चिमण्यांची चिव चिव नाही
कावळ्यांची कावं कावं आहे .
पहाटेच्या वाऱ्यालाही
पेट्रोलचा दुर्गंध आहे.
सुकलेल्या नळांना
पाण्याची तहान* आहे.
विजेचा झटका बघा
घामाने कासाविस आहे.
कचऱ्याच्या ढिग्यार्यांवर
डुकरांचा वाद आहे.
डॉक्टरांच्या मदतीला आज
डेंगू आणि मलेरिया आहे.
क्षयग्रस्त फुप्फुसाना आता
यमराजाचीच वाट आहे.
दारूचा सुकाळ आहे
नित नवे परवाने आहे
नशा विरुद्ध लढ्याचा
झिंगणारा आगाज* आहे.
नित नवे परवाने आहे
नशा विरुद्ध लढ्याचा
झिंगणारा आगाज* आहे.
टीप:
तहान = वर्षभर आधी रस्त्यावरची नळाची पाईपलाईन तुटली अजूनही ठीक झाली नाही. हि परिस्थिती अनेक ठिकाणी आहे.
आगाज = एका वर्षात थोक भावात दारूचे परवाने व बारचे परमिट दिले दिले. यालाच म्हणतात नशा विरुद्ध युद्ध.
No comments:
Post a Comment