Thursday, September 4, 2025

ब्रज रक्षक गोवर्धन


हिरव्यागार वस्त्रांनी नटलेला गोवर्धन पर्वत आकाशात उंच मानकरून उभा होता. दूर यमुने पर्यन्त पसरलेले हिरवेगार कुरण. पायथ्याशी कमळ दलांनी भरलेले अनेक सरोवर असलेला सुंदर ब्रज परिसर  सारस, बदके, हंस इत्यादि चित्र विचित्र पक्षी, हरिण ,व्याघ्र सहित अनेक वन्यप्राण्यांनी सुशोभित होता. यमुनेच्या काठी कदंब, आंबा, पेरु, इत्यादि  नाना वनस्पति आणि वृक्षांनी आच्छादित कुंजवन होते. एक दिवस पशू पालक आपल्या गायी, म्हशी, बकर्‍या घेऊन या परिसरात आले. मानवी स्वभावानुसार घर बांधण्यासाठी आणि जाळण्यासाठी  वृक्ष तोड केली. पण नवीन वृक्ष लागवड केली नाही. काही काळांत गोवर्धन पर्वत वनस्पति विहीन झाला. फक्त माती आणि दगडे शिल्लक उरली. दर पावसाळ्यात दरड कोसळू लागली. गोवर्धंनाच्या पायथ्याशी असलेली सरोवरे ही माती दगडांनी भरून गेली. यमुना काठचे कुंजवन ही नाहीसे झाले. वन्य प्राणीही ब्रज परिसर सोडून निघून गेले. 

एक दिवस वादळ आले. मेघ गर्जना सहित भयंकर पाऊस कोसळू लागला. यमुनेला भयंकर पूर आला, तिला रोखण्यासाठी काठावर वृक्ष नव्हते. यमुनेचे पानी गावांत शिरले. दुसरीकडे वृक्ष विहीन गोवर्धन पर्वताचे अनेक कडे ढासळले. गोवर्धन पर्वतावरून चिखलाचा पूर ही गावांत शिरला. शेकड़ों घरे जमींदोस्त झाली. शेकडो गोपालक आणि हजारों पशु पाण्यात वाहून गेले. सर्वांना वाटले हा देवराज इंद्रचा कोप आहे. देवराज इंद्रला प्रसन्न करण्यासाठी यज्ञाचे आयोजन करण्याचा निश्चय केला. पण श्रीकृष्णाने यज्ञाचा विरोध केला. श्रीकृष्ण म्हणाला, आपल्याच मूर्खपणामुळे आपल्या वर ही आपत्ति आली. आपणच गोवर्धन पर्वतावरील आणि  यमुनेच्या काठी असलेली झाडे आणि वनस्पति नष्ट केली. आपण विसरून गेलो गोवर्धन पर्वत आपला रक्षक आहे. आपण स्वार्थाने आंधळे होऊन  मूर्खपणा केला नसता तर या भयंकर पावसाने आपले नुकसान केले नसते. गोवर्धन पर्वताला पूर्वीचे वैभव प्रदान करणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाचे म्हणणे सर्व गोपालकांना पटले. श्रीकृष्णाच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा गोवर्धन पर्वतानवर वृक्ष लागवड केली. पायथ्याशी असलेल्या सरोवरांना पुन्हा जिवंत केले. या शिवाय श्रीकृष्णाने 99 सरोवरांचा निर्माण केला. यमुनेकाठी हजारों वृक्ष लाऊन कुंजवनांची निर्मिती केली. 

काळ बदलला. ब्रज परिसर पुन्हा पूर्वी सारखा हिरवळीने समृद्ध झाला. वन्य प्राणी पशू-पक्षी तिथे पुन्हा परतले. एक दिवस पुन्हा भयंकर पाऊस आला. पण या वेळी चिखलचा पूर आला नाही. परिसरतील शेकडो सरोवरांनी पावसाचे पानी साठवून घेतले. यमुना काठावरच्या वृक्षांनी पूरचा जोर कमी केला. गोपालक आणि त्यांचे पशू सुरक्षित राहिले. गोवर्धन पर्वताने बृजची रक्षा केली. 

आपण निसर्गाचे  संरक्षण केले की निसर्ग आपली रक्षा करतो, हा मार्ग श्रीकृष्णाने जगाला दाखविला. निसर्ग सुरक्षित राहावा यासाठी आपल्या ऋषींनी  पर्वत, नद्या, सरोवरे, जंगल इत्यादींना देवत्व प्रदान केले.   

आज आपण स्वार्थी झालो आहोत. आपल्या शूद्र स्वार्थांसाठी निसर्ग नष्ट करत आहोत. परिणाम भयंकर पूर येऊ लागला आहे, पर्वत कोसळू लागले आहेत. हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहे. मानव जातीला वाचवायचे असेल तर आज पुन्हा श्रीकृष्णाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करण्याची गरज आहे.   

No comments:

Post a Comment