Friday, April 11, 2025

काळाजी गरज: मेकाले नव्हे कौशल युक्त गुरुकुल शिक्षण पाहिजे

  


आजच्या शिक्षणाचे दोन वाक्यात वर्णन करता येते. पहिले वाक्य विषय पाठ करा. दुसरे वाक्य पाठ केलेले कागदावर लिहा किंवा टंकित करा. याचे एक उदाहरण एकदा एक मुनि  जंगलातून जात होते. मुनिला शिकारीच्या जाळ्यात अटकलेले काही पोपट दिसले. मुनिने पोपटांना जाळ्यातून मुक्त केले. मुनि ने विचार केला, आज मी या पोपटांना शिकार्‍याच्या जाळ्यातून मुक्त केले. पण भविष्यात पुन्हा हे पोपट जाळ्यात अटकू शकतात.   मुनिने शिकारी पासून सावधान राहण्यासाठी पोपटांकडून पाठ करून घेतले, शिकारी येणार, जाळे टाकणार, त्यावर दाणे टाकणार, आम्ही दाणे खाणार नाही, शिकारीच्या जाळ्यात अटकणार नाही. पोपटांना हे पाठ झाले याची खात्री झाल्यावर मुनि आपल्या मार्गाने निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिकारीने पुन्हा जाळे  लावले, त्यावर दाणे टाकले. पोपट जाळ्याकडे पाहत जोरात बोलू लागले, शिकारी आला, जाळे टाकले, त्यावर दाणे टाकले, आम्ही दाणे खाणार नाही. असे ओरडत सर्व पोपट दाणे खाण्यासाठी जाळ्यावर उतरले. मुनिने पोपटांकडून पाठांतर करून घेतले होते पण प्रात्यक्षिक ज्ञान दिले नव्हते.   

आपल्या देशातील मैकाले शिक्षण व्यवस्थेत 90 टक्के शिक्षण यातच येते. सरकारी नौकरी सोडून कुठेही कौशल रहित  शिक्षणाचा उपयोग नाही. 21 वर्षे (18+3) वर्ष शिक्षण घेऊन ही अधिकान्श तरुणांसमोर पुढे काय कराचे हा भला प्रश्न चिन्ह असतो. कारण त्यांच्यापाशी कोणत्याही विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान नसते.  मग शिक्षण कसे असावे हा प्रश्न मनात येणार. याचे उत्तर अथर्ववेदात गुरुकुलात प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार केले पाहिजे यात सापडते.

आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्तः

तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवाः

अथर्व० ११।५।३


शब्दार्थ : आचार्य उपनयन संस्कार करून शिष्याला गुरुकुलात प्रवेश देतो. ज्या प्रमाणे आई आपल्या उदरात गर्भाचे पोषण करते तसेच आचार्य तीन रात्री शिष्याचा सांभाळ करतो. त्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्या तेजस्वी ब्रह्मचारीला आशीर्वाद देण्यासाठी देवता/ विद्वान जन तिथे येतात.

इथे तीन रात्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण. त्यासाठी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक विद्यार्थीला गरजेचे.  अज्ञानी ब्रम्हचारी हा पशु समान असतो. आचार्यचे पहिले कार्य आपल्या शिष्यावर उत्तम संस्कार करणे. विद्यार्थी, धैर्यवान, क्षमाशील, संयमी, शरीर आणि मन शुद्ध ठेवणारा, चोरी करणारा, असत्य बोलणारा, इंद्रियांवर नियंत्रण असलेला अर्थात हिंसा, द्वेष, लोभ, मोहांपासून दूर राहणारा, मानवीय गुणांनी संपन्न असा निर्मित झाला पाहिजे. अशक्त शिष्य ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ ठरतो. गुरुकुलांत ब्रम्हचारी  शारीरिक व्यायाम, योग, प्राणायाम कार्याचे. त्यांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ झाल्याने ज्ञान  प्राप्त करण्यासाठी  परिश्रम  ते करू शकत होते.  ज्ञान प्राप्ती नंतर  पुरुषार्थ करून धर्म मार्गावर चालत अर्थ अर्जित करून, संसारीक भोग भोगून, मोक्षाच्या वाटेवर चालण्याची क्षमता निर्मित करणे ही गुरूचे कार्य. गुरुकुलातून ज्ञान प्राप्त करून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना सर्व साधुवाद देतीलच.  याचे उदाहरण, वैदिक गुरुकुलात शिकलेले स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत.

गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी मेकाले पूर्व भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांचा उल्लेख आपल्या "रमणीय वृक्ष' (The Beautiful Tree) या पुस्तकात केला आहे. यात विलियम अडम्स, जी.डब्लू लिटणर सहित अनेक ब्रिटीश अधिकार्यांनी १८२० ते १८४० च्या कालखंडात पंजाब, मुंबई, बिहार, ओडिशा आणि चेन्नई प्रांतात केलेले भारतीय शिक्षणाचे दस्तावेज आहेत. या दस्तावेजानुसार काही निष्कर्ष मी काढण्याचा प्रयत्न केला.

शिक्षण सर्व जातीतल्या मुलांसाठी खुले होते. मद्रास प्रांतात तिन्नेवेली जिल्ह्यात शुद्रांची संख्या ८४ टक्के तर, सेलम मध्ये ७०टक्के होती.  ब्राम्हणांची मुले ते ६व्या वर्षी तर शुद्रांची ते वर्ष झाल्यावर शिक्षण सुरू करायची. प्राथमिक शिक्षण ज्यात विद्यार्थी  स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि आणि त्या वेळचे सामान्य ज्ञान प्राप्त करायचे. आजच्या हिशोबाने वी पास झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे कौशल धातू विद्या, लोह, तांबा पितळ, स्वर्ण इत्यादी. लाकडाचे कार्य, दगडावर शिल्प, तलावांची निर्मिती, स्थापत्य कला, साबण निर्मिती, विभिन्न प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती, इत्यादी इत्यादि. या शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आयुर्वेद आणि  औषधी निर्मिती, सांख्य, साहित्य, तंत्र शास्त्र ही शिकवल्या जात असे. शिष्याला विषय100 टक्के आत्मसात झाल्या शिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होत नसे. गुरुकुलांत शिक्षणाचा उद्देश्य विद्येचा व्यावहारिक पक्ष ही शिष्याने आत्मसात केला पाहिजे हा होता. त्या विषयाच्या विद्वानांकडून प्रात्यक्षिक ज्ञान  विद्यार्थी घेत असे. एक विद्यार्थी 8 वर्षांत ज्ञान प्राप्त करत असे तर दुसर्‍याला 16 वर्ष ही लगायचे१८२५ मध्ये चेन्नई प्रांतात ,५०,००० विध्यार्थी शिक्षा ग्रहण करायचे इंग्लेंड पेक्षा दुप्पट.बिहार आणि बंगाल मध्ये लाख गुरुकुल होते. १०० उच्च शिक्षा देणारे संस्था होत्या. वस्त्र, भोजन, निवारा इत्यादी सुविधा स्थानिक गावातील लोक पुरवायचे. अधिकांश शिक्षक ब्राह्मण कायस्थ असले तरी ३० जातींचे शिक्षक होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक त्याकाळी सर्वात  अंत्यज  समजणार्‍या चांडाळ जातीचे होते. दक्षिणेत ब्राम्हणेतर शिक्षकांची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त होती. 

त्याकाळी अस्पृश्यता असली तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले होते. मलबार जिल्ह्यात वैद्यक शास्त्र शिकणाऱ्या १९४ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के शूद्र  होते. फक्त ३१ ब्राह्मण होते. तर खगोल शास्त्र शिकणाऱ्या ८०० पैकी फक्त १३१ ब्राम्हण होते. स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर, ब्राम्हण मुली ३७ टक्के तर वैश्य शूद्र इत्यादी ११ ते १९ टक्के. त्याकाळी भारतात बहुतेक जगात सर्वात जास्त स्त्री शिक्षण होते. याचा अर्थ 1857 आधी जगात सर्वात जास्त साक्षरता भारतात  होती. 

1857 नंतर ब्रिटीशांना, फूट डालो आणि राज करो नीती राबवून जाती-जातीत वैमनस्य वाढविण्यासाठी खोटे प्रतीक आणि खोटा इतिहास जनतेच्या मनात रुजविणे गरजेचे होते. जुनी पाटी पुसल्या शिवाय नवे प्रतीक मनावर ठसवले जाऊ शकत नाही हे ब्रिटीशांना माहीत होते. त्यासाठी सर्व प्रथम भारतातील शिक्षण संस्थान नष्ट करण्याची गरज होती.  आपल्या शक्तीच्या जोरावर गुरुकुलांची आर्थिक नाळ कापून टाकली. सर्व गुरुकुलांना समाप्त केले. गावो-गावी असलेले 6 लाख गुरुकुल समाप्त झाले.  पुढील दोन पिढीत, अर्थात 50 वर्षांत, देशाची अधिकान्श जनता साक्षर पासून निरक्षर झाली. ब्रिटीशांना फक्त सरकारी कर्मचारी हवे होते  म्हणून  शाळा जास्त उघडल्या नाही. ज्या उघडल्या त्या ही मोठ्या शहरांमध्ये.  याचा सर्वात जास्त फटका आजच्या भाषेत म्हणाल तर ओबीसी आणि दलित समुदायला बसला. 90 टक्के दलित समुदाय निरक्षर झाला. ब्रिटीशांनी प्रचार माध्यम आणि खोट्या इतिहासाच्या माध्यमातून यासाठी उच्च वर्गाला जवाबदार ठरविले. उत्तर भारतात शिक्षण नष्ट झाले. थोड्या बहुत ब्राम्हण आणि वैश्य जनतेला घरात किमान साक्षर होण्याचे शिक्षण मिळत होते. फक्त दक्षिण भारतात, काही गुरुकुल विपरीत परिस्थितीत जिवंत राहिली. त्यामुळे वेदांचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान वाचले. आपले ज्ञान नष्ट झाल्याचे एक उदाहरण-  पाणीदार शहरांचा, गावांचा आणि घरांचा निर्माण करण्याची विद्या जवळपास नष्ट झाली. मी जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात राहत होतो तिथे पावसाचे सर्व पाणी बेड्यात (आंगणात) पडायचे. (आयताकार वाड्याच्या मध्यभागी बेडा होता). 30 फुट खोल असलेल्या हेंडपंपचे पाणी गोड असायचे. 150 पूर्वी पाण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर घरांची आणि नगरांची निर्मिती व्हायची. 1947 मध्ये दिल्लीची जनसंख्या 4 लक्ष होती आणि 500 वर तलाव होते.  आजच्या वास्तुविदांना हे ज्ञान नाही. गुरुकुल शिक्षण मेकाले शिक्षणपेक्षा जास्त उत्तम आणि व्यावहारिक होते, हे कळते.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वेक्षणानुसार साक्षर भारतीयांना निरक्षर बनविण्याचे कार्य ब्रिटीशांनी मेकाले शिक्षण लादून केले.   आज जे स्वत:ला मागास म्हणवितात, अश्या जनतेला ब्रिटीशांनी निरक्षर आणि मागास  बनविले  हे ही कळते. 

भारताला स्वात्यंत्र मिळून 75 वर्ष झाली. अजूनही देशात मेकाले शिक्षण सुरू आहे. आज ही 18 वर्षाचा युवा कौशलहीन असतो. प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या उत्तम बाबी नवीन शिक्षण  व्यवस्थेत घेण्याचे गरजेचे आहे. आठवी नंतर 100 टक्के विद्यार्थ्यांना कौशल युक्त शिक्षण अनिवार्य करणे काळाजी गरज आहे.  बिना प्रात्यक्षिक शिक्षण देता स्नातक निर्माण करणे म्हणजे अशिक्षित बेरोजगार पैदा करणे.