्मामुळे जर आपल्याला स्वस्थ्य शरीर मिळाले नाही तर आपला इलाज नसतो. पण जर परमेश्वराने प्रदान केलेल्या स्वस्थ्य शरीराची निगा ठेवली नाही तर आपले शरीर व्याधिग्रस्त होईल, गोल-मटोल होईल. अर्थात हे सर्व आपल्याला माहित असते. तरीहि आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. तसे म्हणल तर शरीराला स्वस्थ्य आणि सुडौल करण्याचा थोडासा प्रयत्न सर्वच  वेळोवेळी करत असतात. पण अश्या  बैडोल शरीरावर आपण गर्व करत नाही.

त्या अभिनेत्रीला आपल्या नग्न शरीराचे प्रदर्शन करण्याची एवढीच इच्छा होती तर योग्य आहार आणि  व्यायाम  करून  आधी शरीराला सुडौल स्वरूप प्रदान  केले असते. मग त्या अभिनेत्रीने गर्वाने म्हंटले असते पहा माझे दोन्ही चित्र. पहा मी  कसे आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या बैडोल शरीराला सुडौल स्वरूप प्रदान केले. सर्वांनी तिचे कौतुकच केले असते.  तिला तिच्या शरीराचा गर्व करण्याचा अधिकार होता.  

बैडोल शरीरावर कुणालाही गर्व वाटला नाही पाहिजे. असे शरीर आपल्याला अनेक कष्ट आणि दुख देणार, आनंद देणार नाही. बाकी तिचे शरीर तिची इच्छा. असो.

 

 

 

No comments:

Post a Comment