द्वापर युगात कृष्ण झाला. कृष्णाने इंद्राच्या कोपापासून वृंदावनला वाचविण्यासाठी गोवर्धन पर्वताची पूजा केली. हिरव्या वनस्पतीच्या वस्त्रांनी गोवर्धन पर्वताचा शृंगार केला. त्याच्या पायथ्याशी ९९ तीर्थ बांधले. नानाविध पक्ष्यांचा गुंजारव. फळे-फुलांचा सुगंध. साक्षात स्वर्गच वृंदावनात उतरला. ब्रज वासी सुखी आणि संपन्न झाले. इंद्र पराजित झाला.
कलयुगात बिल्डर कृष्णाने, पर्वतांना फोडून गिट्टी तैयार केली. तीर्थांना(तलाव) बुजवून तिथे मोठ्या-मोठ्या इमारती बांधल्या. इमारतींपर्यंत पोहचण्यासाठी भव्य रस्ते बांधले. त्या साठी मार्गात येणारे पर्वत, वन-उपवन पशु-पक्षी सर्वांचा विनाश केला. भव्य इमारती तैयार झाल्या. पण पाणीच नव्हते. पाण्यासाठी भांडणे झाली, युद्ध झाले, संपूर्ण मानवजातीचा विनाश झाला. इमारती ओसाड पडल्या. साक्षात नर्क पृथ्वीवर अवतरला. आपल्या स्वार्थासाठी पृथ्वीवरच्या जीवांचा संहार करणारा मानव नावाचा दैत्य हि नष्ट झाला. विशेष म्हणजे मानव नावाच्या दैत्याला मारण्यासाठी इंद्राला युद्ध करावे लागले नाही, वज्र हि चालविण्याची गरज पडली नाही.
टीप: भागवतात कृष्णाने ९९ तीर्थ बांधले असे वर्णन आहे.
No comments:
Post a Comment