आज आषाढी एकादशी
विठ्ठल नाही पंढरपुरी
भक्ताच्या दर्शनासी
गेला तो मुंबापुरी.
मला वाटते कधी-कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते. महाराजांची कुलदैवत आई तुळजा भवानी. आसुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अफजल खानाने आईची विटंबना केली. महाराजांच्या जागी दुसरा कुणी असता तर त्वेषाने खानवर तुटून पडला असता. हजारो मावळे शहीद झाले असते. स्वराज्याचे स्वप्न हि भंगले असते. अश्या प्रसंगी हि महाराज शांत राहिले. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले.
विठ्ठल तर भक्तांचा देव. भक्तांचे कष्ट पाहून तो नाथा घरी पाणी भरायला गेला. भानुदासाला वाचविण्यासाठी शुष्क काष्ठाला हिरवे केले. जिथे कठोर तपस्येनंतर देवांचे दर्घडते इथे पंढरीत तर साक्षात पांडुरंग भक्तांच्या दर्शनासाठी विटेवर उभे आहेत, अनेक युगांपासून. आपल्या एका भक्ताला इथे येण्यापासून आसुरी शक्तींनी रोखले आहे, हे पांडुरंगाला कळणारच. मग त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्याच्या घरी जाणारच. अर्थात हि साधी सौपी गोष्ट आसुरी शक्तींच्या अधीन असणार्या मूर्खांना कळणे अशक्यच. आज पांडुरंग चरणी एकच प्रार्थना. पांडुरंगा तू दयाळू आहे, आपल्या सर्व अज्ञ लेकरांना क्षमा कर, क्षमा कर.
No comments:
Post a Comment