नदीचे दोन्ही किनारे हसत-खेळत समुद्राला भेटण्यासाठी निघाले. दोन्ही किनारे एकत्र प्रवास करत समुद्राला सहज भेटले असते. न जाणे त्यांच्यात काय घडले. ते श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने ग्रस्त झाले. दुराग्रहाची इंगळी ही त्यांना डसली. डाव्या किनार्याला वाटत होते, त्यालाच समुद्राकडे जाण्याचा मार्ग माहीत आहे. उजव्या किनार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्या किनार्याला वाटायचे, डावा किनारा मूर्ख आहे, त्याला काहीच कळत नाही. समुद्राकडे जाण्याचा मार्ग फक्त त्यालाच माहीत आहे, डाव्या किनार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. त्यांच्यात रोज विवाद होऊ लागले. एकदा भांडण विकोपाला गेले. डावा किनारा पूर्व दिशेकडे वळला तर उजवा किनारा पश्चिम दिशेकडे वळला. दोन्ही किनार्यामध्ये साठलेले नदीचे पानी वाळवंटात वाहून गेले.
पाण्या अभावी त्यांना पुढे जाण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. दोन्ही किनारे पाण्याअभावी तडफडत-तडफडत वाळवंटात नष्ट झाले.
नदीचे पाणी म्हणजे नवर्या-बायकोचे प्रेम. सुखी संसारासाठी हे प्रेम नेहमी जपून ठेवले पाहिजे. त्यासाठी सर्वस्व त्याग करावा लागला तरी केला पाहिजे.
No comments:
Post a Comment