(महाभारताची कथा जर आज घडली असती तर..)
कुरुक्षेत्रच्या रणांगणातून जीव मुठीत घेऊन दुर्योधन पळत-पळत २१व्या शतकातल्या दिल्ली नगरीत युमुनेच्या काठावर असलेल्या निगमबोध घाटाकाठी येऊन पोहचला. दुर्योधनाने सुटकेचा निश्वास टाकला," वाचलो एकदाचा". आता भीम, कृष्ण आणि पांडव माझे काहीही करू शकत नाही. त्यांना यमुनेच्या जळात मला शोधणे शक्य नाही.
नदीत उडी टाकण्याच्या तैयारीत असलेल्या दुर्योधनाकडे पाहून भीम जोरात ओरडला. भ्याडा, महाराज धृतराष्ट्र यांचा खरा पुत्र असेल तर समोर ये. माझ्याशी युद्ध कर. जिंकला तर तुला राज्य मिळेल आणि हरला तरी स्वर्गात जाशील. कुरुवंशाला कलंकित करू नको. पण दुर्योधनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दुर्योधनाने तुच्छ नजरेने भीमाकडे बघितले आणि म्हणाला, मूर्खा तू किती हि टाकून बोलले तरी काही लाभ नाही. मी यमुनेत उडी घेतो आहे, हिम्मत असेल तर तूही उडी टाक. माझा वध करण्याची प्रतीज्ञा पूर्ण कर. यमुनेच्या तळाशी आपण मल्ल युद्ध खेळू म्हणत, दुर्योधनाने पाण्यात उडी घेतली.
दुर्योधन यमुनेच्या तळाशी पोहचला. दुर्योधनापाशी पाण्यातून प्राणवायू शोषणाची सिद्धी होती. पाण्यात असणार्या प्राणवायू शोसून जलचर पाण्याच्या आत हि जिवंत राहतात. पण आजच्या २१ शतकात कारखान्यातून निघणार्या विषारी रसायनांमुळे यमुनेचे पाणी विषाक्त आणि प्राणवायू रहित झाले होते. यमुनेच्या पाण्यात सुश्म जलचर जीवांना हि जिवंत राहणे अशक्य नव्हते. यमुनेच्या तळाशी आल्यावर दुर्योधनाने आपल्या सिद्धीच्या मदतीने श्वास घेण्याचा प्रयत्न केला. प्राणवायू रहित घातक विषारी पाणी नाकपुड्यांच्या वाटे त्याच्या शरीरात शिरले. त्याला श्वास घेणे अवघड झाले. त्याने विचार केला, वर जाऊन भीमाशी युद्धकरून वीर मरण पत्करणे जास्त योग्य. त्याने पाण्यातून वर येण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रदूषित पाण्यातून तो वर येऊ शकला नाही. दुर्योधनाचा त्या विषाक्त पाण्यात तडफडून अंत झाला.
No comments:
Post a Comment